ब्रेक अप...

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
27 Dec 2011 - 1:19 am

माझी अपेक्षापूर्ती न करणाऱ्या या अनामिक नात्याचा मला भयंकर कंटाळा आलाय बघ. तू म्हणशील पुरुष इथून तिथून सारखेच असतात, मलाही तसंच समज हवं तर. तुझे सारे आरोप अन् आक्षेप मला मान्य आहेत. हो, मीही पुरुष आहे. मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत. तुला तुझे करियर घडवायचे आहे. तू आता मध्यावर आली आहेस. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. तू जीव तोडून काम करतेस, प्रसंगी ओव्हर टाईमलाही थांबतेस. त्यामुळे होतं काय की तुझ्याकडे स्वतःसाठीच जिथे वेळ नसतो, तिथे माझ्यासाठी तू कधी वेळ काढणार, कधी मला एकांतात भेटायला येणार? नाहीच जमत ते तुला. गेले काही महिने तू मला जशी हवी होती तशी भेटत नाहीये. वाटतं तू मला टाळते आहेस, भेटण्याचे ठरवूनही येत नाहीस. प्रयत्न करते म्हणतेस अन् ऐनवेळी काहीतरी कारण पुढे करून मला हुलकावणी देतेस. त्यानंतर उडणारा विस्फोट मी शब्दांत नाही सांगू शकत. तू येणार म्हणून केलेली जय्यत तयारी तशीच वाया जाते. मानसिकच नव्हे तर शारीरिक खच्चीकरण केल्यासारखे होते. मी आतल्या आत कोमजून जातो. कशासाठी आपण हा अट्टहास चालवला आहे? असाही प्रश्न पडतो. कामधंदा सोडून तुझी प्रतीक्षा करीत रहावी अन् तू ‘वेळ नाही ना रे मिळाला, बघू पुढच्यावेळी भेटू..’ असं सहज म्हणतेस अन् माझ्या नजीक यायचं प्रकर्षानं टाळतेस. हे काही मला पटत नाही बघ. मी इतक्या आर्जवाने तुला बोलावतो, एकदातरी येच म्हणतो पण तू मात्र किती सफाईदार खोटे बोलून मला वाकुल्या दाखविल्यासारखे करतेस. तुझं हे खिजवणं आहे की तुझी मजबुरी हे कळायला मार्ग नसतो. मी प्रतिप्रश्न करताच तू तुझे अनेक प्रॉब्लेम्स सांगत सुटतेस. ‘घरी खूप कामं पडलीयेत रे, मला कामाहून घरी निघायलाच उशीर झालाय कसं भेटू शकते तुला? आज नाईटशिप करून थकलेय रे, नवऱ्याचा फोन आला होता त्याने लवकर बोलावलंय अरे, घरी पाहुणे आलेत काय करू रे? वेळच नाही बघ तुझ्याकडे यायला.’ अशी कितीतरी संयुक्तिक कारणे तू मला सुनावून सहीसलामत (हसत) सुटतेस.
मग मला प्रश्न पडतो की हे अनैतिक संबंध कशासाठी? यात आपला काय फायदा? ही ‘बया’ तर आपल्याला बोटावर नाचविल्यासारखे खेळवीत आहे. जिच्यासाठी आपण धावाधाव करून साड्या खरेदी केल्या, त्यावर मॅचींग ब्लाउज शिवायला टाकले. ब्लाउजचं माप देण्यासाठी तू आलीच नाहीस, पण तुझा एक जुना ब्लाउज टेलरला देण्याकरिता माझ्याकडे सुपूर्त करण्यास तुला बरे वेळ मिळाला? कितीतरी महागडे ड्रेसमटेरियल तुझ्यासाठी मी खरेदी केले होते, त्यांची शिलाई देखील मीच दिली. परंतु तू एकदाही ते ड्रेस घालून मला निवांत बिलगली नाहीस. तू म्हणेल ती चीज हजर करतांना मला किती यातायात करावी लागली हे तुझ्या गावी नसावे असेच तू वागायचीस. केवळ एक सूप्त इच्छेच्या तृप्तीसाठी मी तुझ्याभोवती गोंडा घोळायचो. तुझी मागणी पूर्ण केली की तू मला पुरुष म्हणून जे हवं ते देशील अशी अपेक्षा बाळगून मी गोल गोल फिरत राहायचो. खरं म्हणजे तू मला तुझ्या हितासाठी फक्त वापरून घेतलं, हो वापरूनच घेतलं. तू तुझा स्वार्थ पाहिलास. तुला तुझ्या पायावर उभं करतांना मी हात सढळ ठेवला. तुझी फी भरली. तुला आलेले कित्येक प्रॉब्लेम्स सोल्व्ह केले. बसचा पास काढून दिला. येता जाता मला मिसकॉल देता यावा म्हणून तुला मोबाईल घेऊन दिला. त्यातला बॅलन्स संपत आला की तू मोठ्या अधिकारवाणीने सांगायचीस, ‘अरे तेवढा बॅलन्स टाक रे..’ मी टाकायचो. मला मात्र तू फक्त मिसकॉल देणार, उलटपक्षी मीच फोन करावा अशी तुझी अट असायची. हे मला कधीच न उलगडलेलं कोडं होतं. म्हणजे तुझा मोबाईल रिचार्ज करायचा मी, तू मात्र तो बॅलन्स इतरांना फोन करून उडवून टाकायचीस. मी तुला रिटर्न कॉल का म्हणून करायचा? माझ्याच पैशातून तू मलाच फोन करीत नाहीस म्हणजे टू मच हं. मग मी ठरवले आता रिचार्ज तर करायचा नाहीच शिवाय रिटर्न कॉलही करायचा नाही. मी तसं तुला सांगताच तुझी ओरड सुरु झाली- ‘आता तू पहिल्यासारखा राहिला नाहीस रे, खूप बदललास. आखडू झालास. बरोबर आहे तुला तुझी बायको भेटली ना, आता माझी गरजच उरली नाहीये.’ परंतु तूच मला टाळीत चालली आहेस हे मी सांगू कुणाला?
त्यात हे आपले अनैतिक संबंध एकदम चोरी छिपे चालत आलेले. त्याचं बोदरेशन काय कमी असतं? तुझा कधीही मिसकॉल येऊ शकतो म्हणूनच मी माझा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला आहे. चारचौघांत किंवा कुटुंबीयांत आपले प्रेम उघड करायचे नाही म्हणून किती तारेवरची कसरत करावी लागते म्हणून सांगू? तुलाही तुझ्या नवऱ्यापुढे माझा कॉल घेता येत नसतो. चुकून तू घरी असतांना मी कॉल केला तर तू अजूनही किती झापतेस मला. पण तू मला कधीही मिसकॉल देऊन मोकळी होणार. (अगदी बायकोजवळ झोपलेलो असतांनाही!) हे कसे काय सहन करायचे? का तर म्हणे तुला नाईट ड्युटी असते, झोप येत नाही म्हणून मला मिसकॉल! धन्य तुझी प्रेमकहाणी. म्हणजे तू तुझा स्वार्थ किती पाहत, जपत आलीयेस पहा. जरा काही खुट्ट झालं, तुझं तुझ्या नवऱ्याशी वाजलं किंवा सासू बोलली, कामाच्या ठिकाणी काही वादंग झाले तर पटकन मला दहा-बारा मिसकॉल देऊन टाकायचे. मी करतोच रिटर्न कॉल. की गाऱ्हाणे ऐकवत बसायचं. माझा बॅलन्स संपलाच म्हणून समजा. दुखाःच्या वेळीच मी आठवणार, इतर आनंदाच्या प्रसंगी का नाही? कधी सहज म्हणून मिसकॉल येतच नाही तुझा. तुला चांगली नोकरी मिळाली, किती पेमेंट मिळाले हे तर तू कधीच मला कळविले नाहीस. तसा माझा अधिकार नसेलही परंतु ज्याच्यामुळे आपण शिकून सावरून, नवे क्षितीज पादाक्रांत करून स्वतःच्या पायावर उभे राहिलो आहोत, त्याला एकदा तरी सांगावसं वाटलं नाही तुला की, ‘चल रे, आज माझा पहिला पगार झालाय. चल कुठेतरी मस्तपैकी कॉफी पिऊ यात...’
छे, घरी जातांना मात्र तू आलेल्या पगारातून सासूला चपला नेशील, पोरांना खाऊ नेशील, नवऱ्याला पगाराचं पुडकं देशील. तुला इथवर आणून पोचविणारा मी कोरडाच राहणार. तुझी भेट तर दूरच, दर्शनही दुर्लभ झाले आहे. अलिकडे तू माझ्याशी फटकून वागते आहेस की खरोखरच घरातलं, बाहेरचं उरकता उरकता तुझ्या नाकीनऊ येत असतील कळायला मार्ग नाही. जर तसं असेल आणि भविष्यात आपण भेटूच शकणार नसू तर मग हे प्रेमाचं गोंडस नाव दिलेलं ओझं वागवायचं का म्हणून? जिथे गाठीभेटी होण्याची सुतराम शक्यता नाही ते तकलादू प्रेम टिकवून ठेवायचंच कशासाठी? तू मला भेटत नाहीस तर का म्हणून मी तुझ्यासाठी झुरायचं? तू जर मला टाळते आहेस, माझ्या अर्जवांना किंमत देत नाहीस, फक्त फोनवर बोलतेस (मीच कॉल केल्यावर) तर मी का म्हणून व्यर्थ खर्च करायचा? ज्यातून काही हशील होत नाही तिथे अशील बनून जाण्यात काही अर्थ आहे का?
माझ्या मते प्रेम-बीम सबकुछ झूठ असतं बघ. एक पुरुष म्हणून माझी मलाच जाणवलेली तळमळ सांगतो- मी तुझ्यावर प्रेम केलं ते मनात एक छुपा ‘हेतू’ ठेवूनच. माझी इच्छा तू पूर्ण करावीस इतकाच माफक आशय त्यात दडलेला होता. तुझ्या अडीअडचणी समजून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता, नाही देखील. केवळ तोंडदेखलेपणा म्हणून मी तुला ऐकून घेत आलोय, भलेबुरे जे जसे सुचतील ते सल्ले देत आलोय. त्यामागे उद्देश एकच तुझा एकांत मिळावा, तुझा मदमस्त सहवास लाभावा, तू मला तृप्त करून सोडावंस. हो, नक्कीच. एक पुरुष म्हणून प्रेम करतांना जे त्याला अपेक्षित असतं तेच मीही अपेक्षित ठेवलं होतं. संधी साधून मी तुझं सर्वस्व लुटलं त्यावेळी फार मोठी मर्दुमकी गाजविल्याचा भास होत राहिला. त्याच भ्रमात मला तुझी चटक लागली अन् तू जे जे सांगितले ते ते करीत गेलो. तुझा अनुनय करता करता त्या बदल्यात तुझं शरीर मागू लागलो. वेळ प्रसंगी ते तू माझ्या हवाली करीत गेलीस त्यात वाद नाहीच, परंतु जेव्हा आज तू तुझ्या इच्छित स्थळी पोचली आहेस तेव्हा मला नकळत झिडकारून पुढे जाणं तुला शोभतं का? कबूल मला माझी बायको मिळालीय पण मग तू तुझी पोळी भाजून घेतल्यावर मला टाळणे योग्य नाही. पुरुष म्हणून मी तुझ्याकडून एकच अपेक्षा बाळगून असतो त्या बदल्यात तू तुझी दहा कामे करवून घेतेस आणि वर पुन्हा मला ठेंगा दाखवतेस म्हणून तर खरं माझा जळफळाट चालला आहे. खिसा रिकामा होतोय अन् हाती धुपाटणे राहतेय याची मला तीव्र जाणीव होऊ लागल्यानेच मी तुझ्याशी फारकत घ्यायचं ठरवलं आहे...
तू कदाचित म्हणशील, ‘सगळे पुरुष सारखेच असतात. स्त्रीला वासनेच्या दृष्टीनेच बघतात.’ हो हेही मला एकदम कबूल आहे. मी कोणी देव नाही निरपेक्ष प्रेम करायला. मीही एक प्राणीच आहे. त्यातही पुरुष. म्हणजे निसर्गनियमाप्रमाणे मी प्रेम करावं ते वासनेच्या अधीन राहूनच! आणि तुला म्हणून सांगतो जिथे वासना नसते ते प्रेम नसतेच मुळी, त्याला 'निष्काम' मैत्री म्हणता येईल हवं तर! स्त्रीवर प्रेम केलं आणि ‘ते’ घडलं नाही तर तो पुरुष बुळाच म्हणावा अन् दुसरं काय? तेव्हा मी ज्या हेतुपुरस्सर तुझ्यावर प्रेम केलं त्याचा मला पुरुष म्हणून अभिमानच वाटतो. खंत एकच राहते की आजकाल तू फक्त तुझा स्वार्थ साधून घेत आहेस. मी टाळीसाठी हात पुढे करतोय अन् तू दूर जातेस हे काही बरोबर नाहीये. टाळी एका हाताने वाजूच शकत नाही हे माहीत असतांनाही तू जवळ येण्याचे टाळावे हेच मला खटकतेय. माझी इच्छा पूर्ण होत नाही तर मी का म्हणून तुझ्यावर खर्च करावा? म्हणूनच आज आपण ब्रेकअप घ्यायचे म्हणजे घ्यायचे. पुन्हा कधीही भेटायचे नाही. मी तुला रिटर्न कॉल करणार नाही. तुझा कॉल मात्र आजपासून घेणार. ती तयारी ठेव तू. तूही आता कमावते आहेस, तुला खुपच वाटत असेल ना माझ्याशी बोलायचे तर बॅलन्स शिल्लक ठेवत जा. मला वेळ असेल किंवा जर बोलावेसे वाटले तरच मी फोन रिसिव्ह करीन तुझा. नाहीतर नाही. अब मेरी मर्जी...
मला माहितीये तू आता आसवे ढाळू लागशील. 'मी इतकी वाईट आहे का रे?' असं विचारशील. पण मी मुळीच बधणार नाही. जिथे मला हवं ते तू देऊ शकत नाहीस तिथे माकडउड्या मारण्यात काहीच अर्थ नाहीये. जे मिळूच शकत नाही त्याची आस धरून वेळ, पैसा, श्रम वाया घालविण्यात मला तरी आता रस उरलेला नाहीये. बघ तुला पटतेय का? नाही पटले तरी चालेल मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम आहे. जितक्या वेळा तू मला उपभोगू दिलंस त्याच्या कैकपटीने अधिक त्याग मी केलेला आहे. घरादाराकडे दुर्लक्ष केलं आहे, वेळ दवडला आहे, पैसा ओतला आहे. आता कुठेतरी हे थांबायलाच हवं. म्हणून हा अंतिम निर्णय- ब्रेक अप.
मग तू म्हणशील, ‘तू मला लुटलंस, माझं सर्वस्व तुला देऊन बसले.’ पण हे मी मानीत नाही. एक तर आपले हे अनैतिक संबंध ना तुझ्या नवऱ्याला कळले, ना माझ्या बायकोला. दुनियेपासून कितीतरी लपतछपत आपण भेटत राहिलो. हा व्यभिचार फक्त तुला व मलाच माहीत आहे. हे गैरवर्तन केवळ आपल्या दोघांतच सीमित राहिलं आहे, राहणार आहे. म्हणजे तू जे काचेचं भांडं समजतेस ते आजही शाबूत आहे. त्यावर कुणीही दगडफेक अजून तरी केलेली नाहीये, ते भांडं फुटण्याचा संभव नाहीच. कारण हा मामला म्हणजे तेरी भी चूप मेरी भी चूप या पठडीतला आहे. तू मला जे बहाल केलंस ते निसर्ग नियमाला धरून होतं. विजातीय धृवांमध्ये आकर्षण व्हायलाच पाहिजे तेच खरं प्रेम. मात्र त्या प्रेमाच्या बदल्यात तू मला कफल्लक केलंस, करते आहेस हे निसर्गनियमाला धरून आहे का? आज तू कमावू लागली आहेस, यशस्वी झाली आहेस, तुला तुझा नवरा आदराने वागवू लागला आहे, तुझी सासू तू ड्युटीवर गेल्यानंतर मागे सर्व कामे उरकू लागली आहे, सर्व काही आलबेल चालेलेलं आहे म्हणून तू मोठ्या मिजासखोरीत वावरू लागली आहेस, तुझ्या डोक्यात हवा शिरली आहे, तुझे पाय जमिनीवर ठरू पाहत नाहीत, एकंदर काय तर तू कृतघ्न होत चालली आहेस. गेल्या महिन्यात तुला पेमेंट वाढवून मिळालं हे एका अक्षरानं तू मला कळवलं नाहीस, मात्र नवऱ्यासोबत बटर चिकन खाऊन सेलिब्रेशन केलंस. वाह रे तुझी नियत. तुझं बरं चाललेलं असतांना, तू ऐशोरामात असतांना, आनंदी असतांना माझा विसर तुला का पडावा? ज्याच्यामुळे हे वैभव पाहत आहोत त्याला एक फोन करवत नाही तुला? हा कुठला न्याय म्हणायचा?
मग अशा परिस्थितीत मी तुझी संगत सोडणे योग्य नव्हे काय? सांग. मी तर ठरवले आहे, तुझंही अंतर्मत वेगळं असू शकणार नाही. ‘जो माझ्याकडे वासनेची शिकार म्हणून पाहतो त्याला का म्हणून भेटायचे?’ असं तुला वाटत असेल, पटलं असेल तर मान्य. तुझा हा आरोप शिरसावंद्य आहे. कारण मी पुरुष या नात्याने तुझ्या स्त्रीत्वाकडे भोगवस्तू म्हणूनच पाहत आलोय. त्यामुळे तू मला निखालस टाळू शकतेस. माझ्याशी असलेले निनावी संबंध तोडू शकतेस. मलाही तेच हवे आहे. कारण माझ्या लेखी- “जिथे ‘काम’ नाही तिथे रामराम घालण्यात अर्थच नाही.” तेव्हा बाय बाय बाय...

अर्थव्यवहारजीवनमानअर्थकारणराजकारणमौजमजाप्रकटनविचारलेखमतविरंगुळा

प्रतिक्रिया

काय हे डॉक? तुम्ही खरच मेडिकल वाले डॉ. आहात काय?
एकंदर तुमचे सगळेच लेखन 'सेक्स'या एकाच विषयाभवती घिरट्या घालत असते.
त्यात परत कधी दुसर्‍या एखाद्या धाग्याला प्रतिसाद नाही की स्वत:च्या धाग्यावर इतरांनी उपस्थित केल्या शंका/प्रश्नांना उत्तरं नाहित. काय चालवलं आहे हे?

(एक सामान्य वाचक.) गणा

प्रखर वास्तववादी लेखन, फक्त मध्ये मध्ये ब्रेक केलं असतं तर (परिच्छेद पाडले असते तर) जास्त सोपं गेलं असतं वाचायला....

तुझी मागणी पूर्ण केली की तू मला पुरुष म्हणून जे हवं ते देशील अशी अपेक्षा बाळगून मी गोल गोल फिरत राहायचो.

?????????????????????

ह्म्म... पुन्हा तेच.

आपल्याला वैद्यकीय उपचारांची तातडीने आवष्यकता आहे असे नम्रपणे सुचवतो.

आपल्याला वैद्यकीय उपचारांची तातडीने आवष्यकता आहे असे नम्रपणे सुचवतो.

सहमत

प्रतिसादांच्या महापुराने मनःशांती लाभावी म्हणून आपल्या व्यभिचाराचे केलेले विकृत प्रदर्शन.

टवाळ कार्टा's picture

27 Dec 2011 - 10:09 am | टवाळ कार्टा

चायला...प्रेम आणि व्याभिचार एकाच वेळी....???
कसे शक्य आहे

सोत्रि's picture

27 Dec 2011 - 10:36 am | सोत्रि

मग अशा परिस्थितीत मी तुझी संगत सोडणे योग्य नव्हे काय? सांग. मी तर ठरवले आहे, तुझंही अंतर्मत वेगळं असू शकणार नाही. ‘जो माझ्याकडे वासनेची शिकार म्हणून पाहतो त्याला का म्हणून भेटायचे?’ असं तुला वाटत असेल, पटलं असेल तर मान्य. तुझा हा आरोप शिरसावंद्य आहे. कारण मी पुरुष या नात्याने तुझ्या स्त्रीत्वाकडे भोगवस्तू म्हणूनच पाहत आलोय. त्यामुळे तू मला निखालस टाळू शकतेस. माझ्याशी असलेले निनावी संबंध तोडू शकतेस. मलाही तेच हवे आहे. कारण माझ्या लेखी- “जिथे ‘काम’ नाही तिथे रामराम घालण्यात अर्थच नाही.” तेव्हा बाय बाय बाय...

"मामू, गेट वेल सून"

- (मुन्नाभाई) सोकाजी

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2011 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार

या येवढ्या सगळ्या अक्षर कचर्‍याचे सार कोणी दोन वाक्यात सांगेल काय ?

बाकी श्री. दिवटे अध्ये मध्ये मिपावरती इतरांचे लेखन वाचायला आणि त्यावर साधक-बाधक प्रतिक्रिया द्यायला देखील येत चला. फक्त आपले लेखन आणून फेकण्यासाठी मिपाचे व्यासपीठ वापरत जौ नका.

>>या येवढ्या सगळ्या अक्षर कचर्‍याचे सार कोणी दोन वाक्यात सांगेल काय ?<<<

दोन वाक्य कशाला........एकच शब्द पुरेसा आहे........ "बकवास"

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2011 - 11:33 am | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद हो मनराव.

@प्रभुदेवा :- रामागडी घरचाच आहे क बदली आलाय ? ;)

भीमाईचा पिपळ्या.'s picture

27 Dec 2011 - 9:34 pm | भीमाईचा पिपळ्या.

या येवढ्या सगळ्या अक्षर कचर्‍याचे सार कोणी दोन वाक्यात सांगेल काय ?

बाकी श्री. दिवटे अध्ये मध्ये मिपावरती इतरांचे लेखन वाचायला आणि त्यावर साधक-बाधक प्रतिक्रिया द्यायला देखील येत चला. फक्त आपले लेखन आणून फेकण्यासाठी मिपाचे व्यासपीठ वापरत जौ नका.

मा. परा,
आपण स्वतःला काय समजता ?
कोणी ज्याच्या त्याच्या पधतीने इथे लिहीत असेल तर तुम्हाला पोटदुखी कशासाठी?
तुम्हाला नसेल प्र द्यायची तर नका ना देउ. प्र काय लग्नातले आहेर आहेत का?
कुणाला फक्त लेख लिहायचे असतील तर तुम्ही मनाई करणारे कोण?
इथल्या संचालकांनी वेळीच लक्ष घालुन पुढील अनर्थ टाळावा असे एक नम्र आवाहन या ठिकाणी करीत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Dec 2011 - 11:11 am | परिकथेतील राजकुमार

मा. परा,
आपण स्वतःला काय समजता ?

समजायला आम्ही स्वतःला काहीपण समजू ;) उद्या देव पण समजू. तुमची काय हरकत हाय काय ?

कोणी ज्याच्या त्याच्या पधतीने इथे लिहीत असेल तर तुम्हाला पोटदुखी कशासाठी?

पोटदुखी नाही हो, डोकेदुखी होऊ नये म्हणून.

तुम्हाला नसेल प्र द्यायची तर नका ना देउ. प्र काय लग्नातले आहेर आहेत का?

तुम्हाला त्याच्याशी काय घेणे देणे ? सार्वजनिक ठिकाणी लेखन आले की त्यावरती जोडे मारायचे का हार फेकायचे हे आम्ही वाचणारे ठरवू.

कुणाला फक्त लेख लिहायचे असतील तर तुम्ही मनाई करणारे कोण?

अर्र्तेज्यायला ! आम्ही कधी मनाई केली बॉ ? का तुम्हाला नको ते दिसायला लागले आहे ? उलट आम्ही तर नुसते लेखच नको तर प्रतिसाद देखील लिहा म्हणून आग्रह करत आहोत.

इथल्या संचालकांनी वेळीच लक्ष घालुन पुढील अनर्थ टाळावा असे एक नम्र आवाहन या ठिकाणी करीत आहे.

अनर्थ ? तो आणी काय म्हणे ? तुम्ही फोलिस केस करता का काय आता माझ्यावरती ? :P

चिपळ्या

वपाडाव's picture

28 Dec 2011 - 11:18 am | वपाडाव

चिपळ्या

कायतरी बरं हे पर्‍या !!!

शिल्पा ब's picture

28 Dec 2011 - 11:56 pm | शिल्पा ब

=)) तुमचा प्र अन सही भयंकर आवडली.

शेवटी काही ट्विस्ट असेल किंव काही आशय असेल व भला अर्थ हाती लागेल म्हणून संपूर्ण वाचले.
धागा उडवायची पावर नसल्याबद्दल प्रथमच इतके वाईट वाटते आहे.

संप्तप्त

विनायक प्रभू's picture

27 Dec 2011 - 11:20 am | विनायक प्रभू

रामा गडी तयार आहे.
भांडे नै म्हणते.

विनायक प्रभू's picture

27 Dec 2011 - 11:20 am | विनायक प्रभू

रामा गडी तयार आहे.
भांडे नै म्हणते.

गेल्या महिन्यात तुला पेमेंट वाढवून मिळालं हे एका अक्षरानं तू मला कळवलं नाहीस, मात्र नवऱ्यासोबत बटर चिकन खाऊन सेलिब्रेशन केलंस. वाह रे तुझी नियत >>>

=)) =)) =))

लई हसलो !

असो , नैतिक - अनैतिक ची दुसरी बाजु आवडली, जरा काम-भोग टाळता जा की लिहीताना ;)

प्यारे१'s picture

27 Dec 2011 - 11:32 am | प्यारे१

डॉक्टरसाहेब......
तुमचा नायक (लेखातलाच असावा अशी करुण अपेक्षा) पार गंडलाय हो.
ना बायको जवळ करत, ना किम्मत देत.
आणि आता प्रेयसी म्हणून जिची निवड केलेली ती पण साफ 'हुकलीये'.
मला वाटतं पुरुषार्थ गाजवायला तुमचा नायक साफ नालायक आहे.
बाकी 'मोस्ट इंपॉर्टंट ऑर्गन इन सेक्स इज ब्रेन' असं कुणीसं म्हणून गेलेलंच आहे.

मैत्रिणींचा झेंडा कधी फडकतो हे ठाऊक असताना (नो ऑफेन्स फिमेल्स, फरगिव्ह मी, हे डॉ. च्या एका लेखाचं नाव होतं ) म्हणजे इतक्या वैयक्तिक गोष्टी बोलू शकत्/शेअर करु शकण्याचं कसब तुमच्याकडं असताना तुमच्या नायकाला बायको अथवा प्रेयसी ची योग्य कळ फिरवता येऊ नये म्हणजे आश्चर्य आहे.
जस्ट मेक अ नोट : प्रॉब्लेम दुनिया में नही आप खुद में है|

शिल्पा ब's picture

27 Dec 2011 - 12:09 pm | शिल्पा ब

<<<जस्ट मेक अ नोट : प्रॉब्लेम दुनिया में नही आप खुद में है|

अहो हेच आम्ही त्यांना मागच्या उडालेल्या लेखात पहीलीच प्रतिक्रिया देताना म्हंटलं होतं...बाकी कोडगेपणा हा डॉ. चा गुण घेण्यासारखा आहे हे जाताजाता सांगते..पर्‍या त्यांच्या प्रत्येक लेखात "दुसर्‍याचे लेख वाचुन एखादी प्रतिक्रिया तरी देत चला, नुसतेच स्वत:चे प्रसिद्ध करण्यासाठी मिपाचा वापर नका करु" हे कानी कपाळी सांगतोय पण एक ना दोन..नुसतेच भरमसाठ लेख.

दादा कोंडके's picture

27 Dec 2011 - 4:09 pm | दादा कोंडके

झेंड्याच्याच धाग्याला बर्‍याच हुच्चभ्रू मंडळींचे चान चान प्रतिसाद पाहूनच आश्चर्य वाटले होते. :)

आत्मशून्य's picture

27 Dec 2011 - 12:08 pm | आत्मशून्य

मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत.

- Starting is excellent. Naked truth. Only This story is somewhat we should call real breakup. good work doctor SAAB.

Khup changale nirikshan aahe ekaa PURUSHACHYA anubhavaach. Pan nantar nantar maatra jaraasaa jaast taaimapass zaalay itakach. Pan katha mastach

. Ha break up tumachaa swatacha asel tar aasha aahe ajun baryaach goshti lawakarach livaal.. Mhnaje vel rikama asel naa ;)

शिल्पा ब's picture

27 Dec 2011 - 12:09 pm | शिल्पा ब

तुम्ही का इंग्रजी सोडेनात हो?? अं?

आत्मशून्य's picture

27 Dec 2011 - 12:58 pm | आत्मशून्य

I am writting this far from the device or application that support Marathi characters as Input format.

मी-सौरभ's picture

27 Dec 2011 - 1:20 pm | मी-सौरभ

ईंग्रजी लिपी वापरुन मराठी शब्द लिहीता येतील की :)

शिल्पा ब's picture

27 Dec 2011 - 1:52 pm | शिल्पा ब

कै नको, ते तर फारच त्रासदायक वाटतं...पण हौस कीती बघा ना या आत्मशुन्य आजोबांना!! मिपा सोडवत नैये अगदी!!

वपाडाव's picture

27 Dec 2011 - 2:04 pm | वपाडाव

काकु, प्रतिसाद देण्याची खुमखुमीच असेल नै का आजोबांना..... धेडगुजरे होउनही मिपाचं व्यसन सुटत नैय्ये.... कसं होणार कै माहिती.....

आत्मशून्य's picture

27 Dec 2011 - 2:19 pm | आत्मशून्य

I love to kill, especially time .

आत्मशून्य's picture

27 Dec 2011 - 2:40 pm | आत्मशून्य

aata आजोबां mhanatach aasal tar tyabaabat ajun ek gosht krupaya lakshaat thevane aavashyak aahe.... Ti mhanaje:....... Dont teach your grandfather how to fish. (H. ghya.)

Tasahi mobilevarun marathit type karata yet nahi ha maaza nhave MIPACHA dosh aahe.

गवि's picture

27 Dec 2011 - 2:53 pm | गवि

दोष कुणाचा हा भाग वेगळा.. आशूसारख्या कोणाला मोबाईलवरुन मिपा वाचण्याची ओढ आहे आणि त्यावर प्रतिसाद देण्याचीही मनापासून इच्छा होते आहे.. अशा वेळी आहे त्या साधनाने शक्य अशा इंग्रजी भाषेत प्रतिसाद दिला तर त्यात खवटण्याचे कारण काय ते कळले नाही..

मलाही अनेकदा प्रतिसाद देण्याची इच्छा आवरत नाही, तेव्हा मी इंडि एसेमेस वर मराठी टाईपतो आणि स्वतःला मेसेज पाठवून तो कॉपीपेस्ट करुन इथे डकवतो.

पण याला उगाच एसेमेस चार्ज पडतो. शिवाय हा वेळखाऊ प्रकार आहे.. मानेमागून घास घेण्याचा..

अँड्रॉईड मोबाईलवरुन प्रतिसाद मिपावरही टंकता येतो, पण त्यात बहुधा क्रोम ब्राऊझर असल्याने मधेच लेखन असे काही गंडते की सांगता सोय नाही..बर्‍याचदा एक चूक सुधारता सुधारता मागचे सारेच बिघडते आणि पुन्हा पहिल्यापासून टंकावे लागते.

तसाही अँड्रॉईड सर्वांकडे असेलच असं नाही.

त्यापेक्षा अशा वेळी एखादा प्रतिसाद कोणी रोमन अक्षरांत लिहिला तर काय बिघडते..?

प्यारे१'s picture

27 Dec 2011 - 2:59 pm | प्यारे१

+१.

शिल्पा ब's picture

27 Dec 2011 - 3:05 pm | शिल्पा ब

मनापासुन बरंच कै करण्याची इच्छा होते म्हणजे केलंच पैजे असं नै..उद्या एखाद्या कन्नड जाणणार्‍या माणसाला कानडीत प्रतिसाद द्यायची इच्छा होईल..

आत्मशून्य's picture

27 Dec 2011 - 9:24 pm | आत्मशून्य

नुकतच इडिया एसेमेस वापरलं. त्यामधेच हा संदेश टाइप केलाय. कॉपि पेस्ट करायला स्वत:ला सेंड करायचिही गरज नहि फ़क्त ड्राफ़्ट म्हणुन सेव करयचा व आपल्या डिफ़ॉल्ट एसेमेस अॅप मधे ओपन करयच (मज़्यकडे तरि हे होतय मि नोकिया सिंबियान ओस वर वापरत आहे) आपल्या सुचनेला मनापासुन धन्यवाद. आता मराठी ही लिहु शकतो :) जय महाराश्ट्र

@शिल्पा ब I think you should be more observant in observations, bcoz I havn't failed to write even a single line in Marathi here yet, It just, I was very very very succesful in finding a way how not to write marathi here ;)

शिल्पा ब's picture

27 Dec 2011 - 3:05 pm | शिल्पा ब

मनापासुन बरंच कै करण्याची इच्छा होते म्हणजे केलंच पैजे असं नै..उद्या एखाद्या कन्नड जाणणार्‍या माणसाला कानडीत प्रतिसाद द्यायची इच्छा होईल..

जल्ला तुमा सगल्यांचा चाल्ला काय हां?
ईषय कसलो नी चरचा कसली चल्लीहा?

(ब तै हे केवळ तुम्हाला उद्देशुन नै हो. तुमचा प्रतिसाद केवळ निमित्तमात्र. :) )

वपाडाव's picture

27 Dec 2011 - 5:52 pm | वपाडाव

जसे आपण स्वतः प्रतिसाद न देता शांत बसु शकत नाही तसेच ते पण......
फरक फक्त काय विषय तोडत प्रतिसाद अन लक्ष दोन्हीही खेचण्याचं तुमचं कसब....
ते मात्र वाखाणण्याजोगे....
ह घ्या न घ्या.....

शिल्पा ब's picture

28 Dec 2011 - 12:01 am | शिल्पा ब

तुम्हाला एवढी इच्छा असेल या धाग्याच्या विषयावर बोलायची तर बोला की, कुणी अडवलंय?
आमच्या कसबाची दखल घेतल्याबद्दल भयंकर आभारी आहे...याची गरज होतीच!!

मनापासुन बरंच कै करण्याची इच्छा होते म्हणजे केलंच पैजे असं नै..उद्या एखाद्या कन्नड जाणणार्‍या माणसाला कानडीत प्रतिसाद द्यायची इच्छा होईल..

मग देऊ दे ना कानडि प्रतिसाद;
आम्ही त्यांना आख्खा कारवार बेळगाव प्रदेश दिलाय त्यांनी एक प्रतिसाद दिला तर काय बिघडतय???

प्रभाकर पेठकर's picture

27 Dec 2011 - 4:08 pm | प्रभाकर पेठकर

अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ.

आत्मशून्य's picture

27 Dec 2011 - 12:00 pm | आत्मशून्य

.

पक पक पक's picture

27 Dec 2011 - 11:55 am | पक पक पक

मनोरुग्ण बनाल हो , हे असल काही बाही लिहीत जाउ नका........

स्पा's picture

27 Dec 2011 - 11:58 am | स्पा

अरे कशाला प्रतिक्रिया देताय...
पुढची जिलबी पडेपर्यंत ते इथे फिरकणार सुद्धा नाहीत, किंवा एकही प्रश्नाला उत्तर देणार नाहीत

दुर्लक्ष करा कि.. धागा अपोआप खाली जाईल

मन१'s picture

27 Dec 2011 - 12:02 pm | मन१

धागा खाली जाणे पुरेसे आहे का?
उडवल्यास बरे होणार नाही का?

@ पक पक प्काकः-
असे लिहिल्याने स्वतः लिहिणारा मनोरुग्ण बनेल की
स्वतः मनोरुग्ण असणारा असे लिहील?

आत्मशून्य's picture

27 Dec 2011 - 12:23 pm | आत्मशून्य

Relax man ! This thread is niether business nor personal.. Then why do people even care if it is exist or should be deleted ? Just enjoy the way writter described the subject.

If you are not happy reading about such things then do protest against one episode of Mandakini's story too coz it is way more descriptive.(No offence to writter of that story as it was a reading fun too)

असे लिहिल्याने स्वतः लिहिणारा मनोरुग्ण बनेल की
स्वतः मनोरुग्ण असणारा असे लिहील?

अछ्छा म्हणजे डॉक्टर्र साहेब स्वतः मुळातच मनोरुग्ण आहेत का..? नाही त्यांनी आगोदर टाकलेल्या जिलब्या वाचल्या नाहित म्हणुन विचारतो आहे. बर आहे वाचल्या नाहीत ते .वाचलो म्हणायच.

स्वतःच्या स्वार्थासाठी एक माणुस दुसर्‍या माणसाला "वापरतोच" त्यात स्त्रीया सुद्धा येतातच ! यात नवल ते काय ? ;)
बाकी पाखरं १ नंबरी लबाड अन् वस्ताद असतातच ! ;)

दिपक's picture

27 Dec 2011 - 12:09 pm | दिपक

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2011 - 12:20 pm | परिकथेतील राजकुमार

दिपक लेका..

रच्याकने, गेट वेल सून डॉक

प्यारे१'s picture

27 Dec 2011 - 12:26 pm | प्यारे१

अत्युच्च प्रतिसाद.... लाईकड. ;)

ही जाहिरात असली तरी मिपा प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष करावे ही णम्र विनंती.
हल्लीच्या लेखांवरुन लेखकांना (लेख लिहीणारी व्यक्ती लेखक. लिंगभेद केलेला नाही ;) ) याची गरज असावी असे वाटते आहे नव्हे खात्री झालेली आहे. ;)

लेख.. त्यातील परिस्थीती आणि नायकाची मानसिकता सुंदर सांगितले आहे...
सर्वस्व जरी प्रेयशीने दिले असले तरी खरे सर्वस्व आपलेच लुटले गेले आहे याची हलकीशी जाण जेंव्हा नायकाल झाली आहे तेंव्हा त्याच्या मनातील विचार एकदम रिअल्यास्टीक वाटत आहे...

मृत्युन्जय's picture

27 Dec 2011 - 2:52 pm | मृत्युन्जय

बाकीचे जौ द्या भौ पन हा लेख / प्रकटन जे काय आहे ते लै बोर हाय.

मनीम्याऊ's picture

27 Dec 2011 - 8:26 pm | मनीम्याऊ

"मी पुरुष या नात्याने तुझ्या स्त्रीत्वाकडे भोगवस्तू म्हणूनच पाहत आलोय"
कुठल्या विकृतविचार धरेचा समर्थन लेखक करत आहेत?
तीव्र निषेध !

आनंद's picture

27 Dec 2011 - 9:42 pm | आनंद

हे (श्री) राम!

विकृत मनोवृत्तीने लिहीलेले अतिशय गलिच्छ लिखाण

स्वतच्या नावापुढे डाँक्टर पदवी लावण्याऱ्‍या माणसाने लिहीलेले वाचून खेद वाटला

जनांची नाही तर मनाची तरी लाज बाळगा

लेखात विकृत काय आहे ते कळाले नाही.
मात्र लेख बंडल आहे हे नक्की.
नायकाचा नव्या वर्षाचा संकल्प चांगला आहे. स्वतःलाच फसवत असलेला नायक त्याचे नेहमी असे धुपाटणेच व्हायचे.
हॅप्पी रीअलायझेशन

माझीही शॅम्पेन's picture

28 Dec 2011 - 12:03 am | माझीही शॅम्पेन

वरील सर्व प्रतिक्रिया देणारे याच्या भावना समजून घेतल्या , फक्त लेखककडून वरवर पाहता त्याच धाटनीचे लेख येत असल्यास मिपा चे ओकयसाठी बेसिन करू नये अस वाटत.

असो तरी पण धाडसने अस म्हणवास वाटल की लेख चक्क आवडला. थोडाफार "सखाराम" स्टाइल वाटला , व्याभिचार , त्याचे मानवी स्वभावावर होणारे परिणाम हे नेहमीच एक गूढ राहिलेले आहे.

५० फक्त's picture

28 Dec 2011 - 8:22 am | ५० फक्त

@ जाई, आपला प्रतिसाद पटला नाही, जे घडतंय किंवा घडलंय त्या अनुभवांचं एक भयाण चित्रंण आहे यात गलिच्छ किंवा विकृत काय आहे कळालं नाही, कधी कधी वास्तव आणि त्याचं चित्रण हे विकृत आणि गलिच्छतेच्या सर्वसामान्य आणि सर्वमान्य कल्पनांपेक्षा जास्त विदारक आणि त्रासदायक असतं.

जनाची अन मनाची लाज बाळगणे हा प्रतिसाद खरंतर इथल्या ब-याच धाग्यांना टाकता येईल, पण तसं होताना दिसत नाही किमान तुमच्याकडुन तरी., उदा. श्री परा यांचा शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यतील होउ घातलेल्या शरीरसंबंधांचं वर्णन असलेला धागा. उलट इथं तर दोन प्रौढ व्यक्तींमधल्या अनैतिक पण फक्त शारिरिकच नाही तर इतर व्यावहारीक संबंधांबद्दल उघड उघड चर्चा आणि ती सुद्धा फारशी शारिरिक वर्णनं न येता केलेली आहे आणि त्या फसत गेलेल्या किंवा चाललेल्या व्यवहारांचं पोस्ट मार्टेम आहे. श्री. परा यांच्या वर उल्लेख केलेल्या धाग्यावर श्री. बिकांचा एक उपप्रतिसाद आहे त्यात त्यांनी श्री. श्रामोंना त्या मालिकेचा पुढचा भाग लिहा असं म्हणताना असं लिहिलंय 'तुम्हाला त्यात मानवी मनाचे कंगोरे वगैरेही दाखवता येतील आणि झालंच तर मग समाज नावाची गुंतागुंतीची चीजही दाखवता येईल नीट व्यवस्थित ' - डॉ. दिवटेंच्य लेखात हेच येतं आहे ना, मानवी मनाचे कंगोरे अन समाजाची गुंतागुंत वगैरे,मग त्याबद्दल एवढा गहजब का ?

@ मनीम्याउ - मला वाटतं लेखक कशाचं समर्थन करत नाहीत, पण जे वाक्य तुम्ही उचललं आहे, खरंच वास्तव ते तसंच नाही का ? पांढरा रंग लावुन कोळसा ठेवला तरी तो काळाच असंणार ना, पुरुषाला स्त्री ही भोगवस्तु वाटणं स्वाभाविक आहे आणि जे नातं किंवा संबंधाबद्दल हे सगळं लिहिलंय त्याचा पायाच भोग आहे, शरीरसुख हेच तर या सर्वांचं मुळ आहे, मग तिथं हे असं स्पष्ट प्रामाणिक प्रतिपादन म्हणजे कोणत्याही विचारधारेचं समर्थन होत नाही तर वर्तनाचा खुलासा होतो. आणि इथं पुरुष स्त्रीकडे भोगवस्तु म्हणुन पाहतो आहे तर ती स्त्री सुद्धा त्या पुरुषाकडुन तिला हवेहवेसे शरीरसुख सोडुन इतर भौतिक भोग पुरवुन घेत आहेच ना, मग त्या बदल्यात पुरुषांनं त्याच्या शरीराचे लाड पुरवले जाण्याची अपेक्षा ठेवली तर त्यात चुक काय आहे ? आणि अशा राजीखुशीच्या अन जाणुन बुजुन ठेवलेल्या संबंधांमध्ये पुरुषाच्या शरीराचे असे लाड पुरवले जाण्यात ते पुरवंणा-या स्त्रीला सुख मि़ळतच नाही असं होण्याची शक्यता फार कमी असते.

हा आपापसातला राजीखुशीचा देण्याघेण्याचा खुला पण एकतर्फी होउन फसलेला व्यवहार आहे, फक्त त्याचं इंटर्नल ऑडिट करुन इथं रिपोर्ट मांडलाच तो वाचताना त्रास होतोय असं असु शकेल. गुलजार नार- भाग १-२ वरचे प्रतिसाद, विशेषत: भाग २ च्या पुढचा भाग लवकर टाका किंवा वाट पाह्तो आहे म्हणणारे प्रतिसाद आणि इथलं प्रतिसाद पाहिले तर ब-याचजणांचा दुट्ट्पीपण मात्र अधोरेखित होतो आहे.

उरला प्रश्न, धागाकर्त्यानं इथं फक्त लेख टाकायचा अन निघुन जायचा किंवा बाकी कुठेही प्रतिसाद द्यायचे नाहीत हा एक प्रकारचा डँबिसपणा असु शकतो, पण डॉ, दिवटेंच्या बाबतीत तसं घडतंय असं दिसत तरी नाही, (http://www.misalpav.com/user/9217/track) तरी याबद्दल मिपाचं धोरण काय म्हणतं, म्हणजे वर्षाला किमान ३० लेखांना प्रतिसाद दिल्याशिवाय लेख टाकता येणार नाही, किमान १२ कवितांबा रुदयस्पर्शी म्हणल्याखेरीज कविता टाकता येणार नाही, असं काही प्रि क्वालिफिकेशन आहे का ?

काहीसं असंच म्हणायला आलो होतो. अर्थात प्रतिक्रियाही "चूक" नाहीत त्या केवळ स्वाभाविक आहेत.. जितका लेख स्वाभाविक आहे तितक्याच.

लेखकाने एखाद्या विचाराचं दर्शन घडवणं म्हणजे समर्थन करणं असा अर्थ काढता येत नाही. तशा अर्थाने शोले लिहिणार्‍याने गब्बरसिंग डीटेलवार रंगवला म्हणून तो खलप्रवृत्तीचं समर्थन करत होता असं नव्हे. इथे तर खलप्रवृत्तीही दिसत नाहीये केवळ सामान्य क्षुद्र (पुन्हा रिलेटिव्ह कल्पना) मनाच्या चौकटीत स्वतःला कल्पून लेखक लिहितो आहे.

लेखनातून नेहमी नीतीकथा किंवा इसापच्या चांगले संदेश देणार्‍या गोष्टीच उतरल्या पाहिजेत असं आहे का?

अर्थात नेहमी एकाच प्रकारचं लिहिणं याला दोषही म्हणता येईल किंवा स्पेशालिटीही..

प्रचेतस's picture

28 Dec 2011 - 9:55 am | प्रचेतस

सहमत आहे.
आम्ही तर बुवा दिवटे साहेबांचे फ्यान आहोत. त्यांच्या लिखाणाची आम्ही चातकाप्रमाणे वाट पाहात असतो आणि ते कधीही आम्हास निराश करत नाहीत.
गणपा, सास्व नेहमी पाकृ टाकतात म्हणून त्यांच्यावर कधीही सतत त्याच प्रकारच्या लिखाणाचा दोषारोप झाल्याचे कधीही ऐकिवात नाही उलट अजून येऊ द्यात म्हणून कौतुकही होते मग दिवट्यांनाच नेहमी दोषाचे धनी का बरे व्हावे लागत?

गणेशा's picture

28 Dec 2011 - 1:19 pm | गणेशा

५० फक्त ,
बरोबर प्रतिसाद,
त्यात एक अ‍ॅड करतो.
स्त्री कडे फक्त भोगवस्तु म्हणुन सर्व पुरुष पाहत नाहित, तरीही येथील नायकाचे हे स्वगत असल्याने तो तसे त्याच्या मनातील विचार सांगतो आहे, आणि तसे चित्रण समजात ही दिसतेच..

गणपा, सास्व नेहमी पाकृ टाकतात म्हणून त्यांच्यावर कधीही सतत त्याच प्रकारच्या लिखाणाचा दोषारोप झाल्याचे कधीही ऐकिवात नाही

वल्ली, वरील वाक्य भारीच विनोदी आहे राव..

गणपा, सास्व नेहमी पाकृ टाकतात म्हणून त्यांच्यावर कधीही सतत त्याच प्रकारच्या लिखाणाचा दोषारोप झाल्याचे कधीही ऐकिवात नाही उलट अजून येऊ द्यात म्हणून कौतुकही होते मग दिवट्यांनाच नेहमी दोषाचे धनी का बरे व्हावे लागत?

वल्ली आपल्या कर्माची फळं भोगायला तयार रहा आता. ;)
ए पऱ्या तो कवितांचा साचा आण रे लवकर.

गवि's picture

28 Dec 2011 - 1:25 pm | गवि

वल्ली आपल्या कर्माची फळं

म्हणजे स्ट्रॉबेरीज का रे भाऊ?

प्रचेतस's picture

28 Dec 2011 - 1:26 pm | प्रचेतस

कुठंय तो साचा? येऊ द्यात लवकर. पाहू द्या जरा डोळे भरून. ;)

५० फक्त's picture

28 Dec 2011 - 1:29 pm | ५० फक्त

येउ देच तो कवितेचा साला, म्हणजे साचा, आम्ही आहोतच मा.संपादिका पैसातै च्या आदेशानुसार आणि श्री परांच्या वांगम यीन प्रेरणेवरुन विडंबनं पाडायला - उदाहरण- http://www.misalpav.com/node/20225

पैसा's picture

28 Dec 2011 - 1:35 pm | पैसा

चकल्यांचा सोर् या नायतर जिलबी मेकर

मी-सौरभ's picture

28 Dec 2011 - 2:04 pm | मी-सौरभ

वल्ली शेठ: तुम्ही कुणाकुणाचे फॅन आहात ते सांगा ना प्ली़ज :)

मन१'s picture

28 Dec 2011 - 10:27 am | मन१

सदर दुवा आपण दिलात त्यावरून इतके नक्कीच दिसते की अजून तरी डॉक्टर सायबाला खुद्द ह्या लेखावरील प्रतिसादांची दखल घ्यावयास वेळ मिळालेला नाही. किंवा डॉक साहेब आपले नुसती मज्जा पाहताहेत.

किसन शिंदे's picture

28 Dec 2011 - 9:50 am | किसन शिंदे

हल्लीच कभी अलविदा ना कहना पाहिलात कि काय? ;)

sagarpdy's picture

28 Dec 2011 - 10:15 am | sagarpdy

दुसरी बाजू सुद्धा मांडा येथे. 'ती' काय विचार करत आहे ते हि लिहा. मग पुढील लेखात दोघांना एकत्र आणा.
'होगी प्यार कि जीत'! ;)

(अर्थात हा स्वानुभव असेल तर यापुढे लिहिणे होणार नाही. काल्पनिक असेल तर मात्र होऊ शकते. )

आदिजोशी's picture

28 Dec 2011 - 6:57 pm | आदिजोशी

जग काहीही म्हणो, आपल्याला लेख आवडला. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. लोकांच्या टिकेकडे लक्ष देऊ नका. तुम्ही लिहीत रहा, आम्ही वाचतो आहोत. अशा धर्तीचे लेख सगळ्यांना आवडत नाहीत. किंबहुना फारच कमी लोकांना आवडतात आणि ते असे लेख पचवू शकतात. त्यातला मी एक आहे.

अवांतर - लेख वाचून काही जालीम जालीय मित्रांची आठवण झाली.

'अशा धर्तीचे लेख सगळ्यांना आवडत नाहीत. किंबहुना फारच कमी लोकांना आवडतात आणि ते असे लेख पचवू शकतात. त्यातला मी एक आहे.'
+१०० टु आदिजोशी...