देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
16 Sep 2020 - 3:48 am

p {
text-align: justify;
font-size: 17px;
}

देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!

‘हजारो भारतीय चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य’ , ‘भारताच्या 10 हजार व्यक्तींवर चीनची नजर’ अशा मथळ्याच्या बातम्या आपल्यापैकी बहुतेकांनी नुकत्याच वृत्तपत्रांमधून वाचल्या असतील.

चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी कमीत कमी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवून आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते सोनिया गांधी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायपालिका आणि उद्योगपतींचाही समावेश आहे. एवढेच नाही तर यात सेलिब्रेटी आणि अगदी मीडियाशी संबंधित लोकांची आणि अनेक गुन्हेगार, आरोपींची नावेही यादीत आहेत. 'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वेबसाइटच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

" दि इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ ‘झेनुआ’ कंपनीच्या माहिती साठय़ातून भारतीयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी उत्खनन केले. माहिती काढण्यासाठी ‘बीग डाटा टूल्स’ चा वापर करण्यात आला. या माहितीसाठय़ाला कंपनीने ‘ओव्हरसीज की इन्फॉर्मेशन डाटाबेस’ (ओकेआयडीबी) असे शीर्षक दिले आहे. या माहितीसाठय़ात शेकडो नोंदी आहेत. त्यातून भारताबद्दलची माहिती शोधण्यात आली. ही माहिती अस्पष्ट नोंदींमध्ये चिन्हांकित केलेली नसल्याचे आढळले. अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, संयुक्त अरब अमिरात (यूएई) या देशांविषयीच्या माहितीचा साठाही कंपनीने केला आहे. कंपनीने ही माहिती कंपनीशी संबंधित असलेल्या संशोधकांच्या जाळ्यामार्फत जमविली आहे.
ही माहिती शेन्झेनमध्ये अध्यापन केलेल्या व्हिएतनाममधील प्राध्यापक ख्रिस्तोफर बाल्डिंग यांच्यामार्फत सूत्रांनी काही वृत्तसंस्थांना दिली. त्यात दि इंडियन एक्स्प्रेस, द ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ या वृत्तपत्रांचा समावेश आहे. "

वरील माहिती ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ समूहाच्याच ‘लोकसत्ता’ ह्या मराठी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत देण्यात आली आहे.

घटनात्मक पदांवरील मंडळी, उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय पुढारी / नेते, न्यायाधीश, उद्योगपती, गुन्हेगार अशा लोकांची माहिती जमवून त्याचा उपयोग देशाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या गुप्तचर संघटना / संस्थांकडून होणे हि काही नवीन गोष्ट नाही. त्यातल्या अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून / फितवून अथवा वेळप्रसंगी अपहरण करून त्यांच्याकडून मिळवलेल्या गोपनीय माहितीचा सरकारकडून संबंधित देशाविषयीचे आर्थिक, व्यापार, युद्ध, परराष्ट्र धोरण ठरवण्याच्या कामी उपयोग केला जातो हे सर्वश्रुत आहे. आय. एस. आय. ह्या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने दाऊद सारख्या गुन्हेगाराला आपल्या जाळ्यात ओढून त्याच्याकरवी मुंबईत घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांचेही आपण साक्षीदार आहोत.

चीनच्या ‘झेनुआ’ कंपनीकडून ज्यांच्यावर नजर ठेवली गेली त्यात आपल्या सारख्या सर्वसामान्य भारतीयांची नावे नसली तरी आपण सुरक्षित आहोत का?

आपण काय बोलतोय ते कोणी आपल्या नकळत ऐकतंय का?

आपण समाज माध्यमांवर (Social Media) वर काय आणि कसे व्यक्त होतोय ते अशा हेरगिरी करणाऱ्या कंपन्या / संस्थांपर्यंत पोहोचतय का?

वरील पैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. ज्याला आपण मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून ओळखतो त्या AI (Artificial intelligence) च्या सध्याच्या जमान्यात अशा हेरगिरी पासून आपण सर्वसामान्य भारतीयही सुरक्षित नाही.

आणि पुढच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे होय अशी आहेत. आपले बोलणेही आपल्या नकळत महा-संगणक ऐकत असेल आणि आपण समाज माध्यमांवर (Social Media) वर काय आणि कसे व्यक्त होतोय तेही अशा हेरगिरी करणाऱ्या कंपन्या / संस्थांपर्यंत पोहोचत आहे.

AI (Artificial intelligence) चा आवाका आता फक्त स्मार्ट फोन्सच्या माध्यमातून आपल्या आवडी-निवडी, पसंती विषयीची माहिती मिळवून त्या अनुषंगाने आपल्याला जाहिराती दाखवण्या पुरता मर्यादित राहिला नसून तो आपल्या कल्पनेपलीकडे प्रचंड वाढला आहे.

मागील पाच-सहा महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढलेला आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये जो संघर्ष झाला होता त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर चीन आणि भारत या दोन्ही देशांचे परस्पर संबंध तणावाचे झाले असून ती परिस्थिती अजूनही कायम आहे. कालच अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चिनी सैन्याने जमवाजमव सुरु केली असल्याची बातमी आली आहे.

अशा परिस्थितीत भारत आणी चीनमध्ये युद्ध होईल की नाही होणार ते येणारा काळच ठरवेल परंतु अशा तणावग्रस्त काळात जवाबदार देशवासी म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहेत.

सध्या सामाज माध्यमांवर युध्द विषयक चर्चा चालू आहेत. त्यावर व्यक्त होताना अनेक जण “युद्ध झाले तर भारताला ते परवडणारे नाही.” , “भारताने सामंजस्याची भूमिका घेऊन युद्ध टाळायला हवे." , “लष्करी ताकदीत चिन आपल्यापेक्षा वरचढ असून युद्ध झाल्यास आपला पराभव अटळ आहे” अशा अर्थाची मते मांडताना दिसत आहेत.

भारत, चीन, युद्ध, गलवान, लडाख हे आणि अशा विषयांशी सबंधित शब्द असलेले लेखन, तसे लेखन करणारे, त्या लेखनावर दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रिया देणारे, दृकश्राव्य माध्यमांवरील चर्चा सत्रे, मुलाखती अशा सर्व डेटाचे अत्यंत कमी वेळात विश्लेषण करून अचूक अथवा अचूकतेच्या जवळ पोचणारा अहवाल तयार करून देण्याचे सामर्थ्य AI (Artificial intelligence) मध्ये आहे आणि चीन सह जगातील अनेक देश त्याचा यशस्वीपणे वापरही करत आहेत.

देशातील जनमताचा कौल जाणून घ्यायला सर्वच माध्यमांवर व्यक्त होणारी मते फार मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्यासाठी खूपच घातक ठरू शकतात. समजा भारत सरकार अथवा आपल्या संरक्षण दलांकडून जनमत युद्धासाठी अनुकूल आहे कि नाही ह्याचा अंदाज घ्यायला अशा मिळवलेल्या माहितीवर आधारित अहवालाचा वापर केला जात असेल तर अशा अप्रस्तुत चर्चा/प्रतिक्रियांमुळे अल्प प्रमाणात का होईना पण त्रुटी येऊन हाती येणाऱ्या अहवालाच्या अचूकतेवर परिणाम होऊ शकतो. पर्यायाने सरकारला / संरक्षण दलांना योग्य तो निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यांचे मनोधैर्यही खच्ची होण्याचा धोका उद्भवतो.

दुसऱ्या बाजूला शत्रू राष्ट्राकडून जर अशा मिळवलेल्या माहितीवर आधारित अहवालाचा वापर केला जात असेल तर परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल असल्याची धारणा होऊन त्यांचे मनोधैर्य वाढल्याने त्यांच्याकडून दबाव वाढवण्याची /आणखीन नवीन कुरापती काढण्याची वा युध्द पुकारण्याची शक्यता वाढते.

प्रत्येक भारतीय मग तो कुठल्याही जाती धर्माचा / भाषेचा असो, कुठल्याही राजकीय पक्षाचा / नेत्याचा समर्थक वा विरोधक असो परंतु अशा कठीण प्रसंगी त्याने कुठल्याही माध्यमावर व्यक्त होताना देश-हिताचे भान ठेवावे आणि भावनांच्या भरात वाहवत न जाता जरा जपून व्यक्त व्हावे.

प्रसंग बाका आहे खरा, पण तो टळला पाहिजे.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

संजय भावे
(उर्फ ‘टर्मीनेटर’)

मांडणीराजकारणविचारलेखमत

प्रतिक्रिया

हे विदा कलेक्शन फक्त ड्रेगन करत असेल असं नाहि. अंकल सॅम, इस्रायल.. अगदी पाक सुद्धा करत असेल.
डिजीटल डोळे आता आपल्यावर सदा-सर्वदा रोखलेले असणार.. वि हॅव्ह टु लिव्ह विथ इट :(

टर्मीनेटर's picture

16 Sep 2020 - 2:59 pm | टर्मीनेटर

हे विदा कलेक्शन फक्त ड्रेगन करत असेल असं नाहि. अंकल सॅम, इस्रायल.. अगदी पाक सुद्धा करत असेल.
डिजीटल डोळे आता आपल्यावर सदा-सर्वदा रोखलेले असणार.. वि हॅव्ह टु लिव्ह विथ इट :(

करेक्ट 👍
डेटा कलेक्शन चे महत्व सर्वच देशांच्या सरकारने ओळखले आहेच, काहींनी आधी तर काहींनी थोडे उशिरा एवढाच काय तो फरक.
इतकेच नाही तर आता त्याचे महत्व स्थानिक पातळीवरील लहान मोठ्या उद्योगांच्याही लक्षात आले आहे.
स्वीगी आणि झोमॅटो हे तर प्रस्थापित ब्रँडस झाले पण गेल्याच आठवड्यात ठाणे शहर आणि परिसरात त्यांच्या प्रमाणेच फूड डिलेव्हरी सर्व्हिस देणाऱ्या व्यावसायिकाने व्यवसायवृद्धीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन त्यांची वेबसाईट आणि मोबाईल ॲप AI ready करण्याचे काम तीन वर्षांच्या करारावर आमच्या कंपनीला दिले आहे,

कुमार१'s picture

16 Sep 2020 - 8:06 am | कुमार१

त्याने कुठल्याही माध्यमावर व्यक्त होताना देश-हिताचे भान ठेवावे आणि भावनांच्या भरात वाहवत न जाता जरा जपून व्यक्त व्हावे.

>>> +११
बऱ्याच वर्षांपूर्वी मी अनुभव मासिकात अवधूत डोंगरे यांचा “आय डिसलाइक” हा फेसबूक माध्यमावरचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, की आपण अशा माध्यमांवर जे काही व्यक्त होत असतो त्याची जागतिक हेरगिरी चालू असते. म्हणूनच त्यांनी फेसबुकला कायमचा रामराम ठोकला होता.
याची आठवण झाली.

टर्मीनेटर's picture

16 Sep 2020 - 3:58 pm | टर्मीनेटर

बऱ्याच वर्षांपूर्वी मी अनुभव मासिकात अवधूत डोंगरे यांचा “आय डिसलाइक” हा फेसबूक माध्यमावरचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, की आपण अशा माध्यमांवर जे काही व्यक्त होत असतो त्याची जागतिक हेरगिरी चालू असते. म्हणूनच त्यांनी फेसबुकला कायमचा रामराम ठोकला होता.

ते खरंच आहे, केवळ फेसबुकच नाही तर प्रत्येक समाज माध्यमांवर हा प्रकार चालतो. इतक्या प्रचंड प्रमाणावर असलेल्या वापरकर्त्यांना फुकट सेवा पुरवणाऱ्या फेसबुक, ट्विटर, गुगल ह्या कंपन्या म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट नक्कीच नाहीत. जाहिराती आणि त्यांच्याजवळ असलेल्या अफाट डेटाच्या जोरावर त्या बक्कळ पैसा कमावतात. ज्या माध्यमांकडे स्वतःची अशी हेरगिरीची यंत्रणा नसेल ते अशा बलाढ्य कंपन्यांकडून किंवा सर्वच माध्यमांवर नजर ठेऊन असलेल्या इतर कंपन्यांकडून माहिती खरेदी करतात.

वापरकर्त्यांना काय, सेवा फुकट मिळाल्याशी मतलब. अर्थात त्यासाठी अशा माध्यमांना राम राम ठोकणे हा मार्ग योग्य वाटत नाही कारण शेवटी कसे व्यक्त व्हायचे व कुठली आणि किती माहिती शेअर करायची हे वापरकर्त्याच्या हातात असते. काही चलाख वापरकर्ते आपल्या कौशल्याने अशा परिस्थितीतही स्वतःचा लाभ करून घेतात.

निनाद's picture

16 Sep 2020 - 9:10 am | निनाद

तुम्ही एक माध्यम सोडले तरी काहीच फरक पडत नाही. कारण तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांच्या वर्तनावरूनही तुमचे प्रोफाईल बनवले जाते.
आज फेबु सोडले मग उद्या जीमेल पण सोडणार का? आणि सोडले तरी काहीच फरक पडत नाही... कारण त्म्ही कुणाला तरी जी मेलवर जेव्हा इमेल पाठवाल तेव्हा गुगल ला आपोआप तुमची माहिती मिळणारच आहे.

सोडले तर आपणच लुझर होतो कारण असा आणि तसा विदा जाणारच आहे. पण राहिलो तर किमान त्या बदल्यात त्यांच्या सेवा तरी मिळवतात येतात!

आनन्दा's picture

16 Sep 2020 - 9:55 am | आनन्दा

सम्पूर्ण सहमत.
मला असे वाटते की आपण आपला अजेंडा समाजमाध्यमांवर पुर्णपणे रेटला पाहिजे.
बांग्लादेशचे युद्ध आठवा.. आपल्या युद्ध तयारीची कल्पनारम्य माहिती असली तरी ती पण खरी म्हणून प्रसारित करा..
अफवा पसरवा, धुरळा उडवा.. जितका जास्त धुरळा, तितकी दृष्यमानता कमी असते हे लक्श्यात ठेवूया.

सुबोध खरे's picture

16 Sep 2020 - 9:31 am | सुबोध खरे

टर्मिनेटर यांनी लिहिलेले बरोबर आहे.

जालावर आपण काय लिहिता हे तारतम्य ठेवा.

जालावरून गायब होऊन स्वतःची अडचण करून घ्या असे ते अजिबात म्हणत नाहीत.

काश्मीर खोऱ्यात असलेल्या माझ्या लष्करातील वर्गमित्रांना याच कारणासाठी व्हाट्सअँप सारख्या सार्वजनिक न्यासाच्या वापराला सरकारने बंदी केली आहे.

कारण अनवधानाने आपण कुठे आहोत काय करतो आहोत हे त्यातून बाहेर जाऊ शकते.

ही एखादे वेळेस अतिशयोक्ती असेल
सद्य स्थितीत जालावर आपणही आपले विश्लेषण टाकताना चार वेळेस विचार करा. कारण त्याचा गैरवापर करून जनमत बदलण्यासाठी उपयोग केला जातो.

लक्षात ठेवा कोणत्याही देशात कम्युनिस्ट राजवट अली तर प्रथम ते तेथील प्रसार माध्यमे निष्ठुरपणे ताब्यात घेतात आणि मग त्याचा आपल्या प्रचारासाठी वापर करतात.

आजही डावीकडे झुकलेली प्रसार माध्यमे भारत चीनपुढे कसा कमी पडतो हेच परत परत सांगत आहेत.

आणि सैनिकांना देश तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी कालच संसदेने दोन्ही सभागृहाची एकत्रित बैठक घेतली आहे.

Prime Minister Narendra Modi on Monday expressed confidence that Parliament will unitedly give this message that the country is standing solidly behind soldiers guarding India’s borders.

https://theprint.in/india/as-monsoon-session-starts-modi-says-hope-parli...

Gk's picture

16 Sep 2020 - 10:42 am | Gk

किती विनोद

नेहरू हरले , काँग्रेस चीन पुढे हरले हे तर साक्षात गृहमंत्री , मोदी , भाजपे , भक्त आजही बोलत असतात

शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 1:12 pm | शाम भागवत

👍

टर्मीनेटर's picture

16 Sep 2020 - 4:27 pm | टर्मीनेटर

जालावरून गायब होऊन स्वतःची अडचण करून घ्या असे ते अजिबात म्हणत नाहीत.

करेक्ट 👍
विशेषतः संवेदनशील विषयांवर व्यक्त होताना जालावर आपण काय लिहिता हे तारतम्य ठेवा हेच सांगायचे आहे. अर्थात असे काही होतच नसेल अशी ज्यांची समजूत असेल त्यांनी खुशाल त्याकडे दुर्लक्ष करावे 😀

Rajesh188's picture

16 Sep 2020 - 11:09 am | Rajesh188

पण असे का घडत आहे ह्याची कारण काय आहेत ह्याची समीक्षा कधी झाली आहे का.
देशाची mainstream media सर्रास जनते मध्ये एकमेका विषयी द्वेष पसरवत आहे.
काही जण मुस्लिम कसे देश द्रोही आहेत हे सांगण्यात गुंतले आहेत तर काही हिंदू कसे वाईट हे सांगत आहे.
Republic tv वर राज्याच्या मुख्यमंत्री चा एकेरी उल्लेख होतो तरी केंद्र सरकार त्या चॅनल ला समज देत नाही .
जर सरकार आणि मीडिया च जबाबदारी नी वागत नसतील तर जनतेस दोष देवून काय फायदा.
रोज सर्व न्यूज चॅनल वर 1 तास सर्व राज्यांच्या समस्या,तेथील घडणाऱ्या घटना ह्यावर वार्ता पत्र चालवणे गरजेचे आहे.
अगदी जबरदस्ती नी.
आणि त्या मध्ये फक्त खऱ्या च बातम्या दिल्या जाव्यात पक्षीय,राजकीय मत बाजूला ठेवून.

जिओ प्लटफॉर्ममध्ये फेसबुक वगैरे भागिदार झालेत आणि ते त्यांचा अजेंडा राबवणारच. एका चाइनिज कंपनीला घेऊन स्वस्त फोर-जी फोन करण्याचे घाटत आहे. हे सरकारी धोरणाविरुद्ध नाही का? चाइनिज हटवा वगैरे? आता तत्या कंपनीच्या हार्डवेरमधून काय गाळणार हे कसे कळणार? बरं हे फोन्स स्वस्त असल्याने गावागावात पोहोचणार. शहरातीच चार हुशार लोकं काय लिहायचं नाही यावर कंट्रोल ठेवणार पण ८०%गाववाले काय करतील?

शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 1:21 pm | शाम भागवत

🤦 ‍

सुबोध खरे's picture

16 Sep 2020 - 1:25 pm | सुबोध खरे

८०%गाववाले काय करतील?

चार हुशार लोक लिहितील तेच फॉरवर्ड करत राहतात.

यासाठीच चार हुशार लोकांनी काय फॉरवर्ड करायचं याचा विचार करायला हवा आहे.

शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 2:23 pm | शाम भागवत

😀

कंजूस's picture

16 Sep 2020 - 2:31 pm | कंजूस

हे ते चार शहाणे कोण शोधण्यासाठी समिती स्थापन होणार.

हीहीही.

टर्मीनेटर's picture

17 Sep 2020 - 2:59 pm | टर्मीनेटर

खिक्क
😁 😁 😁

चीन जे केले आहे तसे अनेक देश अनेक वर्ष करत असतात .
You tube, fb, twiter,google map अनेक अशी बरीच ऍप फुकट का दिली जातात आणि ही सर्व ऍप कोणत्या देशात जास्त वापरली जातात.
हे ही सर्व अॅप वापरतात त्यांची सर्वांची रोजची detail माहिती गोळा होते .
आणि ती माहिती साठवून ठेवली जाते हे नवीन नाही.
लोकांच्या समाज मध्यामावरील प्रतिक्रिया ह्या देशात सामाजिक वातावरण कसे आहे ह्याचे निर्देशक असतात .
कोणती काडी टाकली की भडका उठेल ह्याचा अंदाज शत्रू राष्ट्र ला नक्की त्या मुळे येतो.
मग सामाजिक वातावरण घडुळ करण्यात राजकीय पक्ष,त्यांचे it cell वाले, media ह्यांनीच मोलाची भूमिका असते ना.
देशातील नागरिकंना मध्ये देशप्रेम कसे निर्माण केले जाते हे शिकायचे असेल तर छञपती नी कसा राज्य कारभार केला ते पाहिले शिका आणि आमालात आना.
कार्या विना फक्त उपदेश योग्य तो परिणाम करत नाही

डीप डाईव्हर's picture

16 Sep 2020 - 11:47 am | डीप डाईव्हर

टर्मिनेटर भाऊ लेख आवडला 👍
Artificial intelligence विषयी आणखीन वाचायला आवडेल. तुमचे ते क्षेत्र असल्यास किंवा त्याचं काही अभ्यास असल्यास त्याच्यावर पण लिहा अशी विनंती.

अवांतर- नेहरू, काँग्रेस, भाजपे, भक्त, हिंदू, मुस्लीम असे धाग्याशी संबंध नसलेले विषय घेऊन तज्ञ लोक्स आलेले आहेत. तेव्हा आता धाग्याची वाटचाल कुठल्या दिशेने होणार त्याचा अंदाज आला आहे 😈

शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 11:52 am | शाम भागवत
शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 11:53 am | शाम भागवत
शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 11:53 am | शाम भागवत
शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 11:54 am | शाम भागवत
शाम भागवत's picture

16 Sep 2020 - 11:54 am | शाम भागवत
टर्मीनेटर's picture

17 Sep 2020 - 3:15 pm | टर्मीनेटर

Artificial intelligence विषयी आणखीन वाचायला आवडेल. तुमचे ते क्षेत्र असल्यास किंवा त्याचं काही अभ्यास असल्यास त्याच्यावर पण लिहा अशी विनंती.

व्यवसायनिमित्ताने AI शी माझा माफक संबंध येतो परंतु ते माझे क्षेत्र नसल्याने मला त्यातली तांत्रिक माहिती नाही. त्यावर काम करणाऱ्या टीम मेम्बर्स कडून अनेकदा त्याबद्दल थक्क करणारी माहिती मिळते.
असे असले तरी त्याचा वापर आणि परिणाम ह्यावर थोडा अभ्यास करून काही लेखन करण्याचा प्रयत्न नक्की करेन.
धन्यवाद 🙏

त्या मध्ये
1) ज्या लोकांमुळे चीन ला धोका आहे आणि त्या लोकांमुळे भारत बलवान राष्ट्र होवू शकेल
2) ज्या लोकांचे भारतात असणे हे भारताच्या नुकसानीचा आहे पण चीन च्या फायद्याचे आहे.
3) आणि जी लोक असल्या मुळे भारताचे नुकसान होईल
आणि जी लोक नसल्या मुळे भारताचे नुकसान होईल
खरं तर ही यादी भारतीय गुप्तचर यंत्रणेने शोधून काढावी .
बरीच माहिती माहीत पडेल.

सुबोध खरे's picture

16 Sep 2020 - 1:20 pm | सुबोध खरे

खरं तर ही यादी भारतीय गुप्तचर यंत्रणेने शोधून काढावी .

आपल्याला काय वाटतं ?

गुप्तहेर संघटनेने ही माहिती शोधली नसेल?

माध्यमांना हिमनगाचे टोक असेल एवढीच माहिती पुरवली जाते.

बाकी सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना याबद्द्ल सावध अगोदरच केले असेल यात शंकाच नाही.

बाकी एकंदर प्रतिसाद पाहून असच वाटतंय कि सगळा भारताचं घाण आहे मग मी त्यात थोडीशी घाण टाकली तर वाईट काय?

बाहेरचा जग घाणेरडं असलं तरी आपलं घर आपण धुवून सारवून स्वच्छ ठेवू शकतोच.

सब चलता है हाच दृष्टिकोन असेल तर ठीकच आहे.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार
🙏

Gk's picture

16 Sep 2020 - 3:41 pm | Gk

लोक सरकारला कर देतात
सरकारने रक्षण करावे

राफेलवर , जीडीपीवर विचारू नका, हा छुपा उद्देश वाटत आहे

सॅगी's picture

16 Sep 2020 - 5:01 pm | सॅगी

हं...थोड्क्यात, उत्तर कोरिया व्हावे...

तुमच्या विरोधी पक्षातसुद्धा असेच मत असणार, सरकारची सरबराई का करता येऊ नये म्हणून. फायनली एकमत झाले म्हणायचे ! ;)
(ह.घ्या.)

Gk's picture

16 Sep 2020 - 6:57 pm | Gk

स्वतःचे ह्यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते म्हणे

हे आम्हाला आत्म नि र ब र व्हायला सांगतात

वरून शत्रूने बॉम्ब टाकल्यास भाजपा जबाबदार नाही , म्हणून डोक्यावर उलटा तवा घेऊन फिरावे , असेही सांगतील

दुर्गविहारी's picture

16 Sep 2020 - 6:25 pm | दुर्गविहारी

उत्तम चर्चा आणि बरीच नवीन माहिती मिळाली.

सुबोध खरे's picture

16 Sep 2020 - 6:51 pm | सुबोध खरे

अजून एक महत्त्वाची गोष्ट

ज्यांना अमेरिका किंवा तत्सम देशात जायचे आहे अशानी टोकाची मते जालावर मांडू नये. कारण हेसर्व देश आपले जालावरील अस्तित्व तपासून पाहत असतात.

त्यात मादक पदार्थ सेवनाचे व्यसन असेल तर किंवा अति उजवे विचार किंवा विशेषतः अति डावे / कम्युनिस्ट विचार मांडले असतील तर आपला व्हिसा कोणतेही कारण न देता नाकारला जाऊ शकतो

Child porn internet var बघतो म्हणून अमेरिकेत प्रवेश रोखला गेला असा प्रसंग घडला होता असे वाचण्यात आहे..
अतिशय बारीक प्रत्येकावर लक्ष असते आणि AI मुळे खूप डाटा चे काही मिनिटात विश्लेषण करता येत .
दोन देशातील दुषमनी असमध्ये हा डाटा कसा वापरला जाईल .हे आपण कसे ठरवणार.
सामान्य जनता जे कमेंट करतात त्यांचे विचार स्थिर नसतात कमेंट मध्ये लिहलेले विचार तो कमेंट करणाऱ्या व्यक्ती खऱ्या आयुष्यात वापरात असेल असे नाही.
सामान्य लोकांचे विचार ठाम नसतात जसे 4 हुशार लोक अफवा (खरे साहेबांच्या पोस्ट मधले) पसरवतात त्याच प्रमाणे त्यांचे विचार बदलत असतात.

वामन देशमुख's picture

16 Sep 2020 - 7:21 pm | वामन देशमुख

Click the button to demonstrate line-breaks in an alert box.

Try it

function myFunction() {
alert("Hello\nHow are you?");
}

वामन देशमुख's picture

16 Sep 2020 - 7:24 pm | वामन देशमुख

चुकून दुसरीकडचं इकडं कॉपी-पेस्ट झालं.
संमं, प्लीज डिलीट करा राव.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Sep 2020 - 8:02 pm | प्रकाश घाटपांडे

व्यक्त होताना भान रहात नाही हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. पण समाजमाध्यमात त्यावर अंकुश ठेवणे हा उपाय व्यवहार्य ठरेल असे वाटत नाही. एआय ला घाबरायला पाहिजे हे पटते. पण आपणही त्या क्षेत्रात भरीव काम करुन प्रतिआव्हान देण्याची क्षमता निर्माण करावी हा मुद्दा जास्त महत्वाचा नाही का?

टर्मीनेटर's picture

17 Sep 2020 - 3:47 pm | टर्मीनेटर

पण आपणही त्या क्षेत्रात भरीव काम करुन प्रतिआव्हान देण्याची क्षमता निर्माण करावी हा मुद्दा जास्त महत्वाचा नाही का?

योग्य मुद्दा!
IT तंत्रज्ञांची आपल्या देशात अजिबात कमतरता नसल्याने त्या क्षेत्रात बऱ्यापैकी काम सुरु झालेले आहे. भविष्यात AI मध्ये करिअर करण्यासाठी आता अनेक विद्यार्थी Machine Learning कडे वळत आहेत हि समाधानाची गोष्ट आहे. अर्थात ह्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ Machine Learning आणि त्यासाठी आवश्यक programming languages शिकून भागणारे नाही. कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित करण्यासाठी, त्यात नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले लॉजिक आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता ज्यांच्यापाशी असेल तेच चांगले यश मिळवू शकतील आणि उरलेले आपण IT मधे हमाली करतो असे सांगायला मोकळे 😀

बोका's picture

16 Sep 2020 - 9:42 pm | बोका

दि इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ ‘झेनुआ’ कंपनीच्या माहिती साठय़ातून भारतीयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी उत्खनन केले. माहिती काढण्यासाठी ‘बीग डाटा टूल्स’ चा वापर करण्यात आला.

इंडियन एक्स्प्रेस अशी बिग डेटा वगैरे वापरून पत्रकारीता पण करते ? (पुन्हा लोकसत्ता वाचणे सुरु करावे का ?)

टर्मीनेटर's picture

17 Sep 2020 - 3:53 pm | टर्मीनेटर

इंडियन एक्स्प्रेस अशी बिग डेटा वगैरे वापरून पत्रकारीता पण करते ? (पुन्हा लोकसत्ता वाचणे सुरु करावे का ?)

लोकसत्ता वाचणे बंद करून मलाही काही वर्षे झाली आहेत. परंतु हि बातमी दुसऱ्या माध्यमांनी दाखवल्याने खात्री करण्यासाठी eलोकसत्ताला भेट दिली तेव्हा वरील माहिती मिळाली. अर्थात आज घडीला तो कितीही कंडम पेपर असला तरी ह्या बातमीत तथ्य असावे, कारण त्याचा हवाला अनेक माध्यमांनी दिला आहे.

बोका's picture

17 Sep 2020 - 9:24 pm | बोका

बातमी बद्दल शंका नाही, तथ्य नक्कीच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हि बातमीआहे.
मला इंडियन एक्स्प्रेस/ लोकसत्ता यांनी 'बिग डेटा वापरुन , उत्खनन करुन' वगैरे काही शोधले याबद्द्ल शंका आहे.

भारतीय मीडिया मध्ये अभ्यासू पत्रकार आहेत कुठे.
हा जी हा जी करणारे संपादक आणि मालकांना
असे सर्व लाळघोटपणा करणारे नवीन पत्रकार आहेत सर्व प्रकारच्या भारतीय मेडियात.
अभ्यासू लोकांना हे पटत नाही ते जास्त दिवस काम करत नाहीत.
कोणी तरी बातमी विकली असेल ह्यांना .

डीप डाईव्हर's picture

17 Sep 2020 - 11:34 pm | डीप डाईव्हर

>>>दि इंडियन एक्स्प्रेस, द ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ या वृत्तपत्रांचा समावेश आहे. >>>
असे बातमीत असल्याचे वर लिहिलंय. ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ बरोबर इंडियन एक्स्प्रेसचा खारीचा वाटा असू शकतो.

बऱ्याच क्षेत्रात इंटरनेट चा वापर होतो.
बँकिंग,संरक्षण,वाहतूक,आणि खूप सारी क्षेत्र त्यांची माहिती सुध्धा नक्कीच कोणी तरी जमा करून ठेवत असेल.
समाज मध्यम वरील माहिती चा असा जास्त काही उपयोग नाही पण बाकी माहिती मिळाली तर कोणत्या ही देशातील सर्व सेवा ठप्प करता येवू शकतात.
त्या साठी आपण काही तरी उपाय करतो ना की कोणी माहिती चोरू नये मग समाज मध्यम वरील माहिती रक्षित करण्यासाठी देशातील यंत्रणा काय करते.
कुठे ही काही झाले की त्याला पाकिस्तान जबाबदार आहे हे उत्तर अपेक्षित नाही.
स्वतः ढिसाळ कारभार करणार आणि क्षत्रू राष्ट्र ला दोषी ठरवणार हे योग्य आहे का.
ते क्षत्रु च आहेत ते त्यांचे काम चोख करणारच

कानडाऊ योगेशु's picture

17 Sep 2020 - 12:25 am | कानडाऊ योगेशु

सामाजिक माध्यमांवर व्यकत होताना चीन अमेरिकेची भीती जाऊ द्या. गल्लीतल्या गावगुंडाकडुनच फलाणा पोस्ट फॉरवर्ड केली ढिकाणा कॉमेंट म्हणुन मारहाण होऊ शकते. अमेरिका चीनला टरकुन राहण्यापेक्षा ह्या गल्लीतल्या शेरांना वचकुन राहणेच हिताचे ठरेल.

Gk's picture

17 Sep 2020 - 6:48 am | Gk

वाघ

आवाज कुणाचा ??!!

सुबोध खरे's picture

18 Sep 2020 - 10:35 am | सुबोध खरे

म्यांव