सांजेच्या व्याकुळ वेळी
का गोकुळ बाधा होते?
आभाळ दाटते तेव्हा
मन राधा राधा होते..
साहवे मला ना जेव्हा
काहिली तनूची उष्ण,
आवेग असा वा-याचा
भासतो जणू की कृष्ण..
मिटताना डोळे माझे
कुशीत मजला घेतो,
रोज मला उठवाया
पाऊस होउनी येतो..
घनघोर बरसतो वेडा
दिवस असो वा रात्र,
रुजवात सुखांची नवथर
भिजवुनी सारी गात्रं..
(ही राधा खास रातराणीसाठी....:))
प्रतिक्रिया
17 Jul 2020 - 8:33 am | प्रचेतस
अतिशय सुरेख, तरल.
17 Jul 2020 - 5:23 pm | प्राची अश्विनी
धन्यवाद!
17 Jul 2020 - 9:03 am | इरामयी
खूप सहज, निरागस, आणि सुंदर काव्य!
17 Jul 2020 - 5:23 pm | प्राची अश्विनी
धन्यवाद!
17 Jul 2020 - 10:01 am | रातराणी
ताई _/\_
कविता खूप आवडली :) :)
17 Jul 2020 - 5:23 pm | प्राची अश्विनी
:)
17 Jul 2020 - 10:18 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त सुरेख
अर्थपूर्ण अन नादमय कविता आवडली,
पैजारबुवा,
19 Jul 2020 - 8:10 am | mrcoolguynice
छान कविता.
"मग* आधा आधा होतो",
असे विडंबन होऊ शकत, असा विचार आला.
परंतु पैबु ते करतीलच असा विचार करून,
शांत बसलो.
"सांजेच्या व्याकुळ वेळी" वैगरे पोटेंशियल वाक्ये ....
*एक प्रकारचे पेयपात्र
19 Jul 2020 - 8:27 am | प्राची अश्विनी
डिट्टो मनातलं बोललात.:)
पैजारबुवा होऊन जाऊंदेत.
20 Jul 2020 - 11:01 am | ज्ञानोबाचे पैजार
हा प्रतिसाद वाचतानाच मनात विडंबन तयार होत होते.
https://misalpav.com/node/47207
पैजारबुवा,
20 Jul 2020 - 11:49 am | प्रचेतस
विडंबन तयार होण्याच्या प्रक्रियेवर एक लेख अवश्य येऊ द्यात
17 Jul 2020 - 10:39 am | माहितगार
नेहमीप्रमाणेच सुरेख 'प्राची काव्य'
आता संग्रह ट्रॅडीशनल पुस्तकाच्या स्वरुपात येऊन जाऊ द्यात. किंवा टेबलटॉप कॅलेंडरच्या स्वरुपातही छान होईल पहा विचार करून.
17 Jul 2020 - 5:23 pm | प्राची अश्विनी
:):)
काय गरीबाची चेष्टा करता??
22 Jul 2020 - 8:03 am | माहितगार
तुमच्या काव्यावर तुटून पडणार्या सर्वच काव्यपंख्यांची डिमांड असणार आहे, जे सगुण आहे ते केव्हान केव्हा किर्ती प्राप्त करतेच, चेष्टा आमच्यासारख्या भूछत्रीवाल्यांची होते, तुमचे काव्य दर्जेदार मराठी भारतीय सांस्कृतीक आरसा आबि वारसा आहे आणि ऑनलाईन नसलेल्या रसिकवर्गा पर्यंत तुमची कविता पोहोचलीच पाहीजे असे आग्रहाने म्हणावेसे वाटते.
22 Jul 2020 - 8:05 am | माहितगार
* तुमचे काव्य दर्जेदार मराठी भारतीय सांस्कृतीक आरसा आणि* वारसा आहे
5 Aug 2020 - 5:28 pm | प्राची अश्विनी
धन्यवाद!! पण संग्रह काढला की तो विकणे आले. मार्केटिंग हा प्रकार अजिबात जमत नाही. त्यामुळे निर्मितीचा आनंद घेते फक्त.
17 Jul 2020 - 10:41 am | गोंधळी
___/\___
17 Jul 2020 - 5:14 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हे
आणि हे
सारखं वाटतय का?
ऑल डेव्हिल्स थिन्क्स द सेम!! :) :)
17 Jul 2020 - 5:22 pm | प्राची अश्विनी
काय भारी लिहिलंय, सावळगाथा.... आवडली..
18 Jul 2020 - 12:02 pm | तुषार काळभोर
डुप्लिकेट आयडीने लॉगिन करायचं इसरलात काय??
18 Jul 2020 - 1:09 pm | प्राची अश्विनी
अहो मिकांची सावळ्यावरील कविता. जीवघेणा फास...
तुम्ही पण ना!
17 Jul 2020 - 5:49 pm | मन्या ऽ
वाह... किती सुंदर....
17 Jul 2020 - 7:12 pm | वीणा३
अतिशय सुंदर !!!
18 Jul 2020 - 12:04 pm | तुषार काळभोर
तो आपला प्रांतच नाही.
पण ही कविता आवडली. एकदम छान.
काही ओळी एक्दम खास आहेत.
18 Jul 2020 - 4:56 pm | शा वि कु
आवडली.
18 Jul 2020 - 6:16 pm | चांदणे संदीप
क्या बात है! लयदार तरल काव्य.
राधा होणे म्हणजे व्याकूळता ही जबरदस्त कल्पना यात दिसते.
सं - दी - प
19 Jul 2020 - 8:30 am | प्राची अश्विनी
चांदणे संदीप, शा वि कु, पैलवान, वीणा३, मन्या s, मिका , गोंधळी, mrcoolguynice... धन्यवाद.
20 Jul 2020 - 11:20 am | गणेशा
सांजेच्या व्याकुळ वेळी
का गोकुळ बाधा होते?
आभाळ दाटते तेव्हा
मन राधा राधा होते..
निव्वळ अप्रतिम..
खुप आवडल्या ओळी या..
5 Aug 2020 - 5:30 pm | प्राची अश्विनी
धन्यवाद.
20 Jul 2020 - 2:15 pm | श्वेता२४
याला चाल लावली तर सुरेल गाणं होईल तयार.
5 Aug 2020 - 5:31 pm | प्राची अश्विनी
धन्यवाद!
21 Jul 2020 - 10:40 pm | सत्यजित...
राधेची सावळबाधा सुंदर चितारलीत!
5 Aug 2020 - 5:30 pm | प्राची अश्विनी
धन्यवाद!
27 Jul 2020 - 10:50 pm | चाणक्य
सुरेख काव्य. खरं सांगतो शीर्षक वाचून ही तुमचीच रचना असणार असं वाटलं आणि तसंच झालं.
5 Aug 2020 - 5:29 pm | प्राची अश्विनी
;) धन्यवाद!
13 Sep 2020 - 11:38 pm | अन्या बुद्धे
आवडली..
16 Sep 2020 - 4:13 pm | प्राची अश्विनी
धन्यवाद!