चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
13 Oct 2025 - 11:11 am

नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.

आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही.

१. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी )

२. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५

३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!

संस्कृतीधर्मविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

11 Nov 2025 - 12:56 pm | सुबोध खरे

हायला

स्फोटात मेलेले जीव हे किड्यामुंग्यांचे गेले

किड्यामुंगीचे जीव कुणी घेतले हे कशाला शोधून काढायचे?

त्यांचा जीव कोणी घेतला हे शोधून कडेने महत्वाचे आहे.

हायला

घोडा बोलो या चतुर बोलो

आग्या१९९०'s picture

11 Nov 2025 - 4:48 pm | आग्या१९९०

उपरोध कळत नसल्याने तुम्हाला शहाणपणाचा अर्धा गुण दिला हे विसरले वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Nov 2025 - 1:00 pm | अमरेंद्र बाहुबली

३५ -४० हजार करोड खर्च करूनही काश्मीरात हल्ले करून अतिरेकी पळून जातात, तर हे दिल्लीतल्या स्फोटातले आरोपी काय डोंबल पकडणार? सुशिक्षित आणी देशप्रेमी लोक सत्तेत येत नाही तोपर्यंत देशाची अशीच वाट लागणार.

सुबोध खरे's picture

11 Nov 2025 - 8:05 pm | सुबोध खरे

३५ -४० हजार करोड खर्च करूनही काश्मीरात हल्ले करून अतिरेकी पळून जातात

तुम्ही या कि RAW किंवा IB किंवा आर्मी मध्ये

दहशतवादी एकदम पळून जातील येमेन मध्ये

हा का ना का

स्वधर्म's picture

11 Nov 2025 - 4:28 pm | स्वधर्म

>> या वेळेस गुप्तचर संस्थेच्या पाठीशी उभे राहायचे कि केवळ जिकडे तिकडे टीका करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे?

अगदी बरोबर. पण 'फक्त त्यावेळी काँग्रेसचे किंवा भाजपाविरोधी सरकार असेल तर एकदम अंगावर जायचे, नाकर्ते म्हणून हिणवायचे' हे लिहायचे राहिले तुमचे.

रामचंद्र's picture

11 Nov 2025 - 5:54 pm | रामचंद्र

पाकिस्तानला अद्दल घडवून सहा महिनेसुद्धा झाले नाहीत तोच असा प्रकार होत असेल तर ही पाकिस्तानची धमक म्हणायची की आपल्या सरकारचा नाकर्तेपणा?

रात्रीचे चांदणे's picture

11 Nov 2025 - 7:14 pm | रात्रीचे चांदणे

पाकिस्तानला काश्मीर दिलं तरी ते सुधारणार नाहीत. फार फार तर आपण असले हल्ले कमी करू शकतो. पूर्ण पणे थांबवने शक्य नाही. कारण आपलेच लोकं त्यांना मदत करायला तयार आहेत.

Trump च्या कामगिरीमुळे सर्वच देश ( रशिया सोडून) सुरक्षित हातों में हैं

आग्या१९९०'s picture

11 Nov 2025 - 8:18 am | आग्या१९९०

मिपा हॉटेलमध्ये आलेल्यांची रोज होणारी मोजणी थांबली का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2025 - 11:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या सात आहेत माहितीस्तव.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

11 Nov 2025 - 10:36 am | सुबोध खरे

आता ७ लोक आहेत

सुबोध खरे's picture

11 Nov 2025 - 11:19 am | सुबोध खरे

मास्तर

दोन आकडी सुद्धा संख्या का नाही? याचा विचार करा.

आग्या१९९०'s picture

11 Nov 2025 - 12:54 pm | आग्या१९९०

मिपावर आत्ता तुम्ही धरून १० हजर आहेत. दोन आकडी संख्या गाठली हो!

सुबोध खरे's picture

11 Nov 2025 - 12:56 pm | सुबोध खरे

नाही ९ च आहेत

सुबोध खरे's picture

11 Nov 2025 - 12:57 pm | सुबोध खरे

बोलवा तुमच्या कंपूतल्या दोन चार फुरोगाम्यांना

आणि करून टाका दोन आकडी

हा का ना का

आग्या१९९०'s picture

11 Nov 2025 - 2:12 pm | आग्या१९९०

बरोबर ९ होते, परंतु तुमच्या कंपूतील एकजण होता, दोघांचे अधिकचे अर्धे अर्धे एकत्र करून १० केले. मनाचा मोठेपणा दाखवावा लागतो.

सुबोध खरे's picture

11 Nov 2025 - 8:07 pm | सुबोध खरे

सध्या 7 सदस्य हजर आहेत.

सुबोध खरे's picture

11 Nov 2025 - 8:14 pm | सुबोध खरे

बरोबर ९ होते, परंतु तुमच्या कंपूतील एकजण होता

बरोबर

तुमच्या कंपूतील ९ जणामुळेच सगळे सुज्ञ लोक मिपा वर येईनासे झाले.

माझ्यासारखा एखादा ज्याला अफाट संयम आहे तोच जुन्या प्रेमामुळे येत राहतो

अन्यथा जुने मिपाकर भेटले तर तीच कहाणी सांगतात कि कंपूबाजी मुळे आता मिपावर यावेसे वाटत नाही.

सुबोध खरे's picture

11 Nov 2025 - 8:15 pm | सुबोध खरे

य झ कुठेतरी बोंबलत हिंडत आहे,

या शेमण्याला लाज लज्जा नाही

काय पण भाषा आहे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2025 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>माझ्यासारखा एखादा ज्याला अफाट ज्ञान आहे तोच जुन्या प्रेमामुळे येत राहतो

गडबडीत असे वाचले. बाय द वे, आपल्या या अफाट ज्ञानामुळे सगळे मिपाकर स्वर्गातच जातील काही वाद नाही. धन्यवाद. =))

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

13 Nov 2025 - 9:28 am | सुबोध खरे

हायला

बिरुटे मास्तर

तुमच्याकडे निवडणूक लावल्या काय?

नाही म्हणजे मास्तर गडबडीत गोंधळ घालतोय म्हणून विचारलं.

नाही तर मास्तर साधारणपणे निवांत असतात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2025 - 11:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मतदान कौल

बिहारींचा मतदान कौल कोणाला ?

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

12 Nov 2025 - 12:29 pm | धर्मराजमुटके

बिहारींचा मतदान कौल कोणाला ?
अंधभक्त आणी मंदभक्त मतदान करणार म्हणजे शेवटी बिहारींचा कौल गोबरयुगालाच :)

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Nov 2025 - 1:53 pm | अमरेंद्र बाहुबली

भाजप आणी नीतीशच्या जंगलराज म्हणून बिहारची मुक्तता झाली तर ते बिहारसाठी चांगलेच झाले म्हणावे लागेल, अर्थात चुना आयोगाने प्रामाणिकपणे काम केल असेल तरच! नाहीतर पुन्हा भाजपचे गंभीर जंगलराज सुरू होईल.

अर्थात चुना आयोगाने प्रामाणिकपणे काम केल असेल तरच! नाहीतर पुन्हा भाजपचे गंभीर जंगलराज सुरू होईल.
आताच असं नक्की काय घडलं असावं की चुनाव आयोग प्रामाणीकपणे काम करील असे तुम्हाला वाटते ?
एवढे मतदान वाढले म्हटल्यावर नक्कीच वोटचोरी झाली असणार. राहूल गांधींच्या 'द बि फाईल्स' मधे याचा खुलासा होईलच म्हणा.

...भाजपचे गंभीर जंगलराज सुरू होईल....

भाजपचे गंभीर बुलडोझर राज म्हणायचे आहे का?

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Nov 2025 - 7:11 pm | अमरेंद्र बाहुबली

गोबरयुग

कंजूस's picture

12 Nov 2025 - 2:49 pm | कंजूस

१.हिंदुस्तान टाइम्स बातमीनुसार दोन तीन पोलपंडितांनी कॉ. आरजेडीला सत्ता मिळेल लिहिलं आहे. लिंक (https://www.hindustantimes.com/india-news/bihar-exit-poll-2025-live-upda...)

२.महिला मतदार वाढल्या की भाजप येणार हे सांगितले जाते.

नावातकायआहे's picture

12 Nov 2025 - 6:33 pm | नावातकायआहे

घोडा मैदान जवळ आहे. "बालदिनी" मतमोजणी होइलच! थोडी कळ काढा!...

शाम भागवत's picture

12 Nov 2025 - 7:26 pm | शाम भागवत

मला वाटते महाआघाडीला जास्त सिटस् दाखवताहेत. दुसऱ्या टप्यात आणखीन वाढलेल्या मतदानामुळे महाआघाडी विरोधातला कल जास्त स्पष्ट झालाय. त्यामुळे मविआला पन्नासपेक्षा जास्त जागा मिळणं अवघड वाटतंय.

चंद्रसूर्यकुमार's picture

12 Nov 2025 - 10:14 pm | चंद्रसूर्यकुमार

SIR मुळे मतदारयादीत बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा आकडा कमी झाला असेल तर बिहारमधील महाभकास आघाडीचे नक्कीच नुकसान होईल. परवा बालदिनाच्या दिवशी काय ते समजेलच :)

मतदारयादीत बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा आकडा....?

ते अगोदर भारतीय नागरिकत्व धरून होते? ते बांगलादेशी किंवा रोहिंगे होते हे कसे कळले? म्हणजे इकडे विहारात नसतील तर दुसरीकडे असतीलच. SIR चौकशीत प्रत्येकाचे जन्म प्रमाणपत्र तपासले का? ते नसतानाही भारतीय नागरिक कसे झाले? एकूण गडबडगुंडा आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Nov 2025 - 11:22 am | चंद्रसूर्यकुमार

अंदाज व्यक्त केला होता तसेच होताना दिसत आहे. जर काँग्रेस आणि मित्रपक्षांना आतापर्यंत जितक्या जागा मिळत होत्या त्यात या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या मतांचा वाटा मोठा असेल तर मग एस.आय.आर मधून त्यांची नावे वगळली जात असतील तर ते आणि त्यांचे डापु गँगमधील चमचे पिसाळणे अगदी क्रमप्राप्त आहे. नेहमीचे यशस्वी कलाकार जर एखाद्या गोष्टीवर टीका करत असतील तर ती गोष्ट देशाच्या हिताची असते यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवावा.

आता बंगालमध्येही एस.आय.आर सुरू झाला आहे. तिकडे तर बांगलादेशी अगदी भरभरून पडले आहेत. मे महिन्यात होणार्‍या निवडणुकांमध्ये कलानगरच्या पेंग्विनला ज्या ममतादिदीचे कौतुक असते तिचा धुव्वा उडावा ही सदिच्छा. अर्थात बंगाली समाज जास्त शिकलेला आहे आणि असल्या जास्त शिकलेल्या लोकांना समोर दिसत असलेल्या गोष्टी बघायच्या नसतात. अन्यथा इतकी दशके कम्युनिस्ट आणि गेली १५ वर्षे ममता तिथून निवडून येत राहिली नसती.

असो... बघू काय होते ते.

सुबोध खरे's picture

14 Nov 2025 - 11:37 am | सुबोध खरे

साडे अकरा वाजून गेले.

मत चोरी, इ व्ही एम हॅकिंग, पैशाची ताकद. मतदारांना धमकावणे, इडी चा धाक आणि इन्कम टॅक्स ची दहशत या बद्दल फुरोगामी रडारड करण्याची वेळ झाली .

सुबोध खरे's picture

14 Nov 2025 - 11:39 am | सुबोध खरे

मतदारांची दिशाभूल करणे , १० हजारांची खिरापत, निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा राहिला कि !

सुबोध खरे's picture

14 Nov 2025 - 11:45 am | सुबोध खरे

त्या चार अनारक्षित गाड्यातून आलेल्या ६ हजार मतदारांमुळेच बिहार चा निकाल असा उलटा पालटा झालाय.

परत निवडणुका घ्यायला हव्यात

आणि आता त्याच गाड्या परत उलट्या आनंद विहार टर्मिनल ला न्यायला हव्यात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2025 - 9:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिहारचं मुख्यमंत्री कोण ? काही ठरलं का ?

-दिलीप बिरुटे
(व्यग्र)

आग्या१९९०'s picture

19 Nov 2025 - 11:39 pm | आग्या१९९०

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून गोदी मिडियाला प्रेमपत्र देण्यात आले.

स्वधर्म's picture

20 Nov 2025 - 9:13 pm | स्वधर्म

जेष्ठ विचारवंत, जातीअंताच्या चळवळीतले जेष्ठ कार्यकर्ते, लेखक आनंद करंदीकर गेले... मंगळवारी दि १८ नोव्हेंबर २०२५ ला एका कार्यक्रमात सहभागी असतानाच त्यांना त्रास होऊ लागला व त्यातच त्यांचे निधन झाले.

मागच्या आठवड्यात त्यांचा लेख प्रसिध्द झाला होता:
आरक्षण म्हणजे गुणवत्तेशी संघर्ष नव्हे दोन तीन दिवसांपऊर्वी त्यांना संदेशही पाठवला होता. त्याचे उत्तर शक्यतो मिळत असे, पण त्याआधीच ही बातमी आली. खूप विद्वान, आय आय टी, आय आय एम चे विद्यार्थी, पी एच डी धारक असूनही सामाजिक चवळीत झोकून देऊन अगदी साधे आयुष्य जगणारे प्रेरणादायक व्यक्तीमत्व होते.
विचारवेध या यू ट्यूब चॅनलवर त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत.

अभ्या..'s picture

20 Nov 2025 - 9:31 pm | अभ्या..

अर्रर्रर्र
अस्सल चळवळीतला माणूस. उदगीरला त्यांनी काम केलेले. बातमी वाचून वाईट वाटले.
ज्ञानपीठ विजेत्या बापाचे विंदांचे नाव कधीही त्यांनी वापरले नाही.
बातमीत त्यांच्या सहचरी सरिता आव्हाड असे नाव आहे. म्हणजे "हमरस्ता नाकारताना" च्या लेखिका सरिता आव्हाड ना? लेखिका सुमती देवस्थळी ह्यांच्या कन्या?

स्वधर्म's picture

21 Nov 2025 - 4:34 pm | स्वधर्म

>> ज्ञानपीठ विजेत्या बापाचे विंदांचे नाव कधीही त्यांनी वापरले नाही.
आजकाल असे मुलगे व असे बापही दुर्मिळच. विंदांनी षड्दर्शने लिहिले आणि आनंद यांनी भगवतगीतेचा सामाजिक आशय असा एक प्रदीर्घ लेख लिहिला होता. गुळमुळीत भूमिका न घेता थेट आणि भेदक लिहायचे.

सरिता आव्हाड यांच्याबद्दल मला माहिती नव्हती. त्यांचे पुस्तक नक्की वाचणार. त्यांना भेटण्याचाही प्रयत्न करेन.

सर्वांना घेऊन जाण्याच्या राजकारणाची अल्टीमेट व्हर्शन सोलापूर जिल्ह्यात.
आजोबा बाबूराव पाटील अनगरकर (काँग्रेसी आमदार. ज्यांच्यावर दरोडेखोरीपासून सगळे आरोप गेली ५० वर्षे तेंव्हाचे विरोधक करत होते)
पिता राजन बाबूराव पाटील (आधी काँग्रेस मग राष्ट्रवादी, आमदार अधिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत साम्राज्य)
ज्येष्ठ पुत्र बाळराजे पाटील (आधी एका खुनात फरारी, नंतर सुटका मग राष्ट्रवादी, आता अर्थातच भाजपा. अनगर गावात एकछत्री दहशत)
कनिष्ठ पुत्र अजिंन्क्यराणा पाटील (पंचायत समिती, आधी राष्ट्रवादी, आता अर्थातच भाजपा. अनगर गावात एकछत्री दहशत)
कनिष्ठ स्नुषा प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील बिनविरोध अध्यक्ष नगर पंचायत अनगर (अर्थातच भाजपा)
.
दोन विरोधी उमेदवार, एक अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे त्यांचा अर्ज बाद ठरला, दुसर्‍या पाटील गटाच्याच अपक्ष त्यांनी अर्ज मागे घेतला. निवडणूक बिनविरोध.
.
जल्लोष सभेत मोठे दीर भाजपाचे लेटेस्ट नेते बाळराजे उपमुख्यमंत्र्याला उद्देषून बोट दाखवत गरजले " अजित पवार, आमचा नाद करायचा नाही"
.
एकच णंबर.

आधार कार्ड हा जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारणे बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारने घेतला आहे. बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे रोखण्यासाठी आणि बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे आधार कार्डावर आधारित तयार केलेली सर्व विलंबित जन्म प्रमाणपत्रे रद्द केली जातील आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

मग आधार कार्ड वर जी जन्मतारखेची नोंद येते ती कुठून येते ? की आपण काहीही सांगीतली तर ती ग्राह्य धरली जाते ? आधार कार्ड देताना जर जन्मतारखेच्या पुराव्याची शहानिशा केली असेल तर आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून का ग्राह्य धरला जाऊ शकत नाही ?

अवांतर : दोन वेगवेगळ्या जन्मतारखेची आधार कार्डे असणारे महाभाग देखील बघण्यात आहेत.

कंजूस's picture

28 Nov 2025 - 5:54 pm | कंजूस

आधार आणि जन्मतारीख...

१९६० त्या अगोदरचा जन्म असेल तर बहुतेकांचे शाळेत नाव घालताना सांगितलेली तारीख लिहून शाळा सोडल्याचा दाखल्यावर नोंद झालेली आहे म्हणता येईल. काहींचे जन्म घरीच झालेले होते. अगदी अचूक तारीख नसली तरी बालकांचं वय फार लपून राहात नाही.
पण पुढे जन्म मृत्यूची नोंद करण्याचं काम जरा बऱ्यापैकी व्यवस्थित होऊ लागलं असावं. जुन्या लोकांचं सोडल्यास १९८० नंतरचे आधार गावातल्या पंचायत/तालुका रुग्णालयांतील जन्म नोंदीवरूनच असतील.

चामुंडराय's picture

28 Nov 2025 - 9:51 pm | चामुंडराय

बरेच वेळा १ जूनला शॉप फ्लोअर वरची मंडळी गठ्ठ्याने निवृत्त व्हायची.
सुरवातीला कळायचे नाही एव्हढ्या सगळ्यांचे वाढदिवस एकाच दिवशी कसे?
पुढे हे गुपित उलगडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Dec 2025 - 11:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राज्यातील नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक असतानाच राज्यभरातील काही नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिराने जाहीर केला. निवडणूक आयोगाचा गोंधळ काही संपत नाही. नगर पंचायत आणि नगर परिषदांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात संबंधित उमेदवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर न झालेल्या ठिकाणील निवडणूका पुढे ढकलून नव्या तारखा पुन्हा निवडणूकीसाठी देण्यात आल्या. नव्या निवडणूका म्हणजे निवडणू़क निर्णय अधिका-यांनी फेटाळलेल्या अर्जांना नव्याने संधी असा प्रकार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम न राहणे, घेतलेला निर्णयात बदल करणे, मा.न्यायालयाच्या निकालाचा अर्थ लावण्यास विलंब करणे, चुकीचे निर्णय घेणे त्यामुळे नगर पंचायती आणि नगर परिषदांमधील निवडणूकासुद्धा नीट घेता येत नाही, अ़जून काय ते दुर्दैवं.

दुसरा मुद्दा, मा. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादाभंग झालेल्या ठिकाणचा निकाल अंतिम निकालाधीन राहील असे मा. न्यायालयाने म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही, हा खूप चांगला निर्णय आहे, असे म्हणता येत नाही. आता निवडणुका घ्या परंतु जेथे आरक्षण मर्यादा 50 टक्के पेक्षा जास्त असेल तेथील निवडणूक निर्णय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन ( subject to decision of the court) राहील. असे म्हणण्यातून मा. सर्वोच्च न्यायालयाने आपली जवाबदारी पार पाडली नाही, असे वाटायला लागते. घटनेतील कलम 329 (b) नुसार निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यावर त्यात हस्तक्षेप करण्याचे हक्क न्यायालयाला नाहीत व केवळ निवडणूक झाल्यावरच त्या निवडणुकीला आव्हान देण्यात येऊ शकते. कुणीही काहीही कारणांनी निवडणूक प्रक्रिया थांबवू नये यासाठी ही प्रक्रियावादी तरतूद आहे. पण संविधानिक उद्देश सांगणारी महत्वाची तरतूद कलम 324 मध्ये आहे की निवडणूक पारदर्शक व मोकळ्या वातावरणात प्रामाणिकपणे झाल्या पाहिजे.

आपण आता अशा नियमबाह्य किंवा चालढकल करणा-या गोष्टी येऊ नये यासाठी पाऊले संसदीय मार्गाने किंवा मा. न्यायालयानेच आपल्या अशा निर्णयावर तोडगा काढणे आवश्यक आहे, असे वाटते. संविधानिक उद्देशांसाठी आणि कायद्यानुसार निर्णय होणे आवश्यकच आहे, अशावेळी कायमच संयम किंवा प्रक्रियावादी कामकाज प्रत्येकवेळी संविधानिक उद्देश बाजूला करणारे नसावे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणे ही लोकशाहीची गरज आहेच, पण कशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया रेटायचीच हे अजिबातच बरोबर नाही, असे वाटले

ऑक्टोबर- नोव्हेंबरचा चालू घडामोडीचा धागा आपण सर्वांनी जीव लावून सांभाळला सर्वांचे आभार...!

-दिलीप बिरुटे

धाग्याचे अध्यक्षच तुम्ही तर काय चांगलाच चालणार.

तर काय दोन निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने भांडाभांडी जोरात सुरू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही मध्ये पडले.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Dec 2025 - 12:14 pm | अमरेंद्र बाहुबली

बिहार इलेक्शन फ्रॉड
https://youtu.be/LLflV4c-RP0