चूकचक्र...समाप्त..
आधीचा भाग (चूकचक्र-१)..
http://www.misalpav.com/node/16489
हा भाग दुसरा आणि शेवटचाच..!!
जिथे सोडलं तिथूनच पुढे वळतो चर्हाट :
पाचवा,आणि शेवटचा साचा: "माचो"
ब्रीदवाक्य : "मी करुन दाखवीन.."
"आय विल प्रूव्ह इट..!"
हे लोक सदैव काहीतरी कर्तबगारी, टू बी प्रिसाईज, पराक्रम करुन दाखवण्याच्या घाईत आणि मूडमधे असतात. पराक्रम करुन सतत स्वतःला सिद्ध करण्याचं ऑब्सेशन..
म्हणजे आता पहा.. बारामतीला एक फ्लाईंग ट्रेनिंग स्कूल आहे. त्यात एक ट्रेनी पायलट नेहमीप्रमाणे प्रॅक्टिस फ्लाईंग (जनरल फ्लाईंग) करायला निघाला. त्याने अजून लायसन्स घेतलं नव्हतं, पण कमर्शियल लायसन्सला लागणारे फ्लाईंगचे तास त्याने पूर्ण केले होते.
त्याने ऐनवेळी आपल्या एका असंच अनधिकृतपणे मैत्रिणीला विमानात घेतलं. ए.टी.सी ला मात्र आपण एकटेच असल्याचं रेडिओवर सांगितलं आणि टेकऑफ घेतला.
मग ए.टी.सीं ने त्याला साडेतीन हजार फुटांवर फ्लाईंग करायला सांगितलं. दिलेली उंची पाळणं हा शिस्तीचा आणि कायद्याचा भाग आहे नं ?
पण नाही...
या मनुष्यविशेषाने विमान साडेतीन हजार फुटांवर आहे असं असत्य रेडिओवर प्रतिपादून प्रत्यक्षात जमिनीपासून फक्त पन्नास फुटांपर्यंत खाली आणलं.
..का? ..तर त्याला नीरा नदीवर असलेल्या शंभर फुटी पुलाखालून विमान घुसवायचं होतं..
ते पराक्रमी कृत्य "करुन दाखवायचं" होतं..
उन्हाच्या विरुद्ध दिशेने उडत तो पुलाखालून सूं करुन मुसंडी मारायला निघालाच होता. पण त्या पुलाच्या जस्ट आगोदर पन्नास फूट उंचीवर असलेल्या हाय टेन्शन वायर्स त्याला दिसल्याच नाहीत. जेव्हा दिसल्या तेव्हा "पुल अप" करायला फार उशीर झाला होता. विमान तारांना धडकलं आणि नदीत कोसळलं.
थँक्स टू भारनियमन्..त्यावेळी वीजप्रवाह बंद होता..
गावकर्यांनी दोघांनाही सोडवलं. पण विमान नष्ट झालं.
माचोगिरीची अशी खूप उदाहरणं देता येतील. पुरुषार्थ हा "प्रिसिजन" मधे असतो. आणि प्रिसिजन ही पुलाखालून विमान काढण्याच्या अचूक कौशल्यात नसते तर नियम पाळण्यात असते हे सर्वांना कळेल तर किती कल्याण होईल..
आणखीही असेच अनेक मनोवृत्तीचे साचे असतील. खरंच्..आपण यातल्या एकाच प्रकारात परफेक्ट बसूच असं नाही. बर्याचदा यातल्या अनेक वृत्तींचं मिश्रण आपल्या आत्मारामात बेमालूम होऊन बसलेलं असतं.
कधीकधी तर आलेल्या संकटानुरूप कुठलीतरी एक विषवृत्ती तेवढ्यापुरती डोकं वर काढते आणि ओव्हरपॉवर करते.
यावर लिहावं तेवढं कमीच..
याखेरीज फ्लाईटमधे कितीतरी ताठर अॅटिट्यूडमुळे समस्या मोठ्या उग्र होतात.
इजिप्त एअरच्या एका को-पायलटने केवळ कंपनीविषयी असंतोष आणि डिप्रेशन यांमुळे मुख्य पायलट टॉयलेटमधे गेलेला असताना विमानाचे नाक खाली दाबून डाईव्ह केलं आणि देवाचं नाव घेत घेत क्रॅश केला. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरवर प्रसाधनगृहातून बाहेर आलेल्या पायलट इन कमांडचे भयचकित शब्द आणि को-पायलटचं शांत नामस्मरण रेकॉर्ड झालंय. त्याच वेळी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर को-पायलटच्या बाजूचा कंट्रोल पूर्ण शक्तिनिशी खाली दाबलेला आणि मुख्य पायलटची आपल्या बाजूचा कंट्रोल जबरदस्त ताकदीने वर ओढून विमान वाचवण्याची केविलवाणी धडपड अशी सगळी नोंद झाली आहे.
आणखी एका प्रसंगी विमानाचा लँडिंग गियर खाली डिप्लॉय न करताच लँडिंग केलं आणि ते बेली लँडिंग होऊन (चाके खाली न आल्याने थेट विमानाच्या पोटावर लँडिंग.) घात झाला. त्यावेळी लँडिंग गियर वरच आहे, जाम आहे हे को-पायलटला माहीत असूनही त्याने ते पायलटला सांगितलं नाही. का? तर त्यांचं पटत नव्हतं आणि ते एकमेकांशी बोलत नव्हते. मुख्य पायलटची बदनामी झाली. जमिनीजवल आल्यावर हा प्रकार झाल्याने को-पायलटला जिवाची खात्री असणार..पण म्हणून इतका इगो?
पायलट विमान हातापायांनी कमी आणि मनाने जास्त चालवतो..
आणि त्याच्या मनाचे खेळ हे जिवाशी खेळ बनू शकतात..
दुर्दैवाने प्री-फ्लाईट मेडिकल टेस्ट फक्त शारिरिकच असते.
आणि पायलटचे पेपर्सही फक्त टेक्निकल असतात..
मनाला हे लागतं की मी इतकं सगळं ज्याविषयी लिहितोय तो "एअरमनशिप" हा विषय अद्यापही भारतीय वैमानिकांच्या अभ्यासक्रमात नाही. कुठे परदेशी पुस्तकांत मिळाला तर अवांतर वाचन म्हणूनच वाचला जातो..
पण इथे तरी त्याची "एक्झाम" होत नाही..
.........................
समाप्त..
Book traversal links for चूकचक्र...समाप्त..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खुपच छान पद्धतीने आपल्या
महाभाग!
खुप छान लिहिलेत इगो प्रॉब्लेम
सुंदर लेखन ..
लेख आवडला.
नेहमीप्रमाणेच सुंदर. इगो
जबरदस्त ...
छान लिखाण गवि.......! अनेक
मस्तच
हे असे एकमेकात न पटणारे
तर त्याला नीरा नदीवर असलेल्या
सुरेख लिहिले आहे.. मनाशी
गवि, नेहमीप्रमाणे उत्तम लेख व
Interlocked.
मस्त लेख!
दोन्ही भाग एका दमात वाचले.
आवडले
अशा लोकांनी स्वतःच्या जीवाचं
गविंचा
सहमत
परत एकदा लै भारी. सहजभौ
हे तर...
+१
रोचक लेख. पण लेखमालिका समाप्त
जबरा !!!
एकदम मस्त लिखाण.