हिंदी, काका कालेलकर आणि ३ वर्षे

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
6 Jul 2025 - 11:26 am

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर मराठी-हिंदी वाद रंगवत खळ-खट्याक नाट्य चालु असल्याचे बातम्यांच्या हेडलाईन्स मधून दिसते. त्या बातम्या असोत का मिपावरील संबंधीत धागा असो मी उघडण्याचे कष्ट यावेळी अद्याप तरी घेतले नाहीत. चार सहा नगरसेवकांना निवडून आणण्या पलिकडे अशा चहाच्या पेल्यातल्या वादळा पलिकडे मराठी लोकांमध्ये गांभीर्य किती आणि तोंड देखले पणा किती ह्या बद्दल कमी बोलावे तेवढेच बरे. असो.

असो माझं टोपणनाव माहितगार, योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध करण्याचा प्रयास करावा हे माझे काम.

भारतातील भाषिक धोरण चर्चेत प्रत्येक भारतीयास माहित असावेच असे पण मराठी लोकांनाही एक महत्वाची नेमकी कल्पना नसलेले एक महत्वाचे नाव. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील बेलगुंडी-सावंतवाडीचे काका कालेलकर उर्फ दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर (१८८५-१९८२). इसवी सन १९३५ नंतर, भारतातील गैर हिंदी राज्यात हिंदी भाषा संदर्भाने सहमती बनवण्याची महत्वाची जबाबदारी महात्मा गांधींनी काका कालेलकरांवर टाकली होती. त्यांनी त्यांची सहमती बनवण्याच्या काळात स्थलांतरीतांनी दुसर्‍या भाषिक प्रदेशात स्थलांतरीत होऊन स्थायिक होताना सर्वसाधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी असे म्हटले होते. तोच काळ राजकीय स्वातंत्र्य विषयक घडामोडींचा होता त्यामुळे असेल कदाचित त्यांची हि सुचवणी भारतीयांच्या विस्मृतीत गेली असेल या सुचवणीला कुणि गांभीर्याने घेतले नाही. हा दोष हिंदी लोकांचा की अ-हिंदी लोकांचा?

संबंधित काळात लिहिलेल्या काका कालेलकरांनी लिहिलेल्या निबंधाचे पुस्तक मुखपृष्ठ अंशतः फाटलेल्या अवस्थेत मला कोथरूडच्या गांधी भवन परिसरातील प्रासंगिक पुस्तक दालनात मिळाले. ते इतके जुनाट दिसत होते की त्याच्या संदर्भ उपयुक्ततेची कल्पना नसल्याने, माझ्या घरच्यांनी काळाच्या ओघात त्या पुस्तकाची रद्दी मध्ये देऊन विल्हेवाट लावली.

काका कालेलकरांच्या बाकी कार्या बद्दल जेमिनी बाबांनी दिलेली इतर सर्वसाधारण माहिती खाली देतो.

काका कालेलकरांनी हिंदी प्रचाराचे कार्य गांधीजींच्या सान्निध्यात आल्यानंतर, विशेषतः 1915 पासून सुरू केले. गांधीजींनी त्यांना हिंदी प्रचाराची जबाबदारी 1935 मध्ये दिली, आणि ते या कामात तीस वर्षांहून अधिक काळ सक्रिय होते.

त्यांच्या कार्याची काही प्रमुख टप्पे:

* 1915: महात्मा गांधीजींची भेट घेतली आणि त्यांचे अनुयायी बनले.
* 1928-1935: गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते.
* 1935: गांधीजींनी त्यांना हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून लोकप्रिय करण्याची जबाबदारी दिली. यानंतर त्यांनी हिंदी प्रचाराच्या कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले.
* 1948 नंतर: ते दिल्लीला गेले आणि त्यांचे हिंदी प्रचार कार्य चालूच राहिले.

त्यांचे हे कार्य स्वातंत्र्यापूर्वीपासून ते स्वातंत्र्योत्तर काळातही (1960 च्या दशकापर्यंत) चालू होते. त्यांना 1965 मध्ये "जीवन-व्यवस्था" या निबंधसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, जो त्यांच्या या दीर्घकाळ चाललेल्या साहित्य आणि सामाजिक कार्याचाच एक भाग होता.

काका कालेलकर हे एक असे गांधीवादी विचारवंत आणि लेखक होते, ज्यांनी गैर-हिंदी भाषिक क्षेत्रांमध्ये हिंदीला लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे इतिहास, जबाबदारी आणि कार्य खालील मुद्द्यांमध्ये समजून घेता येईल:

इतिहास आणि हिंदीशी संबंध:

* मातृभाषा मराठी, तरीही हिंदी प्रेम: काका कालेलकर मूळतः मराठी भाषिक होते, ज्यांचा जन्म महाराष्ट्रातील साताऱ्यात झाला होता. असे असूनही, त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याच्या विचाराला पूर्णपणे स्वीकारले.
* गांधीजींचा प्रभाव: महात्मा गांधींच्या सान्निध्यात आल्यानंतर, कालेलकर हिंदी प्रचाराच्या कार्यात पूर्णपणे सामील झाले. गांधीजींनी स्वतः त्यांना हिंदी प्रचारासाठी गुजरातला पाठवले होते आणि नंतर दक्षिण भारतात हिंदी प्रचाराचे काम व्यवस्थित करण्यास सांगितले होते.
* इतर भाषांवर प्रभुत्व: मराठीसोबतच त्यांना गुजराती, हिंदी, बांगला आणि इंग्रजीचेही चांगले ज्ञान होते. गुजराती भाषेतील त्यांच्या सखोल ज्ञानामुळे गांधीजींनी त्यांना "सवाई गुजराती" ही पदवीही दिली होती.

हिंदीसाठी त्यांची जबाबदारी आणि कार्य:

* राष्ट्रभाषा प्रचाराला राष्ट्रीय कार्यक्रम मानणे: काका कालेलकरांचे मत होते की हिंदीचा प्रचार केवळ भाषिक कार्य नाही, तर एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यांनी राष्ट्रभाषेच्या प्रचाराला राष्ट्रीय एकता आणि अखंडतेसाठी आवश्यक मानले.
* स्वतः हिंदी शिकणे आणि प्रचार करणे: त्यांनी आधी स्वतः हिंदी शिकली आणि नंतर अनेक वर्षे दक्षिण भारतात हिंदीच्या प्रचार-प्रसाराचे कार्य केले. त्यांनी 'दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा' सारख्या संस्थांशी जोडून काम केले आणि त्या प्रांतांमध्ये प्रवास करून प्रचार कार्यात मदत केली.
* गैर-हिंदी भाषिक क्षेत्रांमध्ये काम: त्यांनी हिंदीतर भाषिक आठ प्रांतांमध्ये हिंदी प्रचाराची ज्योत पेटवली. ते देशभरात फिरत राहिले, लोकांना समजावत राहिले की हिंदी (त्यावेळी) 12 कोटी लोकांची मातृभाषा आहे आणि तिला राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारल्याने भारतीय संस्कृती अधिक समर्थ आणि पुष्ट होईल. त्यांनी आसाम, मणिपूर आणि केरळसारख्या राज्यांमध्येही हिंदी प्रचारासाठी अथक प्रयत्न केले आणि तेथे हिंदीची अनेक केंद्रे उघडण्यास मदत केली.
* लेखन आणि विचारांचा प्रसार: त्यांनी गुजराती आणि हिंदीमध्ये विपुल साहित्य रचना केली. त्यांची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी बहुसंख्य पुस्तकांचे अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. त्यांच्या लेखनातून आणि भाषणांमधून त्यांनी हिंदीची उपयुक्तता आणि महत्त्व समजावले.
* "जीवन-व्यवस्था" सारखे निबंध संग्रह: जरी कोणत्याही विशिष्ट निबंधाचा उल्लेख नसला तरी, त्यांच्या "जीवन-व्यवस्था" सारख्या निबंध संग्रहांमध्ये, ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला, भाषिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेवरील त्यांचे विचार स्पष्ट होतात, जे अप्रत्यक्षपणे हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांशी संबंधित होते.

थोडक्यात, काका कालेलकरांनी आपल्या बहुभाषिक पार्श्वभूमीचा उपयोग करत, गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली, हिंदीला गैर-हिंदी भाषिक क्षेत्रांमध्ये एक राष्ट्रभाषा म्हणून स्थापित करण्यासाठी महत्त्वाची ऐतिहासिक जबाबदारी पार पाडली. त्यांनी स्वतः हिंदी शिकून, देशव्यापी प्रचार अभियान राबवून आणि आपल्या लेखनातून हिंदीबद्दल सहमती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

* मी व्यक्तिशः वाचलेल्या निबंध विषयक स्मृती शिवाय इतर माहिती विकिपीडिया आणि एआय च्या मदतीने घेतली आहे त्यात काही त्रुटी असतील तर चुभूदेघे.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर चर्चा शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
* उत्तर दायित्वास नकार लागू.

धोरणवावरइतिहासभाषालेख

प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील लोकांनी हिंदीचा प्रचार केला ही चूक झाली का?

गांधींची मते १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. भारताची software मधील भरारी English येत असल्यामुळेच झाली. English ही आपली strength आहे आणि आपण ती टिकवली पाहिजे.

हिंदीचा भारतात नक्कीच उपयोग आहे. पण त्यासाठी पहिलीपासून शाळेत शिकवण्याची गरज नाही. दैनंदिन वापराची बोलता आली म्हणजे खूप आहे.

रच्याकने, हिंदी चित्रपटांनी हिंदीचा जेव्हढा प्रसार केला आहे तेव्हढा इतर कुणीही करू शकले नाहीत. हे leverage करता येईल का?

माहितगार's picture

8 Jul 2025 - 12:48 pm | माहितगार

काळाचेच म्हणावयाचे झाल्यास, दोन वेगवेगळ्या भाषा व्यवहार करणार्‍या व्यक्ती स्वत:च्याच भाषातून संवाद साधत राहतील इतपत रिअल टाईम अनुवाद तंत्रज्ञान पुढे गेले आहे. त्यामुळे भाषा विवादांचे आजचे मुद्दे बहुधा अजून दहा वीस वर्षात मागे पडावयास हरकत नाही.

परभाषी व्यवहार यंत्र माध्यमातून कानावर पडता पडताच जास्त वेळा उपयोग करत राहील्यास, काही महिन्यांपेक्षा अधिक काळ रहाणारी परभाषी व्यक्ती स्थानिक भाषा सहज अवगत करू लागतील किंवा त्याच्या अगदी विरुद्ध घडेल ते यणारा काळच सांगू शकेल.

पण मुदलात या धागा लेखाचा उद्देश एक्सप्लेन करण्यात मी कुठे तरी कमी पडलो. समजा उपजिविका निमीत्ताने एक मराठी माणूस पश्चिम बंगाल मध्ये स्थायिक झाला आणि एक बंगाली माणूस महाराष्ट्रात स्थायिक झाला दोघेही परराज्यातील संवादासाठी प्रवासी म्हणून तात्पुरत्या काळात हिंदी वापरतील तर ठिक आहे. पण उदर निर्वाहासाठी स्थायिक परराज्यात स्थायिक होत आहेत हिंदी आल्यामुळे अडत नाही पण एकुण भारतीय संस्कृतीतही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांना आपापली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे जी स्थानिक भाषेच्या माध्यमातून विकसीत झालेली असते. स्थानिक भाषाच आली नाही तर स्थानिक संस्कृतीशी तुम्ही तुटलेले रहाणार. स्थानिक संस्कृतीशी तुटलेल्यांची संख्या अधिक झाली तर स्थानिक बहुसंख्या पासून परभाषी समुदाय दुर रहाणार एकमेकांचे दृष्टीकोणांचे बारकावे नीट समजणार नाहीत त्या शिवाय स्थानिक भाषा न शिकता परभाषीयांची लोक संख्या वाढतच गेली आपली भाषिक संस्कृती नामशेष होईल का या बद्दलची असुरक्षीतता वाढत जाते आणि हि असुरक्षीतता भाषिक तंत्रज्ञानाच्या बळावर किती भरून काढता येईल हे नेमके सांगणे तुर्तास तरी शक्य नसावे.

जरासा कमी पडलो असेन २

गांधी जुने झाले तरी भारतातील भाषा विषयक अधिकृत संसदीय आणि शासकीय धोरणांवरचा त्यांचा ऐतिहासिक परिणाम नाकारता येत नाही आणि त्या हिंदी धोरणाची सहमती गैर हिंदी भाषी राज्यात करणार्‍या काका कालेलकरांचे योगदानही कमी मोजता येत नाही.

ह्या लेखाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लोकांनी हिंदीचा प्रचार केला ही चूक झाली का? हा ही नाही. काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले आणि ३ वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करणे आणि करावयास लावणे या वर फोकस असेल तर भाषिक विवाद आपोआपच कमी होईल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Jul 2025 - 1:18 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले

आत्मसात कशी करायची? समजा मी खाजगी कंपनीत अभियंता म्हणून आंध्रप्रदेशातील 'विजयवाडा' येथे बदली होऊन आले आहे. आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर? समजा ऑन्लाईन प्रयत्न केला तर मग सराव कोणाबरोबर करायचा? स्थानिक लोकांचा ईगो सुखावण्याकरिता हे सगळे उपद्व्याप करायचे. मग एखादे तेलुगु वाक्य म्हंटले की आजुबाजुचे लोक टाळ्या वाजवणार. जे सध्या महाराष्ट्रात होते. अमराठी माणूस मराठी अडखळत बोलला की स्थानिकांचा ईगो सुखावतो."मला भाषा येत नाही" असे प्रामाणिक उत्तर दिले की लोकांना राग येतो.
सरकारी कचेर्यात, एल आय सी/एस बी आय. मध्ये असे क्लासेस घेतले जातात असे ऐकले आहे.

माहितगार's picture

9 Jul 2025 - 2:18 pm | माहितगार

आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर?