चूकचक्र...समाप्त..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
8 Feb 2011 - 4:52 pm

आधीचा भाग (चूकचक्र-१)..

http://www.misalpav.com/node/16489

हा भाग दुसरा आणि शेवटचाच..!!

जिथे सोडलं तिथूनच पुढे वळतो चर्‍हाट :

पाचवा,आणि शेवटचा साचा: "माचो"

ब्रीदवाक्य : "मी करुन दाखवीन.."

"आय विल प्रूव्ह इट..!"

हे लोक सदैव काहीतरी कर्तबगारी, टू बी प्रिसाईज, पराक्रम करुन दाखवण्याच्या घाईत आणि मूडमधे असतात. पराक्रम करुन सतत स्वतःला सिद्ध करण्याचं ऑब्सेशन..

म्हणजे आता पहा.. बारामतीला एक फ्लाईंग ट्रेनिंग स्कूल आहे. त्यात एक ट्रेनी पायलट नेहमीप्रमाणे प्रॅक्टिस फ्लाईंग (जनरल फ्लाईंग) करायला निघाला. त्याने अजून लायसन्स घेतलं नव्हतं, पण कमर्शियल लायसन्सला लागणारे फ्लाईंगचे तास त्याने पूर्ण केले होते.

त्याने ऐनवेळी आपल्या एका असंच अनधिकृतपणे मैत्रिणीला विमानात घेतलं. ए.टी.सी ला मात्र आपण एकटेच असल्याचं रेडिओवर सांगितलं आणि टेकऑफ घेतला.

मग ए.टी.सीं ने त्याला साडेतीन हजार फुटांवर फ्लाईंग करायला सांगितलं. दिलेली उंची पाळणं हा शिस्तीचा आणि कायद्याचा भाग आहे नं ?

पण नाही...

या मनुष्यविशेषाने विमान साडेतीन हजार फुटांवर आहे असं असत्य रेडिओवर प्रतिपादून प्रत्यक्षात जमिनीपासून फक्त पन्नास फुटांपर्यंत खाली आणलं.

..का? ..तर त्याला नीरा नदीवर असलेल्या शंभर फुटी पुलाखालून विमान घुसवायचं होतं..

ते पराक्रमी कृत्य "करुन दाखवायचं" होतं..

उन्हाच्या विरुद्ध दिशेने उडत तो पुलाखालून सूं करुन मुसंडी मारायला निघालाच होता. पण त्या पुलाच्या जस्ट आगोदर पन्नास फूट उंचीवर असलेल्या हाय टेन्शन वायर्स त्याला दिसल्याच नाहीत. जेव्हा दिसल्या तेव्हा "पुल अप" करायला फार उशीर झाला होता. विमान तारांना धडकलं आणि नदीत कोसळलं.

थँक्स टू भारनियमन्..त्यावेळी वीजप्रवाह बंद होता..

गावकर्‍यांनी दोघांनाही सोडवलं. पण विमान नष्ट झालं.

माचोगिरीची अशी खूप उदाहरणं देता येतील. पुरुषार्थ हा "प्रिसिजन" मधे असतो. आणि प्रिसिजन ही पुलाखालून विमान काढण्याच्या अचूक कौशल्यात नसते तर नियम पाळण्यात असते हे सर्वांना कळेल तर किती कल्याण होईल..

आणखीही असेच अनेक मनोवृत्तीचे साचे असतील. खरंच्..आपण यातल्या एकाच प्रकारात परफेक्ट बसूच असं नाही. बर्‍याचदा यातल्या अनेक वृत्तींचं मिश्रण आपल्या आत्मारामात बेमालूम होऊन बसलेलं असतं.

कधीकधी तर आलेल्या संकटानुरूप कुठलीतरी एक विषवृत्ती तेवढ्यापुरती डोकं वर काढते आणि ओव्हरपॉवर करते.

यावर लिहावं तेवढं कमीच..

याखेरीज फ्लाईटमधे कितीतरी ताठर अ‍ॅटिट्यूडमुळे समस्या मोठ्या उग्र होतात.

इजिप्त एअरच्या एका को-पायलटने केवळ कंपनीविषयी असंतोष आणि डिप्रेशन यांमुळे मुख्य पायलट टॉयलेटमधे गेलेला असताना विमानाचे नाक खाली दाबून डाईव्ह केलं आणि देवाचं नाव घेत घेत क्रॅश केला. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरवर प्रसाधनगृहातून बाहेर आलेल्या पायलट इन कमांडचे भयचकित शब्द आणि को-पायलटचं शांत नामस्मरण रेकॉर्ड झालंय. त्याच वेळी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर को-पायलटच्या बाजूचा कंट्रोल पूर्ण शक्तिनिशी खाली दाबलेला आणि मुख्य पायलटची आपल्या बाजूचा कंट्रोल जबरदस्त ताकदीने वर ओढून विमान वाचवण्याची केविलवाणी धडपड अशी सगळी नोंद झाली आहे.

आणखी एका प्रसंगी विमानाचा लँडिंग गियर खाली डिप्लॉय न करताच लँडिंग केलं आणि ते बेली लँडिंग होऊन (चाके खाली न आल्याने थेट विमानाच्या पोटावर लँडिंग.) घात झाला. त्यावेळी लँडिंग गियर वरच आहे, जाम आहे हे को-पायलटला माहीत असूनही त्याने ते पायलटला सांगितलं नाही. का? तर त्यांचं पटत नव्हतं आणि ते एकमेकांशी बोलत नव्हते. मुख्य पायलटची बदनामी झाली. जमिनीजवल आल्यावर हा प्रकार झाल्याने को-पायलटला जिवाची खात्री असणार..पण म्हणून इतका इगो?

पायलट विमान हातापायांनी कमी आणि मनाने जास्त चालवतो..

आणि त्याच्या मनाचे खेळ हे जिवाशी खेळ बनू शकतात..

दुर्दैवाने प्री-फ्लाईट मेडिकल टेस्ट फक्त शारिरिकच असते.

आणि पायलटचे पेपर्सही फक्त टेक्निकल असतात..

मनाला हे लागतं की मी इतकं सगळं ज्याविषयी लिहितोय तो "एअरमनशिप" हा विषय अद्यापही भारतीय वैमानिकांच्या अभ्यासक्रमात नाही. कुठे परदेशी पुस्तकांत मिळाला तर अवांतर वाचन म्हणूनच वाचला जातो..

पण इथे तरी त्याची "एक्झाम" होत नाही..

.........................

समाप्त..

समाजतंत्रप्रवासप्रकटनविचार

प्रतिक्रिया

खुपच छान पद्धतीने आपल्या विषयाला धरुन समस्त माणसांचे स्वभाव विशेष सांगण्याचे कौशल्य खुप आवडले..
आपले लिखान तर जबरदस्त असतेच..
यावेळी त्याचे उड्डाण मात्र खुप उंच होते .. आणि पंख स्थीर.. दिशा एकदम परफेक्ट .. मिपाच्या धावपट्टीवर लँडिंग पण छान झाले .

स्वैर परी's picture

8 Feb 2011 - 5:08 pm | स्वैर परी

असेही महाभाग असतात? असली कृत्ये करताना, दुसर्याच्या नाहि पण निदान स्वतःच्या जिवाची तरी पर्वा करावी माणसाने!

मुलूखावेगळी's picture

8 Feb 2011 - 5:10 pm | मुलूखावेगळी

खुप छान लिहिलेत
इगो प्रॉब्लेम अवघड आहे. आनि रिकामेटेकडे माचो पन

मराठे's picture

8 Feb 2011 - 6:52 pm | मराठे

सुंदर लेखन ..

स्वाती२'s picture

8 Feb 2011 - 7:00 pm | स्वाती२

लेख आवडला.

नरेशकुमार's picture

8 Feb 2011 - 7:10 pm | नरेशकुमार

नेहमीप्रमाणेच सुंदर.

इगो प्रोब्लेम सगळिकडेच भयानक ठरतो.

स्वच्छंदी_मनोज's picture

8 Feb 2011 - 7:41 pm | स्वच्छंदी_मनोज

जबरदस्त लेख आणी माहिती...
गावाला असताना नेहेमी ठरावीक फ्लाईंग ट्रॅक वरुन विमाने उडताना दिसायची व काही वेळा भलत्याच मार्गावरुन उडताना दिसायची.. तेव्हा काही माहीती नव्हती आणी आता भलत्याच मार्गावरुन उडताना दिसल्यावर विचार येईल की आत्ता पायलट कुठल्यातरी "साच्यात" असतील काय?

भयानक आहे सगळ.. माझ्यामते फ्लाईंग शिकवताना वर गवि म्हणतात तसा "एअरमनशिप" हा विषय प्रथम कंपल्सरी शिकवयला हवा ऑप्शनल नव्हे. कारण टेक्नीकल शिकण्याची पात्रता असतेच म्हणूनच विद्यार्थ्यांची निवड पायलट प्रशिक्षणाकरता होत असावी.."एअरमनशिप" जाणण्याची कला मात्र व्यक्तीसापेक्ष असावी..

प्रास's picture

8 Feb 2011 - 7:46 pm | प्रास

छान लिखाण गवि.......!

अनेक आवश्यक विषयांच्या परीक्षा होत नाहीत याचं वैषम्य आहेच.......

आत्मशून्य's picture

8 Feb 2011 - 7:58 pm | आत्मशून्य

.

रेवती's picture

8 Feb 2011 - 8:05 pm | रेवती

हे असे एकमेकात न पटणारे आपल्या फ्लाइटला आले कि आपलं 'राम नाम सत्य' व्हायचं.:(

तर त्याला नीरा नदीवर असलेल्या शंभर फुटी पुलाखालून विमान घुसवायचं होतं..

ते पराक्रमी कृत्य "करुन दाखवायचं" होतं..

त्या बहाद्दराच्या सोबत त्याची मैत्रीण होती. आणि विषेश म्हणजे ते दोघेही त्यावेळेस टाइट्ट होते

प्राजु's picture

9 Feb 2011 - 7:01 am | प्राजु

सुरेख लिहिले आहे..
मनाशी निगडीत बर्‍याच गोष्टी असतात त्या जीवाशी खेळ होऊ शकतात हे खरंच आहे.

गवि, नेहमीप्रमाणे उत्तम लेख व एक शंका -

"त्याच वेळी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर को-पायलटच्या बाजूचा कंट्रोल पूर्ण शक्तिनिशी खाली दाबलेला आणि मुख्य पायलटची आपल्या बाजूचा कंट्रोल जबरदस्त ताकदीने वर ओढून विमान वाचवण्याची केविलवाणी धडपड अशी सगळी नोंद झाली" विमानात असे हे दोन दोन समांतर (पॅरलल) कंट्रोल असतात ते एकमेकाशी इंटरलॉक असतात का, कारण या वाक्याने असं वाटतंय की एकच मशीन किंवा एकाच यंत्रणेला दोन ठिकाणाहुन नियंत्रित केलं जातं आहे, अशा सिस्टिमस इलेक्ट्रिकल मध्ये असतात, पण बहुधा त्यात ईंटरलॉक असतंच.

हर्षद.

गवि's picture

9 Feb 2011 - 10:22 am | गवि

अगदी बरोबर.दोन्ही बाजूचे कंट्रोल्स रिडंडंट असतात. उदा. एक हलवला की दुसरा तसाच हलतो.

ब्रिटिश टिंग्या's picture

9 Feb 2011 - 9:42 am | ब्रिटिश टिंग्या

माझ्या माहितीप्रमाणे इजिप्त एअरच्या दुर्घटनेवेळेस ती को-पायलटची शेवटची युएस ट्रीप होती. को-पायलटच्या बेबंध वर्तवणुकीमुळे इजिप्त एअरने हा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऐकुन बिथरलेल्या को-पायलटने सुड म्हणुन विमान क्रॅश केले असे एनटीएसबीच्या अहवालात समजते!
वास्तविक पाहता को-पायलटची ड्युटी फाईटच्या लास्ट लेगमध्ये सुरु होणार होती परंतु टेकऑफ झाल्यावर लगेचच त्याने कॉकपिटमध्ये अरेरावी करुन को-पायलटचे कंट्रोल्स स्वत:कडे घेतले. त्यानंतर मुख्य पायलट टॉयलेटमध्ये गेला असताना को-पायलटने प्रथम ऑटो-पायलट ऑफ केला आणि कंट्रोल पुर्णपणे खाली दाबला जेणेकरुन विमान संपुर्णत: नोज डाउन पोजिशन मध्ये गेले. प्रचंड जी फोर्स असुनदेखील पायलट कसाबसा कॉकपिटमध्ये पोहचला. त्याने कंट्रोल वरती करण्याचा प्रयत्न केला परंतु विमान ऑलरेडी नोज डाउन डाईव्ह अवस्थेत असल्याने आणि को-पायलट कंट्रोल खाली दाबल्याने पायलटचे प्रयत्न निष्फळ ठरले!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Feb 2011 - 4:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे

दोन्ही भाग एका दमात वाचले. तुम्ही एकदम खिळवून ठेवणारे लिहिता हो गवि.
पुलेशु

सन्जोप राव's picture

10 Feb 2011 - 6:01 pm | सन्जोप राव

दोन्ही भाग खूप आवडले. विमानप्रवासाच्या भीतीत वाढ होऊनही.

अशा लोकांनी स्वतःच्या जीवाचं काय वाटेल ते करावं पण इतरांच्या जीवाशी खेळण्याचा हक्क यांना कोणी दिला? आणि विमान क्रॅश झाल्यावर ती व्यक्ती स्वतःतरी वाचणार असते का? भिरभिर्या मनाचे लोकं!!
बाकी लेखनशैली आवडली.

सहज's picture

11 Feb 2011 - 7:18 am | सहज

हातखंडा विषय त्यामुळेच प्रभावी लेखन!!

आजानुकर्ण's picture

11 Feb 2011 - 9:59 am | आजानुकर्ण

दोन्ही भाग आवडले. उत्तम लेखन.

नगरीनिरंजन's picture

11 Feb 2011 - 8:33 am | नगरीनिरंजन

परत एकदा लै भारी. सहजभौ सारखेच म्हणतो.
ती बारामतीची बातमी वाचली होती पेपरात. पायलटचा वगैरे परवाना देण्याआधी त्या माणसाला कसलाही "अ‍ॅटिट्यूड" नाही हे पाहणं खूपच महत्त्वाचं आहे.

चिगो's picture

11 Feb 2011 - 10:55 am | चिगो

मनाला हे लागतं की मी इतकं सगळं ज्याविषयी लिहितोय तो "एअरमनशिप" हा विषय अद्यापही भारतीय वैमानिकांच्या
अभ्यासक्रमात नाही.
<<

हे तर खरंच वाईट आहे. "अ‍ॅटीट्युडनल ट्रेनिंग" हा त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग व्हायलाच हवा. शेवटी कुणाच्या जवळ जे ज्ञान आहे त्याचा योग्य वा अयोग्य वापर त्याचा मनोवृत्तीवरच ठरत असते...

बाकी, गवि नेहमीप्रमाणेच जबरा...

पियुशा's picture

11 Feb 2011 - 12:32 pm | पियुशा

+१
:)

कानडाऊ योगेशु's picture

11 Feb 2011 - 12:57 pm | कानडाऊ योगेशु

रोचक लेख.
पण लेखमालिका समाप्त करण्यासाठी अंमळ घाई केली असे वाटते.
तर्हेतर्हेचे नमुने हे तसे अधुनमधुन भेटतातच.(आणि त्यांचे किस्से ही ऐकायला मिळतात.)
त्यामुळे मालिका ओपन एंडेड ठेवायला हवी होती असे वाटते.

टुकुल's picture

11 Feb 2011 - 1:30 pm | टुकुल

दोन्ही भाग आताच वाचुन काढले,
खुपच वेगळ आणी मनोरंजक तेव्हयाढ्याच ताकतीने लिहिलय तुम्ही.

--टुकुल

सौन्दर्य's picture

1 Dec 2017 - 5:41 am | सौन्दर्य

मी देखील दोन्ही भाग एकत्रच वाचले. अगदी अंगावर काटा येईल इतके भयानक वर्णन केले आहे तुम्ही. मी माझ्या विमान प्रवासात बहुतेक झोपूनच जातो, पण आता झोप लागेल की नाही हे सांगता येणार नाही.

मानवी स्वभावाचे हे विचित्र नमुने तुम्ही म्हंटल्याप्रमाणे सर्वत्र पाहायला मिळतात, इतरस्त्र ते जीवघेणे ठरत नसले तरी पायलट जर असा विक्षिप्त निघाला तर मात्र खरे नाही.