इमर्जन्सी! -१

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
7 Mar 2010 - 11:10 pm

इमर्जन्सी..

दि. मार्च १, २०१०. सकाळपासून चहाशिवाय चालत नाही या सबबी खाली टमरेल भरून चहा, आणि सोबत बरंच सटरफ़टर खाऊन झालं होतं. वेळ जात नव्हता म्हणून की काय अधे मध्ये (खाण्यातून ) वेळ मिळेल तेव्हा, इमेल चेक करणे, त्यांना उत्तरे देणे, आणि घरातलं काम हे ही करत होते. आदल्या दिवशी होळीरे होळी पुरणाची पोळी असा शंख करत पुरणाच्या पोळ्या हादडल्या होत्याच. पुरणाची पोळी दुसरे दिवशी सुंदर लागते, त्यामुळे ती खायला हवीच, अशी मनाची समजूत घालून भरपेट नाष्टा केल्यावर , दुपारचं जेवणंही तितकंच व्यवस्थित केलं होतं. एकूण काय "पोटाला विश्रांतीची गरज नसते" असा समज करून घेऊन पोटाची व्यवस्थित काळजी घेतली जात होती.
आणि अचानक दुपारनंतर लक्षात आलं, की आपल्याला छातीमध्ये दुखते आहे. छातीमध्ये थोडंसं डाव्याबाजूला सतत दुखते आहे. कशामुळे असेल असा अंदाज बांधायचा प्रयत्न केला.. तर समोर फ़क्त माझ्या पुरणपोळ्याच आल्या. :( गॅसेस!! हम्म!. संध्याकाळपर्यंत हे दुखणं जरा जास्तीच दुणावलं. (कशाला खाव्यात इतक्या पुरणपोळ्या!!) असो. हे जेव्हा असह्य झालं तेव्हा मात्र मी, आमच्या इथल्या हार्टफ़र्ड मेडिकल सेंटरला फोन केला आणि अपॉइंट्मेंट मागितली. पण ७ वाजून गेले असल्याने अपॉइंटमेंट ची वेळ निघून गेली होती. त्या अटेंडंटने काय होतंय असं विचारल्यावर , "आय हॅव अ चेस्ट पेन" असं दाबात उत्तर दिलं मी. घाबरून तिने नर्सला निरोप दिला. आणी थोड्याच वेळात नर्सचा फ़ोन आला. तिने काही लक्षणे फ़ोन वर विचारली. "छातीत डाव्या बाजूला दुखते आहे, ते कोणीतरी छातीवर बसून राहिल्यासारखे दुखते आहे का?" मी,"हो." ती," पाठीमध्येही दुखते आहे का? " मी, "हो". ती," श्वास घ्यायला त्रास होतो आहे का? मी, "नाही." ती,"दीज आर द सिम्पट्म्स ऑफ़ अर्ली हार्ट अ‍ॅटॅक. आणि तू ३० प्लस आहेस ना?" मी (जरा रागातच) "हो." मनातंतल्या मनांत "तुला काय करायचंय माझ्या वयाशी??" ती," तू एकदा तुझा इ सी जी करून घे. आजच्या आज इमर्जन्सी ला जाऊन सगळे चेकप करून घे." झालं!! माझं धाबं दणाणलं. मला हार्ट अ‍ॅटॅक!! माझ्या मुलाचं काय होईल?? माझ्या नवर्‍याचं काय होईल??

आता इ सी जी करायला इमर्जन्सी मध्ये जायचं म्हणजे काय होइल काही सांगता नाही येत. म्हणून अतिशय जड अंत:करणाने मुलाला, नवर्‍याला जेवायला वाढलं. मनात म्हंटलं,"खाउन घ्या आज भरपूर, उद्यापासून माझ्याहातचं खायला मिळेल कि नाही माहिती नाही." डोळे भरून आले माझे. नवरा म्हणाला "तू ही जेवून घे." पुन्हा मनांत म्हंटलं,"हो रे.. आता पुन्हा तुम्हा दोघांबरोबर जेवायला मिळेल की नाही माहिती नाही." आणि डोळे टिपत जेवायला बसले. माझ्या डोळ्यांत पाणी बघून नवरा म्हणाला ,"खूप दुखते आहे का? थांबेल , तू जेवून घे." त्याला बिचार्‍याला काय माहिती माझ्या डोळ्यांत पाणी कशामुळे आले ते!!

जेवणं आटोपली आणि आम्ही एमर्जन्सीला जायला निघालो. मुलाला मैत्रीणीकडे ठेवूया असा विचार आला मनांत, पण नको!! राहुदे, तो माझ्या नजरेसमोर असलेला बरा. काय माहिती मी आलेच नाही हॉस्पिटलमधून घरी तर!!... मी माझ्या पर्स मध्ये मला लागणार्‍या वस्तू घेतल्या. इन्शुरन्सच कार्ड घेतलं. पाण्याची बाटली घेतली (शेवटच्या वेळी उपयोगी पडेल कदाचित!! जाता जाता हॉस्पिटलचं पाणी नको तोंडात पडायला). शेवटी कपडे भरायला लागले तेव्हा मात्र नवर्‍याचे पेशंस संपले. त्याचा चेहरा बघून मी कपडे भरायचा विचार रद्द केला. इमर्जन्सी ला गेलो. तिथे गेल्या गेल्या मला जाणवलं आपला डावा हातही दुखतो आहे... म्हणजे हे नक्कीच हार्ट अ‍ॅटॅकचे लक्षण आहे. तिथे प्रायमरी चेकप मध्ये माझं बीपी पाहिलं गेलं आणि नाव नोंदवून घेऊन आम्हाला वेटिंग रूम मध्ये बसवलं. वाटलं, साधारण अर्ध्या तासात आत घेऊन जातील. घड्याळात पाहिलं ८.३० वाजले होते रात्रीचे. आमच्या सारखेच तातडीची सेवा हवे असलेले खूप लोक त्या वेटिंग रूम मध्ये होते.

समोर टिव्हीवर एकापाठोपाठ एक विनोदी मालिका सुरू होत्या. एक बाई व्हिलचेअर बसून पोट धरून कण्ह्त होती. हम्म.. अपचन झालं असणार हिला. एक सधारण २४-२५ वर्षाची मुलगी तिच्या तान्ह्या मुलीला घेऊन आली होती. तिच्यासोबत साधारण एक ४५ वर्षाची बाई होती , तिची आई असावी. नक्की कोणासाठी आले असावेत? मी विचार करत होते.. कारण त्या तिघिंपैकी कोणीही आजारी दिसत नव्हतं. आणि मग बघता बघता ४-५ बायका आलटून पालटून त्या तिघिंना तिथे येऊन भेटून गेल्या.. नक्की काय चालं होतं कहीच कळलं नाही. पण प्रत्येकीच्या अतिप्रचंड घेरामुळे जागा व्यापली गेली तिथली आणि अचानक फ़ारच गर्दि झाल्यासारखे वाटू लागले. असेच आजूबाजूचे निरिक्षण करण्यात तास भर निघून गेला. आता छातीतले दुखणे वाढू लागले आहे असे जाणवले. पाठितही ठणका वाढला. मी रिसेप्शन ला जाऊन विचारले ती म्हणाली "तुझ्या आधी अजून ३ नंबर आहेत.. मग तुला आत बोलावतील." अरेच्च्या!! मला इथे हार्ट अ‍ॅटॅक होऊ घातलाय आणि ही मला माझ्या आधी ३ नंबर आहेत असे सांगते आहे!! रागच आला. पण काहीही न बोलता पुन्हा जागेवर येऊन बसले. दरम्यान नवर्‍याच्या मांडिवर लेक झोपी गेला. पुन्हा आजूबाजूचे परिक्षण निरिक्षण करण्यात दिड तास निघून गेला. मनांत आलं, "आता इथे बसल्या बसल्या मला हार्ट अ‍ॅटॅक येईल मग कळेल या इथल्या रिसेप्शनवालीला.." शेवटी रात्री १२ वाजता मला आत बोलावले. आणि अतिशय जड आंत:करणाने आजूबाजूच्या लोकांकडे मी पाहून घेतलं. लेकाच्या डोक्यावरून मायेने हत फ़िरवला.. त्याला जवळ घेतलं आणि नवर्‍याकडे असहाय्य पण दु:खी मनाने पाहिलं. तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो.

क्रमश:

(वरील 'छातीत दुखणे आणि इमर्जन्सीला जाणे' ही घटना जरी सत्य असली तरी बाकी माझा कल्पना विस्तार आहे. )

कथाविनोदप्रकटनलेखअनुभवआस्वाद

प्रतिक्रिया

नरेंद्र गोळे's picture

7 Mar 2010 - 11:37 pm | नरेंद्र गोळे

प्राजू, कल्पना विस्तार ठीक आहे पण

इ इ जी की इ सी जी?

हृदयाचे दुखणे असेल तर इ सी जी असायला हवा!

आपले http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही स्वागतच आहे.

प्राजु's picture

8 Mar 2010 - 12:00 am | प्राजु

दुरूस्ती केली आहे , काका. धन्यवाद. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

विसोबा खेचर's picture

7 Mar 2010 - 11:43 pm | विसोबा खेचर

हम्म! वाचतो आहे..

रोज दोन पेग प्या.. हार्टकरता एकदम चांगलं!

(सर्व खाऊनपिऊन ठणठणीत हृदयाचा) तात्या.

शुचि's picture

7 Mar 2010 - 11:55 pm | शुचि

मस्त रंगवलय प्राजु.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

प्रियाली's picture

8 Mar 2010 - 1:43 am | प्रियाली

पुढे लिहा लवकर नाहीतर माझ्या छातीत दुखायला लागेल.

मीनल's picture

8 Mar 2010 - 2:55 am | मीनल

आला का?
अग, डॉक्टर नाही .तो हार्टमधे अ‍ॅटॅक ????????
मीनल.

चतुरंग's picture

8 Mar 2010 - 3:03 am | चतुरंग

'इमर्जन्सी केअर' ह्या पाटीची थट्टा अमेरिकेइतकी कुठे होते की नाही कल्पना नाही. जास्त पैसे घेऊन सगळ्यात उशिरा सर्विस मिळते. हा माझ्यासकट माझ्या माहितीतले जे जे लोक इमर्जन्सीला जाऊन आलेत त्या सगळ्यांचा १००% अनुभव आहे.
तिथे बसून बसून माणूस कंटाळून किंवा आपोआपच नैसर्गिकरीत्याच बरा होऊन जाईल पण सर्विस मिळणे अवघड! ;)
असो पुढे वाचायला उत्सुक आहे! :)

चतुरंग

चित्रा's picture

8 Mar 2010 - 3:35 am | चित्रा

हे असले कसले हे कल्पनारंजन?

बाकी आपल्या चित्रपटांमध्ये रूग्णाला खाटेवर घालून ती खाट पळवत ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असल्याचे बघण्याची इतकी सवय झालेली असते की त्यामुळे इमर्जन्सी रूममध्ये वेळ लागला की, हे काय भलतेच, असे वाटते. प्रत्यक्षात डॉक्टरांची इमर्जन्सीकडे पाहण्याची पद्धत वेगवेगळी असावी असे वाटते. इमर्जन्सी दोन प्रकारच्या असाव्यात - एक अगदी गंभीर, आणि दुसर्‍या ज्यांना दोनतीन तास उशीर चालू शकतो अशा. आम्हाला वेगवेगळ्या कारणांसाठी तीनदा इमर्जन्सी रूममध्ये जाण्याची वेळ आली होती - तीनही वेळा विविध अनुभव आले. ते परत कधीतरी.

धनंजय's picture

10 Mar 2010 - 1:48 am | धनंजय

इमर्जन्सी विभागात गेल्या-गेल्या "हा मिनिटा-मिनिटाचा जीवनमरणाचा प्रश्न आहे का?" अशा प्रकारचा ढोबळ कयास पटकन केला जातो.

ज्या परिस्थितीत मिनिटांची किंमत फार असते, त्यांचा इलाज धावत-पलत होतो. (रक्तस्राव, बेशुद्ध करणारा हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायूचा झटका... येथे इलाजाची सुरुवात व्हायला तासापेक्षा कमी विलंब लागावा.)

या नीरक्षीरविवेकाला "ट्रियाज" म्हणतात.

ज्या रुग्णांचा जीवनमरणाचा प्रश्न पुढच्या काही तासांमध्ये नाही, त्यांचे हळूहळू काम होते.

इमर्जन्सी विभागात कर्मचारी मोठ्या प्रमाणात टंगळमंगळ करत नाहीत. (आळस हे विलंबाचे प्रमुख कारण नसते.) खरोखर तातडीच्या रुग्णांकडे लक्ष देता-देता कमी तातडीच्या रुग्णांकडे विलंब करणे आवश्यक होते. सर्वांनाच तातडीची सेवा देण्याइतपत कर्मचारी/विभाग बसवणे आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य नसते.

यू.एसमधल्या मोठ्या इस्पितळांच्या इमर्जन्सी विभागांत तातडी नसलेल्या लोकांची इतकी रेलचेल का असते? त्याचे एक कारण असेही : इमर्जन्सी विभागात विमा असला-नसला तरी भरती करून घ्यावे लागते, चाचणी+प्राथमिक इलाज करावा लागतो, असा कायदा आहे. ज्यांना डॉक्टराकडे जायला परवडत नाही, त्यांना इलजासाठी हे एक ठिकाण उपलब्ध असते.
अन्य कारणेसुद्धा असतील.

jaypal's picture

8 Mar 2010 - 10:17 am | jaypal

रंगाशेठ हे भारीच
तिथे बसून बसून माणूस कंटाळून किंवा आपोआपच नैसर्गिकरीत्याच बरा होऊन जाईल पण...........

प्राजुजी कवितां इतकाच लेख पण आवडला

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात

रेवती's picture

8 Mar 2010 - 4:43 am | रेवती

आता यात कसला क्रमश:?
सांग कि पटापट!
तरीच मला काल वाटलं कि हिचा फोन नाही बर्‍याच दिवसात्.....आजारी पडलिये काय!:(

रेवती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2010 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता यात कसला क्रमश:?
सांग कि पटापट!

नै तर काय...!

हे असे छातीत कळेबिळेचे वाचले की मलाही डाव्या बाजूला चमका निघाल्याचा भास व्हायला लागतो.
आणि लक्षणं तशीच तर नाही ना, अशी शंका यायला लागते. :(

-दिलीप बिरुटे
[डरफोक]

कुठेतरी वाचल्याचे आठवतय.. बहुतेक ढकलपत्र असावं, पण ऊपाय छान होता..
अश्या वेळी "विठ्ठल" हा शब्द जोर-जोरात जमले तर ऊड्या मारत म्हणावा.. ५-१० मिनिटात वायु सरुन मोकळे होतात म्हणे.. च्कटफु आहे, प्रयत्न करुन बघायला हरकत नाही !! ही कसली तरी उपचार पध्दती आहे, स्वर आणि व्यंजन यांच्या ऊच्चारावरुन असे प्रकार बंद होऊ शकतात.

अवांतर :- अमेरीकेत ईनो मिळत नाही का??

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

ज्ञानेश...'s picture

10 Mar 2010 - 12:48 pm | ज्ञानेश...

गॅसेसमुळे असेल, किंवा आणखी कशामुळे, पण छातीत/पोटात दुखत असतांना उड्या मारणे हा अघोरी प्रकार आहे. कोणीही असे काही करू नका..!

अर्थात, विठ्ठलाच्या दर्शनाची भलतीच आस लागली असेल, तर हरकत नाही.

अरुंधती's picture

8 Mar 2010 - 10:09 am | अरुंधती

प्राजु,
खदखदून हसले तुझी इमर्जन्सी वाचताना.... आता पुढचा भाग पण येऊ देत पटकन!

:-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

भानस's picture

10 Mar 2010 - 10:13 am | भानस

अग काय गं... बरी आहेस ना? आता ही रचित कथा म्हणावी का खरेच् घडलेय? अग आजकाल तू दिसलीही नाहीस तिकडे.... बाकी इमर्जन्सीचे वर्णन मात्र १००% बरोबर.... ताटकळत बसून अर्ध्यांचे दुखणेच पळ काढतेय की..... लवकर उलगडा करा..... उगा पल्स काहून वाढवून राहिले वो बाय....

मंगेशपावसकर's picture

11 Mar 2010 - 10:23 am | मंगेशपावसकर

या पुढे तुम्हाला ताईच हाक मारेन