मिपाकरांच्या वाचनखुणा.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
31 Mar 2021 - 8:10 pm

नमस्कार मिपाकरांनो,

आपल्या सर्वांच्या आवडत्या मिसळपाव.कॉम ह्या संकेतस्थळाला यंदा पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत.
पंधरा वर्षांच्या मिपाच्या यशस्वी वाटचालीत अनेक लेखक/लेखिकांनी उत्तमोत्तम कथा, कादंबऱ्या, लेख, लेखमालिका लिहून मोलाचे योगदान दिले आहे.
मिपावरच्या एकूण धाग्यांची संख्या आता पन्नास हजाराचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचली आहे. इतक्या मोठ्या साहित्य खजिन्यात दडलेली/कालौघात विस्मृतीत गेलेली कित्येक मूल्यवान रत्ने शोधून काढून वाचणे हि नवीनच नाही तर जुन्या वाचकांसाठीही गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्या एवढी कठीण गोष्ट आहे.
आपल्यापैकी अनेकांना आवडलेल्या लेखनाची वाचनखूण साठवून ठेवण्याची सवय आहे तेव्हा आपली व्यक्तिगत आवड म्हणून जपून ठेवलेला हा ठेवा प्रतिसादातून लिंक रूपाने अन्य वाचकांबरोबर वाटून त्यांनाही वाचनानंदाची अनुभूती द्यावी अशी सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती

सुरुवात म्हणून मी सगळ्या नाही पण माझ्या तींन वाचनखुणा खाली देत आहे.

१) इब्न बतूत - भाग १
जयंत कुलकर्णी साहेबांनीं लिहिलेली १२ भागांची लेखमालिका.

२) मोसाद - भाग १
कै.बोका-ए-आझम यांनी लिहिलेली १४ भागांची लेखमालिका.

३) मक्केतील उठाव १
हुप्प्या यांनी लिहिलेली ७ भागांची लेखमालिका.

वरील तीनही अभ्यासपूर्ण लेख मालिका मला खूप आवडतात. अजूनही बऱ्याच वाचनखुणा आहेत त्या नंतर शेअर करतो!
आता तुमची पाळी! चला तर मग आता पटापट तुमच्या वाचनणखुणा शेअर करा 🙂

आपल्या सर्वांनी प्रतिसादातून शेअर केलेल्या वाचनखुणा सूचिबद्ध करून स्वतंत्र धागा रूपाने ('मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांक) ह्या वर्षीच्या मिपा वर्धापनदिनी म्हंणजेच गणेश चतुर्थीला श्री गणेश लेखमालेच्या बरोबर प्रकाशित करावा अशी विंनंती मिपा प्रशासनास करण्याचा मानस आहे, जेणेकरून ह्या वर्धापनदिनी आपल्या सर्वांना श्री गणेश लेखमालेत नवीन लेखन आणि 'मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांकात आत्तापर्यंतचे वाचकांच्या पसंतीस ऊतरलेले जुने पण दर्जेदार लेखन वाचण्याची दुहेरी मेजवानी मिळेल.

मांडणीवाङ्मयप्रकटनविचार

प्रतिक्रिया

गणेशा's picture

6 Apr 2021 - 11:43 am | गणेशा

आता थोड्या अलीकडच्या काळातील आवडत्या धाग्यांच्या ज्या वाचनाखुणा केलत्या त्या देतो..

धग..
http://misalpav.com/node/46931
- रातराणी..

अलीकडच्या काळात मला ४- ५ कथा खुप आवडल्या होत्या.. त्यातील रातराणी ने लिहिलेली हि कथा खुपच मनाला स्पर्श करून जाते..

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Apr 2021 - 12:17 pm | ॲबसेंट माइंडेड ...

धग
सुरेख कथा. हस्तीदंती मनोरऱ्यात बसुन सामाजीक समस्यांवर लिहीणाऱ्या लोकांचा दांभीकपणा लेखीकेने छान उलगडुन दाखवला आहे.

तुम्ही वाचत आहात, म्हणुन वाचनखुणा देण्यास छान वाटत आहे..

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Apr 2021 - 12:34 pm | ॲबसेंट माइंडेड ...

तुम्ही देत रहा मी वाचत आहे. मालीका नंतर वाचेन आधी कथा,लेख वाचुन घेतो. खुप काही चांगले वाचायला मीळतय.

धग ..मन स्पर्शुन गेली.त्यामुळे मला आज माझी "मोबाइलची शाळा " ही लॉकडाऊनवर गोष्ट आठ्वली.मिपावर देणार नव्हते,पण आता दिली आहे.

गणेशा's picture

6 Apr 2021 - 11:46 am | गणेशा

http://misalpav.com/node/46922
आरसा - बिपीन सांगळे.

आरसा हि सुद्धा अलीकडे मिपावर लिहिलेली एक उत्क्रुष्ट माझ्या आवडीची कथा आहे..

मस्त..

अदा बेगम आजच वाचायला घेतो आहे नुकतीच आलेली..

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Apr 2021 - 1:56 pm | ॲबसेंट माइंडेड ...

आरसा
कथेतला कल्पनाविलास आवडला. आणि तिथे काय मिळत नाही ? एकदा तर रेल्वेचं अख्खं इंजिन आलेलं विकायला. या वाक्याला हसु आले.

गणेशा's picture

6 Apr 2021 - 2:04 pm | गणेशा

आता आणखिन एक best कथा देतो अलीकडची..
आणि पुन्हा आपण जुन्या कथा कडे वळूयात

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2021 - 10:28 pm | चौथा कोनाडा

आरसा भारीच आहे !
बेगम अदा पण वाचत आहे.
बिपिन सांगळे झकासच लिहितात !

काल बऱ्याच येथील कथा वाचल्या.
त्यात धग(आधी वाचली होतीच), आरसा, काटेकोरंटीची फुले आणि बोहेमियम रॅप्सडी
ह्या जास्त आवडल्या.

गणेशा's picture

6 Apr 2021 - 2:07 pm | गणेशा

http://misalpav.com/node/46982

बोहेमियम रॅप्सडी - स्टार्क..

पुन्हा पुन्हा वाचावी अशीच.. आज घेतो वाचायला पुन्हा मी..

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Apr 2021 - 3:15 pm | ॲबसेंट माइंडेड ...

बोहेमियम रॅप्सडी
अप्रतिम. हा एकच शब्द पुरेसा आहे या कथेची स्तुती करण्यासाठी.
खुप म्हणजे खुपच आवडली. धन्यवाद गणेशा साहेब.

Bhakti's picture

6 Apr 2021 - 3:32 pm | Bhakti

बोहेमियम रॅप्सडी
अफाट!!
लेखनशैली खूपच आवडली.सुंदर कथा आहे.

धन्यवाद कसले.. आणि साहेब काय..

:-)
आपला साधा गणेशा बोला राव..

मोगरा's picture

10 Apr 2021 - 3:17 pm | मोगरा

बोहेमियम रॅप्सडी

अप्रतिम., खुप सुंदर.,

गणेशा's picture

6 Apr 2021 - 5:18 pm | गणेशा

बारा हा आकडाच वेगळा आहे..:-)
आता पुन्हा जुण्या वाचनाखुणा बघायला गेलो आणि माझ्याच कविता मालेची वाचनखुण सापडली..
स्वतःच स्वतःची वाचन खूण देणे बरोबर नसले तरी माझ्याच मला देतो..:-) असुद्या...

http://misalpav.com/node/17166
आई .. मिटलेला श्वास.. (संपुर्ण) - गणेशा.

उंबर्‍यावर सांजसमयी
मन माझे रडते आई
पाणावलेली आर्त रांगोळी
तुझेच स्मरणगीत गाई

- १२मती कर :-)

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Apr 2021 - 8:35 pm | ॲबसेंट माइंडेड ...

आई .. मिटलेला श्वास.. (संपुर्ण)
वाह. सुरेख आहे कविता संग्रह. पार्श्वभुमी सांगीतल्याने जास्त भिडल्या.

गणेशा's picture

6 Apr 2021 - 7:47 pm | गणेशा

http://misalpav.com/node/20895
मुसोलिनीचा उद्य अस्त - जयंत कुलकर्णी
(१० भाग )

वाचनखूण सुविधेचा वापर कसा आणि काय हेच माहित नव्हते :-)

अजून 'हॉल ऑफ फेम' कसा करणार आहात ते नाही समजले पण हा धागा आला त्यामुळे मिपावरचे जुने लोकप्रिय लेखन वाचण्याचा चान्स घेणार आता.

गणेशा's picture

7 Apr 2021 - 8:36 am | गणेशा

http://misalpav.com/node/16319
एअरपोर्ट - गवि

मला खुप आवडलेली हि कथा..

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

7 Apr 2021 - 11:17 am | ॲबसेंट माइंडेड ...

एअरपोर्ट
मस्तच आहे कथा.

माझ्याकडे बऱ्याचस्या छान छान ट्रेकिंग च्या वाचनाखुणा जास्त आहेत, पण फोटो आता दिसत नाहीयेत त्यामुळे त्या देत नाहीये...
जास्त वाचनखुणा ट्रेक च्या होत्या

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

7 Apr 2021 - 11:20 am | ॲबसेंट माइंडेड ...

ट्रेकिंग माझ्या आवडीचा विषय नाही. तुम्ही द्या वाचनखुणा इतरांना कामी येतील.

आणि मी ट्रेकिंग आणि सायकल वाला..:-)

एक कथेची वाचन खूण देतो खाली wt

गणेशा's picture

7 Apr 2021 - 8:44 am | गणेशा

http://misalpav.com/node/15366
माझी भटकंती - पुर्वोत्तर भारत.. - चिगो

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

7 Apr 2021 - 12:35 pm | ॲबसेंट माइंडेड ...

माझी भटकंती - पुर्वोत्तर भारत..
ईशान्य भारताचा धावता आढावा छान आहे.

बिपीन सुरेश सांगळे's picture

8 Apr 2021 - 11:54 pm | बिपीन सुरेश सांगळे

| ॲबसेंट माइंडेड ...
आरसा
कथेतला कल्पनाविलास आवडला. आणि तिथे काय मिळत नाही ? एकदा तर रेल्वेचं अख्खं इंजिन आलेलं विकायला. या वाक्याला हसु आले.

या प्रतिक्रियेसाठी आभार .
पण गंमतीचा भाग असा कि ते रेल्वे एंजिन तिथे खरोखर विकायला आले होते . मी ते पेपर मध्ये वाचले आणि प्रत्यक्ष जाऊन पाहिलेदेखील

गणेशा's picture

9 Apr 2021 - 12:19 am | गणेशा

http://misalpav.com/node/15497

मी आणि नवा पाऊस... - नीधप

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

9 Apr 2021 - 10:10 am | ॲबसेंट माइंडेड ...

मी आणि नवा पाऊस...
नीधप यांच्या कथा चाकोरी बाहेरच्या वाटल्या. त्यांची वाचलेली ही तीसरी कथा सुद्धा आवडली.

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2021 - 1:29 pm | चौथा कोनाडा

भारी धागा आहे हा. कधीही उघडा आणि शिफारस असलेलं, वाचलं नसेल तर वाचायचं, फार पुर्वी वाचलं असेल तर पुन्हा वाचायचं !

अभ्याचं आवडलेलं काही लेखनः

जी नाईन
सैराट आन सैराटच
पोश्टरबॉईज
पोश्टरबॉइज -२
लग्नाला यायचं हं!

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

9 Apr 2021 - 3:42 pm | ॲबसेंट माइंडेड ...

जी नाईन
वाह, मस्तच लिहीलय. अजुनही जी नाईन पंथाचे सच्चे पाईक आजुबाजुला दिसतात. कित्येकांनी आपल्या मुलाचे नाव मिथुन ठेवले आहे.

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2021 - 5:02 pm | चौथा कोनाडा

राईट ! हा गरिबांचा अमिताभ तळागाळात पोहोचला होता.
मी देखील मिथुनचे वेड प्रचंड प्रमाणात पाहिलेय.
सध्या तर बंगालच्या निवडणुकीत मोठा स्टार प्रचारक आहे !

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

9 Apr 2021 - 5:35 pm | ॲबसेंट माइंडेड ...

पोश्टरबॉइज
खुसखुशीत लेखन मस्तच.

कालच त्याला भेटून सगळ्या लिंक्स घेतल्या होत्या..

त्याचा काळ आणि मी येथे नसलेलो काळ एक होता..२०११ पासून

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

10 Apr 2021 - 12:57 pm | ॲबसेंट माइंडेड ...

लग्नाला यायचं हं!
छान माहीती मिळाली वाचुन. बरीच किचकट प्रक्रीया आहे म्हणायची. फोटो तेवढे नाही दिसले.

मोगरा's picture

10 Apr 2021 - 3:10 pm | मोगरा

अतिशय सुंदर धागा.,

बऱ्याच कथा वाचल्या., आवडल्या.,
अश्याच सुंदर सुंदर कथा गोष्टींच्या लिंक्स देत चला.. छान वाटतेय वाचून..

वाचतेय.......

मोगरा's picture

10 Apr 2021 - 3:15 pm | मोगरा

शब्द झाले मोती -२
- गणेशा.,

( selective म्हणाल तर -
कॉलेज विश्व(१-४)., कंपनी आणि मित्र(१-४), शाळा आणि पावसाबद्दलचे सगळे लिखान हे जास्त वाचनीय., आर्त आहे आणि ते खरे जीवन असल्याने ते जास्तच आवडले)

मोगरा's picture

10 Apr 2021 - 3:26 pm | मोगरा

लिंक्स राहिली द्यायची.

शब्द झाले मोती -२
http://misalpav.com/node/46749

आणि आणखीन गणेशाचाच

Maroon colour
https://misalpav.com/node/47318

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2021 - 5:11 pm | चौथा कोनाडा

Maroon colour +१
अतिशय तरल आहे !

गणेशा's picture

10 Apr 2021 - 5:56 pm | गणेशा

http://misalpav.com/node/15673
बकुळीची फुले - प्राजू(२०१०)

----
@ मोगरा,
माझे धागे आवर्जून दिल्या बद्दल धन्यवाद...

बकुळीची फुले...चटका लावणारी!

Bhakti's picture

10 Apr 2021 - 6:44 pm | Bhakti

शीर्षक आणि शेवट कायम पुरणार आहे.

http://misalpav.com/node/48108
नीलकंठ देशमुख.

गणेशा's picture

11 Apr 2021 - 10:14 am | गणेशा

http://misalpav.com/node/16823
जीवधन नाणेघाट
- वल्ली

Bhakti's picture

11 Apr 2021 - 1:34 pm | Bhakti

मस्त.
मिपावर आल्यापासून मला समजलं की असंही भारी काही असत.म्हातारी व्हायच्या आधी जाईन एकदा.;)

सिरुसेरि's picture

11 Apr 2021 - 1:39 pm | सिरुसेरि

लक्षात राहिलेली कथामाला , लेखन धागे - http://www.misalpav.com/node/32509
http://www.misalpav.com/node/34681

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2021 - 2:57 pm | चौथा कोनाडा

विजूभाऊ यांची शाळकरी विद्यार्थ्याचे भावजीवन आणि शालेय दिवसांविषयीची ५७ भागांची सर्वांगसुंदर मालिका:

दोसतार...

मला काही भाग बेहद्द आवडले. बर्‍याच भागांवर प्रतिसाद दिले आहेत !
अर्थात ही मालिका "मिपा पुस्तकं"च्या अंतर्गत "मिपाकरांचे दीर्घलेखन" यात समाविष्ट केली गेली आहे !
(पण अनुक्रमणिकेच्या ड्रॉपडाऊन यादीत फक्त १६ भागच दिसतात, त्यामुळे पुढचे भाग शोधयला जड जाते. समं या वर काही करता येतंय का ते बघा)

अमर विश्वास's picture

11 Apr 2021 - 3:04 pm | अमर विश्वास

मस्त धागा ... वाचनीय खजिना मिळाला

आमची मिपा वरची पहिली वाचनखूण होती "रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा" सोन्याबापूंचा हा धागा होता. आवडत्या विषयावर उत्तम चर्चा

https://misalpav.com/node/29011

आणि त्यांनत एक महत्वाची लेखमाला

डॉक्टर सुबोध खरे सरांची "काटा वजनाचा "
https://misalpav.com/node/34300

गणेशा's picture

19 Apr 2021 - 8:27 am | गणेशा

http://misalpav.com/node/24071

आमचं गोयं..- पैसा,.प्रीत मोहर..बिपीन कार्यक्रते

प्रस्तावना १ /२ वाचली.लिखाणातील सुंदर प्रयोग!
निवांत वाचत आहे.

अनन्त अवधुत's picture

19 Apr 2021 - 11:14 pm | अनन्त अवधुत

जेडी यांची ही सापांबद्दलची अप्रतीम लेखमाला: http://www.misalpav.com/node/24830

चौथा कोनाडा's picture

22 Apr 2021 - 10:13 pm | चौथा कोनाडा

+१
भन्नाट आहे ही मलिका !

स्वराजित's picture

23 Apr 2021 - 2:04 pm | स्वराजित
स्वराजित's picture

23 Apr 2021 - 2:24 pm | स्वराजित

https://www.misalpav.com/node/31949 कासरा
https://www.misalpav.com/node/31115 अकादमी
https://www.misalpav.com/node/34637 पॉर्नची गरज आहे का?
https://www.misalpav.com/node/21124 कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 2)
https://www.misalpav.com/node/15190 पाशवी प्रतिशोधाची कहाणी
https://www.misalpav.com/node/1958 कविता एक लांबचा प्रवास
https://www.misalpav.com/node/23629 सियाचीन ग्लेशीयर.....शेवटचा भाग ......आयुष्याची दोरी
https://www.misalpav.com/node/48449 गावाच्या गोष्टी : मना सज्जना भक्ती पंथेची जावे.
https://www.misalpav.com/node/18342 देरसू उजाला

टर्मीनेटर's picture

6 Jul 2021 - 1:56 pm | टर्मीनेटर

गेले सुमारे तीन महिने वाचनमात्र राहून मिपाकरांनी प्रतिसादातून शेअर केलेल्या त्यांच्या सर्व वाचनखुणा वाचून काढल्या. काय जबरदस्त लेखन केलंय मिपाकरांनी, फारच छान 👍

प्रतिसादातून हा साहित्य खजिना वाचकांसाठी खुला करणाऱ्या सर्वांचे आणि गणेशा भाऊंचे विशेष आभार 🙏

टर्मीनेटर's picture

7 Jul 2021 - 1:16 pm | टर्मीनेटर

इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी बद्दल इंग्रजी मध्ये भरपूर लेखन वाचायला मिळते पण दुर्दैवाने त्याच्याबद्दल सविस्तर, तपशीलवार माहिती मराठीत वाचायला मिळत नाही, ती आपल्या मिपावर उपलब्ध आहे.
इतिहासाची आवड असलेल्या प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी 'मुसोलिनीचा उदयास्त' ह्या जयंत कुलकर्णी साहेबांच्या मालिकेची माझी वाचनखुण इथे शेअर करत आहे.
आता बरेचसे फोटो दिसत नाहीयेत पण माहिती फार छान आहे!
https://www.misalpav.com/node/20263

गॉडजिला's picture

7 Jul 2021 - 2:03 pm | गॉडजिला

बेस्ट ऑफ मिपा हा सेक्शन ठळक लिंक द्वारे ठेवायला हवा जेणे करून नव्या सदस्यांना मिपाच्या वास्तव रूपाची अतिशय चटकन ओळख होऊ शकेल

टर्मीनेटर's picture

7 Jul 2021 - 3:02 pm | टर्मीनेटर

१०००% सहमत!
मी अनेक मित्रमंडळीना मिपा बद्दल सांगत असतो, परंतु त्यातल्या कित्येकांनी सदस्यत्व घेणे तर दूरच, वाचनमात्र राहणेही पसंत तर केले नाही. उलट मलाच "त्या निवृत्त लोकांनी चर्चा करण्यासाठी असलेल्या फोरमवर तू काय करतोस?" असा प्रश्न विचारला होता 😔

'फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन' म्हणतात त्याप्रमाणे नव्याने इथे येणाऱ्यांचा गैरसमज होऊन त्यांनी मिपाकडे पाठ फिरवू नये ह्यासाठी आपण म्हणता त्याप्रमाणे नव्या सदस्यांना मिपाच्या वास्तव रूपाची ओळख करुन देणे खरोखर आवश्यक आहे.

कुमार१'s picture

7 Jul 2021 - 3:46 pm | कुमार१

मिपाच्या वास्तव रूपाची ओळख करुन देणे खरोखर आवश्यक आहे.
>>+ ११

गुल्लू दादा's picture

7 Jul 2021 - 5:30 pm | गुल्लू दादा

अगदी सहमत

विमान अपहरण यावर पन एक धागा होता ?

श्रीरंग_जोशी's picture

24 Sep 2021 - 1:58 am | श्रीरंग_जोशी

विमान अपहरणावर माझा हा एक लेख आहे. काठमांडू ते कंदहार..
असे अधिकही असू शकतात.

रंगीला रतन's picture

24 Sep 2021 - 10:59 am | रंगीला रतन

मस्त लेख. धन्यवाद.

कविता व प्रतिक्रिया वाचून हसून हसून जिवंतपणी समाधी मिळाली फक्त थ्रओर ज्ञानेश्र्वरांचेच नांव नको.आमचीही न्वोद होऊदेत. थोडावेळ मिपा वाचायचे ठरवून अजूनी वाचतोच आहे. ही कविता प्रथम वाचताना अस वाटले मुद्दाम बोबडे हे बोल माझे टंकले आहे.व काही विडंबन असेल, पण कविता तर कळलीच नाही पण प्रतिक्रिया बापसे बेटे सवाई होत्या.

खरोखर प्रतिक्रिया अफाट छान!! विडंबनामुळे (प्रतिक्रियांमुळे) जेवण झोप लयाला गेले.वाचतच बसलो व झपूर्झा गडे झपूर्झा अवस्था झाली. हसून हसून ठसका, खोकला, शिंका, पोटदुखी, झोप उडाली भूक मेली सर्व सुंदरअनुभव एकदमच सर्व मिपाकरांनी देऊन मरगळलेल्या मनाला तरतरी आणल्या बद्दल सर्व मिपाकर व कविता टंकणार्याचे खूप खूप खूप मनापासूनआभार व कोटी कोटी प्रणाम !!

बारा वर्षे,सहा महिने तीन दिवस (खूप खूप जुना, प्राचीन मराठी सिनेमा)होऊनही ताजी, टवटवीत राहिलेली वरील मराठी विनोदी कविता . कविता व अभिप्राय प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर!! मोकलाया दाहि दिश्या. सर्वांनी कायम जरूर वाचावेत अभिप्राय. व टवटवीत रहा.

विजुभाऊ's picture

25 Jan 2022 - 5:13 pm | विजुभाऊ

हा धागा सदोदित वर रहावा.

शाम भागवत's picture

26 Jan 2022 - 9:52 am | शाम भागवत

सर्वात जास्त वाचनखुणा असलेला धागा कसा शोधायचा?

प्रसाद गोडबोले's picture

26 Jan 2022 - 11:08 am | प्रसाद गोडबोले

अ‍ॅक्च्युअली

जसे फेसबूकवर मेमरीज आहेत तसेच मिपावर मेमरीज काढायला हरकत नाही , दररोज त्या दिवशी पुर्वी कोणते लेखन झाले होते ह्याचा एक कॉलम फ्रंट पेज वर असावा. ह्याने मिपाची पेज एंगेजमेंट देखील वाढेल ! आणि समजा जुन्या काळातील काही उत्तम लेखन नजरचुकीने दुर्लक्शित झाले असेल तर तेही वर येईल अन त्याला योग्य तो न्याय मिळेल !