बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.
कधी कधी मात्र मोबाईलच्या अतिरेकाने आपले नुकसान संभवते - हे नुकसान परस्पर संबंधातील गैरसमज आणि त्यातून उद्भवणारे तणाव, मोबाईलच्या अतिवापराने विनाकारण आर्थिक नुकसान आदी प्रकारचे असते, तर कधी केवळ मोबाईल असल्यामुळेच तातडीने संपर्क साधता येतो आणि कोणाचा जीव बचावतो तर कोणाची मालमत्ता संकटातून बाहेर काढता येते.
आपल्या मिपाकरांना या बाबतीत काय अनुभव आहेत? मोबाईल फोन मुळे कधी खूप नुकसान झाले तर कधी अचानक आलेल्या संकटातून बाहेर निघण्यासाठी मोबाईल चा उपयोग झाला का?
मोबाईल फोन संदर्भातले आपले अनुभव, अविस्मरणीय घटना शेअर करा...
--
इंटरनेटप्रेमी,
मुंबई, इंडिया.
प्रतिक्रिया
29 Jul 2010 - 3:39 pm | आगाऊ कार्टा
माझे मोबाईल मुळे नव्हे तर मोबाईलचेच नुकसान झाले आहे.
त्या दिवशी माझा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री पार्टी करुन आम्ही सुमारे ११ वाजताच्या दरम्यान CCD (कॅफे कॉफी डे) मिरामार येथे गेलो.
सगळ्यांनी कॉफी मागवली आणि गप्पा मारत बसलो होतो.
मी लगेच माझा मोबाईल (Nokia 5610 xpress music with 3.2 MP camera) काढून फोटो काढायला सुरुवात केली.
कॉफी आल्यावर मोबाईल टेबलावर ठेवला आणि कॉफी प्यायला सुरुवात केली.
कॉफी पिऊन झाल्यावर आम्ही निघालो आणि आपापल्या रुमवर गेलो.
दुसर्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना लक्षात आले की मोबाईल गायब आहे. मग शोधाशोध सुरु.
CCD मध्ये जाऊन पण आलो पण काही उपयोग झाला नाही.
मित्रांनी पण जाम शिव्या घातल्या.
29 Jul 2010 - 8:06 pm | कार्लोस
काय छान विशय आहे पन मला तर एक दम शाप वाट्टॉ
5 Aug 2010 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते.
सहमत आहे.
मोबाईल सोबत असल्यावर आपण एकटे असलो तरी आपण आपल्या लोकांशी कनेक्टेड आहोत असे वाटत असते. गर्दी गोंगाटात हेडफोन कानाला लावले आणि आपली आवडती गाणी लागली की, सर्व कोलाहलापासून आपण दूर जातो. मनातले विचार मनसोक्त मागे पुढे धावत असतात.
नुकसानीचे म्हणाल तर मी पाहिले आहे की, मोबाईलवर बोलतांना देहभान हरपून बोलत चालणा-यांची गम्मत वाटत असते. आपल्याच नादात रस्त्यावरुन याला त्याला धडकत चालत असतात. एकाच जागेवर चकरा मारत बोलणारे, मोठमोठ्याने बोलणारे, डोळे बंद करुन बोलणारे, मोबाईलवर बोलणा-यांचे निरिक्षण केले की मजा येते. तोंडावर हात ठेवून बोलणारे, एकदा कानाला आणि एकदा तोंडाला मोबाईल लावणारे, दुचाकीवरुन जातांना खांदा आणि कान याच्यात मोबाईल दाबून बोलणारे तर विचारु नका. अपघाताला आमंत्रण देणारे वरीलपैकी एखादा प्रसंग नक्की असू शकतो हे मात्र तितकेच खरे आहे.
आपल्याकडे थ्रीजी सुविधा आल्यावर म्हणे बोलणारा दिसणार आहे, मोबाईलवर वेगाने नेटस्पीड मिळणार आहे, असे काय नी काय ऐकून आहे, त्याची सुविधा मिळाली की अजून काही ना काही घडणार आहे तेव्हा त्याचे स्वागत करण्याची मी तरी वाट पाहात आहे. :)
अवांतर : मोबाईल वर मिळणार्या थ्रीजी सुविधेची माहिती द्या रे कोणीतरी ?
-दिलीप बिरुटे