तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग१/४)
पाषाणभेद सचिन बोरसे सहर्ष सादर करीत आहे, तुफान विनोदी धमाल वगनाट्य - वैरी भेदला वाटंवरचा अर्थात देश प्रेमाला पुरत नाही.
प्रमुख भुमीका: राजा, राणी, राजपुत्र, प्रधान, हवालदार, शिपाई, राजपुत्री, कोतवाल, दिवाणजी, हुजर्या, हवालदार, भालदार, चोपदार, दासी, नर्तीका, विदुषक, सोंगाड्या आदी.
लेखक, कवी: शाहीर पाषाणभेद सचिन बोरसे
दिग्दर्शनः xxx
संगीतः xxx
कलाकार: xxx, xxx, xxx, xxx, xxx, xxx,
(पडदा उघडतो तेव्हा शाहीर गण सुरू करतात.)
-------------------------
गण
(चाल पारंपरीक)
देव गौरीनंदन आधी वंदुया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ||
रसीक जमले आम्हांसमोरी
तुझेच रूप जणू शेंदरी
उशीर नका लावू देवा
झडकरी या या
शुभ कार्याची सुरूवात करूया ||१||
रिद्धी सिद्धीचा तु रे स्वामी
तुज पुजीतो कलावंत आम्ही
मंगल कार्याआधी
गणाला गावूया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||२||
देव गौरीनंदन आधी वंदुया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ||
------------------------
सोबती: वा वा शाहीर, गण तर लई फसकलास झाला. आक्षी आदर्श झाला बघा. मन लई परसन्न झालं. आता परंपरेनुसार गणानंतर गौळण बी झ्याक होवूंद्या. पब्लीक कसं खुष व्हाया पायजेल. आसं खुष, आसं खुष की त्येंनी सगळे घोटाळे, महागाई, प्रेटोल दरवाढ, भारनियमन, मुख्यमंत्री बदलाबदली समदं विसरायला पायजे, काय?
शाहीरः आसं म्हनता. मंग होवून जावूदे!
(ढोलकीचा ताल सुरू होतो अन त्या ठेक्यावर डोक्यावर माठ घेतल्याच्या आव आणत मावशी येते.)
क्रमश:
पुढचा भाग: तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -२/४)
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०३/२०११
प्रतिक्रिया
8 Mar 2011 - 1:36 pm | गणेशा
शाहिर .. गण तर लय झ्याक झालाय..
आता गवळणी ची वाट पाहत आहे .. होउन जाउदे ....
8 Mar 2011 - 1:49 pm | टारझन
धमाल विनोदी ? आहो कास्ट पाहुन तर ट्रिपल एक्स वाटतंय हे पाभे जी :)
-एक्स्वायभेद
8 Mar 2011 - 4:09 pm | पिंगू
दफोराव लवकरच पुढचा भाग येऊ द्या..