दादाजीपंतांनी सिऊबास शहाणे केले

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
4 Jan 2011 - 12:00 pm

मित्रहो,

लोकप्रभातील श्री. पांडूरंग बलकवडे यांचा खालील लेख जरूर वाचावा आणि इतरांस वाचण्यास प्रवृत्त करावे. ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे.

लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

आपल्या पुढार्‍यांइतकी नीच माणसे या पृथ्वितलावर सापडणे नाही.

जयंत कुलकर्णी.

इतिहासलेखमतसंदर्भमाहिती

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Jan 2011 - 2:54 pm | llपुण्याचे पेशवेll

छान लेख आहे. पूर्वी देखील वाचला होता. हे सगळं कंटेट असलेलं एक पत्रक वाटत होते शनिवार पेठेत ते वाचलें होतें.

आपल्या पुढार्‍यांइतकी नीच माणसे या पृथ्वितलावर सापडणे नाही.

१००% सहमत...
आमच्या ठाण्यातले काही राजकारणी दादोजींचे नाव असलेल्या स्टेडियमचे नाव बदला अशी मागणी करु लागले आहेत्...या फोकलिच्यांना ठाण्यातले भिकार रस्ते दिसत नाहीत्...पण त्याच रस्त्यांवर जागो जागी या साहेबांचे पोस्टर मात्र लागलेले दिसतात !!!
(ठाण्यातल्या अती भिकार- राजकारणी आणि रस्त्यांना वैतागलेला )

चिंतातुर जंतू's picture

4 Jan 2011 - 5:37 pm | चिंतातुर जंतू

लेखात असा दावा केला आहे:

दादाजी कोंडदेवाच्या त्या पत्रात जिजाबाई साहेबांचा उल्लेख ‘सौभाग्यवती मातुश्री जिजाआऊ साहेब’ असा आला आहे. राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव यांच्याविषयी खोटा, गलिच्छ व हलकट मजकूर लिहिणारा जेम्स लेन आणि त्या हलकट मजकुराचा प्रचार व प्रसार करणारी मंडळी यांना दादाजीच्या पत्रातला हा ‘मातुश्री जिजाआऊ साहेबांचा’ उल्लेख हे चोख उत्तर नाही का?

आणि तुम्ही म्हणता आहात की त्याच पत्रामुळे ब्रिगेडच्या अतिरेक्यांनाही चोख उत्तर दिले आहे.

जिजाबाई शहाजींची पत्नी होत्या आणि दादोजी शहाजींचे कारभारी होते. त्यामुळे वतनपत्रासारख्या अधिकृत दस्तात दादोजींनी जिजाबाईंचा असा उल्लेख करणं साहजिक वाटतं. पण त्यामुळे चोख उत्तर कुणाला आणि कसं मिळतं ते कळलं नाही.

धमाल मुलगा's picture

4 Jan 2011 - 5:54 pm | धमाल मुलगा

जयंतराव,
बलकवड्यांनीही शेवटी एक सुत्र अवलंबलं, 'गाढवापुढं गायली गीता, कालचा गोंधळ बरा होता.'

जोवर आपापली उखळं पांढरी करुन घेण्यासाठी पुंडाई माजवणार्‍या राजकीय वरदहस्ताचा जोरा आहे तोवर हे असंच चालणार.

काय बोलायचं?

प्रियाली's picture

4 Jan 2011 - 7:10 pm | प्रियाली

ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे.

ब्रिगेडचे अतिरेकी जेम्स लेन सोबत होते का? असे असेल तर भांडारकर संस्थेची नासधूस का बरे केली?

आम्हाघरीधन's picture

4 Jan 2011 - 8:58 pm | आम्हाघरीधन

हे बलकावडे तेच ना ज्यांनी पुण्यात २४ एप्रिल २००६ ला मराठा विकास मंचाने आयोजित केलेल्या 'दादोजी कोंडदेव कोण होते?' या खुल्या चर्चा सत्रातुन पळ काढला होता........
त्यावेळी संधी असुनही त्यांनी पळ काढला तेंव्हा त्यांचे म्हणने आज किती मनावर घ्यायचे हे वाचकांनीच ठरवावे..
असो. जयवंत राव आपण चालु ठेवा....

धमाल मुलगा's picture

4 Jan 2011 - 9:00 pm | धमाल मुलगा

का पळ काढला होता?
नक्की माहिती काय आहे? आणि बातमी काय आहे?

अर्धवटराव's picture

4 Jan 2011 - 10:47 pm | अर्धवटराव

धमु,
तुमच्या "का" ला उत्तर नाहि. कारण दादोजींवरचा आक्षेप हा कुठल्याही गैरसमजातुन किंवा सत्यशोधनातुन आलेला नसुन जातीआधारीत गलिच्छ राजकारणातुन आलेला आहे. दगडावर डोकं आपटुन घ्यायला कोण शहाणा या लोकांच्या सभेला जाईल??

(वेडा) अर्धवटराव

अर्धवटराव's picture

4 Jan 2011 - 10:51 pm | अर्धवटराव

बलकावड्यांनी पळ (??) का काढला हे शोधुन काढता येईल हो... पण त्यांनी दिलेल्या मुद्द्यांवर तुमचं मत काय ? अर्थात ते तुम्ही मनावर घेणार नाहिच हे तुम्ही अगोदरच सांगीतल आहे म्हणा. आणि मनावन न घेण्याचं कारणही सांगीतल आहे... "मनाचा भाव"
चालायचच.

अर्धवटराव

चेतन's picture

5 Jan 2011 - 11:07 am | चेतन

http://misalpav.com/node/8009#comment-123153

याला अजुन उत्तर देताय

मृगनयनी's picture

5 Jan 2011 - 1:40 pm | मृगनयनी

'मराठा महासंघा'ने सम्भाजी ब्रिगेड्'च्या- (उर्फ काँ. आणि रा.वा. काँ' च्या पा__ल्या _त्र्या च्या) पळपुट्या धोरणाचे जाहीरपणे वाभाडे काढून रातोरात शिवगुरु= दादोजींचा पुतळा हलवण्याच्या हलकट कृतीचा धिक्कार केलेला आहे.... याबद्दल कुणाला काय बरे वाटते? :-?

शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली किल्ले शिवनेरी येथे झाला. हा किल्ला तेव्हा निजामशाहीत होता व जिजावु गरोदर असतांनाच तेथे शिवाजीराजांचे बंधु संभाजी यांच्या विवाहाप्रित्यर्थ आल्या होत्या. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे १६३६ पर्यन्त चाकर होते आणि ते आदिलशहातर्फे कोंडाना किल्ल्याचे व दौंड प्रांताचे सुभेदार होते. शहाजी राजे तेंव्हा निजामशाहीत होते आणि निजाम आणि आदिलशाहमधुन विस्तव जात नव्हता. १६३६ मद्धे शहाजी राजे आदिल्शाहा चे सरदार बनले. शहाजीराजांना निजामशाही सोडुन आदिलशाहीकडे जावे लागले, कारण मोगलांनी निजामशाहीचा अस्त घडवला होता. दादोजींची आदिलशाही सुभेदारी पुढेही कायम झाली पण शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष् ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली. शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ साली कोंड्देव शहाजी राजांच्या सेवेत आले आणि ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे वीष घीवुन आत्महत्त्या केल्याने निधन झाले.
(संदर्भ: जेधे शकावली आणि तारीख-इ-शिवाजी)

१६३६ साली शाहाजी राजांनी दादोजींना आपल्या सेवेत घेउन पहिली कामगिरी दिली ती शिवापुर विकसीत करण्याची. १६३७ साली पुण्यात लाल महाल बांधण्याची कामगीरीही त्यांच्यावर सोपवली गेली. (संदर्भ- जेधे शकावली). १६३६ ते १६३९ या काळात शिवाजी राजे, जीजावु शाहाजी राजांसमवेत बंगलोर येथे वास्तव्यास होते, हेही येथे लक्ष्यात घायला हवे. तेथेच शिवरायांचे पुढील प्रशिक्षण सुरु होते. तत्पुर्वीच शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षन गोमाजी नाइक पानसंबळ या लखुजी जाधवांनी नेमलेल्या प्रशिक्षकाकडुन जुन्नर (शिवनेरी) पासुनच सुरु झाले होते. या काळात गोमाजी नाइकांच्या सल्ल्यावरुन महाराजांनी लढवैया पठान तुकडीला सेवेत घेतले आणि धर्म-निरपेक्षतेचा पहिला संस्कार राजांवर घडला. बाजी पासलकर हेही राजांचे प्रशिक्षक होते.

वरील घटनाक्रम पाहिला तर दादोजी हे बाल-शिवाजीचे प्रशिक्षक-गुरु होते हा दावा फोल ठरतो कारण दादोजींना तशी संधीच मिळालेली नाही. ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत, पण १६४६ सालीच तोरणा जिंकुन आपण कोणाची पर्वा करत नाही हे महाराजांनी सिद्ध केले. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो. तसेच लाल महाल त्यांच्या देखरेखीत (जिजावु आणि महाराजांच्या अनुपस्थितीत) बांधला गेला पण त्यांचे (दादोजींचे) वास्तव्य तेथे कधीच नव्हते. ते कोंडाना वा आपल्या मलठन येथील वाड्यात रहात असत. 

दादोजी हे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार असुनही त्यांनी हयातीत शिवाजी महाराजांच्या हवाली किल्ला केला नव्हता हेही येथे लक्षात ठेवायला हवे. "तारिख-इ-शिवाजी" असे म्हनते कि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य-धडपडीला वैतागुन दादोजींनी वीष घेवुन आत्महत्या केली. त्यांचा एक हात घोरपडे सरदारांनी का तोडला याची माहिती पुढे आहेच. त्यासमयी त्यांचे वय ७२ होते. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला (१६४५). त्यावेळी शिवाजीमहाराजांचे वय १५ वर्ष असेल. त्यामुळे युद्धकला दादोजींनी शिवाजी महाराजांना शिकवली असे म्हणता येत नाही...आणि नंतर अवघ्या २ वर्षांत दादोजींचे निधन झाले.एका अर्थाने दादोजी हे १६३६ पासुन एकाच वेळीस दोन व्यक्तींची सेवा करत होते. शहाजीमहाराजांवर आदिलशाहीचा कधीच विश्वास नव्हता कारण त्यांनी पुर्वी स्वराज्यस्थापनेचा प्रयत्न केला होता हे जगजाहीर होते. अशा स्थितीत शिवाजीमहाराजांनीही बंडाची भुमिका घेतल्याने आदिलशाहचे आणि त्याच वेळीस शाहाजीराजांचे प्रतिनिधी असलेले दादोजी यांची पंचाइत झालीच असनार. त्यामुळेच त्यांनी शहाजी राजांकडे शिवाजीराजांबद्दल तक्रार केलेली दिसते. म्हणजेच दादोजींना शिवरायांचे प्रेरक-समर्थक मानता येत नाही आणि तसे म्हनने दिशाभूल करणारे आहे. 

आता दादोजींचा हात का तोडला गेला याबद्दल: 

सन १६४५. एक जिजावुंनी दिलेला निवाडा जो दादोजींशी संबधीत आहे. हकीकत अशी (संदर्भ: शिवकालीन निवाडे) रंगनाथ गनेश सोनटक्के हे कस्बे जिन्ती, परगना श्रिगोन्दे येथील कुलकर्नी वतन पहात असत. ते जमा महसुल घेवुन महसुलाचा हिशोब द्यायला दादोजी कोंडदेव यांच्याकडे कोंडाना मुक्कामी आले. आधीचे हिशोब आणि आताचे हिशोब जुळत नसल्याने दादोजींशी सोनटक्के यांचे भांडन झाले पण तदनंतर दादोजींनी त्यांना भोजन प्रित्यर्थे आपल्या निवासी निमंत्रीत केले. रात्री भोजनानंतर (भोजनात वीष घातले असल्याने) त्यांचा दादोजींच्याच निवासस्थानी म्रुत्यु झाला. तदनंतर रंगनाथ यांचे पुत्र विसाजी रंगनाथ सोनटक्के यांनाही दादोजींनी धमक्या दिल्या. यामुळे प्रक्षुब्ध होवुन भानाबाई विसाजी सोनटक्के या जिजावुन्च्या दरबारी आल्या व तक्रार गुदरली. जीजावुंनी तपास करुन दादोजी हे दोषी आहेत याची खात्री करुन घेतली आणि भानाबाईंना भरपाइ म्हणुन बाभ्हुळ्गाव येथे बिघे १२० चावर १८० अशी जमीन स्वत: सनद करुन दिली आणि दादोजींना बोलावुन फैलावर घेतले.ऐतिहासिक निवाड्यांवरुन हे स्पष्ट दिसते कि दादोजी हे आदिलशहाचा महसुल हडपत होते. ही वार्ता आदिलशहा आणि शहाजी राजांना कळली आणि त्याचीच परिणती म्हनजे १६४६ साली दादोजींचे प्राणावरुन हातावर निभावणे.

आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे किती मनोविक्रुत असतील हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

१. ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे वीष घीवुन आत्महत्त्या केल्याने निधन झाले.
--> आजवर कुठेही ब्रिगेड / डॉ. जयसिंगराव पवार आणि इतर लोक जसे बेडेकर किंवा बलकवडे यांनी दादोजींचा मृत्यू ही आत्महत्या होती असा उल्लेख केलेला वाचलेला नाही. याचा संदर्भ समजू शकेल काय..

२. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला (१६४५) -- दादोजींचा हात प्रत्यक्ष कोणी तोडला होता असा कुठेही उल्लेख आलेला नाही. याचाही संदर्भ मिळू शकेल काय...

३. शाहाजी राजांनी दादोजींना आपल्या सेवेत घेउन पहिली कामगिरी दिली ती शिवापुर विकसीत करण्याची.
शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष् ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली.
तसेच लाल महाल त्यांच्या देखरेखीत (जिजावु आणि महाराजांच्या अनुपस्थितीत) बांधला गेला पण त्यांचे (दादोजींचे) वास्तव्य तेथे कधीच नव्हते.

--> यातून दोन गोष्टी स्पष्ट आहेत की त्यांच्या कामावर आणि निष्ठेवर शहाजी राजे, जिजाऊ आणि शिवाजी या सर्वांचा मोठा भरवसा होता. नाही तर त्यांना सुभेदारी आणि जहागिरीची जबाबदारी दिलीच नसती. आणि जिजाऊ आणि लहान शिवाजी यांना बंगळूराहून इतक्या लांब पुण्याला पाठवले नसते.
तसेच शेवटपर्यंत ते चाकरी करीत होते. म्हणजे त्यांचे इमान / स्वामिनिष्ठा याबद्दल दुमत नाही.
दुसरी गोष्ट बलकवडे यांनी अनेक संदर्भ दिले आहेत जे हेच सिद्ध करतात.
(अजूनही ते गुरू होते यावर आलेलो नाही. पण हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे. की हा मनुष्य कृतघ्न अथवा कारस्थानी होता असे त्यांना अजिबात न मानणार्‍यांनीही म्हटलेले नाही.)

३. तत्पुर्वीच शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षन गोमाजी नाइक पानसंबळ या लखुजी जाधवांनी नेमलेल्या प्रशिक्षकाकडुन जुन्नर (शिवनेरी) पासुनच सुरु झाले होते. या काळात गोमाजी नाइकांच्या सल्ल्यावरुन महाराजांनी लढवैया पठान तुकडीला सेवेत घेतले आणि धर्म-निरपेक्षतेचा पहिला संस्कार राजांवर घडला. बाजी पासलकर हेही राजांचे प्रशिक्षक होते.
--> धर्म निरपेक्षतेचा प्रश्नच नव्हता. अवघा महाराष्ट्र -शहाजी / मालोजी / लखूजी आणि पूर्वज हे निजाम / आदिलशहा इ. च्या चाकरीत पिढ्यन पिढ्या होते. आपल्या जहागिरीत पठाण तुकड्या आणि इतर खान सुभेदारांबरोबर एकत्र एका शाहीची चाकरी वतनदारी ही काही वेगळी गोष्ट नव्हती. मग यात पहिला संस्कार घडला असं कसं म्हणता येईल.
बंगळूरास काय सगळे मराठा सुभेदार / शिलेदार होते काय?

दुसरं गोमाजी नाईक पान संबळ हे मोठं नाव आहे. ते शिवनेरीला कधी होते? त्यांनी नंतरही स्वराज्यात काम केलं आहे असे उल्लेख आहेत. -- मग शिवाजी महाराज त्यांच्या कडून शिवनेरीला कधी शिकले. आणी शिवनेरीला ते शहाजींच्या संबंधांमुळे त्या किल्लेदाराकडे राहिले. तिथे लखुजींनी गोमाजींना कधी पाठवलं याचा काय संदर्भ आहे.

४. वरील घटनाक्रम पाहिला तर दादोजी हे बाल-शिवाजीचे प्रशिक्षक-गुरु होते हा दावा फोल ठरतो कारण दादोजींना तशी संधीच मिळालेली नाही. ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत, पण १६४६ सालीच तोरणा जिंकुन आपण कोणाची पर्वा करत नाही हे महाराजांनी सिद्ध केले. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो.

--> पुण्यात राजे काहीच शिकले नाहीत काय? म्हणजे महाराजांनी बंगळूर आणि शिवनेरी ला राहून सर्व परिस्थीती समजावून घेतली आणि राज्य स्थापन करायचं ठरवलं असा अर्थ काढला जातो आहे.
बाजी पासलकर किंवा इतर जे लढवय्ये महाराजांना शिकवण्यासाठी नेमण्यात आले ते शहाजीराजांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती - जे त्यांचे काही नाही म्हटलं तर चक्क काम होतं त्या दादोजींनी नेमले नाहीत तर पुण्यात येऊन दुसर्‍या कोणी केलं काय? दादोजी वृद्ध होते. त्यांनी स्वतः राजांना तलवार चालवायला शिकवलं असेल असा कुठे उल्लेखही नाही. त्यामुळे तसा दावा फोल असण्यासाठी मुळात तसा कोणी दावाच केलेला नसावा.
दुसरं न्यायदान, सुभ्याचा कारभार, देशमुखांची कामं, इ. सदरेवरच्या गोष्टी महाराज तेव्हा असलेल्या सुभेदार किंवा योग्य शब्द कारभार्‍यांकडून शिकले नसतील तर अजून कोणाकडून शिकले.

--> ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो.
दादोजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे प्रेरक होते असं कुठेही कोणी म्हटल्याचं ऐकिवात नाही. इतिहासाच्या पुस्तकात नव्हतं. मग हा कोणाचा दावा निकालात काढला आहे.

जीजावुंनी तपास करुन दादोजी हे दोषी आहेत याची खात्री करुन घेतली आणि भानाबाईंना भरपाइ म्हणुन बाभ्हुळ्गाव येथे बिघे १२० चावर १८० अशी जमीन स्वत: सनद करुन दिली आणि दादोजींना बोलावुन फैलावर घेतले.ऐतिहासिक निवाड्यांवरुन हे स्पष्ट दिसते कि दादोजी हे आदिलशहाचा महसुल हडपत होते. ही वार्ता आदिलशहा आणि शहाजी राजांना कळली आणि त्याचीच परिणती म्हनजे १६४६ साली दादोजींचे प्राणावरुन हातावर निभावणे.
--> हा नवीन संदर्भ आहे आणि ब्रिगेडच्या आरोपात किंवा बलकवडे आणि इतर इतिहास संशोधकांबरोबर असलेल्या वादात आलेला दिसत नाही.
जर आधीच आला असेल तर क्षमस्व. पण संदर्भ द्यावा ही विनंती. कारण हा प्रचंड गंभीर आरोप आहे. आणि त्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या स्वामिनिष्ठेवर मोठा डाग आहे. मग बलकवडे यांनी दिलेले सगळे संदर्भ आणि शाहू महाराजांनी केलेला गौरव पूर्ण उल्लेख चूक आहे. आणि खुद्द डॉ. जयसिंगराव पवार यांचंही लिखाण चुकीचं आहे असा अर्थ ध्वनित होतो आहे.

आपण मिपावर प्रथमच अतिशय उत्तम ऐतिहासिक संदर्भ दिले आहेत (अशी माहितीपूर्ण उत्तरं आत्तापर्यंत कोणीच दिलेली नाहीत. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. पण संदर्भ वर्षानुवर्ष दिले नाहीत) त्यामुळे माझ्यासारख्या इतिहासप्रेमी पण इतके तपशिलवार खुलासे / साल/ बखरी / जेधे शकावली इ. चा अभ्यास नसलेल्यांना तुमच्या उत्तरातून खूप माहिती मिळू शकेल. एकूणात वरील संदर्भांचा आणि प्रश्नांचा खुलास मिळाल्यास सर्व मिपाकरांना अतिशय मोलाचे ठरेल.

योगप्रभू's picture

5 Jan 2011 - 2:06 pm | योगप्रभू

अवतार महोदयांची ही वरील पोस्ट म्हणजे संजय सोनवणी यांची ब्लॉगपोस्ट ढापून जशीच्या तशी येथे चिकटवली आहे. निदान तसा संदर्भ तरी द्यायचा.

अर्धवटराव's picture

5 Jan 2011 - 7:14 am | अर्धवटराव

बलकवड्यांनी जे संदर्भ दिलेत ते विकृत मनोवृत्तीचे म्हणावे काय ??

अर्धवटराव

शिल्पा ब's picture

5 Jan 2011 - 7:54 am | शिल्पा ब

<<<दगडावर डोकं आपटुन घ्यायला कोण शहाणा या लोकांच्या सभेला जाईल??
तुम्हीच वर लिहिलंय ना हे? तरीही!!! शेवटी ज्याची त्याची समज...ज्याचे त्याचे संस्कार वगैरे वगैरे...कोणत्याही प्रकारची ताकद जवळ नसेल तर जाऊ द्या..

नितिन थत्ते's picture

5 Jan 2011 - 8:34 am | नितिन थत्ते

>>.कोणत्याही प्रकारची ताकद जवळ नसेल तर जाऊ द्या..

जात्युच्छेदनाच्या कामात गुंतले असताना सावरकरांना ऐकायला मिळालेल्या "आत्ता पेशवाई असती तर....." या वाक्याची आठवण झाली.

अवलिया's picture

5 Jan 2011 - 11:03 am | अवलिया

म्हणजे नक्की काय?

नितिन थत्ते's picture

5 Jan 2011 - 11:51 am | नितिन थत्ते

इकडे इतके सावरकरभक्त आहेत की वरील संदर्भ लगेच कळेल असे वाटले होते. पण सावरकरभक्त सावरकरांचे लिखाण वाचत नसावेत म्हणून.....

सावरकर रत्नागिरीत असताना रूढीभंजनाचे कार्य करीत होते. तेव्हा ते हिंदुधर्मातील अनिष्ट रूढींवर टीका करीत असत. त्यावेळच्या सनातन्यांनी "आज जर पेशवाई असती तर (सावरकरांना) हत्तीच्या पायी तुडवले असते" असे विधान केले होते.

शिल्पा ब यांच्या प्रतिसादात मला तीच भावना दिसली.

शिल्पा ब's picture

5 Jan 2011 - 11:57 am | शिल्पा ब

नाईलाज आहे पण माझी भावना पण हिच होती..आहे...आता काय करता? सांगा.

सुनील's picture

5 Jan 2011 - 12:20 pm | सुनील

आज जर पेशवाई असती तर .......

हे वाचावे.

>>>>इकडे इतके सावरकरभक्त आहेत की वरील संदर्भ लगेच कळेल असे वाटले होते. पण सावरकरभक्त सावरकरांचे लिखाण वाचत नसावेत म्हणून.....

छे छे तुमच्यासारखे हुशार आणि अभ्यासु मंडळी असतांना आम्ही फक्त आरती ओवाळण्याचे काम करतो. तुम्ही बरोबर हवे ते संदर्भ, हवे तसे ,हवे तेव्हा देतातच त्यामुळे काळजी नसते. असो

>>>>सावरकर रत्नागिरीत असताना रूढीभंजनाचे कार्य करीत होते. तेव्हा ते हिंदुधर्मातील अनिष्ट रूढींवर टीका करीत असत. त्यावेळच्या सनातन्यांनी "आज जर पेशवाई असती तर (सावरकरांना) हत्तीच्या पायी तुडवले असते" असे विधान केले होते.

जात्युच्छेदनाच्या कामात गुंतले असताना सावरकरांना ऐकायला मिळालेल्या "आत्ता पेशवाई असती तर....." या वाक्याची आठवण झाली.

इथे तुम्ही तुमच्या प्रतिसादातील वाक्य उपमा रुपाने वापरले आहे. उपमे मधे साधर्म्य अपेक्षित असते असे काहीसे वाटते. तुमच्या वाक्याचा उत्तरार्ध वरिल प्रतिसादकाच्या मनातील भावना आणि तथाकथित विधानातील भावना यांचा एकमेकांवर आरोप होत साधर्म्य असल्याचे आपण प्रतिपादन करत आहात. याचाच अर्थ तुमचे वाक्य अर्थगर्भ आणि परिपुर्ण होण्यासाठी, कारण तुम्ही निरर्थक आणि अनावश्यक लिहित नाही असा तुमचा गौरव असल्याने, तुमच्या वाक्यातील पुर्वार्ध ज्यामधे तुम्ही सावरकरांचे जातीभेद उच्छेदन करण्याचे कार्य आणि वरिल प्रतिसाद ज्या भावनेतुन आला आहे त्या प्रतिसादाचे मूळ कारण असलेले काही राजकारणी आणि जातीवर आधारीत भेद करत समाजात दुही माजवण्याचे कार्य करणारे काही ब्रिगेडी कार्यकर्ते, नेते यांचे मुल्यमापन एकाच स्तरावर करत असुन ते समान आहेत असेच तुमचे म्हणणे आहे हे तुम्ही उपमा अलंकार वापरला आहे यावरुन सिद्ध होत आहे.

मागे तुम्हीच एका राष्ट्रपुरुषाची विटंबना करणारा लेख लिहिला होता आणि संपादक मंडळातील तसेच संपादकांशी जवळीक असलेल्या काही व्यक्तिंनी त्याला टाळ्या वाजवल्या होत्या याची आठवण झाली.

>>>>शिल्पा ब यांच्या प्रतिसादात मला तीच भावना दिसली.
शिल्पा ब यांनी उत्तर दिले आहे सबब नो कमेंटस.

नितिन थत्ते's picture

5 Jan 2011 - 1:16 pm | नितिन थत्ते

१. मी व्यक्त केलेले भावना साधर्म्य आहेच असे शिल्पा ब यांनी मान्य केले आहे त्यामुळे तुमचा हा सगळा प्रतिसादच दुर्लक्षिण्यायोग्य आहे.

२. आपण उद्धृत केलेल्या धाग्यावरील माझे स्पष्टीकरण प्रसिद्ध झाल्यावर "भांडण संपल्याचे" आपण जाहीर केले होते.

अवलिया's picture

5 Jan 2011 - 1:19 pm | अवलिया

>>>१. मी व्यक्त केलेले भावना साधर्म्य आहेच असे शिल्पा ब यांनी मान्य केले आहे त्यामुळे तुमचा हा सगळा प्रतिसादच दुर्लक्षिण्यायोग्य आहे.

जरुर दुर्लक्ष करा.

>>>>२. आपण उद्धृत केलेल्या धाग्यावरील माझे स्पष्टीकरण प्रसिद्ध झाल्यावर "भांडण संपल्याचे" आपण जाहीर केले होते.

भांडण संपले असले तरी त्याची आठवण आम्हाला येऊ नये असा नियम नाही. जशी तुम्हाला आठवण आली तशी आम्हाला पण आली.

असो.

नितिन थत्ते's picture

5 Jan 2011 - 1:22 pm | नितिन थत्ते

.

पक्या's picture

6 Jan 2011 - 7:46 am | पक्या

अवलिया यांच्याशी या प्रतिसादासाठी सहमत.

शिल्पा ब's picture

6 Jan 2011 - 7:58 am | शिल्पा ब

<<<>>>>शिल्पा ब यांच्या प्रतिसादात मला तीच भावना दिसली.
शिल्पा ब यांनी उत्तर दिले आहे सबब नो कमेंटस.

याविषयी मी इतका विचार केलाच नव्हता त्यामुळेच मी चुकीचा प्रतिसाद दिला...चूक माझीच आहे.
तुमच्या मताशी सहमत आहे.

विकास's picture

6 Jan 2011 - 7:59 am | विकास

नितीनरावांचे एकंदरीत या वर्तमानासंदर्भात आणि विषयासंदर्भात काय मत आहे? संभाजी ब्रिगेड ज्या पद्धतीने आवाज करत आहे, ज्या पद्धतीने त्यांनी भांडारकर इन्स्टीट्यूटमधे गोंधळ घातला असे म्हणले जाते ते आपल्याला योग्य वाटते का?

नितिन थत्ते's picture

6 Jan 2011 - 12:40 pm | नितिन थत्ते

मागील वर्षी "पोटतिडिकीने लिहिलेले पत्र" या (आता उडालेल्या) याच विषयावरच्या धाग्यात मत व्यक्त केले होते.

असो.

बलकवडेंच्या मोठ्ठ्या लेखात ९१ कलमी बखरीतले एकच वाक्य दादोजी गुरू असल्याचे सूचीत करते. इतर सर्व फाफटपसारा शिवाजी महाराजांना दादोजीविषयी आदर असल्याविषयी आहे.

मैत्र's picture

6 Jan 2011 - 1:02 pm | मैत्र

इतर सर्व माहिती हा फाफट पसारा आहे या विधानाचं कारणही देणं सयुक्तिक ठरेल.

श्रीमंत महाराज भोसले त्यांची बखर, म्हणजेच शेडगावकर भोसले बखर, या बखरीतही शाहजी राजांची जहागीर भरभराटीस आणण्याकरिता दादाजीने केलेल्या व्यवस्थेचे तपशीलवार वर्णन केले आहे. आणि शेवटी ‘‘शिवाजीराजे ह्यास विद्याभ्यास करणारा सिक्षाधारी (म्हणजे शिक्षक) होता, त्यांणी विद्याभ्यासात सिवाजीराजे ह्यांस तयार केले’’ असे म्हटले आहे.

शिवादिग्विजय बखरीतदेखील ‘‘शिवाजी महाराज पुणे प्रांती राहून दादाजीपंती विद्याभ्यास करविला; मल्लयुद्ध, शस्त्रयुद्ध करावयाच्या गती शिकविल्या’’ असे म्हटले आहे.

-> वरील दोन संदर्भ आपल्या नजरेतून अनवधानाने सुटले असावेत.

तसेच यानंतर असे वाक्य त्या लेखात आहे-->
येथवर दादाजीपंताच्या कामगिरीविषयीचे पुरावे काय आहेत ते संक्षेपाने सांगितले. आता या व इतर पुराव्यांवरून नामवंत इतिहासकारांनी काय निष्कर्ष काढले आहेत ते थोडक्यात सांगतो.

म्हणजे फक्त सगळे संदर्भ दादोजी हे गुरू होते याचेच असण्याचं कारण नाही आणि तसा दावाही नाही. मग हा फाफट पसारा आहे या विधानाचा आधार किंवा Assumption काय ?

म्हणून, पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा जो प्रसंग लाल महालाच्या जागेत शिल्पबद्ध करण्यात आला आहे, त्या शिल्पात दादाजी कोंडदेवाचा समावेश असावा यात गैर तर काही नाहीच, उलट अशा इमानी पुरुषाचा समावेश त्या शिल्पात असावा ही गोष्ट अत्यंत उचित अशीच आहे.
--> हे वाक्य शेवटी ज्या पद्धतीने मांडले आहे त्यावर ते लेखाचे conclusion वाटते. मग या वाक्याला अनुसरून इतर माहिती आहे असे तुम्हाला वाटत नाही का? आणि का?

नितिन थत्ते's picture

6 Jan 2011 - 1:16 pm | नितिन थत्ते

ओक्के

मुळात वादाची सुरुवात दादोजी शिवाजी महाराजांचे गुरू होते की नाही याने झाली होती म्हणून मी त्याच दृष्टीने बलकवडेंचा (जो जुना आहे) लेख वाचला.

दादोजींची व्यवस्थापकीय कामगिरी उत्तमच असावी. त्यामुळे "सोन्याचा नांगर --- पुतळा" काढण्याची गरज नाही. तो काढला गेला ही चूकच झाली असावी.

विकास's picture

6 Jan 2011 - 5:02 pm | विकास

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मात्र माझा प्रश्न त्या प्रश्नावरून झालेल्या हिंसा/दंग्यासंदर्भात होता.

मृगनयनी's picture

5 Jan 2011 - 10:18 am | मृगनयनी

सहमत!

हा हा हा! दादोजींनी शिवबांस शहाणे केले!

परन्तु अजित- दादांना कोण बरे शहाणे करणार?

असो!

हा न सम्पणारा विषय आहे. तूर्तास पुण्या'चे "जिजापूर" होऊ नये म्हणजे झालं! :)

जय परशुराम!

पंगा's picture

6 Jan 2011 - 8:17 am | पंगा

ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे.

ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजी कसे काय बरे उत्तर देऊ शकले? ब्रिगेड आणि दादोजी हे समकालीन होते*, की दादोजी हे चिरंजीव आहेत?

* संभाजीमहाराजांच्या नावाने काढलेली ब्रिगेड ही दादोजींच्या समकालीन??? की ब्रिगेडच्या नावातला 'संभाजी' हा वेगळाच कोणीतरी, शिवाजीमहाराजांचा समकालीन किंवा अगोदरचा आहे?

(अवांतरः दादोजींच्या 'चोख उत्तरा'वरून आठवले. कॉलेजच्या दिवसांत एक टुकार हिंदी पिच्चर पाहिला होता. पिच्चरचे नाव आता आठवत नाही. ते महत्त्वाचेही नाही. तर पिच्चरमध्ये आमच्या साइडहीरोला बदनाम करण्यासाठी त्याचे त्याच्या मानलेल्या वहिनीशी संबंध आहेत असे व्हिलनमंडळी उगाचच उठवून देतात. आमच्या साइडहीरोला ते खूप लागते. पुढे याच व्हिलनमंडळींकडून आमच्या साइडहीरोचा भर रस्त्यात खून होतो. तर फूटपाथच्या कडेला कोसळून मरता मरता आमचा साइडहीरो आपल्या अंगातून सांडणार्‍या ग्यालनभर रक्ताने शेजारच्या भिंतीवर हाताने मोठ्या अक्षरांत 'भाभी मेरी माँ' असे लिहितो, आणि मग लगेच खास हिंदी पिच्चरच्या पद्धतीस अनुसरून धाड्कन मरून पडतो. असो.)

शिल्पा ब's picture

6 Jan 2011 - 8:19 am | शिल्पा ब

भावना समजून घ्या हो...बाकी असले टुकार पिच्चर तुम्ही पाहता हे वाचून डोळे पाणावले (माझेच..)

पंगा's picture

6 Jan 2011 - 10:24 am | पंगा

बाकी असले टुकार पिच्चर तुम्ही पाहता हे वाचून डोळे पाणावले (माझेच..)

डोळे आमचेही पाणावायचे. पण काय करणार! कँपसवर जे पिच्चर दाखवायचे ते झक मारत पहावे लागायचे. दुसरा पर्याय नव्हता. मजबूरी का नाम...

(नाही म्हणायला दुसरा एक पर्याय होता. कँपसबाहेर गावात एक डब्बा थेटर होते - 'डब्बा'च म्हणायचे त्याला - पण त्यात त्याहूनही रद्दी पिच्चर लागत. आणि कँपसवरच्या पिच्चरमध्ये असला काही सीन आला तर तो नाइलाजाने टॉलरेट केला जायचा - गावातल्या थेटरात आला तर गावकरी थेटरात आनंदाने टाळ्या वगैरे वाजवायचे. आता बोला!)

जयंत कुलकर्णी's picture

6 Jan 2011 - 7:42 pm | जयंत कुलकर्णी

सविस्तर उत्तर द्यायचा प्रयत्न अवश्य करण्यात येईल.

जयंत कुलकर्णी's picture

10 Jan 2011 - 10:26 pm | जयंत कुलकर्णी

प्रेषक आम्हाघरीधन दि. मंगळ, 04/01/2011 - 20:58.
याना उत्तर -

हे बलकावडे तेच ना ज्यांनी पुण्यात २४ एप्रिल २००६ ला मराठा विकास मंचाने आयोजित केलेल्या 'दादोजी कोंडदेव कोण होते?' या खुल्या चर्चा सत्रातुन पळ काढला होता........
त्यावेळी संधी असुनही त्यांनी पळ काढला तेंव्हा त्यांचे म्हणने आज किती मनावर घ्यायचे हे वाचकांनीच ठरवावे..
असो. जयवंत राव आपण चालु ठेवा....

मी स्वत: एकदा संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमाला गेलो होतो. कारण एकच होते की त्यांचे काही मुद्दे असले तर ते स्वत: ऐकावेत. पण तेथे गेल्यावर उकिरड्यात भुंकणारी कुत्री बरी अशी भाषा ऐकून माझ्यासारखे अनेक श्रोते त्या सभेतून उठून गेले. नशिबाने त्यात अनेक मराठेही होते. अशा सभेत कोणीही शहाणा, ज्याचा मेंदू शाबूत आहे तो जाणार नाही हेच सत्य आहे. श्री बलकवडे तेथे गेले नाहीत हेच बरोबर आहे. आम्ही उठून जात असताना आमची जी खिल्ली उडवण्यात आली त्यावरून मला वरील उपमा सुचली आहे. यात अतिशोयक्ती काहीही नाही.

उत्तर अवतार यांना-
दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते.
प्रेषक अवतार दि. बुध, 05/01/2011 - 01:43.

१ यावेळी शहाजी मुघलांच्या नोकरीत होता. तेव्हा हा किल्ला शहाजीच्या जहागिरीत होता असेच म्हणणे संयुक्तिक ठरेल. त्या काळी प्रमूख सरदारानी नोकरी बदलली की त्याचा मुलूख आपोआप त्या नवीन मालकाच्या मुलखात सामील व्हायचा. व त्यातला सगळा कर त्या नवीन मालकाला मिळे. हे दोन प्रकारे शक्य होत असे. एक म्हणजे त्या सरदाराने नोकरी बदलली तर किंवा त्याचा पराभव झाला आणि त्या नवीन मालकाने त्याला सरदारकी देऊ केली तर. पुर्वी छोट्या छोट्या सरदारांकदे सुध्दा दादाजी कोंडदेवांसारखी माणसे असायची. दादाजी कोंडदेव अदिलशाहच्या नोकरीत अप्रत्यक्षरित्या होता कारण शहाजी हा अदिलशहाचा नोकर होता आणि दादाजी शहाजीचा. असेच घडून १६३६ च्या शेवटास शहाजी याचा माहूली येथे पराभव होऊन त्याला अदिलशहाच्या नोकरीत जावे लागले. त्यामुळे त्याच्या मुलखातील त्याची सर्व माणसे ही अदिलशहाची अप्रत्यक्ष नोकरीत गेली.

१६४१ पर्यंत म्हणजे शिवाजी १२ वर्षाचा असेपर्यंत ते बेंगलोरास होते. या बाबतीत सभासद बखरीत खालील उतारा आहे.
“शाहाजीराजे यांसी दौलतेमधे पुणे परगाणा होता. तेथे दादाजी कोंडदेव शाहाणा, चौकस ठेविला होता. तो बेंगरुळास महारांजास भेटीस गेला. त्याबरोबर रा. शिवाजीराजे व जिजाबाई आऊ ऐशी गेली. ते समयी राजियांस वर्षे बारा होती. बराबर शामराव नीळकंठ म्ह्णून पेशवे करून दिले व बाळ्कृष्णपंत, नारोपंत दिक्षितांचे चुलत भाऊ, मजमूदार दिले व सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादाजीपंतास व राजे यांसी पुण्यास रवाना केले”. ( काय हे आमच्या राजास या शहाजीने कसायांच्या हातात की हो दिले. कुठे फेडाल हे पाप ....)
या वरून हे कळते की त्या वेळेस दादोजी हे शहाजीच्या पदरी होते व शहाजी अदिलशहाच्या.

२ १६३६ साली शहाजी राजे अदिलशहाचे सरदार बनले नाही तर त्यांचा माहूली येथे अदिलशहाने पराभव केला व त्यांच्या आश्रयास असलेल्या निजामशहास ग्वाल्हेरला तुरुंगात टाकले. त्यांनी काही जॉब बदलला नाही.

आता दादोजींच्या तथाकथित आत्महत्येबद्दल. हा उल्लेख जदूनाथ सरकार यांच्या एका लेखात आली आहे ती कशी आली ते बघुयात. एक्याण्णव कलमी बखरीच्या एका फार्सी अनुवादातून ही नोंद सरकारांनी उचलली आहे. याच बखरीच्या बाकीच्या भाषांतरात याचा उल्लेख नाही. ही बखरच मुळी अत्यंत अविश्वसनीय आहे. कारण यात असाही उल्लेख आहे की दादोजींच्या मृत्यीनंतर शिवाजीने शहाजीराजांची सर्व मालमत्ता व खजीना जप्त केला. परत हा जो उल्लेख (आत्महत्येचा) २४ व्या कलमात आहे असे म्हटले गेले ते कलमच मुळ बखरीत नाही. ( पारसनीस यांची प्रत). दादोजींच्या मृत्यूचा उल्लेख असलेली तीन अस्सल पत्रे खुद्द शिवाजी महाराजांनीच लिहीली आहेत त्यात काय लिहीले आहे ते बघुयात.

१ पहिले पत्र १५ ऑक्टोबर १६४७चे आहे. ते त्यांनी पुणे परगण्यातील कर्हेलपठार तरफेच्या कारकुनास पाठवले आहे. त्यात त्यांनी पुर्वी जे इनाम चालू होते तेच चालू ठेवण्यास सांगितले आहे. त्यात असा उल्लेख आहे “ सालमजकुराकारणे मशहुरल हजरत दादाजी कोंडदेऊ सुभेदार यासी देवाज्ञा झाली म्हणऊनू”

मशहूर : प्रसिध्द, हजरत : या शब्दाचा अर्थ माधव ज्युलियन यांनी असा दिला आहे “ राजास, पैंगमबरास,अगर श्रेष्ठ व वंद्य पुरूषास या शब्दाने स्वामी या अर्थाने संबोधितात. या वरून शिवाजीमहाराजांच्या मनात या माणसाबद्दल काय भावना होती हे समजते.

२ दुसरे पत्र २४ मे १६४७ च्या आसपासचे आहे ते त्यांनी लिहीले आहे पुण्याच्या देशमुखांना पाठवलेले आहे त्यात सुध्दा त्यांनी एका मशिदीचे इनाम तसेच चालू ठेवायला सांगितले आहे. त्यात पण त्यांनी दादोजींचा असाच आदरपुर्वक उल्लेख केलेला आहे.

३ तिसरे महादजीभटाच्या तक्रारी विषयी पुण्याच्या देशमुखांना लिहीतांना त्यांनी म्हटले आहे “हाली मशहूरल हजरत दादाजी कोंडदेऊ सुभेदार यास देवाज्ञा जाली म्हणोन” इ....
जर शिवाजी महाराजांच्या उद्योगाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असती तर त्यांचा उल्लेख असा करायची शिवाजी महाराजांना गरज नव्हती हे मला वाटते मान्य असावे.

कृपया जेधे शकावलीत व तारीख-इ-शिवाजी यात हे कोठे लिहीले आहे हे सांगावे.
तारीख-इ-शिवाजी म्हणजे मुसलमानांनी केलेले एक्याण्णव कलमी बखरीचे फार्सी भाषांतर. त्यात अनेक त्यांच्या फायद्याच्या गोष्टी घुसडलेल्या ! ज्याचे केले त्याचे खरे नाव आहे “ तफ्सील अहवाल अरूज व खुरज राजाहाये व सरदारान दखन” याचा अर्थ दखनच्या राजांचा व सरदारांच्या उत्कर्षाचा व विद्रोहाचा इतिहास” हे सगळे मुळीच विश्वासार्ह नाही. यदुनाथ सरकारांना मराठी, मोडी, अजिबात येते नव्हते हे जगजाहीर आहे. त्यांनी लिहीले ते सगळे ग्रॅंट डफ आणि फार्सी साधनांवरून. त्यावर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहे. हे म्हणजे नेहरुंनी शिवाजीला चोर आणि लुटेरा म्हटले त्यावर विश्वास ठेवण्यासारखे झाले.

खरे तर ते १६४१ पर्यंत बेगलोरला होते. शिवभारतात शिवाजी बेंगलोरास सात वर्षाचा झाला असा उल्लेख आहे. आता हे गोमाजी नाईक पानसंबळ कोण होते हे बघूयात.

जिजाबाईंचे लग्न जेव्हा शहाजी महाराजांशी झाले तेव्हा जाधवांनी एका नोकर माणसास जिजाऊंबरोबर दिले. त्याचे नाव होते “ गोमाजी नाईक पानसंबळ जामदार” याचा उल्लेख महाराजांनी अफजलखानाच्या स्वारीत बैठकीच्या वेळी जे हजर होते ( सल्लामसलतीची) त्या लोकांच्यात आहे. जामादार/जामदार म्हणजे कपडे/दागदागिने संभाळणारा. हा एक गडी जाधवांनी जिजाऊंबरोबर दिला होता. जाधवांचे आणि भोसल्यांचे संबंध पहाता शिवाजीला शिकवण्यासाठी जाधव एखादा माणूस देतील आणि भोसले तो त्या कामासाठी स्विकारतील हे असंभवनीय. शिवाय एक पत्रात शिवाजी महाराजांनी या नाईकांना समज दिली असाही उल्लेख आहे तो असा.
महाराजांनी हे पत्र मावळच्या देशाअधिकार्याठस पाठवले आहे.

पाषाण, तर्फ कर्यात मावल, येथील पाटीलकी गोविंदराव शितोळे, देशमूख, परगणा पुणे यांची आहे. वाडी करंदी येथील कुणबी रणपिसे हा आपल्याला निराळा मजरा करून दिला आहे म्हणून भांडण करतो. तुम्ही त्याच्या सांगण्यावरून शितोळ्यांशी भांडण करता असे त्यांनी आमच्याकडे येऊन विदीत केले आहे. तरी नसती पाटीलकीची नवी भांडणे करावयाची तुला काय गरज आहे ? आम्ही लहानपणापासून या मुलखात आहोत. मिरासदार कोण व गैरमिरासदार कोण हे आम्ही चांगलेच जाणतो आणि माणसाचे माणूस ओळखतो. तू नवा सुभा करायला आला आहेस. तुला हे काही ठाऊक नाही आणि उगाच एकाच्या सांगण्यावरून दुसर्‍याशी भांडण करतोस. हे तुला करायला कोणी सांगितले आहे ? यापुढे नसती मिरासदारांची नवी भांडणे करशील तर आपले केलेले पावशील हे समजून शितोळ्यांशी भांडणे न करावीत.
पूर्वी मातुश्री आऊसाहेबांनी करंदी हा वेगळा मजरा करायला सांगितले होते, त्यावेळी आम्ही ते मानले नाही. त्यानंतर गोमाजी नाईक पानसंबळ यांनी शितोळ्यांशी तंटा केला. ते वर्तमान आम्हाला समजल्यावर आम्ही त्यांस ताकीद केली. आत्तापर्यंत सुरळीत चालू आहे. त्याप्रमाणे आत्ताही शितोळ्यांची पाटीलकी सुरळीत चालवणे. वाडी करंदीचा मजरा केलेला नाही. मातुश्री आऊसाहेबांचे अगर दुसर्‍या कुणाचे पत्र तंट्यामुळे त्याने ( रणपिशाने) नेले असेल त्यावर जाऊ नये. शितोळ्यांशी काही भांडण केलेस तर आम्हाला बोल नाही. ताकिद होईल. जाणिजे.”
या पत्रात या गोमाजींना ताकीद दिली असा स्पष्ट उल्लेख आहे. गुरूजींना ताकीद देण्याइतके महाराज उध्दट असावेत किंवा हा त्यांचा गुरू नसावा. दुसर्‍याची शक्यता जास्त वाटते. तसेच हेही लक्षात घेतले पाहिजे की महाराजांनी साक्षात स्वत:च्या आईचे म्हणणे ऐकले नाही व न्याय दिला. त्यात त्यांच्या माहेरचा माणसाने शितोळ्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला असताना सुध्दा. पण इतिहासात अशा अनेक नोंदी (जवळ जवळ सगळ्या निकालाबाबत) आहेत की महाराजांनी स्पष्टच सांगितले आहे की दादोजींनी दिलेला निर्णयच पुढे चालवावा.

१ १६२९ साली लखूजी जाधवाचा विजापूर दरबारात खून झाल्यावर शहाजी महाराज पुण्यात येऊन राहिले. त्यानंतर त्यांनी हा मुकासा कधीही हातचा जाऊ दिला नाही. त्यांना इकडून तिकडे नोकरदारी केली पण हा मुकासा सोडला नाही. त्यांच्या अनेक पत्रात दादाजींचा उल्लेख मायन्यात असा केलेला आढळतो “राजश्री दादाजी कोनदेऊ शुभेदार किले कोंडाणा व परगणा पुणा व माहालानिहाये” दादोजी हा शहाजीने नेमलेला एका किल्ल्याचा सुभेदार होता. अदिलशाहीत व मुघलांच्या दरबारात सुभेदार हे पद फार मोठे होते व सहसा त्यांच्या नातेवाईकातच दिले जायचे. खुद्द शहाजी महाराज सुध्दा कधी सुभेदार झाले असावेत की नाही ही शंकाच आहे. कारण त्यांचा तसा उल्लेख कुठेही नाही. पण ज्या प्रमाणे इंग्लीश सिनेमाची कॉपी हिंदीमधे व हिंदीची मराठीमधे त्या प्रमाणे छोट्या छोट्या परगण्यातसुध्दा पेशवे, सबनीस, सुभेदार असायचे..... अर्थात दादोजींच्या परगण्यातून शहाजीला अदिलशहाला कर द्यावा लागत असणारच तो दादोंजी मार्फतच देत असणार. तो जर अदिलशाचा सुभेदार असता तर त्याला शहाजीच्या आज्ञा पाळायची काही गरज नव्हती. पण तो शहाजीच्या, जिजाऊंच्या व शिवाजीच्या आज्ञा पाळताना दिसतोय. तो नि:संशय शहाजीचाचा सरदार/नोकर होता. दुसरे म्हणजे सर्व कागदपत्रात दादोजींचा उल्लेख हा शहाजींच्या वतनासंबंधीतच येतो. तसे नसते तर इतरही परगण्याबाबत उल्लेख सापडले असते. पहिल्यापासून दादोजी हे शहाजीचे व शिवाजीचे एकनिष्ठ बुध्दिमान सेवक होते.
शहाजीने स्वराजस्थापनेचा प्रयत्न केला हे कुठल्या जगात जाहीर आहे हे कृपया सांगावे. त्याला बिचार्‍याला यासाठी वेळच नव्हता. तुमच्या घरातली वरीष्ठ मंडळी जेव्हा कौतुकाने तुमच्याबद्दल “ हा सारखा बंदूक बंदूक खेळत असतो” अशी तक्रार करतात तेव्हा त्यांना तुम्ही पुढे अतिरेकी देशद्रोही होणार असे म्हणायचे असते का ?
इतिहासात अनेक घटनांची तर्कशुध्द संग्ती लावायची असते. ती करताना प्रत्येक गोष्टीचा काटेकोर पुरावा असतोच असे नाही. नाहीतर फालतू व चक्रम प्रश्नही विचारता येतात.

हे काही सापडले नाही. कृपया लेख स्कॅन करून द्या, म्हणजे आभ्यास करता येईल. पण दादोजींच्या हाताचा एक उल्लेख एका दंतकथेत आहे. तो असा. ती त्या एक्याण्णव कलमी बखरीतील आहे म्हणून दंतकथा.
“दादोजीने शिवापूर येथे शहाजीच्या नावाने एक आमराई लावली होती. त्यातला एक आंबा त्याने तोडला. ही आपली चूक असे समजून तो आपला हात कापायला निघाला. लोकांनी त्याला त्यापासून प्रवृत्त केले. त्याची आठ्वण म्हणून त्याने त्याच्या अंगरख्याची एक बाही लांडी केली. ही हकिकत समजल्यावर शहाजीने समजूत काढण्यासाठी त्याला मानाची वस्त्रे पाठवली व त्यानंतर दादोजीने लांडी बाही वापरायचे सोडून दिले.” इ.....

शाहू महाराजांनी पण असा उल्लेख केलेला आढळतो “ मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला परंतू त्याने केलेले निवाडे औंरंगजेब बादशहास वंद्य झाहले” हे उदगार शाहू महाराजांनी काढले असे पत्र बाजीरावाचा शाहूमहाराजांच्या दरबारातील प्रतिनिधी पुरंदरे याने बाजीरावास पाठवले आहे.....
अजून काय लिहावे .........................

या पार्श्वभुमीवर संभाजी ब्रिगेड्चे प्रवक्ते यांनी टि.व्ही.वर एका मुलाखतीत "एक उल्लेख सोडला तर हे पुस्तक उत्कृष्ट आहे" असा उदगार काढले त्याला काय म्हणावे ? आणि यासाठी इतिहास बदलायला निघालेल्यांना कुठली विकृती आहे.... हे आपल्याला समजले असेलच. या विकृतीचे नाव आहे xxर.....

महाराज आत्ता असते तर त्यांनी दादोजींच्या बदनामी केल्याच्या गुन्ह्यासाठी लेन आणि ब्रिगेडच्या शूरविरांचा चौरंग करायची शिक्षा दिली असती हे निश्चित......

अर्धवटराव's picture

10 Jan 2011 - 10:53 pm | अर्धवटराव

अहो हे कोणाला सांगताय? त्यांना इतिहासाशी काहि घेणे देणे नाहि हो. भविष्यात रंगणार्‍या एका गलिच्छ आणि आत्मघातकी कलगीतुर्‍याची पार्श्व्भूमी तयार करताहेत हे लोक. साला हिंदुंना शापच आहे एकमेकांचे गळे घोटुन परकियांचे खिसे भरण्याचा...

(शापित) अर्धवटराव

जयंत कुलकर्णी's picture

11 Jan 2011 - 9:09 am | जयंत कुलकर्णी

उत्तर जेथे शक्य आहे तेथे द्यायलाच पाहिजेना ! म्हणून एवढा वेळ घालवून हे उत्तर तयार केले. दुसरे म्हणजे मिपावर हेच म्हणणे रहायला नको, आणि पुढे याला कोणी उत्तर दिले नाही म्हणून हे बरोबर आहे असेही कोणाला वाटायला नको.

म्हणून हे उत्तर !

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Jan 2011 - 1:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे

योग्य, अभ्यासपूर्ण आणि खणखणीत उत्तर. ते देण्यामागची भूमिका स्पष्ट केलीत हे बरे झाले. पण ही आचरट लोकं परत ४-५ ओळीत गलिच्छ आरोप करून मोकळे होतील आणि तुम्हाला परत मोठ्ठा प्रतिसाद लिहावा लागेल. त्यामुळे प्रत्येक आरोपाचे खंडन करू नका. यातील एक सदस्य तर दोन वर्षे जुन्या प्रतिसादाला अजून उत्तर देत नाही आहेत. मुळात समज कमी असेल तर मुद्देसूद उत्तर द्यायला जमणार कसे? पाषाणावर कितीही पाणी ओतले तरी तो मऊ होत नाही. तो प्रयत्न सोडून द्या.

अवलिया's picture

11 Jan 2011 - 1:31 pm | अवलिया

सहमत आहे.

ही असली लोकं आणि आंतरजालीय विचारवंत ही अत्यंत हलकट जमात आहे.

अर्धवटराव's picture

11 Jan 2011 - 11:32 pm | अर्धवटराव

तुमच्या संयमाया दाद देतो.
>>पुढे याला कोणी उत्तर दिले नाही म्हणून हे बरोबर आहे असेही कोणाला वाटायला नको
अगदी बरोबर. मी थोडं फ्रस्टेट होउन प्रतीसाद दिला होता. सत्य कोणि ऐको वा न ऐको, सांगणार्‍याने सांगत जावे...

अर्धवटराव

विकास's picture

12 Jan 2011 - 2:00 am | विकास

सहमत. प्रतिसाद आवडला. "त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !" असे वागला नाहीत ते योग्यच झाले. :-)

बरीच नवीन माहिती कळली. याच्या विरुद्ध जर कोणी अशीच अभ्यासांती माहिती दिली तर ती देखील वाचायला आवडेल.

सुधीर काळे's picture

12 Jan 2011 - 8:17 am | सुधीर काळे

जय हो, जयंतराव! Bravo!!
तुमच्या इतिहासाच्या आणि बखरीच्या अभ्यासाची खोली पाहून 'म्या पामर' थक्कच झालो!!
हे काम असेच नेटाने चालू ठेवा.....

दादोजींचे स्थान थोरल्या महाराजांच्या आयुष्यात नक्कीच ठळक होते,परंतु ते स्थान एका पथदर्शक,गुरु चे होते का...हा नक्कीच सखोल संशोधनाचा विषय आहे.कारण गुरुपद हे अढळस्थानी असतं, आणि याचा उल्लेख हर प्रकारच्या शिवचरित्रात यायला हवा होता, मुख्यत्वे कुठलेही तत्कालीन परदेशी इतिहासकार वा उत्तरेतील महाराजांचे चरित्रकार याचे दाखले देत नाहीत. मेहेंदळेसरांनी सुद्धा यासंदर्भात कोणतेही संदर्भ दिले नाहीत, अजून हजारो कागदपत्रे प्रकाशात यावयाची आहेत.कदाचित त्यात ते गुरु असण्याचे पुरावे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.घाईघाईत निष्कर्षप्रत पोचण्यापेक्षा,तटस्थ राहून अधिक अधिक संशोधन व्हायला हवे.

अर्धवटराव's picture

16 Jan 2011 - 2:00 am | अर्धवटराव

तुम्ही पथदर्शक, गाईड या अर्थाने जर म्हणाल तर दादोजी शिवरायांचे गुरू नसावे. दादोजींनी शिवबाला सिव्हील एडमिनिस्ट्रेशनचे आणि न्यायदानाचे ट्रेनींग दिले असावे. इतर विषयांकरता, शस्त्रविद्येकरता वेगवेगळे ट्रेनर्स कामाला लावले असतील. मुलुखाची, माणसांची आणि तत्कालीन समाज जीवनाची ओळख दादोजींनी शिवबाला करुन दिली असावी.

ज्या अर्थाने तुम्ही गुरू म्हणताय त्याअर्थाने शिवाजीचा गुरू ना दादोजी, ना समर्थ रामदासस्वामी, ना तुकाराम वगैरे मंडळी. शिवबाचा गुरू म्हणजे त्याची आई जिजाऊ. इतरांनी शिवाजीला जाणता-कळता झाल्यावर शिकवण दिली असेल, पण जिजाऊनी गर्भावस्थेपासुन शिवबावर संस्कार केले, त्याचा पींड तयार केला, बाल शिवबात जीजाऊने आपली तळमळ ओतली, स्वप्न रुजवले. त्यातून शिवचरित्र घडले असावे.

अर्धवटराव

कोकणप्रेमी's picture

11 Jan 2011 - 1:03 pm | कोकणप्रेमी

अतिशय योग्य उत्तर जयन्तराव. कुलकर्णी आडनाव सार्थ थरविलेत. गोमाजी पानसम्बळ यान्च्याबद्दल्ची महिती माझ्यासाथी नवी आहे. धन्यवाद

सुधीर काळे's picture

12 Jan 2011 - 7:55 am | सुधीर काळे

बलकवडे यांनी लिहिलेला लेख शरदरावांच्या (शरदराव पवार-केंद्रीय मंत्री) कदाचित् वाचनात आलेला नसेल म्हणून मी तो लेख त्यांना त्यांच्या लोकसभेच्या pawars@sansad.nic.in या ई-मेल पत्त्यावर पाठविण्याचा प्रयत्न माझ्या खासगी 'याहू' आयडी वरून तसेच माझ्या कंपनीच्या 'चक्रास्टील.कॉम' आयडीवरून केला पण माझ्या दोन्ही 'आयडी'वरून तो बाउन्स झाला.
शरदरावांचा आणखी कुठला आयडी इथे कुणाला माहीत असल्यास कळवावा. कारण त्यांना हे पटणे आवश्यक आहे असे मला वाटते.
धन्यवाद

तुजं माजं पटाना आन् तुज्या वाचून कटाना... काय रे हिकडची झुंबाझुंबी...

म्हाराजांवरून येवडे वाद झाले, येवड्या प्रतिक्रिया इकडं झडल्या (हो, झडल्याच!) पण हाती कायबी नाय गवसलं राव... आलिकडच्यांना पलिकडचे कुत्रे वाटायलेत आणि वायशे वर्शा...
शेवटी कसंय की, पत्रातून किंवा इतर ऐतिहाशिक दस्तावेजातून जे काही आसतंय ना तेचा अर्थ कोण कसा काडल काय सांगावं? बरं, येकाद्याला समाजलेलाच अर्थ दुसर्‍यानी आगदी तसाच समजून घ्यावा हा त्याचा आट्टहास कशापायी बरं? त्ये काय वादातीतलं निसर्गसत्य हाय वय, की सगळ्यांनी येकाच सुरात म्हणायला?

आमी सगळ्यांचं सगळं वाचतो. आणि सोताचा शिवाजी उभा करतो. पण मनात. तो आन् मी, मदी कुणीच न्हाइ. जसा तो मला, तसाच तो दुसर्‍या कुणाला न्हाइ. कारण, आमाला जे काय वादग्रस्त वाटतं हे आमी कुणाला सांगतच न्हाइ. हा, पर चांगल्या गोष्टी तेवड्या समद्यांना धरू धरू सांगतो. जाऊ द्या, पर इकडं काय फरक पडायचा दिसत न्हाइ राव... चालू द्या तुमची पुराणपोथी.

सुकोबाराय म्हणूनच म्हणतेत-

सुका म्हणे जगी | भांडी सर्व जनीं ||
शिवबाचा आदर्श | कोण ठेवे ||

जय हारी विट्ठाल!!!

भारी समर्थ

जयंत कुलकर्णी's picture

12 Jan 2011 - 1:25 pm | जयंत कुलकर्णी

असे सगळ्यांनीच केले असते तर माझा एवढा वेळ गेला नसता आणि हे एवढे सगळे लिहायचीही वेळ आली नसती.

उरला प्रश्न समजण्याचा - काळा रंग काळा आहे आणि केशरी रंग केशरी आहे हे समजण्यासाठी काही विषेश बुध्दी पाहीजे असे नाही :-)

त्या मुळे जे इतिहासात लिहीलेले आहे त्यातून काही वेडावाकडा अर्थ काढणे हे काम नालायक लोकंच करू शकतात. ते आपण पहातच आहात.

:-)

अर्धवटराव's picture

12 Jan 2011 - 10:52 pm | अर्धवटराव

अहो हे वादंग इतिहासाच्या वेगवेगळ्या इंटरप्रिटेशन्स वरुन नाहि माजलय. ऐतिहासिक व्यक्तींच्या नावावर सामाजीक तेढ माजवुन त्यावर स्वार्थाची पोळी भाजण्याचा घाणेरडा डाव आहे हा.

अर्धवटराव

प्रस्तुत संदर्भातला एक उत्तम लेख
http://dnyanadadeshpande.blogspot.com/2011/01/blog-post.html