✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ब्रेक अप...

ड
डॉ.श्रीराम दिवटे यांनी
Tue, 12/27/2011 - 01:19  ·  लेख
लेख
माझी अपेक्षापूर्ती न करणाऱ्या या अनामिक नात्याचा मला भयंकर कंटाळा आलाय बघ. तू म्हणशील पुरुष इथून तिथून सारखेच असतात, मलाही तसंच समज हवं तर. तुझे सारे आरोप अन् आक्षेप मला मान्य आहेत. हो, मीही पुरुष आहे. मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत. तुला तुझे करियर घडवायचे आहे. तू आता मध्यावर आली आहेस. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. तू जीव तोडून काम करतेस, प्रसंगी ओव्हर टाईमलाही थांबतेस. त्यामुळे होतं काय की तुझ्याकडे स्वतःसाठीच जिथे वेळ नसतो, तिथे माझ्यासाठी तू कधी वेळ काढणार, कधी मला एकांतात भेटायला येणार? नाहीच जमत ते तुला. गेले काही महिने तू मला जशी हवी होती तशी भेटत नाहीये. वाटतं तू मला टाळते आहेस, भेटण्याचे ठरवूनही येत नाहीस. प्रयत्न करते म्हणतेस अन् ऐनवेळी काहीतरी कारण पुढे करून मला हुलकावणी देतेस. त्यानंतर उडणारा विस्फोट मी शब्दांत नाही सांगू शकत. तू येणार म्हणून केलेली जय्यत तयारी तशीच वाया जाते. मानसिकच नव्हे तर शारीरिक खच्चीकरण केल्यासारखे होते. मी आतल्या आत कोमजून जातो. कशासाठी आपण हा अट्टहास चालवला आहे? असाही प्रश्न पडतो. कामधंदा सोडून तुझी प्रतीक्षा करीत रहावी अन् तू ‘वेळ नाही ना रे मिळाला, बघू पुढच्यावेळी भेटू..’ असं सहज म्हणतेस अन् माझ्या नजीक यायचं प्रकर्षानं टाळतेस. हे काही मला पटत नाही बघ. मी इतक्या आर्जवाने तुला बोलावतो, एकदातरी येच म्हणतो पण तू मात्र किती सफाईदार खोटे बोलून मला वाकुल्या दाखविल्यासारखे करतेस. तुझं हे खिजवणं आहे की तुझी मजबुरी हे कळायला मार्ग नसतो. मी प्रतिप्रश्न करताच तू तुझे अनेक प्रॉब्लेम्स सांगत सुटतेस. ‘घरी खूप कामं पडलीयेत रे, मला कामाहून घरी निघायलाच उशीर झालाय कसं भेटू शकते तुला? आज नाईटशिप करून थकलेय रे, नवऱ्याचा फोन आला होता त्याने लवकर बोलावलंय अरे, घरी पाहुणे आलेत काय करू रे? वेळच नाही बघ तुझ्याकडे यायला.’ अशी कितीतरी संयुक्तिक कारणे तू मला सुनावून सहीसलामत (हसत) सुटतेस. मग मला प्रश्न पडतो की हे अनैतिक संबंध कशासाठी? यात आपला काय फायदा? ही ‘बया’ तर आपल्याला बोटावर नाचविल्यासारखे खेळवीत आहे. जिच्यासाठी आपण धावाधाव करून साड्या खरेदी केल्या, त्यावर मॅचींग ब्लाउज शिवायला टाकले. ब्लाउजचं माप देण्यासाठी तू आलीच नाहीस, पण तुझा एक जुना ब्लाउज टेलरला देण्याकरिता माझ्याकडे सुपूर्त करण्यास तुला बरे वेळ मिळाला? कितीतरी महागडे ड्रेसमटेरियल तुझ्यासाठी मी खरेदी केले होते, त्यांची शिलाई देखील मीच दिली. परंतु तू एकदाही ते ड्रेस घालून मला निवांत बिलगली नाहीस. तू म्हणेल ती चीज हजर करतांना मला किती यातायात करावी लागली हे तुझ्या गावी नसावे असेच तू वागायचीस. केवळ एक सूप्त इच्छेच्या तृप्तीसाठी मी तुझ्याभोवती गोंडा घोळायचो. तुझी मागणी पूर्ण केली की तू मला पुरुष म्हणून जे हवं ते देशील अशी अपेक्षा बाळगून मी गोल गोल फिरत राहायचो. खरं म्हणजे तू मला तुझ्या हितासाठी फक्त वापरून घेतलं, हो वापरूनच घेतलं. तू तुझा स्वार्थ पाहिलास. तुला तुझ्या पायावर उभं करतांना मी हात सढळ ठेवला. तुझी फी भरली. तुला आलेले कित्येक प्रॉब्लेम्स सोल्व्ह केले. बसचा पास काढून दिला. येता जाता मला मिसकॉल देता यावा म्हणून तुला मोबाईल घेऊन दिला. त्यातला बॅलन्स संपत आला की तू मोठ्या अधिकारवाणीने सांगायचीस, ‘अरे तेवढा बॅलन्स टाक रे..’ मी टाकायचो. मला मात्र तू फक्त मिसकॉल देणार, उलटपक्षी मीच फोन करावा अशी तुझी अट असायची. हे मला कधीच न उलगडलेलं कोडं होतं. म्हणजे तुझा मोबाईल रिचार्ज करायचा मी, तू मात्र तो बॅलन्स इतरांना फोन करून उडवून टाकायचीस. मी तुला रिटर्न कॉल का म्हणून करायचा? माझ्याच पैशातून तू मलाच फोन करीत नाहीस म्हणजे टू मच हं. मग मी ठरवले आता रिचार्ज तर करायचा नाहीच शिवाय रिटर्न कॉलही करायचा नाही. मी तसं तुला सांगताच तुझी ओरड सुरु झाली- ‘आता तू पहिल्यासारखा राहिला नाहीस रे, खूप बदललास. आखडू झालास. बरोबर आहे तुला तुझी बायको भेटली ना, आता माझी गरजच उरली नाहीये.’ परंतु तूच मला टाळीत चालली आहेस हे मी सांगू कुणाला? त्यात हे आपले अनैतिक संबंध एकदम चोरी छिपे चालत आलेले. त्याचं बोदरेशन काय कमी असतं? तुझा कधीही मिसकॉल येऊ शकतो म्हणूनच मी माझा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला आहे. चारचौघांत किंवा कुटुंबीयांत आपले प्रेम उघड करायचे नाही म्हणून किती तारेवरची कसरत करावी लागते म्हणून सांगू? तुलाही तुझ्या नवऱ्यापुढे माझा कॉल घेता येत नसतो. चुकून तू घरी असतांना मी कॉल केला तर तू अजूनही किती झापतेस मला. पण तू मला कधीही मिसकॉल देऊन मोकळी होणार. (अगदी बायकोजवळ झोपलेलो असतांनाही!) हे कसे काय सहन करायचे? का तर म्हणे तुला नाईट ड्युटी असते, झोप येत नाही म्हणून मला मिसकॉल! धन्य तुझी प्रेमकहाणी. म्हणजे तू तुझा स्वार्थ किती पाहत, जपत आलीयेस पहा. जरा काही खुट्ट झालं, तुझं तुझ्या नवऱ्याशी वाजलं किंवा सासू बोलली, कामाच्या ठिकाणी काही वादंग झाले तर पटकन मला दहा-बारा मिसकॉल देऊन टाकायचे. मी करतोच रिटर्न कॉल. की गाऱ्हाणे ऐकवत बसायचं. माझा बॅलन्स संपलाच म्हणून समजा. दुखाःच्या वेळीच मी आठवणार, इतर आनंदाच्या प्रसंगी का नाही? कधी सहज म्हणून मिसकॉल येतच नाही तुझा. तुला चांगली नोकरी मिळाली, किती पेमेंट मिळाले हे तर तू कधीच मला कळविले नाहीस. तसा माझा अधिकार नसेलही परंतु ज्याच्यामुळे आपण शिकून सावरून, नवे क्षितीज पादाक्रांत करून स्वतःच्या पायावर उभे राहिलो आहोत, त्याला एकदा तरी सांगावसं वाटलं नाही तुला की, ‘चल रे, आज माझा पहिला पगार झालाय. चल कुठेतरी मस्तपैकी कॉफी पिऊ यात...’ छे, घरी जातांना मात्र तू आलेल्या पगारातून सासूला चपला नेशील, पोरांना खाऊ नेशील, नवऱ्याला पगाराचं पुडकं देशील. तुला इथवर आणून पोचविणारा मी कोरडाच राहणार. तुझी भेट तर दूरच, दर्शनही दुर्लभ झाले आहे. अलिकडे तू माझ्याशी फटकून वागते आहेस की खरोखरच घरातलं, बाहेरचं उरकता उरकता तुझ्या नाकीनऊ येत असतील कळायला मार्ग नाही. जर तसं असेल आणि भविष्यात आपण भेटूच शकणार नसू तर मग हे प्रेमाचं गोंडस नाव दिलेलं ओझं वागवायचं का म्हणून? जिथे गाठीभेटी होण्याची सुतराम शक्यता नाही ते तकलादू प्रेम टिकवून ठेवायचंच कशासाठी? तू मला भेटत नाहीस तर का म्हणून मी तुझ्यासाठी झुरायचं? तू जर मला टाळते आहेस, माझ्या अर्जवांना किंमत देत नाहीस, फक्त फोनवर बोलतेस (मीच कॉल केल्यावर) तर मी का म्हणून व्यर्थ खर्च करायचा? ज्यातून काही हशील होत नाही तिथे अशील बनून जाण्यात काही अर्थ आहे का? माझ्या मते प्रेम-बीम सबकुछ झूठ असतं बघ. एक पुरुष म्हणून माझी मलाच जाणवलेली तळमळ सांगतो- मी तुझ्यावर प्रेम केलं ते मनात एक छुपा ‘हेतू’ ठेवूनच. माझी इच्छा तू पूर्ण करावीस इतकाच माफक आशय त्यात दडलेला होता. तुझ्या अडीअडचणी समजून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता, नाही देखील. केवळ तोंडदेखलेपणा म्हणून मी तुला ऐकून घेत आलोय, भलेबुरे जे जसे सुचतील ते सल्ले देत आलोय. त्यामागे उद्देश एकच तुझा एकांत मिळावा, तुझा मदमस्त सहवास लाभावा, तू मला तृप्त करून सोडावंस. हो, नक्कीच. एक पुरुष म्हणून प्रेम करतांना जे त्याला अपेक्षित असतं तेच मीही अपेक्षित ठेवलं होतं. संधी साधून मी तुझं सर्वस्व लुटलं त्यावेळी फार मोठी मर्दुमकी गाजविल्याचा भास होत राहिला. त्याच भ्रमात मला तुझी चटक लागली अन् तू जे जे सांगितले ते ते करीत गेलो. तुझा अनुनय करता करता त्या बदल्यात तुझं शरीर मागू लागलो. वेळ प्रसंगी ते तू माझ्या हवाली करीत गेलीस त्यात वाद नाहीच, परंतु जेव्हा आज तू तुझ्या इच्छित स्थळी पोचली आहेस तेव्हा मला नकळत झिडकारून पुढे जाणं तुला शोभतं का? कबूल मला माझी बायको मिळालीय पण मग तू तुझी पोळी भाजून घेतल्यावर मला टाळणे योग्य नाही. पुरुष म्हणून मी तुझ्याकडून एकच अपेक्षा बाळगून असतो त्या बदल्यात तू तुझी दहा कामे करवून घेतेस आणि वर पुन्हा मला ठेंगा दाखवतेस म्हणून तर खरं माझा जळफळाट चालला आहे. खिसा रिकामा होतोय अन् हाती धुपाटणे राहतेय याची मला तीव्र जाणीव होऊ लागल्यानेच मी तुझ्याशी फारकत घ्यायचं ठरवलं आहे... तू कदाचित म्हणशील, ‘सगळे पुरुष सारखेच असतात. स्त्रीला वासनेच्या दृष्टीनेच बघतात.’ हो हेही मला एकदम कबूल आहे. मी कोणी देव नाही निरपेक्ष प्रेम करायला. मीही एक प्राणीच आहे. त्यातही पुरुष. म्हणजे निसर्गनियमाप्रमाणे मी प्रेम करावं ते वासनेच्या अधीन राहूनच! आणि तुला म्हणून सांगतो जिथे वासना नसते ते प्रेम नसतेच मुळी, त्याला 'निष्काम' मैत्री म्हणता येईल हवं तर! स्त्रीवर प्रेम केलं आणि ‘ते’ घडलं नाही तर तो पुरुष बुळाच म्हणावा अन् दुसरं काय? तेव्हा मी ज्या हेतुपुरस्सर तुझ्यावर प्रेम केलं त्याचा मला पुरुष म्हणून अभिमानच वाटतो. खंत एकच राहते की आजकाल तू फक्त तुझा स्वार्थ साधून घेत आहेस. मी टाळीसाठी हात पुढे करतोय अन् तू दूर जातेस हे काही बरोबर नाहीये. टाळी एका हाताने वाजूच शकत नाही हे माहीत असतांनाही तू जवळ येण्याचे टाळावे हेच मला खटकतेय. माझी इच्छा पूर्ण होत नाही तर मी का म्हणून तुझ्यावर खर्च करावा? म्हणूनच आज आपण ब्रेकअप घ्यायचे म्हणजे घ्यायचे. पुन्हा कधीही भेटायचे नाही. मी तुला रिटर्न कॉल करणार नाही. तुझा कॉल मात्र आजपासून घेणार. ती तयारी ठेव तू. तूही आता कमावते आहेस, तुला खुपच वाटत असेल ना माझ्याशी बोलायचे तर बॅलन्स शिल्लक ठेवत जा. मला वेळ असेल किंवा जर बोलावेसे वाटले तरच मी फोन रिसिव्ह करीन तुझा. नाहीतर नाही. अब मेरी मर्जी... मला माहितीये तू आता आसवे ढाळू लागशील. 'मी इतकी वाईट आहे का रे?' असं विचारशील. पण मी मुळीच बधणार नाही. जिथे मला हवं ते तू देऊ शकत नाहीस तिथे माकडउड्या मारण्यात काहीच अर्थ नाहीये. जे मिळूच शकत नाही त्याची आस धरून वेळ, पैसा, श्रम वाया घालविण्यात मला तरी आता रस उरलेला नाहीये. बघ तुला पटतेय का? नाही पटले तरी चालेल मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम आहे. जितक्या वेळा तू मला उपभोगू दिलंस त्याच्या कैकपटीने अधिक त्याग मी केलेला आहे. घरादाराकडे दुर्लक्ष केलं आहे, वेळ दवडला आहे, पैसा ओतला आहे. आता कुठेतरी हे थांबायलाच हवं. म्हणून हा अंतिम निर्णय- ब्रेक अप. मग तू म्हणशील, ‘तू मला लुटलंस, माझं सर्वस्व तुला देऊन बसले.’ पण हे मी मानीत नाही. एक तर आपले हे अनैतिक संबंध ना तुझ्या नवऱ्याला कळले, ना माझ्या बायकोला. दुनियेपासून कितीतरी लपतछपत आपण भेटत राहिलो. हा व्यभिचार फक्त तुला व मलाच माहीत आहे. हे गैरवर्तन केवळ आपल्या दोघांतच सीमित राहिलं आहे, राहणार आहे. म्हणजे तू जे काचेचं भांडं समजतेस ते आजही शाबूत आहे. त्यावर कुणीही दगडफेक अजून तरी केलेली नाहीये, ते भांडं फुटण्याचा संभव नाहीच. कारण हा मामला म्हणजे तेरी भी चूप मेरी भी चूप या पठडीतला आहे. तू मला जे बहाल केलंस ते निसर्ग नियमाला धरून होतं. विजातीय धृवांमध्ये आकर्षण व्हायलाच पाहिजे तेच खरं प्रेम. मात्र त्या प्रेमाच्या बदल्यात तू मला कफल्लक केलंस, करते आहेस हे निसर्गनियमाला धरून आहे का? आज तू कमावू लागली आहेस, यशस्वी झाली आहेस, तुला तुझा नवरा आदराने वागवू लागला आहे, तुझी सासू तू ड्युटीवर गेल्यानंतर मागे सर्व कामे उरकू लागली आहे, सर्व काही आलबेल चालेलेलं आहे म्हणून तू मोठ्या मिजासखोरीत वावरू लागली आहेस, तुझ्या डोक्यात हवा शिरली आहे, तुझे पाय जमिनीवर ठरू पाहत नाहीत, एकंदर काय तर तू कृतघ्न होत चालली आहेस. गेल्या महिन्यात तुला पेमेंट वाढवून मिळालं हे एका अक्षरानं तू मला कळवलं नाहीस, मात्र नवऱ्यासोबत बटर चिकन खाऊन सेलिब्रेशन केलंस. वाह रे तुझी नियत. तुझं बरं चाललेलं असतांना, तू ऐशोरामात असतांना, आनंदी असतांना माझा विसर तुला का पडावा? ज्याच्यामुळे हे वैभव पाहत आहोत त्याला एक फोन करवत नाही तुला? हा कुठला न्याय म्हणायचा? मग अशा परिस्थितीत मी तुझी संगत सोडणे योग्य नव्हे काय? सांग. मी तर ठरवले आहे, तुझंही अंतर्मत वेगळं असू शकणार नाही. ‘जो माझ्याकडे वासनेची शिकार म्हणून पाहतो त्याला का म्हणून भेटायचे?’ असं तुला वाटत असेल, पटलं असेल तर मान्य. तुझा हा आरोप शिरसावंद्य आहे. कारण मी पुरुष या नात्याने तुझ्या स्त्रीत्वाकडे भोगवस्तू म्हणूनच पाहत आलोय. त्यामुळे तू मला निखालस टाळू शकतेस. माझ्याशी असलेले निनावी संबंध तोडू शकतेस. मलाही तेच हवे आहे. कारण माझ्या लेखी- “जिथे ‘काम’ नाही तिथे रामराम घालण्यात अर्थच नाही.” तेव्हा बाय बाय बाय...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थव्यवहार
जीवनमान
अर्थकारण
राजकारण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
लेख
मत
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
18087 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

काय हे डॉक? तुम्ही खरच मेडिकल

गणपा
Tue, 12/27/2011 - 02:05 नवीन
काय हे डॉक? तुम्ही खरच मेडिकल वाले डॉ. आहात काय? एकंदर तुमचे सगळेच लेखन 'सेक्स'या एकाच विषयाभवती घिरट्या घालत असते. त्यात परत कधी दुसर्‍या एखाद्या धाग्याला प्रतिसाद नाही की स्वत:च्या धाग्यावर इतरांनी उपस्थित केल्या शंका/प्रश्नांना उत्तरं नाहित. काय चालवलं आहे हे? (एक सामान्य वाचक.) गणा
  • Log in or register to post comments

प्रखर वास्तववादी लेखन, फक्त

५० फक्त
Tue, 12/27/2011 - 07:07 नवीन
प्रखर वास्तववादी लेखन, फक्त मध्ये मध्ये ब्रेक केलं असतं तर (परिच्छेद पाडले असते तर) जास्त सोपं गेलं असतं वाचायला....
  • Log in or register to post comments

तुझी मागणी पूर्ण केली की तू

पक पक पक
Tue, 12/27/2011 - 08:25 नवीन
तुझी मागणी पूर्ण केली की तू मला पुरुष म्हणून जे हवं ते देशील अशी अपेक्षा बाळगून मी गोल गोल फिरत राहायचो. ?????????????????????
  • Log in or register to post comments

ह्म्म... पुन्हा तेच. आपल्याला

अर्धवट
Tue, 12/27/2011 - 08:27 नवीन
ह्म्म... पुन्हा तेच. आपल्याला वैद्यकीय उपचारांची तातडीने आवष्यकता आहे असे नम्रपणे सुचवतो.
  • Log in or register to post comments

आपल्याला वैद्यकीय उपचारांची

सविता
Tue, 12/27/2011 - 11:15 नवीन
आपल्याला वैद्यकीय उपचारांची तातडीने आवष्यकता आहे असे नम्रपणे सुचवतो.
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

प्रतिसाद,प्रतिसाद, प्रतिसाद, प्रतिसाद, प्रतिसाद, प्रतिसाद......

प्रभाकर पेठकर
Tue, 12/27/2011 - 09:51 नवीन
प्रतिसादांच्या महापुराने मनःशांती लाभावी म्हणून आपल्या व्यभिचाराचे केलेले विकृत प्रदर्शन.
  • Log in or register to post comments

चायला...प्रेम आणि व्याभिचार

टवाळ कार्टा
Tue, 12/27/2011 - 10:09 नवीन
चायला...प्रेम आणि व्याभिचार एकाच वेळी....??? कसे शक्य आहे
  • Log in or register to post comments

गेट वेल सून

सोत्रि
Tue, 12/27/2011 - 10:36 नवीन
मग अशा परिस्थितीत मी तुझी संगत सोडणे योग्य नव्हे काय? सांग. मी तर ठरवले आहे, तुझंही अंतर्मत वेगळं असू शकणार नाही. ‘जो माझ्याकडे वासनेची शिकार म्हणून पाहतो त्याला का म्हणून भेटायचे?’ असं तुला वाटत असेल, पटलं असेल तर मान्य. तुझा हा आरोप शिरसावंद्य आहे. कारण मी पुरुष या नात्याने तुझ्या स्त्रीत्वाकडे भोगवस्तू म्हणूनच पाहत आलोय. त्यामुळे तू मला निखालस टाळू शकतेस. माझ्याशी असलेले निनावी संबंध तोडू शकतेस. मलाही तेच हवे आहे. कारण माझ्या लेखी- “जिथे ‘काम’ नाही तिथे रामराम घालण्यात अर्थच नाही.” तेव्हा बाय बाय बाय...
"मामू, गेट वेल सून" - (मुन्नाभाई) सोकाजी
  • Log in or register to post comments

तेच तेच आणि तेच

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/27/2011 - 11:12 नवीन
या येवढ्या सगळ्या अक्षर कचर्‍याचे सार कोणी दोन वाक्यात सांगेल काय ? बाकी श्री. दिवटे अध्ये मध्ये मिपावरती इतरांचे लेखन वाचायला आणि त्यावर साधक-बाधक प्रतिक्रिया द्यायला देखील येत चला. फक्त आपले लेखन आणून फेकण्यासाठी मिपाचे व्यासपीठ वापरत जौ नका.
  • Log in or register to post comments

>>या येवढ्या सगळ्या अक्षर

मनराव
Tue, 12/27/2011 - 11:18 नवीन
>>या येवढ्या सगळ्या अक्षर कचर्‍याचे सार कोणी दोन वाक्यात सांगेल काय ?<<< दोन वाक्य कशाला........एकच शब्द पुरेसा आहे........ "बकवास"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/27/2011 - 11:33 नवीन
धन्यवाद हो मनराव. @प्रभुदेवा :- रामागडी घरचाच आहे क बदली आलाय ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

या येवढ्या सगळ्या अक्षर

भीमाईचा पिपळ्या.
Tue, 12/27/2011 - 21:34 नवीन
या येवढ्या सगळ्या अक्षर कचर्‍याचे सार कोणी दोन वाक्यात सांगेल काय ? बाकी श्री. दिवटे अध्ये मध्ये मिपावरती इतरांचे लेखन वाचायला आणि त्यावर साधक-बाधक प्रतिक्रिया द्यायला देखील येत चला. फक्त आपले लेखन आणून फेकण्यासाठी मिपाचे व्यासपीठ वापरत जौ नका.
मा. परा, आपण स्वतःला काय समजता ? कोणी ज्याच्या त्याच्या पधतीने इथे लिहीत असेल तर तुम्हाला पोटदुखी कशासाठी? तुम्हाला नसेल प्र द्यायची तर नका ना देउ. प्र काय लग्नातले आहेर आहेत का? कुणाला फक्त लेख लिहायचे असतील तर तुम्ही मनाई करणारे कोण? इथल्या संचालकांनी वेळीच लक्ष घालुन पुढील अनर्थ टाळावा असे एक नम्र आवाहन या ठिकाणी करीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मा. परा, आपण स्वतःला काय

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/28/2011 - 11:11 नवीन
मा. परा, आपण स्वतःला काय समजता ?
समजायला आम्ही स्वतःला काहीपण समजू ;) उद्या देव पण समजू. तुमची काय हरकत हाय काय ?
कोणी ज्याच्या त्याच्या पधतीने इथे लिहीत असेल तर तुम्हाला पोटदुखी कशासाठी?
पोटदुखी नाही हो, डोकेदुखी होऊ नये म्हणून.
तुम्हाला नसेल प्र द्यायची तर नका ना देउ. प्र काय लग्नातले आहेर आहेत का?
तुम्हाला त्याच्याशी काय घेणे देणे ? सार्वजनिक ठिकाणी लेखन आले की त्यावरती जोडे मारायचे का हार फेकायचे हे आम्ही वाचणारे ठरवू.
कुणाला फक्त लेख लिहायचे असतील तर तुम्ही मनाई करणारे कोण?
अर्र्तेज्यायला ! आम्ही कधी मनाई केली बॉ ? का तुम्हाला नको ते दिसायला लागले आहे ? उलट आम्ही तर नुसते लेखच नको तर प्रतिसाद देखील लिहा म्हणून आग्रह करत आहोत.
इथल्या संचालकांनी वेळीच लक्ष घालुन पुढील अनर्थ टाळावा असे एक नम्र आवाहन या ठिकाणी करीत आहे.
अनर्थ ? तो आणी काय म्हणे ? तुम्ही फोलिस केस करता का काय आता माझ्यावरती ? :P चिपळ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमाईचा पिपळ्या.

ठ्ठो....ठ्ठो....

वपाडाव
Wed, 12/28/2011 - 11:18 नवीन
चिपळ्या
कायतरी बरं हे पर्‍या !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

=)) तुमचा प्र अन सही भयंकर

शिल्पा ब
Wed, 12/28/2011 - 23:56 नवीन
=)) तुमचा प्र अन सही भयंकर आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

गलिच्छ लिखाण संपूर्ण वाचले.

मन१
Tue, 12/27/2011 - 11:19 नवीन
शेवटी काही ट्विस्ट असेल किंव काही आशय असेल व भला अर्थ हाती लागेल म्हणून संपूर्ण वाचले. धागा उडवायची पावर नसल्याबद्दल प्रथमच इतके वाईट वाटते आहे. संप्तप्त
  • Log in or register to post comments

दोन वाक्ये

विनायक प्रभू
Tue, 12/27/2011 - 11:20 नवीन
रामा गडी तयार आहे. भांडे नै म्हणते.
  • Log in or register to post comments

दोन वाक्ये

विनायक प्रभू
Tue, 12/27/2011 - 11:20 नवीन
रामा गडी तयार आहे. भांडे नै म्हणते.
  • Log in or register to post comments

गेल्या महिन्यात तुला पेमेंट

सुहास..
Tue, 12/27/2011 - 11:29 नवीन
गेल्या महिन्यात तुला पेमेंट वाढवून मिळालं हे एका अक्षरानं तू मला कळवलं नाहीस, मात्र नवऱ्यासोबत बटर चिकन खाऊन सेलिब्रेशन केलंस. वाह रे तुझी नियत >>> =)) =)) =)) लई हसलो ! असो , नैतिक - अनैतिक ची दुसरी बाजु आवडली, जरा काम-भोग टाळता जा की लिहीताना ;)
  • Log in or register to post comments

डॉक्टरसाहेब...... तुमचा नायक

प्यारे१
Tue, 12/27/2011 - 11:32 नवीन
डॉक्टरसाहेब...... तुमचा नायक (लेखातलाच असावा अशी करुण अपेक्षा) पार गंडलाय हो. ना बायको जवळ करत, ना किम्मत देत. आणि आता प्रेयसी म्हणून जिची निवड केलेली ती पण साफ 'हुकलीये'. मला वाटतं पुरुषार्थ गाजवायला तुमचा नायक साफ नालायक आहे. बाकी 'मोस्ट इंपॉर्टंट ऑर्गन इन सेक्स इज ब्रेन' असं कुणीसं म्हणून गेलेलंच आहे. मैत्रिणींचा झेंडा कधी फडकतो हे ठाऊक असताना (नो ऑफेन्स फिमेल्स, फरगिव्ह मी, हे डॉ. च्या एका लेखाचं नाव होतं ) म्हणजे इतक्या वैयक्तिक गोष्टी बोलू शकत्/शेअर करु शकण्याचं कसब तुमच्याकडं असताना तुमच्या नायकाला बायको अथवा प्रेयसी ची योग्य कळ फिरवता येऊ नये म्हणजे आश्चर्य आहे. जस्ट मेक अ नोट : प्रॉब्लेम दुनिया में नही आप खुद में है|
  • Log in or register to post comments

<<<जस्ट मेक अ नोट : प्रॉब्लेम

शिल्पा ब
Tue, 12/27/2011 - 12:09 नवीन
<<<जस्ट मेक अ नोट : प्रॉब्लेम दुनिया में नही आप खुद में है| अहो हेच आम्ही त्यांना मागच्या उडालेल्या लेखात पहीलीच प्रतिक्रिया देताना म्हंटलं होतं...बाकी कोडगेपणा हा डॉ. चा गुण घेण्यासारखा आहे हे जाताजाता सांगते..पर्‍या त्यांच्या प्रत्येक लेखात "दुसर्‍याचे लेख वाचुन एखादी प्रतिक्रिया तरी देत चला, नुसतेच स्वत:चे प्रसिद्ध करण्यासाठी मिपाचा वापर नका करु" हे कानी कपाळी सांगतोय पण एक ना दोन..नुसतेच भरमसाठ लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

झेंडा, यस्स...

दादा कोंडके
Tue, 12/27/2011 - 16:09 नवीन
झेंड्याच्याच धाग्याला बर्‍याच हुच्चभ्रू मंडळींचे चान चान प्रतिसाद पाहूनच आश्चर्य वाटले होते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मीही तुझ्यावर प्रेम करतांना

आत्मशून्य
Tue, 12/27/2011 - 12:08 नवीन
मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत. - Starting is excellent. Naked truth. Only This story is somewhat we should call real breakup. good work doctor SAAB. Khup changale nirikshan aahe ekaa PURUSHACHYA anubhavaach. Pan nantar nantar maatra jaraasaa jaast taaimapass zaalay itakach. Pan katha mastach . Ha break up tumachaa swatacha asel tar aasha aahe ajun baryaach goshti lawakarach livaal.. Mhnaje vel rikama asel naa ;)
  • Log in or register to post comments

तुम्ही का इंग्रजी सोडेनात

शिल्पा ब
Tue, 12/27/2011 - 12:09 नवीन
तुम्ही का इंग्रजी सोडेनात हो?? अं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

शिल्पा ब-Ji woh aisa hai ke

आत्मशून्य
Tue, 12/27/2011 - 12:58 नवीन
I am writting this far from the device or application that support Marathi characters as Input format.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आ.शू.

मी-सौरभ
Tue, 12/27/2011 - 13:20 नवीन
ईंग्रजी लिपी वापरुन मराठी शब्द लिहीता येतील की :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

कै नको, ते तर फारच त्रासदायक

शिल्पा ब
Tue, 12/27/2011 - 13:52 नवीन
कै नको, ते तर फारच त्रासदायक वाटतं...पण हौस कीती बघा ना या आत्मशुन्य आजोबांना!! मिपा सोडवत नैये अगदी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

/-/

वपाडाव
Tue, 12/27/2011 - 14:04 नवीन
काकु, प्रतिसाद देण्याची खुमखुमीच असेल नै का आजोबांना..... धेडगुजरे होउनही मिपाचं व्यसन सुटत नैय्ये.... कसं होणार कै माहिती.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

:)

आत्मशून्य
Tue, 12/27/2011 - 14:19 नवीन
I love to kill, especially time .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

@शिल्पा -ji

आत्मशून्य
Tue, 12/27/2011 - 14:40 नवीन
aata आजोबां mhanatach aasal tar tyabaabat ajun ek gosht krupaya lakshaat thevane aavashyak aahe.... Ti mhanaje:....... Dont teach your grandfather how to fish. (H. ghya.) Tasahi mobilevarun marathit type karata yet nahi ha maaza nhave MIPACHA dosh aahe.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

काय होते ??

गवि
Tue, 12/27/2011 - 14:53 नवीन
दोष कुणाचा हा भाग वेगळा.. आशूसारख्या कोणाला मोबाईलवरुन मिपा वाचण्याची ओढ आहे आणि त्यावर प्रतिसाद देण्याचीही मनापासून इच्छा होते आहे.. अशा वेळी आहे त्या साधनाने शक्य अशा इंग्रजी भाषेत प्रतिसाद दिला तर त्यात खवटण्याचे कारण काय ते कळले नाही.. मलाही अनेकदा प्रतिसाद देण्याची इच्छा आवरत नाही, तेव्हा मी इंडि एसेमेस वर मराठी टाईपतो आणि स्वतःला मेसेज पाठवून तो कॉपीपेस्ट करुन इथे डकवतो. पण याला उगाच एसेमेस चार्ज पडतो. शिवाय हा वेळखाऊ प्रकार आहे.. मानेमागून घास घेण्याचा.. अँड्रॉईड मोबाईलवरुन प्रतिसाद मिपावरही टंकता येतो, पण त्यात बहुधा क्रोम ब्राऊझर असल्याने मधेच लेखन असे काही गंडते की सांगता सोय नाही..बर्‍याचदा एक चूक सुधारता सुधारता मागचे सारेच बिघडते आणि पुन्हा पहिल्यापासून टंकावे लागते. तसाही अँड्रॉईड सर्वांकडे असेलच असं नाही. त्यापेक्षा अशा वेळी एखादा प्रतिसाद कोणी रोमन अक्षरांत लिहिला तर काय बिघडते..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

+१.

प्यारे१
Tue, 12/27/2011 - 14:59 नवीन
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मनापासुन बरंच कै करण्याची

शिल्पा ब
Tue, 12/27/2011 - 15:05 नवीन
मनापासुन बरंच कै करण्याची इच्छा होते म्हणजे केलंच पैजे असं नै..उद्या एखाद्या कन्नड जाणणार्‍या माणसाला कानडीत प्रतिसाद द्यायची इच्छा होईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

@गवि YOU SIMPLY ROCKS! MADE MY DAY

आत्मशून्य
Tue, 12/27/2011 - 21:24 नवीन
नुकतच इडिया एसेमेस वापरलं. त्यामधेच हा संदेश टाइप केलाय. कॉपि पेस्ट करायला स्वत:ला सेंड करायचिही गरज नहि फ़क्त ड्राफ़्ट म्हणुन सेव करयचा व आपल्या डिफ़ॉल्ट एसेमेस अॅप मधे ओपन करयच (मज़्यकडे तरि हे होतय मि नोकिया सिंबियान ओस वर वापरत आहे) आपल्या सुचनेला मनापासुन धन्यवाद. आता मराठी ही लिहु शकतो :) जय महाराश्ट्र @शिल्पा ब I think you should be more observant in observations, bcoz I havn't failed to write even a single line in Marathi here yet, It just, I was very very very succesful in finding a way how not to write marathi here ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मनापासुन बरंच कै करण्याची

शिल्पा ब
Tue, 12/27/2011 - 15:05 नवीन
मनापासुन बरंच कै करण्याची इच्छा होते म्हणजे केलंच पैजे असं नै..उद्या एखाद्या कन्नड जाणणार्‍या माणसाला कानडीत प्रतिसाद द्यायची इच्छा होईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

जल्ला तुमा सगल्यांचा चाल्ला

गणपा
Tue, 12/27/2011 - 16:13 नवीन
जल्ला तुमा सगल्यांचा चाल्ला काय हां? ईषय कसलो नी चरचा कसली चल्लीहा? (ब तै हे केवळ तुम्हाला उद्देशुन नै हो. तुमचा प्रतिसाद केवळ निमित्तमात्र. :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

/-/

वपाडाव
Tue, 12/27/2011 - 17:52 नवीन
जसे आपण स्वतः प्रतिसाद न देता शांत बसु शकत नाही तसेच ते पण...... फरक फक्त काय विषय तोडत प्रतिसाद अन लक्ष दोन्हीही खेचण्याचं तुमचं कसब.... ते मात्र वाखाणण्याजोगे.... ह घ्या न घ्या.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

तुम्हाला एवढी इच्छा असेल या

शिल्पा ब
Wed, 12/28/2011 - 00:01 नवीन
तुम्हाला एवढी इच्छा असेल या धाग्याच्या विषयावर बोलायची तर बोला की, कुणी अडवलंय? आमच्या कसबाची दखल घेतल्याबद्दल भयंकर आभारी आहे...याची गरज होतीच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

मग देऊ दे ना कानडि प्रतिसाद

मी-सौरभ
Tue, 12/27/2011 - 18:00 नवीन
मनापासुन बरंच कै करण्याची इच्छा होते म्हणजे केलंच पैजे असं नै..उद्या एखाद्या कन्नड जाणणार्‍या माणसाला कानडीत प्रतिसाद द्यायची इच्छा होईल..
मग देऊ दे ना कानडि प्रतिसाद; आम्ही त्यांना आख्खा कारवार बेळगाव प्रदेश दिलाय त्यांनी एक प्रतिसाद दिला तर काय बिघडतय???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मिपाचे घोषवाक्य...

प्रभाकर पेठकर
Tue, 12/27/2011 - 16:08 नवीन
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

.

आत्मशून्य
Tue, 12/27/2011 - 12:00 नवीन
.
  • Log in or register to post comments

मनोरुग्ण बनाल हो , हे असल

पक पक पक
Tue, 12/27/2011 - 11:55 नवीन
मनोरुग्ण बनाल हो , हे असल काही बाही लिहीत जाउ नका........
  • Log in or register to post comments

अरे कशाला प्रतिक्रिया

स्पा
Tue, 12/27/2011 - 11:58 नवीन
अरे कशाला प्रतिक्रिया देताय... पुढची जिलबी पडेपर्यंत ते इथे फिरकणार सुद्धा नाहीत, किंवा एकही प्रश्नाला उत्तर देणार नाहीत दुर्लक्ष करा कि.. धागा अपोआप खाली जाईल
  • Log in or register to post comments

धागा खाली...

मन१
Tue, 12/27/2011 - 12:02 नवीन
धागा खाली जाणे पुरेसे आहे का? उडवल्यास बरे होणार नाही का? @ पक पक प्काकः- असे लिहिल्याने स्वतः लिहिणारा मनोरुग्ण बनेल की स्वतः मनोरुग्ण असणारा असे लिहील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

Relax man ! This thread is

आत्मशून्य
Tue, 12/27/2011 - 12:23 नवीन
Relax man ! This thread is niether business nor personal.. Then why do people even care if it is exist or should be deleted ? Just enjoy the way writter described the subject. If you are not happy reading about such things then do protest against one episode of Mandakini's story too coz it is way more descriptive.(No offence to writter of that story as it was a reading fun too)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

असे लिहिल्याने स्वतः लिहिणारा

पक पक पक
Tue, 12/27/2011 - 13:03 नवीन
असे लिहिल्याने स्वतः लिहिणारा मनोरुग्ण बनेल की स्वतः मनोरुग्ण असणारा असे लिहील? अछ्छा म्हणजे डॉक्टर्र साहेब स्वतः मुळातच मनोरुग्ण आहेत का..? नाही त्यांनी आगोदर टाकलेल्या जिलब्या वाचल्या नाहित म्हणुन विचारतो आहे. बर आहे वाचल्या नाहीत ते .वाचलो म्हणायच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

स्वतःच्या स्वार्थासाठी एक

मदनबाण
Tue, 12/27/2011 - 12:02 नवीन
स्वतःच्या स्वार्थासाठी एक माणुस दुसर्‍या माणसाला "वापरतोच" त्यात स्त्रीया सुद्धा येतातच ! यात नवल ते काय ? ;) बाकी पाखरं १ नंबरी लबाड अन् वस्ताद असतातच ! ;)
  • Log in or register to post comments

(No subject)

दिपक
Tue, 12/27/2011 - 12:09 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आईचा घो !

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/27/2011 - 12:20 नवीन
दिपक लेका.. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. रच्याकने, गेट वेल सून डॉक Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

अत्युच्च प्रतिसाद.... लाईकड.

प्यारे१
Tue, 12/27/2011 - 12:26 नवीन
अत्युच्च प्रतिसाद.... लाईकड. ;) ही जाहिरात असली तरी मिपा प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष करावे ही णम्र विनंती. हल्लीच्या लेखांवरुन लेखकांना (लेख लिहीणारी व्यक्ती लेखक. लिंगभेद केलेला नाही ;) ) याची गरज असावी असे वाटते आहे नव्हे खात्री झालेली आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा