लग्न पाहावे करून.

विवेकखोत's picture
विवेकखोत in जनातलं, मनातलं
30 Nov 2011 - 10:24 am

मला तशी लिहियाची सवय नाही पण गेल्या सहा महिन्यात तिने (म्हणजे माझी वाग्दत्त वधू) सवय लावली मला असे वाटे कि या लिखाणाला अजून थोडी पोलीशिंग ची गरज आहे. बघू कसे जमते ते. आता नियमित ब्लोग लिहिण्याची सवय लावणार आहे.(काही चुकले तर माफी असावी )
जुने लोक म्हणतात ते काही खोटे नाही, आता मझे लग्न महिन्यावर आले , घरामध्ये नुसता गोंधळ हे आन ते आन , खरेदी, पत्रिका नि अजून काय काय ,
पण खरेच खूप चं अनुभूती आहे. लग्न मधली धमाल काही ओरच पण लग्न म्हणजे एक जबाबदारी हे मला कळले अचानक ४-५ वर्षाने मोठे झाल्या सारखे वाटते आहे.
पण ते सुद्धा आवश्यक आहे ते मला पटते कारण एक stability येते माणसाच्या आयुष्यात, खूप सुखकारक बदल घडून येतात आता हेच पहा न मी आता पर्यंतच्या आयुष्यात जेवढे apple खाल्ले नाहीत तेवढे या ६ महिन्यात (म्हनजे लग्न ठरल्या पासून )खाली आहेत. मला सुद्धा माझ्या मध्ये फरक जाणवत आहे. प्रेमाचे नाते पण खूप हळुवार फुलत जाते. पण असो खूप छान अनुभव आहे .
तसे आमच्या जॉब प्रोफेशन मध्ये जमीन अस्मान चे अंतर आहे, ती निसर्गात रमणारी तर मी eletronics gadgetsमध्ये रमणारा, ती प्राणी पक्षी आणि फुले या वर प्रेम करणारी आणि मी आपला computer आणि mobile सारख्या वस्तूमध्ये रमणारा, वाटले कसे जमावे आपले हा हा म्हणता कसे दिवस सरले काही कळले नाही. दोन्ही वेगळ्या प्रोफेशन मध्ये असल्या मुळे जॉब विषयी काही जास्त बोलणे होत नवते त्याचा आम्हाला फायदाच झाला कधीही गप्पा कंटाळवाण्या झाल्या नाहीत.
engagement ते लग्न हा प्रवास खूप पटकन झाला. अजून लग्नाला मोजकेच दिवस बाकी आहेत. बघू कसे काय जमते ते

धोरणसंस्कृतीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Nov 2011 - 10:26 am | प्रचेतस

मी आता पर्यंतच्या आयुष्यात जेवढे apple खाल्ले नाहीत तेवढे या ६ महिन्यात (म्हनजे लग्न ठरल्या पासून )खाली आहेत

अ‍ॅपल कशाला खाताय, कांदे खा आता.

सुहास झेले's picture

30 Nov 2011 - 10:30 am | सुहास झेले

:D :D :D

विवेकखोत's picture

30 Nov 2011 - 11:34 am | विवेकखोत

का मस्करी करताय अहो हे सगळे तुमच्या आयुष्यात सुधा घडेल व घडणार असेल
अहो बायको जे म्हणेल ते कराव लागते

स्पंदना's picture

30 Nov 2011 - 11:51 am | स्पंदना

बायको तुम्हाला अ‍ॅपल खा म्हणतेय अन तुम्ही अ‍ॅपल 'खाली ' ??? कलयुग कलयुग !!

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2011 - 11:57 am | परिकथेतील राजकुमार

अ‍ॅपल कशाला खाताय, कांदे खा आता.

रात्री चांदीच्या ग्लासातून कांद्याचा रस घेतलात तर अतीउत्तम.

पराशेट..पराशेट.. थांबा.. आधी त्यांना अंदाज घेऊ द्या. तुम्ही एकदम फारच जालीम उपाय सांगता बुवा. सफरचंदाने भागत असेल तर कांदा अन सोनाचांदीभस्म कशाला उगाच?

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2011 - 12:08 pm | परिकथेतील राजकुमार

पराशेट..पराशेट.. थांबा.. आधी त्यांना अंदाज घेऊ द्या. तुम्ही एकदम फारच जालीम उपाय सांगता बुवा. सफरचंदाने भागत असेल तर कांदा अन सोनाचांदीभस्म कशाला उगाच?

आधीच आपण तयारीत असलेले बरे.
उद्या गुढघेदुखीचा त्रास सुरू व्हायला नको. आधीच काळजी घेतलेली बरी ;)

प्रभाकर पेठकर's picture

30 Nov 2011 - 12:55 pm | प्रभाकर पेठकर

तुम्ही एकदम फारच जालीम उपाय सांगता बुवा. सफरचंदाने भागत असेल तर कांदा अन सोना चांदी भस्म कशाला उगाच?

नाहितर काय..! उगीच क्रॅश लँडींग व्हायचे.

सर्वसाक्षी's picture

30 Nov 2011 - 1:13 pm | सर्वसाक्षी

त्यांची पत्नि हिमाचली वा काश्मिरी असावी.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2011 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार

त्यांची पत्नि हिमाचली वा काश्मिरी असावी.

ह्या तर्कामागचे तर्कीक जाणून घ्यायला आवडेल.

प्रचेतस's picture

30 Nov 2011 - 1:21 pm | प्रचेतस

सफरचंद हे कारण असावे.

मग एखाद्या केसमधे कांदे खात असतील तर वधू लासलगावची असेल म्हणावे का?

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2011 - 1:28 pm | परिकथेतील राजकुमार

इन दॅट कॅस, बर्‍याच बायकांना स्मशान निवासी म्हणावे लागेल. कारण त्या नवर्‍याचे डोके खातात आणि रक्त पितात.

सगळ्याच केसेस मध्ये बायका स्मशान निवासीच असतात.
लहानपणापासूनच नवर्याचे डोक्याचा भेजा फ्रय कसा बनवावा ह्याची शिकवण त्यांना मिळालेली असते.

जर नोन वेज खात असाल तर लोबस्तर ,कोलंबी बघा तरी करून!

गवि's picture

30 Nov 2011 - 2:11 pm | गवि

करेक्षन ...

तुम्हाला ऑयस्टर म्हणायचं असावं..

ओव्हर अँड औट..

ऑयस्टर मिळाला तर बाकी कसलीच गरज लागणार नाही!
पण सांभाळून खा. तो एकदम गिळायचा असतो म्हणे!
चांदीच्या आणि कांद्याच्या मानाने परवडेबल आहे!

चांदीच्या आणि कांद्याच्या मानाने परवडेबल आहे!

नक्की कुठे रहाता तुम्ही?

मुद्दामच लिहील.इथे ओयास्तेर बघायला मिळत नाही आणि तुम्ही ओय्स्तेर कसा सुचवता?
चांदीच्या पेल्यातल पाणी,दुध,बदाम,मंजुळा,भस्म, मटन इथ्पार्यांच ठीक आहे!

विजुभाऊ's picture

30 Nov 2011 - 2:51 pm | विजुभाऊ

लग्नात उखाणा घ्यायला मदत
चांदीच्या पेल्यात तुळशीच्या मंजुळा
**** राव अंगात दम आहे तर थोडी ज्वारी दळा

चांदीच्या पेल्यात तुळशीच्या मंजुळा
*** रावांचे नाव घेता भरुन येतो गळा.

चांदीच्या पेल्यात तुळशीच्या मंजुळा
**** राव आले.*** पंत तुम्ही पळा.

सूड's picture

30 Nov 2011 - 3:12 pm | सूड

* राव आले.*** पंत तुम्ही पळा

हे लय भारी.

सूड's picture

30 Nov 2011 - 2:30 pm | सूड

प्र का टा आ

सगळ्याच केसेस मध्ये बायका स्मशान निवासीच असतात.
लहानपणापासूनच नवर्याचे डोक्याचा भेजा फ्रय कसा बनवावा ह्याची शिकवण त्यांना मिळालेली असते.

एक स्त्री असुन तु असा प्रतिसाद दिलास ;) निषेढ ;)
(किचेन तै तु नक्की कीचेन तैच आहेस ? की कीचेन दादा ? ;) )

तैच अहे कि पियु! पन पण सत्य ते सत्य असत!

कपिलमुनी's picture

30 Nov 2011 - 3:55 pm | कपिलमुनी

चला ..एका तरी स्त्री ला सत्याची जाणीव आहे म्हणायची ..

(पाशवी शक्ती कुठे दिसत नहित आज काल, नहितर किचेन चे अवघड झाले असते )

मीनाक्षी देवरुखकर's picture

30 Nov 2011 - 10:29 am | मीनाक्षी देवरुखकर

खूप सुखकारक बदल घडून येतात आता हेच पहा न मी आता पर्यंतच्या आयुष्यात जेवढे apple खाल्ले नाहीत तेवढे या ६ महिन्यात (म्हनजे लग्न ठरल्या पासून )खाली आहेत

होणारि बाय्को डॉक्टर आहे काय?

नाय सहज विचारल जुनी विन्ग्लीश म्हन आठवली

अन्या दातार's picture

30 Nov 2011 - 11:20 am | अन्या दातार

काय्तर बओलून र्‍हाताल तुमी. सपर्चंद डागदरास दूर ठेवाया खात्याल. आता होणारी बाय्को डागदर आसंल तर कशापायी तिला दूर ठिवाचं?

(अ‍ॅप्पल आणि डॉक्टर या दोघांना दूर ठेवायला बघणारा) अन्या

मोहनराव's picture

30 Nov 2011 - 1:52 pm | मोहनराव

हे मात्र बेस बोल्लात राव!!

कपिलमुनी's picture

30 Nov 2011 - 11:14 am | कपिलमुनी

चांदीचा पेला आणि तुळशीच्या मंजुळा.....
:D

:D

(अजुन काय काय वाचावे लागणार )

पु ले शु.

आणि लग्नाला बोलवा बर का..( किचेन तै ना तरी नक्कि , त्या पेला भेट देतात )...

हो आणि आता पराशेठ आणि कपिलमुनी(?), म्हणतायत तर आम्ही सगळे मिपाकर मिळून तुम्हाला चांदीचा पेला,कांद्याच पोत,बदामचा डबा,तुळशीच्या मंजुळा (आणखीन काही उरलाय का?) भेट देऊ!

आणि वर जे सोन अनि चांदि लिहिलय तेहि देउ!फक्त सग्ळ्याचा उपयोग एक्दम करु नका! ;)

सुखी संसाराची सोपी वाटचाल!

किसन शिंदे's picture

30 Nov 2011 - 11:22 am | किसन शिंदे

खूप सुखकारक बदल घडून येतात आता हेच पहा

एकदा लग्न आटपले कि कळेल लवकरच ;)

मोहनराव's picture

30 Nov 2011 - 1:55 pm | मोहनराव

मग नंतर दु:खकारक बदलसुद्धा लक्षात येतील!!

हा हा हा
काय रे बाबा, धन्य आहात.

नगरीनिरंजन's picture

30 Nov 2011 - 11:29 am | नगरीनिरंजन

खरेच खूप चं अनुभूती आहे

सहमत. आमच्या लहानपणी तीर्थरूपांनी आमच्या कानाखाली जाळ काढल्यावर कानात असाच "चं" आवाज येत असायचा बराच वेळ. लग्न झाल्यावर जाळ न काढताही हा आवाज सतत ऐकू येतो हे तुम्हाला आधीच कसे कळले?

हो रे मित्रा... अतिशय सुखद आहे ही आयुष्यातली घटना..

..(का तोडा एखाद्याचे सुखस्वप्न आधीच?)

शिल्पा नाईक's picture

30 Nov 2011 - 1:17 pm | शिल्पा नाईक

+ १ सहमत (++१ सहमत = कंसातील वाक्य)

थोड्या दिवसांत जमीनीवर येतात सगळेजण, ले़खक पण येतील. अन पुढे मुलं झाली की जमीनीत जावसं वाटू लागेल. :(

तोवर घेउ देत त्यांना 'सुखद अनूभव' :)

आजच सकाळी एक वन लाईनर वाचली.

पोर जन्मल्यावर पहिली दोन वर्षं त्याला पायावर उभं रहायला आणि बोलायला शिकवण्यात जातात आणि पुढची सोळा वर्षं त्याला "खाली बस" आणि "गप्प बस" म्हणण्यात खर्ची पडतात.

.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2011 - 1:26 pm | परिकथेतील राजकुमार

पोर जन्मल्यावर पहिली दोन वर्षं त्याला पायावर उभं रहायला आणि बोलायला शिकवण्यात जातात आणि पुढची सोळा वर्षं त्याला "खाली बस" आणि "गप्प बस" म्हणण्यात खर्ची पडतात.

ह्या द्विअर्थी वाक्याचे गवि ह्यांनी रसग्रहण देखील टाकावे अशी विनंती.

रसग्रहणाची आर्डर टंकनिकेला दिली आहे. थोड्या वेळात टंकेलसे वाटते..

शिल्पा नाईक's picture

30 Nov 2011 - 1:30 pm | शिल्पा नाईक

++१ सहमत. पण ती पहिली २ वर्ष पण महाग पडतात हो.
मला जुळी मुलं आहेत. सध्या २ वर्ष पुर्ण होताहेत. जन्माला येण्या आधी पासून वाईट अवस्था आहे माझी (ह. घ्या. ) :)

लीलाधर's picture

30 Nov 2011 - 11:41 am | लीलाधर

मला तशी लिहियाची सवय नाही पण गेल्या सहा महिन्यात तिने (म्हणजे माझी वाग्दत्त वधू) सवय लावली मला आत्तापासूनच होम मिनीस्टरच्या तालावर चालताय? नक्कीच तुम्ही होम मिनीस्टर मध्ये एस एम एस करा तुमचा नंबर लागेल. रोज दैनंदीनी लिहीत चला :)

स्पंदना's picture

30 Nov 2011 - 11:48 am | स्पंदना

बोले तो ऽ ऽ लाइफ मे सेटल होने को मंगता है । हां ना? क्या बोलती तु ? वो विवेकखोत, वो अपना मिसळ्पाव वाला? वो सेटल होने जा रहा है । तो लाइफ मे सेटल होने को मंगता ।

रानी १३'s picture

30 Nov 2011 - 11:53 am | रानी १३

नगरीनिरंजन तुमचा प्रतिसाद वाचुन खुप हसु आले.

प्रभाकर पेठकर's picture

30 Nov 2011 - 1:23 pm | प्रभाकर पेठकर

पण, लिखाणाला - 'ण' लिहिता येतो नं! मग, 'हे आन ते आन' - हे 'न' कशाकरिता??

जॉब प्रोफेशन, जॉब विषयी - अर्धचंद्र टाकता येतो नं? मग ब्लोग - हे कशा करीता??

नवते - लेखात इतकी जोडाक्षरे व्यवस्थित लिहिणार्‍याला 'व्ह' लिहिता येत नाही??

लग्नाला मोजकेच दिवस बाकी आहेत. बघू कसे काय जमते ते

काय कसे जमते ते पाहायचे आहे?? तसही, काळजी करू नका. सगळ्यांना जमते.

कपिलमुनी's picture

30 Nov 2011 - 1:27 pm | कपिलमुनी

सगळ्यांना जमते.

ह ह पू वा

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2011 - 1:24 pm | परिकथेतील राजकुमार

काय कसे जमते ते पाहायचे आहे?? तसही, काळजी करू नका. सगळ्यांना जमते.

__/\__
पेठकर काका आजकाल तुफान फलंदाजी करत आहेत.

मन१'s picture

30 Nov 2011 - 1:42 pm | मन१

अग्गा गा यो...........
पेठकर अंकल, लैच भारी की हो

विजुभाऊ's picture

30 Nov 2011 - 1:38 pm | विजुभाऊ

लग्न म्हणजे एक जबाबदारी हे मला कळले अचानक ४-५ वर्षाने मोठे झाल्या सारखे वाटते आहे.

अरे बापरे...आत्ताच ही अवस्था.......

माणूस- केमिस्टला - मला विषाची बाटली द्या.
केमिस्ट- प्रीस्र्कीप्षन असल्याशिवाय देता येणार नाही.
माणूस- हि माझी लग्न पत्रिका बघा.
केमिस्ट-बस झाल वेड्या,आता रडवतो का मला? लहान देऊ का मोठी? :( :-( :sad:

विवेकखोत- ह.घे.
:) :-) :smile:

सीग्राम्स इम्पिरियल ब्लूच्या सगळ्या जाहिराती फटाफट डोळ्यासमोर तरळून गेल्या..विशेषतः -

उसकी वाईफ की ऑफिशियल टूर.. सात दिन की .. कॅन्सल हो गयी..

किंवा

कब है अ‍ॅनिव्हर्सरी सर..?

कल................. थी....

ओह..फाईव्ह कॅरट डायमंड रिंग सर...

अच्छा पुढल्या महिन्यात लग्न आहे तुमचं तर !!

कपिलमुनी's picture

30 Nov 2011 - 1:50 pm | कपिलमुनी

मनोधैर्य वाढवावे ( लग्नासाठी नव्हे , लेख आणि प्रतिक्रियेसाठी ..नाहीतर नवलेखकाच्या भ्रुणहत्येच पाप लागायच )

+१सहमत! इथे येऊन एक आठवडाच झालाय आणि काय काय कानावर पडतंय!
विवेकराव मी पा वर स्वागत आहे!
शुद्धलेखनाविषयी काही प्रश्न असतील तर कृपया मला विचारू नये!

मोहनराव's picture

30 Nov 2011 - 4:14 pm | मोहनराव

<<शुद्धलेखनाविषयी काही प्रश्न असतील तर कृपया मला विचारू नये!>>
तुम्हालाच शुद्धलेखनाविषयी विचारलेले बरे...कारण तुमच्या प्रत्येक धाग्यावर खुप लोकांनी खुपदा सांगितले आहे व उशीर का होईना पण शुद्धलेखन सुधारले आहे... त्यामुळे आता दुसर्‍यांना सल्ले द्यायला मुभा आहे!! ;)

आनंद गगनात मावेना!
धन्यवाद!

विनायक प्रभू's picture

30 Nov 2011 - 2:42 pm | विनायक प्रभू

तुम्हाला अ‍ॅपल मधे अळी मिळाली काहो?

jaypal's picture

30 Nov 2011 - 2:57 pm | jaypal

लेख भारी आणि प्रतिसादांनी तर लग्ना आधीच बार उडवलाय
"पुढिल" वाटचालिस शुभेच्छा ;-)

jay

किसन शिंदे's picture

30 Nov 2011 - 3:00 pm | किसन शिंदे

या लेखासाठी अतिशय समर्पक कार्टून शोधून काढलंत.. :bigsmile:

_/\_

आता तुमच्या दोघांच्या नवीन आयुष्य सुखाचे जावो.तुम्ही दोघाही आयुष्यभर एकमेकांना समजून घ्याल आणि एकमेकांची काळजी घ्याल अशी अपेक्षा करते.या पुढे तुमचा आयुष्य सुखाच समृद्धीचा असो अशी अपेक्षा करते.
लग्न झाल्यावर थोड्या फार प्रमाणात कुरबुरी होणारच.पण त्या तिथल्या तिथेच सोडून द्यायच्या.भांडायचं पण ती भांडण ताणून धरायचं नाही.तिथल्या तीथे सोडून द्यायचा.मुलींचा स्वभाव मुळातच हळवा असतो.काहीही झाल तरी लगेच रडायला लागतात.तिच्या डोळ्यातून आपल्यामुळे पाणी येणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची.
नांदा सौख्य भरे!

विजुभाऊ's picture

30 Nov 2011 - 4:05 pm | विजुभाऊ

मुलींचा स्वभाव मुळातच हळवा असतो.काहीही झाल तरी लगेच रडायला लागतात.तिच्या डोळ्यातून आपल्यामुळे पाणी येणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची.

या वर कोणताही अनुभवी शहाणा माणुस विश्वास ठेवणार नाही. ठेवु नये.
एकवेळ नायगार्‍याच्या धारेला लागलेला माणूस पोहुन बाहेर निघु शकेल पण डोळ्यातुन आलेल्या पाण्याच्या धारेत वाहुन गेलेला पोहुच शकत नाही. तुम्ही त्य अधारेत वहात जात ही मेख एकदा कळाली की संपले.
असो.
अर्थात ही ठेच ज्याची त्यानेच लावुन घ्यायची असते.
बाबा बुलेशा म्हणुन गेलाय आग और इश्क बराबर दोनो पर पानी आग बुझाये... आशीक के जब आसू निकले और अगन लग जाये.

अस काय करता?माझ वधू वर सूचक केंद्र आहे कि नै! माझे वरील प्रतिसाद बघून कोण म्हणेल का तसं? म्हणून मी टिपिकल प्रतिसाद दिला!
जणू माझ्याकडूनच लग्न ठरलंय!

एकवेळ नायगार्‍याच्या धारेला लागलेला माणूस पोहुन बाहेर निघु शकेल पण डोळ्यातुन आलेल्या पाण्याच्या धारेत वाहुन गेलेला पोहुच शकत नाही. तुम्ही त्य अधारेत वहात जात ही मेख एकदा कळाली की संपले.

स्वाणूभव.. स्वाणूभव.. म्हणतात हो हाच. ;)

विवेकखोत's picture

30 Nov 2011 - 3:24 pm | विवेकखोत

माझ्या पहिल्या वहिल्या पोस्ट ला भर भरून प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद.
माझ्या लिखाण मध्ये काही त्रुटी असतील तर क्षमा असावी. पण मी लिहिण्याचा एक प्रयत्न करत आहे.
आपल्या दिलेल्या प्रतिक्रिया व सूचना मी लक्षात ठेवीन ...

गवि's picture

30 Nov 2011 - 3:34 pm | गवि

खोतसाहेब..

तुमच्या लग्नाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा.. पहिलं लिखाण आहेत म्हणालात त्यामुळे लिहावंसं वाटलं. इथे आम्ही चालवलेल्या थट्टामस्करीमुळे काहीतरी भलताच गैरसमज करून घेऊ नका..

इथे असेच वाईट मनावर कोवळे संस्कार करणारे प्रतिसाद नेहमीच येतच असतातच.. विशेषतः लग्न, हनिमून, थंडी, कांदा, मटण वगैरे विषय निघाले की.

मनावर कोवळे संस्कार करणारे प्रतिसाद

वरील पैकी एका तरी प्रतिक्रियेत संस्कार आहेत का हो?

गवि's picture

30 Nov 2011 - 3:46 pm | गवि

हे राम..

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2011 - 3:49 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या वर्षाअखेर संपन्न होणार्‍या 'मिपारत्न' सोहळ्यात, श्री. गवि ह्यांना 'प्रोत्साहनकार' पुरस्काराने सन्मानीत करावे असा ठराव मी मांडत आहे.

टूकाररत्न
परा

सर्वसाक्षी's picture

30 Nov 2011 - 4:03 pm | सर्वसाक्षी

हे राम!

हा तर अंत्यसंस्कार आहे!

मोहनराव's picture

30 Nov 2011 - 3:51 pm | मोहनराव

मोठे व्हा किचेन ताई/माई/आक्का!!

रेवती's picture

30 Nov 2011 - 9:11 pm | रेवती

अहो काय हे किचेनतै.

विजुभाऊ's picture

30 Nov 2011 - 5:06 pm | विजुभाऊ

इथे असेच वाईट मनावर कोवळे संस्कार करणारे प्रतिसाद नेहमीच येतच असतातच.. विशेषतः लग्न, हनिमून, थंडी, कांदा, मटण वगैरे विषय निघाले की.


अरे दारु राहिली की.....ल्ह्ययची

चिंतामणी's picture

1 Dec 2011 - 12:26 am | चिंतामणी

ते बरोबर आहे हो विजुभौ. पण अजून एक गोष्ट राहीली ना.

इथे असेच वाईट मनावर कोवळे संस्कार करणारे प्रतिसाद नेहमीच येतच असतातच.. विशेषतः लग्न, हनिमून, थंडी, कांदा, मटण,दारु, चांदीचा पेला वगैरे विषय निघाले की.
:bigsmile:

तिमा's picture

30 Nov 2011 - 4:23 pm | तिमा

खोतसाहेब,

तुम्हाला इथे काहीही लिहायला हरकत नाही. फक्त हा ब्लॉग नाही एवढे ध्यानात ठेवावे. पाहिजे तर एक वेगळा ब्लॉग उघडून त्याच्या लिंका इथे द्याव्या. 'लग्नानंतरचे अनुभव' यावरही क्रमशः लिहायला हरकत नाही. आत्ताच एवढ्या प्रतिक्रिया आल्यात. तेंव्हा तर किती येतील याची कल्पना करा.

अन्या दातार's picture

30 Nov 2011 - 4:32 pm | अन्या दातार

>>आत्ताच एवढ्या प्रतिक्रिया आल्यात. तेंव्हा तर किती येतील याची कल्पना करा.

नशीब, फक्त कल्पना करा असे म्हणला नाहीत ते!
आणि एवढ्या प्रतिक्रिया आल्या म्हणजे सध्या सगळे चांदीच्या पेल्यातून पाणी पीताहेत ना. ;)

विवेकखोत's picture

30 Nov 2011 - 4:38 pm | विवेकखोत

काय saheb अशी थट्टा मस्करी कराल पुढे लिहिण्याची हिम्मत नाही होणार , खरे तर तुमी जुन्या blogger लोकांनी प्रोत्साहन द्यायला हवे तुमी तर आमचीच वात लावताय

प्रभाकर पेठकर's picture

30 Nov 2011 - 6:57 pm | प्रभाकर पेठकर

'लग्नानंतरचे अनुभव' यावरही क्रमशः लिहायला हरकत नाही.

लेख सचित्र असावेत, अशी नम्र विनंती.

>>>>आमचीच वात लावताय.
हां तेवढी 'वात' बाकी सांभाळा.

बाबौ....
काकांचा आयडी हॅक तर नाही ना झाला? ;)

मी-सौरभ's picture

1 Dec 2011 - 12:05 am | मी-सौरभ

ह्या सगळ्याला प्रभूमास्तरच जबाबदार आहेत.....

त्या ५५+ मुळे काय काय होतय बघा म्हणावं

>>हां तेवढी 'वात' बाकी सांभाळा.

आणि वा पण चूकू नका बरं का

परीनिता's picture

30 Nov 2011 - 4:31 pm | परीनिता

लग्नाच्या हार्दिक शुभेछा

गौरी१२'s picture

30 Nov 2011 - 5:50 pm | गौरी१२

विवेक भाऊ ... तुम्ही फलंदाजी नका करू गोलंदाजी करा. अशी विकेट द्यायची नाही तर घ्यायची .....
म्हणजे अहो लेखक नाही वाचक व्हा ...आणि विकेट काढा. ;) :)

.......... मी एक वाचक !!! :)

गौरी१२'s picture

30 Nov 2011 - 5:51 pm | गौरी१२

विवेक भाऊ ... तुम्ही फलंदाजी नका करू गोलंदाजी करा. अशी विकेट द्यायची नाही तर घ्यायची .....
म्हणजे अहो लेखक नाही वाचक व्हा ...आणि विकेट काढा. ;) :)

.......... मी एक वाचक !!! :)

अन्या दातार's picture

30 Nov 2011 - 5:56 pm | अन्या दातार

वाचक होऊन विकेट कश्या काढतात ब्वा? विकेट काढायला निदान प्रतिसाद तरी टंकावे लागतातच.
आणि जर सगळेच विकेटा काढायला बसले तर विकेट घ्यायच्या कुणाच्या?

विजुभाऊ's picture

30 Nov 2011 - 6:04 pm | विजुभाऊ

काहिही न लिहिता विकेटी कशा काढायच्या याचे क्लासेस घ्यायला भडकमकर मास्तराना सांगायला हवे

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2011 - 6:28 pm | अत्रुप्त आत्मा

एक सुचना-कांदा वगैरे तत्सम बाबींबरोबर पान खात नसलात/असलात तरी नुसता वडीकाताचा तुकडा अधुन मधुन चघळत रहा... प्रत्येक ओव्हरला एक सिक्सर हमखास बसेल. ;-)

बयकांच्या द्रुष्टिकोनातुन नवरा म्हणजे= लग्नापूर्वी नाथ,लग्न झाल्यावर प्राणनाथ,आणी पोर झालं की अनाथ :-D

मी-सौरभ's picture

1 Dec 2011 - 12:07 am | मी-सौरभ

आमचा साष्टांग नोंदवून घ्या हो बुवा....

अत्रुप्त आत्मा's picture

1 Dec 2011 - 4:37 pm | अत्रुप्त आत्मा

आमचा साष्टांग नोंदवून घ्या हो बुवा.... >>> घेतला बुवा.___ -----^----- ___ :-)

अजून लग्नाला मोजकेच दिवस बाकी आहेत. बघू कसे काय जमते ते

बापरे हसून पुरेवाट झाली किंवा वाट लागली काहीही म्हणा.
तुम्हाला लग्नासाठी शुभेच्छा. आम्ही लेखी शुभेच्छा देवू शकतो.
विनायक प्रभूंकडे गेलात तर शाब्दिक शुभेच्छा मिळतील, शिवाय चांदीचा पेला फ्री, फ्री, फ्री!
मिपावर जर तुमचा पहिलाच धागा असेल तर स्वागत दणक्यात झाले म्हणायचे.

आशु जोग's picture

30 Nov 2011 - 11:38 pm | आशु जोग

एपलमधे लोह असते ना

आत्ता कळाले की ईव्ह ने अ‍ॅपल का खाल्ले होते.
सालं बाबा अ‍ॅडमच्या जमान्यापासून हे चालत आलय