मला भेटलेले रुग्ण - २०

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
1 Nov 2019 - 11:57 pm

सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !!
हा मुळापासून हादरला होता ....
मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं .... शेवटी हे सांगीतलं की तुझ्यापेक्षा जास्त शक्यता तर मला आहे कारण मी रोज एखादा टिबीचा रुग्ण बघतो किंवा निदान करून उपचार सुरू करतो , माझी प्रतिकारशक्ती मी अशीच मेंटेन केलेली आहे !!
ह्या सगळ्या संभाषणाला परवा वर्ष झालं हे दादा सांगत होता आणि थॅंक्स म्हणाला तेव्हा जाणवलं की डॉक्टर म्हणून मी यशस्वी का आहे :)

_________________________________

डॉक्टर थॅंक्स ......
ओपिडी संपत आली होती तेव्हा ही मुलगी आणि तिची आई भेटायला आल्या .....ती म्हणाली की डॉक्टर ॲलर्जीची ट्रिटमेंट पूर्ण झालीये , तिन वर्षांपुर्वी असलेला त्रास नाहीसा झाला ; आज तुम्हाला फक्त थॅंक्स म्हणायला आलो !!
माझ्या डोळ्यासमोरून मागची तिन वर्ष झरकन तरळून गेली आणि खूपच आनंद झाला की आपण एखाद्याचा आयुष्यात एवढं स्थान मिळवू शकलो ..... You made my day मी त्यांना एवढंच म्हणू शकलो ....

_________________________________

ओपिडी संपत आली होती , हे ७५ वर्षांचे गृहस्थ आणि त्यांचे दोन मुलं सेकंड ओपिनीयसाठी आले आणि आल्या आल्या माझ्याकडे दाखवल्याची जुनी फाईल दाखवत काही नव्या फाईल्स व रिपोर्टस् दाखवून म्हणाले , डाॅक्टर उद्या पेट स्कॅन करायचा आहे कारण आमच्या फॅमिली डॉक्टरांना कॅन्सरची शक्यता वाटते आहे . त्या आवाजातली मुर्तिमंत भिती आजही मला स्पष्ट आठवते आहे, मी ऐकून घेतलं आणि सगळे रिपोर्टस् आणि एक्सरे बघून झाल्यावर फक्त एकच तपासणी करायला सांगितली व त्यानंतर पेट स्कॅन करा एवढंच सांगीतलं....
दोन दिवसांनी रिपोर्ट आल्यावर त्यांना अभिनंदन केलं आणि म्हणालो ‘काका हा तर टिबी आहे , तुम्ही पूर्ण बरे व्हाल काहीही काळजी करू नका !’
सहा महिन्यांनी टिबीचा कोर्स पूर्ण झाल्यावर परत अभिनंदन केलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू काय सांगत होते हे मी शब्दात मांडूच शकणार नाही ...

_________________________________

‘हर दिन नमाज के वक्त डाक्टर साब हम आपके लिए दुऑं मांगते है ‘ ..... हे फॉलोअपला आलेल्या रुग्णाच्या बायकोनी म्हटल्यावर मला भरून आलं ...
मी फक्त दम्याचं निदान करून उपचार चालू केले होते ......
_________________________________

आरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनप्रतिसादसद्भावनाअभिनंदनप्रतिक्रियालेखअनुभवआरोग्य

प्रतिक्रिया

तुम्ही एक एक रुग्ण बरा करून त्यांचे आशीर्वाद मिळवून तुमच्या जवळची पुंजी वाढवत आहात. आम्हाला तुमचा अभिमान आहे.

तुमचे रुग्णानुभव वाचनीय तर असतातच पण मननीय देखील असतात. रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला जसे बरे वाटते तसे अशा प्रतिक्रिया येण्या करता तुम्ही त्या रुग्णांना कशी सेवा दिली असेल हे विचार मनात येतात.
तुम्ही कुशल धन्वंतरी तर आहातच पण त्याहून अधिक प्रेमळ माणूस आहात हे जाणवते.
रुग्णांच्या शरीरावर औषध योजना करण्याबरोबरच तुम्ही त्यांच्या मनावर उपचार करता.
तुमच्या व्यवसायात तुम्हाला उदंड यश मिळतेच आहे, निरामय आरोग्याचाही लाभ तुम्हाला निरंतर होवो या सदिच्छा. _/\_

माझीही शॅम्पेन's picture

2 Nov 2019 - 8:37 am | माझीही शॅम्पेन

सुंदर लेख डॉक्टर !!!

सोत्रि's picture

2 Nov 2019 - 8:45 am | सोत्रि

डाॅक्टर - पेशंट हे नातं व्यावसायिक न राहता जवळकीचं असायला हवं! आणि दोन्ही बाजूकडून तसा प्रयत्न कसोशीने व्हायला हवा!

- (जीव वाचवलेल्या डाॅक्टरचा ऋणी असलेला) सोकाजी

सुबोध खरे's picture

2 Nov 2019 - 9:36 am | सुबोध खरे

जुने रुग्ण आवर्जून तुम्हाला भेटून धन्यवाद देतात याचे समाधान वेगळेच असते.
त्याची किंमत पैशात करता येणार नाही.

जेम्स वांड's picture

2 Nov 2019 - 11:05 am | जेम्स वांड

तुम्ही डॉक्टर लोक राव देव आहात देव, एक शब्द कमी जास्त नाही. तोलून मापून बोलतोय पण खरं बोलतोय मी साहेब. अद्भुत आहात तुम्ही लोक.

पुणे जिल्ह्यातील एका सुप्रसिद्ध ग्रामीण सरकारी रुग्णालयात मित्राची ओबीजीवाय लागलेली. गड्यानं एका दिवसात सहा डिलिव्हरी केल्या अन सायंकाळी आमच्यासोबत जरा मौज म्हणून हॉटेल मध्ये जेवायला आला होता, हॉटेलात पाय टाकल्याबरोबर फोन, डॉक्टर प्रायमी आली आहे एक, म्हणते फक्त डॉक्टर अबक दादा हवेत, याल का? गडी लगेच गाडी वळवून हॉस्पिटल मध्ये तिला स्टेबल केले, ताई नको चिंता करुस हा स्त्रीत्वाचा आशीर्वाद आहे बयो बघ मी आलोय आता म्हणत फटकन मोकळी केली, नॉर्मल डिलिव्हरी!

दीड तासाने आला, समोर केलेली बिअर नाकारून म्हणतो "आज आयुष्याची नशा आहे बिअर नको"

डॉ श्रीहास's picture

2 Nov 2019 - 12:09 pm | डॉ श्रीहास

तुमच्या डॉक्टर मित्राला आमचा नमस्कार कळवा .

नितीन पाठक's picture

2 Nov 2019 - 3:36 pm | नितीन पाठक

डॉक, या वेळेचा लेख नेहमीप्रमाणे मस्त आहे. जबरदस्त अनुभव आणि पेशंटचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.

चौकटराजा's picture

3 Nov 2019 - 8:50 am | चौकटराजा

हल्ली डॉक्टरांच्या पेशाकडे लोक संशयाने पाहात पुन्हा पुन्हा त्यांच्यकडेच जात असतात इलाज म्हणून नाईलाज म्हणून ! पण डॉकटर असणे हा एक अत्यंत मानाचा ,कृतकृत्यतेचा "व्यवसाय " आहे ! आपल्याला अशी सार्थक झाल्याची भावना अनुभवास येणे हे भाग्याचे आहे ! कलावंतास असा अनुभव येतो ! भारत देशात कमालीची अग्रेसिव्ह व अगदी शास्रीय पद्धतीची ( १०० टक्के डिफरंशियल डायग्नोसिस ) ट्रीटमेंट अवघड आहे असे माझे फिजिशन म्हणत असतात . ते माझ्या थोड्याफार अभ्यासानुसार ही खरे आहे ! अशा वेळी तर अनुभवाची कसोटी लागून कमीतकमी खर्चात अचूक निदान होणे अशी क्षमता असणाऱ्या डॉ ना जास्त मान मिळत जातो. आपल्याला असेच आशीर्वाद लोकांचे मिळावेत अशी शुभेच्छा !

जेम्स वांड's picture

3 Nov 2019 - 12:36 pm | जेम्स वांड

इथं गावठी लोक आमच्या गावाकडली तर विंजेक्शन नाय तर इलाज नाय म्हणतात, शेवटी डॉक्टर लोकांचं समाधान म्हणून गोळ्या देतोच अन प्लासीबो म्हणून चक्क डिस्टील वॉटर का ग्लुकोज काय ते असतं त्याची सुई टोचतो, तेव्हा बरी झालेली माणसे उलट त्यालाच म्हणतात

"म्हनलोवतो का न्हाय एक सुई मारा पगा घोडा हुतोय मानसाचा"

नेहमीप्रमाणेच हृदयस्पर्शी..