लक्ष्मणपूर, एक पडाव......२

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
1 Jan 2022 - 3:24 pm

https://www.misalpav.com/node/49710
लक्ष्मणपूर, एक पडाव

मीच लिहीलेला लेख आणी त्यावर मान्यवरांचे प्रतीसाद शांतपणे वाचताना वाटले की मी आपल्या सर्वांच्या बरौबर गप्पाच मारतोय. सर्वाचे धन्यवाद.

नोकरी मुळे सतत बदली नवे शहर नवे लोक तेव्हा कळाले की शहराचा इतिहास आणी भुगोल जाणून घेणे आवश्यक आसते. त्यामुळे शहराची प्रथम दर्शनी ओळख होते. शहरातील पारंपारिक खुणा (conventional signs ) जर लक्षात ठेवल्या तर त्या शहरा मधे सहज फिरता येते. सैन्यात "नकाशा वाचन (मँप रीडिंग) हा एक खुपच महत्वाचा विषय. मँट्रिक मधे स्पे जाँग्रोफी हा विषय घेतल्यामुळे पुढे त्याचा उपयोग झाला.
ब्रिज,रोड क्लासिफिकेशन,टेरेन,पारंपारिक खुणा इत्यादी माहिती असणे फार आवश्यक,निर्मनुष्य जंगल ,डोंगर दरी ,वाळवंटात भटकंती करताना हीच माहीती देवा सारख्या धाऊन येते. श्रीलंकेतल्या जंगलात, काश्मीर मधील दुर्गम भागात, मध्यप्रदेशातील बिहाडा मधे किवां चंद्रपूरच्या नक्षलवादी भागात अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात किंवा पकडण्यासाठी किती महत्प्रयास सुरक्षा दलाला करावे लागत असतील याची थोडीफार कल्पना आपल्याला येईल. बाकी हल्ली गुगलबाई सदैव मदतीला धावतात त्यामुळे जास्त फरक पडत नाही पण सुरक्षा दलाला याचा उपयोग मर्यादितच.

कुठल्याही शहरातील मुख्य पोस्ट आँफिस अमूमन शून्य मैलावर आसते. साहेबांनी १७६६ मधे पोस्ट खाते सुरू केले.पहिलं पोस्ट ऑफिस कलकत्त्याला स्थापन झाले.साहेब मोठा हुषार, इती पु.ल.देशपांडे.त्याने पोष्ट आणी रेल्वे खाते हे आपल्या व्यापारीक व सामरीक सोईनुसार प्रस्थापित केले.जसजसे फिरंग्याचे पाय पसरत गेले तसतसे या खात्यांचे जाळे पण देशभर पसरले.आपली मराठी भाषा किती समृद्ध याचा दाखला म्हणजे सर्व विभागांच्या पुढे खातं हा शब्द जोडून त्यांना किती "अर्थ"पुर्ण केले आहे,नाही!

आसो,थोडे विषयांतर झाले.लखनौचा भुगोलही जनरल पोस्ट आँफिस पासूनच सुरु होतो. जी पी ओ च्या इमारतीला सुद्धा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इतीहासाची थोडी ओळख झालीय वेळोवेळी पुन्हा इतीहासा कडे वळावेच लागेल. सध्या तरी आपण लखनौ रेल्वे स्थानका पासुन पुढचा प्रवास सुरू करूयात.

नुकतेच मायबाप सरकारने स्वातंत्रयोतर पंचवीसाव्या वर्षात तृतीय श्रेणीचे डबे रातोरात रगंवून त्याला द्वितीय श्रेणीत बदलत देशवासीयांचे जीवनमान सुधारण्याचे श्रेय लाटले होते. होते. प्रवास दुपारी तीन वाजून वीस मिनिटाने पुणे - मुबंई एक्सप्रेस ने सुरू झाला पुढे कल्याण, पंजाब मेल ने झांसी आणी साबरमती एक्सप्रेसने लखनौ आसा प्रवास केला. हे सर्वच नवीन होते.आसो त्यावेळच्या सुखसोयी आणी आताच्या सुविधा या मधे खुपच फरक आहे.आता मुबंई लखनौ पुष्पक एक्सप्रेस, कुशिनगर एक्सप्रेस,झेलम एक्सप्रेस, पुणे-गोरखपूर (लखनौ) आणी पुणे -दिल्ली -लखनौ (आमौसी विमानतळ ) आशा सरळ रेल्वे व हवाई सेवा प्रवासा करता उपलब्ध आहेत. विमानतळ ते रेल्वे स्टेशन आशी मेट्रो सुद्धा उपलब्ध आहे.

चार बाग"', हे लखनौ चे मुख्य रेल्वे स्टेशन.कधीकाळी लखनौची ही चार बाग (चहार बाग), खुप सुदंर बाग होती पण नबाबशाही संपली आणी या बागेचा "नुर" ओसरला.

चहार बाग (चारबाग) ही एक फारसी स्थापत्यकला आहे.एका चौरस जमीनीच्या तुकड्याचे चार छोट्या चौरस तुकडयात विभाजन करून त्यात फुलबागा,मध्यभागी मकबरा, पाय रस्ते आणि पाण्याचे वहाणारे पाट आसे विकसीत चतुर्भुज उद्यान जणू काही चौपड किंवा ल्युडोचा पट मांडलाय.आग्र्याची आरामबाग,ताजमहाल,दिल्ली मधील हुमायूँची कबर,श्रीनगर,कशमीर मधील शालीमार आणी निशात "मुघल गार्डन्स",याच शैलीवर बनवल्या आहेत. एवढेच काय आपल्या औरंगाबादचा बिबी का मकबरा पण याच शैलीतला.

औरंगजेबा नंतर मुघलीया सल्तनतला उतरती कळा लागली कमकुवत शासक रंगरेलीयाँ आणी ऐशो आरामात मश्गुल झाले आणी त्याचा फायदा मराठे,अब्दाली आणि पुढे फिरंग्याना मीळाला. मोगलांचे सरदार, नबाब डोईजड झाले आणी ते स्वताःला शहेनशहां समजू लागले. दिल्लीचा बादशहा फक्त नावापुरता.

लखनौचे नबाब याला अपवाद नव्हते. आलम बाग, ऐश बाग,लालबाग,केसरबाग,चहारबाग दिलकुशा या नबाबी बागा मुख्यत्वेकरून ऐशो आराम करता वेगवेगळ्या बेगमांच्या नावाने बनल्या होत्या. मुबंईच्या धोबीतलाव प्रमाणे आता ना नबाबाच्या बेगमा ना बागा उरल्या. "काप गेला अन भोकं राहीली".आता नविन जमान्यातल्या हाथी पार्क,आंबेडकर पार्क, निबूं पार्क ,बोटॅनिकल गार्डन, हजरत महल पार्क आशा आनेक बागा लखनौच्या शानो शौकत मे चार चाँद लगा रही है।

मोहम्मदबाग (रायबरेली,अमेठी कडून येताना) आणी आलमबाग (कानपूर कडून येताना ) मधील ही चारबाग फिरंग्याना आवडली आणी मोबदल्यात दुसरीकडे जागा नबाबाला देऊन इथे रेल्वे स्थानकाची नीव टाकली.तोपर्यंत ऐशबाग हे लखनौचे मुख्य रेल्वे स्थानक होते.चारबाग हे स्टेशन १९१४ साली बांधा़वयास सुरुवात झाली आणि १९२३ मधे पुर्ण झाले. त्या काळी ७० लाख रुपये खर्च झाले. हे मुघल, राजपूत आणि अवधी स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेले प्रेक्षणीय स्थळ आहे.याचे डिझाईन व निर्माण भारतीय इन्जिनीयर मुक्ता प्रसाद चौबे यांनी केले. हे स्टेशन उंचीवरुन (aerial view) जणू बुद्धीबळाचा डाव (शतरंज की बिसात) माडंल्या सारखे वाटते व त्याचे डोम आणी खांब बुद्धी बळाच्या पटावरच्या सोंगट्या पिवळ्या आणि रक्तासारखा लाल रंगाच्या रंगाने रंगवलेली हि महालनुमा इमारत प्रवाश्यांना मंत्रमुग्ध करते.हे रेल्वे स्थानक छोटी लाईन बडी लाईन आसे दोन भागात वाटले आहे,मिटरगेज आणी ब्राँडगेज.आता सर्वच ब्राँडगेज पण दोन्ही स्थानके छोटी लाईन ,बडी लाईन आजही याच नावाने ओळखली जातात.बाहेरून राजमहालासम दिसणाऱ्या स्टेशनमधे होणारा गडबड गोधंळ, चित्र विचित्र आवाज,चिल्लम चिल्ली याचा यत्किंचितही आदांज बाहेरील लोकाना येत नाही.जणू साऊंड प्रुफ, ही या स्थानकाची दुसरी विशेषता आहे.

छोटी लाईनच्या स्थानका समोर एक जुने रेल्वे इंजीन ठेवले आहे. बडी लाईन स्थानकावर जवाहरलाल नेहरू आणी महात्मा गांधी आणी मोहम्मद अली जिनाच्या सन १९१६ मधे झालेल्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून समोर बापूजीचां बसलेला पुतळा आहे.

स्थानका बाहेर आल्यावर नवीन प्रवासी थोडा वेळ तरी भान विसरून स्थापत्यकलेच्या अदभुत प्रतिभेच्या प्रेमात पडल्याशिवाय रहात नाही. स्थानका समोर खुप मोठे पटांगण, खुप सार्‍या सायकल रिक्षा,काही इक्के (टांगा,आता बहुतेक दिसणार नाहीत ),थोडीफार दुचाकी, चार चाकी वाहने.
जनाब, हुजूर, मालीक सबोधंत रिक्षावाले प्रवाश्याला घेरतात. प्रथमदर्शनी मराठी किवां अन्य दाक्षिणात्य प्रवासी भाबांवतो. सायकल रिक्षा चालक, त्याची रिक्षा व बेफाम चालवण्याचे कौशल्य बघून पहिल्यांदा बसणारा जीव मुठीत धरूनच बसतो. फारच माफक दरात लाबंपर्यत घेऊन जातात.चढावर रिक्षा चालकाची स्थिती बघून नवीन प्रवासी जरूर खाली उतरतो आणि त्याला धक्का सुद्धा देत मदत करतो, पण निर्ढावलेल्या प्रवाशांना काय, रोज मरे त्याला कोण रडे. नवीन प्रवासी घासाघीस न करता मागेल तेवढे कधी कधी थोडे वरती पण पैसे देतो पण निर्ढावलेल्या प्रवाश्यानां घासाघीस करणे, धमकावणे यात काही गैर वाटत नाही.

तुम्ही इथेच थांबा मी जरा पान घेऊन येतो. इथेच समोर एक पानवाला आहे, सादा पान,चार बोटावर मावेल एवढच एक पान का पत्ता, कथ्था,चुना,"दो ठो टुकडे छलीये के" (डली, छालिया माने सुपारी) एक ठो इलायची के दाना बस हो गयी पान की गिलौरी तयार. माझा नेहमीचा पानवाला, जेंव्हा जेंव्हा कोणाला सोडायला, घ्यायला येतो तेंव्हा याला जरुर भेट देतो."जनाब, बहूत दिन के बाद नजरे इनायत हुयी, सब खैरीयत तो है" आशी विचारपुस करत पान लावतो. पु. ल. च्या पानवाल्या सारखाच इथला सुद्धा जर कुणी गुलकंद, बडीशेप मागीतली तर "कहाँ से आया बे" आसे काहीतऱी भाव त्याच्या चेहर्‍यावर आणतो.

"गर मज़ा चाहो तो कतरो दिल सरौते से मिरा
तुम सुपारी की डली रखते हो नाहक़ पान में "

शायर-मुसहफी गुलाम हमदानी.

सरौता-अडकित्ता

चला थोडी पानबद्दल चर्चा करुयात. देसी, बनारस, कलकत्ता, मगही एक ना दोन पानाचे प्रकार. नबाब दिसौरी पान पसंत करायचे. ना मीठा ना कडवा, चावल्यावर तोडांत विरघळणारे चोथा न होणारे. माहोबा, पुरातन महोत्सवनगर खजुराहो जवळ येथील पान सर्वात चांगले म्हणतात. बनारस मधे पानावर चुन्याचे बोट लावून देतात तर लखनौ मधे याला मुर्खपणा समजतात. बनारस पान पिकल्या वर खातात. बनारस मधे तबांखू तर लखनौ मधे सादा आणी मीठा पान पसंत करतात. पुन्हा एकदा विषयांतर पण नाइलाज आहे.

चला स्टेशन समोरच्या रोडने विधानसभा मार्ग वरून हजरत गंज कडे निघुयात.
क्रमशः....... ३

इतिहासमुक्तकनोकरीलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

शेर भाई's picture

1 Jan 2022 - 5:36 pm | शेर भाई

पानाप्रमाणेच रसाळ ओघवते वर्णन, सगळे एकदम प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे ठाकले.
२०१० मध्ये झांशी का झांसी ला BHEL च्या Railway Couch Factory ला भेट दिली होती तेव्हा BHELच्या वतीने इथे धावती भेट दिली होती.

त्यावेळेस झांसी वरून निघताना “रात्री जेवूनच जा” असा आग्रह झाला होता. तिथल्या Railway Couch Factory च्या GM ने सांगितले होते, कि "भाई यहा कि Railway भी नवाबी है, आप खाना खा के टहलते हुये जायेंगे फिर भी आपको गाडी मिल हि जायेगी." माझी परतीची गाडी ७.०० वाजता होती म्हणून मी जेवणाला थांबायचे नाकारले होते. आणि नंतर अर्थातच त्यांचे म्हणणे खरे ठरले, गाडी रात्री ११.३० ला आली.

| चारबाग स्टेशन उंचीवरुन (aerial view) जणू बुद्धीबळाचा डाव (शतरंज की बिसात) माडंल्या सारखे वाटते
हे आता देखील असेच दिसते का ??

आणि हो पु. भा. प्र.

कर्नलतपस्वी's picture

3 Jan 2022 - 3:33 pm | कर्नलतपस्वी

ऐकोणीसशे तेवीस मधे बनवलेल्या इमारतीत डागडुजी आणी रंगरगोटी शीवाय काहीच नवीन नाही. छोटी लाईन स्टेशन नंतर बनले आहे पण वास्तु सौदर्य साभांळले आहे.

मुक्त विहारि's picture

1 Jan 2022 - 6:45 pm | मुक्त विहारि

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

कर्नलतपस्वी's picture

1 Jan 2022 - 10:12 pm | कर्नलतपस्वी

शेर भाई पहीली भेट १९७४ व शेवटची भेट २०१६ मधे शहरात फारच फरक पडलाय पण मगही पानाची चव आणी स्टेशन आहे तसेच आहे.

मुक्त विहारीजी प्रतीसाद बद्द्ल धन्यवाद.

कुमार१'s picture

2 Jan 2022 - 12:01 pm | कुमार१

ओघवते वर्णन.
वाचतोय

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jan 2022 - 3:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

फोटू असते तर अजून मजा आली असती.
ही घ्या गणपा शेठ नी लिहिलेली फोटो डकवण्याची पाकृ

पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

2 Jan 2022 - 5:19 pm | कर्नलतपस्वी

पैजारबुवा
प्रतीसादा बद्दल धन्यवाद, आम्ही तंत्रज्ञान मागासवर्गीय ,डाँस ३.८ कोबाँल, लोटस, वर्डस्टार, स्टोरीबोर्ड प्लस च्या जमान्यातले प्रयत्न करतोय पण यश काय आले नाही. पण लढाई जारी आहे लवकरच तोफांचे आवाज ऐकू येतील आसे वाटते.

कर्नलतपस्वी's picture

2 Jan 2022 - 6:03 pm | कर्नलतपस्वी

mipa

कर्नलतपस्वी's picture

2 Jan 2022 - 6:08 pm | कर्नलतपस्वी

mipa_picasa

कर्नलतपस्वी's picture

2 Jan 2022 - 6:25 pm | कर्नलतपस्वी

mipa

फूल माझ्या बागेतले आहे

अनन्त्_यात्री's picture

2 Jan 2022 - 7:23 pm | अनन्त्_यात्री

थांबू नका.

पुभाप्र

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jan 2022 - 4:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

जमले की

आता पुढचा लेख फोटो युक्त येउद्या.

पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

2 Jan 2022 - 6:28 pm | कर्नलतपस्वी

पैजारबुवा धन्यवाद

प्रचेतस's picture

3 Jan 2022 - 1:35 pm | प्रचेतस

खूपच सुरेख लिहिताय. जीवंत वर्णन आहे. सर्व दृष्ये डोळ्यांसमोर उभी राहात आहेत.

सिरुसेरि's picture

3 Jan 2022 - 2:28 pm | सिरुसेरि

छान लेख .

टर्मीनेटर's picture

4 Jan 2022 - 5:53 pm | टर्मीनेटर

हा भागही मस्तच 👍
पान खाल्यावर तोंड / ओठ लाल झालेले आवडत नसल्याने ते सहसा खात नाही, पण गेल्या काही वर्षांपासून मघई पान बऱ्याच ठिकाणी मिळायला लागल्यामुळे क्वचित प्रसंगी/सणासुदीला ते मात्र आवडीने खातो.

मनो's picture

5 Jan 2022 - 2:44 am | मनो

चार बाग (चहार बाग),

फार्सी भाषेत चहार چھار म्हणजेच आकडा ४, त्यामुळं चहारबाग आणि चारबाग दोन्ही एकच.

इस्लामी वास्तुकलेत काही आकडे महत्वाचे असतात. जसे हश्त-बीहिश्त (आठ स्वर्ग) हा आठ तुकड्यांत विभागलेला असतो
https://en.m.wikipedia.org/wiki/Hasht-behesht_(architecture)

हश्त-बीहिश्त बाग (आठ स्वर्गाचा बगीचा) हे अहमदनगरच्या बाहेर सावेडीपासच्या महाल अधिक बागेचे नाव. त्या नावाचा अपभ्रंश होत होत आपण आज त्याला मराठीत 'भिस्तबाग' म्हणतो.

कर्नलतपस्वी's picture

5 Jan 2022 - 7:29 am | कर्नलतपस्वी

नवीन माहिती समोर आली.

.