जर मी तुम्हाला सांगितल की "एकदा किनई आम्ही नरकात गेलो होतो" तर तुम्ही नक्कीच मला 'भूतबाधा झालेली दिसतेय हिला' किंवा 'सर्वपित्रिचा परिणाम काय हो' किंवा तत्सम काहीतरी म्हणाल. पण जरा थांबा, मी अगदी खर तेच सांगते आहे. हा बघा पुरावा ... http://www.hell2u.com/
गेले काही दिवस इथे भूतांविषयी 'चर्चा' चालू आहे ती वाचताना आठवण झाली तीन वर्षांपूर्वी जिथे भेट दिली होती अशा एका छोट्याश्या जागेची. विश्वास ठेवायला थोड कठीण वाटेल पण अमेरिकेच्या मिशिगन राज्यात एक जागा आहे जिच खरखुर नाव आहे 'हेल' ! Hell, MI 48169 हा आहे त्या जागेचा पत्ता. १८३८ साली जोर्ज रीवज अणि कुटुम्बिय इथे रहू लागले अणि १८४१ साली सरकार दप्तरी नाव देताना म्हणे जोर्ज म्हणाला "नरक म्हणा हव तर, काय फरक पडतोय" आणि अशाप्रकारे या जागेला नाव पडल 'हेल'.
इथे फार नाही ४/६ इमारती आहेत. त्यापैकी एक पोस्ट ऑफिस, एक खानपान गृह, एक चर्च आणि एक दुकान. लोक म्हणे इथे येउन स्वतःलाच एक पत्र पाठवतात, 'नरकातून' आलेल एक पत्र संग्रही असाव म्हणून :) चर्च पण ख़ास आहे, त्यावर चक्क प्रश्नचिन्ह आहे क्रोस च्या जागी ! जोडपी खास या चर्च मध्ये लग्न लावून घेतात म्हणे. दुकान तर काय बारा महीने यांचा हलोविन साजरा होत असतो.
आणि नुकतच या 'हेल'ने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. आपल्या नावाला साजेसा एक पराक्रम गाजवलाय. या गावाच नाव गिनीज बुकात जाणार आहे एका विशेष कारणासाठी. १८ सप्टेम्बर रोजी इथे एकाच वेळी ५१ शववाहिका (हर्स) एकत्र आल्या होत्या.
http://www.freep.com/article/20110919/NEWS06/110919072/Hearses-set-Guinn...
आता या अशा गोष्टीसाठी अशाच खास नावाची जागा पाहिजे नाही का ? हलोविन येतोच आहे तर म्हटल सर्वांना या जागेची ओळख करून द्यावी. मग, कोण कोण येणार आहे नरकात ?
प्रतिक्रिया
28 Sep 2011 - 2:14 pm | बद्दु
तिकडंलं सगळंचं कसं ग्रेट ...माणसं ग्रेट म्हणजी भुतं बी ग्रेट.. तवा हलुवीन बी एक्दम ग्रेट्..चालु द्या..
28 Sep 2011 - 2:21 pm | प्रियाली
वेलकम टू हेल हे मस्तच. लेख आणखी थोड्या विस्ताराने यायला हवा होता.
माझ्या एका जुन्या कोवर्करचे नाव हॅल लेविन. आम्ही त्याला म्हणत असू की तुझ्याकडे बारा महिने हॅलोविन.
28 Sep 2011 - 2:26 pm | परिकथेतील राजकुमार
ओळख आणि फटू झकासच.
मात्र ओळख फारच त्रोटक आणि अपूर्ण (अगदी हातचे राखून) करून दिल्यासारखी वाटते आहे.
28 Sep 2011 - 3:07 pm | बिपिन कार्यकर्ते
मजेशीर!
28 Sep 2011 - 5:03 pm | अत्रुप्त आत्मा
चांगला उत्कंठा वर्धक विषय आहे,,, लेकिन ऐसा लगा,,, के शुरु होते होते,खतम :-( हो गया खेल
28 Sep 2011 - 5:10 pm | सुहास झेले
आवडेल नरकात जायला ... :D
28 Sep 2011 - 5:18 pm | आत्मशून्य
.
28 Sep 2011 - 5:49 pm | चेतन सुभाष गुगळे
हेल मध्ये जाऊन हे हेल काढून गातात. ऐकणार्यांची मने हेलावून जातात.
http://www.youtube.com/watch?v=9Kih0ySrdSw&feature=related
28 Sep 2011 - 6:05 pm | मराठे
हे हे हेल!
28 Sep 2011 - 7:10 pm | शुचि
मस्त नेहमीप्रमाणेच.
28 Sep 2011 - 7:13 pm | रेवती
भेट आवडली पण जरा धावती झाली का?
चर्चवरचे प्रश्नचिन्ह खासच. एकदम वेगळी कल्पना!
28 Sep 2011 - 8:49 pm | प्रभो
भारी!!
30 Sep 2011 - 6:02 pm | मस्तानी
खर आहे, लेख अगदी छोटेखानी झालाय, पण अगदी सहज गप्पा मारताना उल्लेख करतो ना, तितक्या सहजच लिहिलय ... हे 'मिप़ा' वरच करता येत ना :) सर्व प्रतिसाद देणार्यान्चे आभार !
मजा म्हणजे, याच मिशिगन मध्ये एक स्वर्ग देखिल आहे :) Google Maps तरी Hell, MI आणि Paradise, MI हे अंतर साधारण सहा तासात कापता येइल म्हणतो बुवा.
ही अशी मजेशीर नाव असलेल्या जागा तुम्ही पण बघितल्या असतील. तुमच्याही आठवणी / किस्से शेअर करा ना सर्वांबरोबर.
2 Oct 2011 - 9:19 pm | राजेश घासकडवी
हे तर भारीच. चर्चवर क्रॉसऐवजी प्रश्नचिन्ह लावणं म्हणजे कहरच.
मुळात हे नाव ठेवणाऱ्या जॉर्जचं आयुष्य किती कडवटपणाने भरलं असेल याची कल्पना येते.