✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मन राधा राधा होते...

प — प्राची अश्विनी, Fri, 07/17/2020 - 07:47
सांजेच्या व्याकुळ वेळी का गोकुळ बाधा होते? आभाळ दाटते तेव्हा मन राधा राधा होते.. साहवे मला ना जेव्हा काहिली तनूची उष्ण, आवेग असा वा-याचा भासतो जणू की कृष्ण.. मिटताना डोळे माझे कुशीत मजला घेतो, रोज मला उठवाया पाऊस होउनी येतो.. घनघोर बरसतो वेडा दिवस असो वा रात्र, रुजवात सुखांची नवथर भिजवुनी सारी गात्रं.. (ही राधा खास रातराणीसाठी....:))

प्रतिक्रिया द्या
24266 वाचन

💬 प्रतिसाद (37)

अतिशय सुरेख, तरल.

प्रचेतस
Fri, 07/17/2020 - 08:33 नवीन
अतिशय सुरेख, तरल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

प्राची अश्विनी
Fri, 07/17/2020 - 17:23 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खूप सहज, निरागस, आणि सुंदर

इरामयी
Fri, 07/17/2020 - 09:03 नवीन
खूप सहज, निरागस, आणि सुंदर काव्य!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

प्राची अश्विनी
Fri, 07/17/2020 - 17:23 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरामयी

ताई _/\_

रातराणी
Fri, 07/17/2020 - 10:01 नवीन
ताई _/\_ कविता खूप आवडली :) :)
  • Log in or register to post comments

:):)

प्राची अश्विनी
Fri, 07/17/2020 - 17:23 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

क्या बात...

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/17/2020 - 10:18 नवीन
मस्त सुरेख अर्थपूर्ण अन नादमय कविता आवडली, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

छान कविता.

mrcoolguynice
Sun, 07/19/2020 - 08:10 नवीन
छान कविता. "मग* आधा आधा होतो", असे विडंबन होऊ शकत, असा विचार आला. परंतु पैबु ते करतीलच असा विचार करून, शांत बसलो. "सांजेच्या व्याकुळ वेळी" वैगरे पोटेंशियल वाक्ये .... *एक प्रकारचे पेयपात्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

डिट्टो मनातलं बोललात.:)

प्राची अश्विनी
Sun, 07/19/2020 - 08:27 नवीन
डिट्टो मनातलं बोललात.:) पैजारबुवा होऊन जाऊंदेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice

नेकी और पुछपुछ?

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 07/20/2020 - 11:01 नवीन
हा प्रतिसाद वाचतानाच मनात विडंबन तयार होत होते. https://misalpav.com/node/47207 पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

विडंबन तयार होण्याच्या

प्रचेतस
Mon, 07/20/2020 - 11:49 नवीन
विडंबन तयार होण्याच्या प्रक्रियेवर एक लेख अवश्य येऊ द्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

नेहमीप्रमाणेच सुरेख 'प्राची

माहितगार
Fri, 07/17/2020 - 10:39 नवीन
नेहमीप्रमाणेच सुरेख 'प्राची काव्य' आता संग्रह ट्रॅडीशनल पुस्तकाच्या स्वरुपात येऊन जाऊ द्यात. किंवा टेबलटॉप कॅलेंडरच्या स्वरुपातही छान होईल पहा विचार करून.
  • Log in or register to post comments

:):)

प्राची अश्विनी
Fri, 07/17/2020 - 17:23 नवीन
:):) काय गरीबाची चेष्टा करता??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

तुमच्या काव्यावर तुटून पडणार्

माहितगार
Wed, 07/22/2020 - 08:03 नवीन
तुमच्या काव्यावर तुटून पडणार्‍या सर्वच काव्यपंख्यांची डिमांड असणार आहे, जे सगुण आहे ते केव्हान केव्हा किर्ती प्राप्त करतेच, चेष्टा आमच्यासारख्या भूछत्रीवाल्यांची होते, तुमचे काव्य दर्जेदार मराठी भारतीय सांस्कृतीक आरसा आबि वारसा आहे आणि ऑनलाईन नसलेल्या रसिकवर्गा पर्यंत तुमची कविता पोहोचलीच पाहीजे असे आग्रहाने म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

*

माहितगार
Wed, 07/22/2020 - 08:05 नवीन
* तुमचे काव्य दर्जेदार मराठी भारतीय सांस्कृतीक आरसा आणि* वारसा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

धन्यवाद!! पण संग्रह काढला की

प्राची अश्विनी
Wed, 08/05/2020 - 17:28 नवीन
धन्यवाद!! पण संग्रह काढला की तो विकणे आले. मार्केटिंग हा प्रकार अजिबात जमत नाही. त्यामुळे निर्मितीचा आनंद घेते फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

+१

गोंधळी
Fri, 07/17/2020 - 10:41 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments

मस्तच

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 07/17/2020 - 17:14 नवीन
हे
साहवे मला ना जेव्हा काहिली तनूची उष्ण, आवेग असा वा-याचा भासतो जणू की कृष्ण..
आणि हे
भेट होता, सावळी ती जाहली कांती तुझी गं गोरट्या रंगात त्या, आता निळ्याचा वास आहे
सारखं वाटतय का? ऑल डेव्हिल्स थिन्क्स द सेम!! :) :)
  • Log in or register to post comments

काय भारी लिहिलंय, सावळगाथा...

प्राची अश्विनी
Fri, 07/17/2020 - 17:22 नवीन
काय भारी लिहिलंय, सावळगाथा.... आवडली..
  • Log in or register to post comments

??

तुषार काळभोर
Sat, 07/18/2020 - 12:02 नवीन
डुप्लिकेट आयडीने लॉगिन करायचं इसरलात काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

अहो मिकांची सावळ्यावरील कविता

प्राची अश्विनी
Sat, 07/18/2020 - 13:09 नवीन
अहो मिकांची सावळ्यावरील कविता. जीवघेणा फास... तुम्ही पण ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

वाह... किती सुंदर....

मन्या ऽ
Fri, 07/17/2020 - 17:49 नवीन
वाह... किती सुंदर....
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर !!!

वीणा३
Fri, 07/17/2020 - 19:12 नवीन
अतिशय सुंदर !!!
  • Log in or register to post comments

मी जास्त कवितांच्या वाटेला जात नाही.

तुषार काळभोर
Sat, 07/18/2020 - 12:04 नवीन
तो आपला प्रांतच नाही. पण ही कविता आवडली. एकदम छान. काही ओळी एक्दम खास आहेत.
  • Log in or register to post comments

मस्त !

शा वि कु
Sat, 07/18/2020 - 16:56 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

सुरेख रचना!

चांदणे संदीप
Sat, 07/18/2020 - 18:16 नवीन
क्या बात है! लयदार तरल काव्य. राधा होणे म्हणजे व्याकूळता ही जबरदस्त कल्पना यात दिसते. सं - दी - प
  • Log in or register to post comments

चांदणे संदीप, शा वि कु,

प्राची अश्विनी
Sun, 07/19/2020 - 08:30 नवीन
चांदणे संदीप, शा वि कु, पैलवान, वीणा३, मन्या s, मिका , गोंधळी, mrcoolguynice... धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सांजेच्या व्याकुळ वेळी

गणेशा
Mon, 07/20/2020 - 11:20 नवीन
सांजेच्या व्याकुळ वेळी का गोकुळ बाधा होते? आभाळ दाटते तेव्हा मन राधा राधा होते.. निव्वळ अप्रतिम.. खुप आवडल्या ओळी या..
  • Log in or register to post comments

__/\__

प्राची अश्विनी
Wed, 08/05/2020 - 17:30 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

अप्रतिम कविता

श्वेता२४
Mon, 07/20/2020 - 14:15 नवीन
याला चाल लावली तर सुरेल गाणं होईल तयार.
  • Log in or register to post comments

:)

प्राची अश्विनी
Wed, 08/05/2020 - 17:31 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

सुंदर!

सत्यजित...
Tue, 07/21/2020 - 22:40 नवीन
राधेची सावळबाधा सुंदर चितारलीत!
  • Log in or register to post comments

:)

प्राची अश्विनी
Wed, 08/05/2020 - 17:30 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

मस्त

चाणक्य
Mon, 07/27/2020 - 22:50 नवीन
सुरेख काव्य. खरं सांगतो शीर्षक वाचून ही तुमचीच रचना असणार असं वाटलं आणि तसंच झालं.
  • Log in or register to post comments

;) धन्यवाद!

प्राची अश्विनी
Wed, 08/05/2020 - 17:29 नवीन
;) धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

आवडली..

अन्या बुद्धे
Sun, 09/13/2020 - 23:38 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

प्राची अश्विनी
Wed, 09/16/2020 - 16:13 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या बुद्धे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा