परवा गणपाचे हैद्राबादी वाचले आणि सगळ्यात पहिल्यांदा आठवण झाली ती 'द अंग्रेज' ह्या तुफान विनोदी हिंग्लिश चित्रपटाची. 'बॉम्बे बॉईज' वगैरे चित्रपटानी पहिल्यांदा मल्टिप्लेक्स चित्रपटांची लाट आणली, त्याच लाटेतला हा एक नितांत सुंदर विनोदी चित्रपट. चित्रपटाचे अजुन एक वैशीष्ठ्य म्हणजे हिंग्लिश चित्रपट असुनही हा चित्रपट कौटुंबीक करमणुक करणारा आहे. कुठेही अश्लील दृष्यांचा, द्विअर्थी संवाद, शिव्या ह्यांच्या भडिमार नाही. नवा दिग्दर्शक, सर्व चेहरे फ्रेश आणि नविन पण चित्रपटाचा दर्जा नक्कीच उच्च करमणुक करणारा आहे. करमणुकप्रधान चित्रपट म्हणुन ह्याच्याकडे नक्की बोट दाखवता येईल.
चित्रपटाची कथा घडते ती हैद्राबादमध्ये. त्यामुळे टिपिकल हैद्राबादी बोलीचा चित्रपटात पुर्ण वापर झाला आहे. त्यातल्या त्यात सलिम फेकु आणि जहांगीर ह्या दोन नमुन्यांसाठी आणि त्यांच्या हैद्राबादी बोली साठी हा चित्रपट बघितलाच पाहिजे. दोघेही कलाकार तसे तुलनेने नविन असुनही त्यांनी चित्रपटभर हास्याचा नुसता धबधबा उडवुन दिला आहे.
प्रणय आणि रोचक हे दोन NRI भारतात आपल्या मित्राच्या कंपनीत काम करण्यासाठी म्हणुन हजर होतात आणि इथुनच चित्रपटाला सुरुवात होते. हैद्राबादमध्ये त्यांचा लोकल गाईड म्हणुन मिळतो तो त्यांचा ऑफिसचा सहकारी प्रसाद. प्रसाद ह्या दोघांनाही शहर दाखवत असतानाच त्यांची गाठ पडते ते तो ओल्ड सिटी चारमिनार जवळील इस्माईल भाई आणि त्याच्या गँगशी. इस्माईल भाई हा चारमिनारचा सो-कॉल्ड फेमस व्यापारी आणि गँगचा खर्च चालवणारा माणुस. त्याच्या गँगमध्ये जहांगीर, सलिम फेकु, गफुर आणि चौस सारखे नमुने भरलेले असतात. जहांगीर स्वतःला कायम फार मोठा भाई असल्याचे दाखवत असतो तर सलिम फेकुला सतत बोलबच्चन करण्यातुन फुरसत मिळत नसते. जोडीला त्यांचे टिपिकल हैद्राबादी आहेच. ह्या गँगचा दिवसच सकाळी चहाच्या हॉटेलत एकत्र बसुन एकमेकांना थापा ठोकत सुरु होत असतो.
ह्याच हॉटेलात चहा प्यायला आलेल्या रोचक, प्रणय आणि प्रसादची फोटु काढण्यावरुन इस्माईलभाईच्या गँगशी खरखर होते. झटापटीत आपला कॅमेरा परत मिळवायच्या प्रयत्नात रोचकच्या हातुन इस्माईलभाईचा शर्ट फाटतो आणि सगळी गॅंग तिघांच्या मागे लागते. तिघेही पळुन जाण्यात यशस्वी होतात पण इकडे आपली इज्जत पुर्णपणे मातीत गेल्याचे इस्माईलभाई ठरवुन टाकतो. आणी प्रणय आणि रोचकचा म्हणजे इस्माईल गँगच्या भाषेत 'अंग्रेजांचा' बदला घ्यायचा निश्चय सगळे पक्का करतात. ह्यानंतर चालु होतो तो तो अंग्रेजांचा पत्ता मिळवण्याचा आणि बदला घेण्याचा एकेक विनोदी प्लॅन. हे प्लॅन आणि ते प्रत्यक्षात उतरताना होणार्या गमती जमती हा भाग चित्रपटातच पाहिला पाहिजे. तो नुसता वर्णन करण्यात गंमत नाही. त्यातल्या त्यात अंग्रेजांच्या बंजारा हिल वरील घराचा पत्ता मिळाल्यावर तिथे जाउन ह्या गँगने त्यांचा शोध घ्यायचा केलेला प्रयत्न म्हणजे कहर आहे.
ह्या कथेला दोन उपकथाकथनांची जोड पण आहे. एक म्हणजे प्रणय आणि रोचकच्या ऑफिसमधीच प्रेमप्रकरणाची आणि दुसरी प्रणयचे घर सांभाळणारा आणि गँगस्टर मामाच्य मदतीने प्रणयचे अपहरण करुन डॉलरमध्ये खंडणी उकळु पाहणार्या प्रणयच्या भावाची रमेशची. प्रणय आणि रोचकमध्ये सगळ्यात आधी ऑफिसमधली सौम्याला पटवण्यासाठी होणार्या चढाओढीचे चित्रण देखील मस्तच. हि सौम्या म्हणजे एक चालता बोलता बाँबच दिसली आहे. टिपिकल हैद्राबादी तिखट फुड आणि त्याने दोन्ही NRI च्या उडवलेल्या गमती पण झकासच.
सर्व कलाकार नविन असुनही अभिनयात कुठेही कमी पडत नाहीत. मग तो मामा आणि त्याची अर्धवट डोक्याच्या माणसांची गँग असो नाहितर प्रणय, रोचकच्या ऑफिसमधली टिपिकल जुन्या विचारांची आणि NRI तरुण भारतीय मुलींना कसे फसवतात ह्याचीच कायम चर्चा करणारी लक्ष्मी असो. ह्याच चित्रपटाचा पुढचा भाग हैद्राबादी नवाब ह्या नावाने हजर झाला. पण त्या विषयी पुन्हा कधीतरी. सध्या तरी तुम्ही ह्या चित्रपटाचा लुत्फ उठवायला विसरु नका.
ह्या चित्रपटातील काही मजेशीर दॄष्ये गुगल व्हिडिओवर देखील बघता येतील :-
http://video.google.com/videoplay?docid=3836676690364677452#
प्रतिक्रिया
15 Sep 2010 - 12:10 pm | ब्रिटिश टिंग्या
पच्चीस सालसे चारमिनार पे बैठेला हुं! :)
अजुन ४-५ चित्रपट आहेत - हंगामा इन दुबई, हैदराबाद नवाब, आदाब हैदराबाद, गुल्लुदादा, गुल्लुदादा रिटर्न
15 Sep 2010 - 12:10 pm | यशोधरा
परा, तू चित्रपट परिक्षण मस्त लिहितोस! :)
15 Sep 2010 - 12:13 pm | Nile
आ गए तुमारे आवारा दोस्ताँ!
15 Sep 2010 - 12:13 pm | चिगो
"वो इस्माइल भाई को अंग्रेजा जब कुंदल-कुंदल के मारे, तब क्या किया रे तुने?" लै भारी आहे भौ... माझ्याकडे आहे हा..
15 Sep 2010 - 12:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बहुत कामां है यारों, नहीं तो अच्छी प्रतिक्रिया देती मै।
15 Sep 2010 - 12:29 pm | प्राजक्ता पवार
उत्तम चित्रपट परिक्षण . अजुन येवुद्यात :smile:
15 Sep 2010 - 12:30 pm | पाषाणभेद
कुठे मिळेल ही चित्रपट सिडी? बाकी मस्त पिच्चर दिसतोय. परा असल्या हलक्या फुलक्या पिच्चरचे परिक्षण करत जा बाबा.
15 Sep 2010 - 6:27 pm | परिकथेतील राजकुमार
तू-नळी वर ३ भागात उपलब्ध आहे ना हा चित्रपट पाभे.
15 Sep 2010 - 12:42 pm | गणपा
जब्रा रे पर्या. यशोतैशी १००% सहमत.
माझ्या गाढवपणामुळे मी आख्खा सिलेक्टेड चित्रपटांचा फोल्डरच डिलीट केला :(
हाही त्या पैकीच एक.
परवाच रेसिपी लिहिताना याची आठवण झाली. आणि परत डाउनलोड ला टाकलाय :)
15 Sep 2010 - 12:45 pm | विंजिनेर
गणपा भौ, टॉरंट आम्हालाबी धाडणेचे करावे.
15 Sep 2010 - 12:58 pm | Nile
एशी हाफिसात, गुबगुबीत खुर्च्यांवर बसुन टोरंटावरुन चोर्या करण्यार्या लोकांना पाहुन गलबलुन आले.
15 Sep 2010 - 1:11 pm | विंजिनेर
'चोर्या' हा शब्द काळजाला भिडला.
बायदवे, उबंटूची iso टोरंटवरून काय खत्तरनाक स्पिडने डाउनलोड होते माहित्ये काय?
15 Sep 2010 - 1:17 pm | Nile
आमाला काय माहीत, आमच्या कडे वरीजनल व्हिस्ता आहे. ;-)
15 Sep 2010 - 12:57 pm | गणेशा
तुम्ही छान वर्णन केले आहे.
आवडला होता हा पिक्चर.
सलिम फेकु मस्त होता.
15 Sep 2010 - 7:01 pm | प्रभो
डालंरा डालंरा डालंरा!!!
15 Sep 2010 - 7:02 pm | विसोबा खेचर
मस्त रे..
'चालता बोलता बाँब' हे शब्द आवडले.. :)
तात्या.
15 Sep 2010 - 8:45 pm | मदनबाण
मस्त परि़क्षण... :)
माझ्याकडे द अग्रेंज आणि हैदराबाद नवाब हे दोन्ही चित्रपट आहेत, पण जास्त द अग्रेंज आवडला.
द अंग्रेज खरच खळखळुन हसवणारा चित्रपट आहे...
सलीम फेकु त्याच्या स्कुटरला ( बजाजच्या) डिस्क ब्रेक आहेत असे म्हणतो तेव्हा तर हसुन हसुन गाल दुखायला लागले होते माझे !!! ;)
पॉयझन बोले तो सेंट को बोलते,मेरे बेडरुम में ७०० किसम की सेंटकी शिशीयां है, मै जब भी दावत मै जाता हू ना एक पुरी सेंट की शिशी डाललेके जाता हूं...:---इति सलिम फेकु. ;)
रिक्षात बसुन पळुन जाताना इस्माईल भाईच्या तंगडीवर वॉचमन सडकवुन दांडुका मारतो तेव्हा इस्माईल भाई जो काही कळवळुन ओरडतो ते पाहण्या सारखेच आहे.;)
जाता जाता :--- माँ की किरकिरी मेरा टाईम खराब चल राहा रे... इति इस्माईल भाई. ;)
16 Sep 2010 - 11:45 am | आनंदयात्री
>>रिक्षात बसुन पळुन जाताना इस्माईल भाईच्या तंगडीवर वॉचमन सडकवुन दांडुका मारतो तेव्हा इस्माईल भाई जो काही कळवळुन ओरडतो ते पाहण्या सारखेच आहे
आणि या बॅग्राउंडला येणारे सलिम फेकुचे वाक्यः(रिक्शावाल्याला उद्देश्युन)
"जरा टेप तो लगाओ उस्ताद !!"
15 Sep 2010 - 10:29 pm | अर्धवटराव
इस्माईल भाई.. वो कोना साफ करो अच्छेसे :)) =))
(नॉन हैद्राबादी) अर्धवटराव
15 Sep 2010 - 10:36 pm | धमाल मुलगा
क्या रे...पच्चीस साल से चारमिनारपे बैठेला हूं...तुमी लोगां मेरेसे पैखाना साफ करवातें? मां की किरकीरी..
=)) =))
आणि मामाच्या वेंट्रीला ब्याकग्राऊंड "म्माम्मा...म्माम्मा...म्माम्मा.." हैट्ट!
15 Sep 2010 - 10:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हो ते "मामा ... मामा ... मामा" बॅकग्राऊंड हाईट आहे. "हैद्राबाद नवाब"मधे "मामा.. रामा ... " नावाचं भीषण तेलुगु गाणंही आहे.
15 Sep 2010 - 10:40 pm | शानबा५१२
हा पीक्चर (?) कधी आला माहीती नाही,पण 'ईस रात की सुबह नही 'ह्या स्व.मिलन पांडेच्या पिक्चरच्यानंतरचा असावा व म्हणुन त्या पिक्चरवरुन चोरला आहे अस म्हणता येईल.पण ते कथानक विनोदी नव्हते.
15 Sep 2010 - 11:19 pm | फारएन्ड
मस्त लिहीले आहे परीक्षण. पूर्वी एकदा हा बघितला तेव्हा पूर्ण डोक्यावरून गेला होता. कदाचित हैद्राबादी संदर्भ माहीत नसल्याने असेल. माझ्या काही मित्रांना एवढा का आवडला ते कळाले नव्हते तेव्हा.
पण आता पुन्हा एकदा बघायला पाहिजे.
15 Sep 2010 - 11:43 pm | अनामिक
मी अजून पाहिला नाही... पण उत्सुकता वाढली आहे... आजच बघतो!
15 Sep 2010 - 11:52 pm | पुष्करिणी
सही , इतकी सुंदर कलाकृती कशी काय राहिली पहायची. परिक्षणाबद्दल धन्स
16 Sep 2010 - 9:36 am | आजानुकर्ण
टिनपाट चित्रपट आहे. बी श्रेणीचे कथानक व त्याच दर्जाचा अभिनय.
16 Sep 2010 - 11:48 am | आनंदयात्री
अर्र तिचायला !! उपक्रमावरचा प्रतिसाद चुकुन इकडे पडला वाटते ;)
हघ्याहेवेसांनलगे.
16 Sep 2010 - 1:40 pm | धमाल मुलगा
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो!!!!!!
आंद्या, लेका स्वाक्षरी टाकायला सुरु कर आता, "येथे सर्व प्रकारच्या विरजणावर चरचरीत फोडणी देऊन मिळेल" =))
16 Sep 2010 - 12:46 pm | बिपिन कार्यकर्ते
इस्माईलभाई आणि गँगचा मी आजन्म चाहता राहिन. परा नेहमीप्रमाणे उत्तम चित्रपट ओळख रे...
16 Sep 2010 - 1:18 pm | सुहास..
हा हा हा ..पुर्ण पिख्चरच झकास हाय !!
16 Sep 2010 - 2:23 pm | Dipankar
जबरदस्त चित्रपट आहे हा
17 Sep 2010 - 3:33 am | घाटावरचे भट
इस्माईल भाई, जहांगीर की पूरी दुकान टूट गई ईस्माईल भाई....
- (सलीम फेकू) भट
17 Sep 2010 - 5:24 am | चतुरंग
क्या समजते रे तुम लोगां अपुनको, दो बार देखा रे, हसहसके पागल बनां देते रे.
फिरसे देखनेकू होना रे मूवी! ;)
(चारमिनारापे)चतुरंग
17 Sep 2010 - 5:43 am | नंदन
लेख, पराभौ. नुस्ता धूमशान पिक्चर आहे, फुल्टू टैम्पास!
17 Sep 2010 - 6:24 am | अविनाशकुलकर्णी
उत्तम चित्रपट परिक्षण .
9 Dec 2011 - 9:09 pm | प्रचेतस
येकदम धमाल चित्रपट. नुकताच खुद्द हैद्राबादेतच मित्राच्या घरी 'द अंग्रेज' पाहिला आणि फिदाच झालो.
इस्माईल भाई आणि त्याची गँग फुल्ल मज्जा आणते. शर्ट, बनियन सारखे सारखे फाटणारा इस्माईल, त्याचा वैतागवाणा चेहरा सलिम फेकूची फेकूगिरी झक्कास. हैद्राबादी बोलीचा लहेजा भारीच.
अंग्रेजांच्या हापिसमध्ये पैखाना साफ करायचा सीन तर एकदम हहपुवा.
हे परीक्षण नजरेतून कसं काय निसटलं होतं कुणास ठावूक. :(