(दुपारी)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
18 Sep 2019 - 2:31 pm

पेरणा अर्थात

चाल :-
बीज अंकूरे अंकूरे (जिथे चालीत निमुट पणे बसणार नाही तिकडे दडपून कोंबा)
ही चाल जमली नाही तर "डोळे कशा साठी"च्या चालीत बसवा,
तेही नाही जमले तर "शुरा मी वंदीले"
ते ही नाही जमले तर "आज ब्लु है पानी पानी"
ते ही नाही जमले तर "अरुणी किरणी धरणी गगन झलके"
आणि ते ही नाही जमले तर नुसती वाचा.

(दुपारी)
तिच्या पायरवाची गाज,
त्याने दडपली छाती,
जैसे वीसमणी हातोड्याने
घाव घणाचे घालती,

तिच्या कपाळीची आठी
असे संशय त्याच्या पाठी,
लालबुंद डोळे जणू,
तांबड्या रश्याचीच वाटी

तिच्या पाठीचे भिंताड
थर मेदाचा तो जाड,
तिच्या भव्य कटीपुढे,
भासे गजराज रोड ..

तिच्या बाहूंचा मांडव,
साडी गलबताचे शीड,
तिची महाकाय काया
ज्याचे ओझे अवघड..

सुस्त दुपारच्या प्रहरी,
ती घोरे भयाकारी,
मन थरारे थरारे,
नाद ऐकोनी अघोरी

पैजारबुवा,

अदभूतकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचिकनरतीबाच्या कवितावीररसकविताबालगीतइंदुरीऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

18 Sep 2019 - 2:38 pm | जॉनविक्क

खपल्या गेलो आहे.

मायमराठी's picture

18 Sep 2019 - 3:00 pm | मायमराठी

थाई भाषेत ५ या संख्येला 'हा' असे म्हणतात. विडंबन वाचून ५५५५५५५ झाले :)).

प्रचेतस's picture

18 Sep 2019 - 3:56 pm | प्रचेतस

पैजारबुवा रॉक्स =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Sep 2019 - 7:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

आज दुपारी दुपारी ।
घेतली पैजाराने सुपारी ॥

दुर्गविहारी's picture

18 Sep 2019 - 11:00 pm | दुर्गविहारी

हाण तिच्यायला !!! :-))))

जालिम लोशन's picture

18 Sep 2019 - 11:05 pm | जालिम लोशन

भन्नाट

रातराणी's picture

19 Sep 2019 - 2:06 am | रातराणी

पैजारबुवा कधीच निराश करत नाहीत.. :)

चांदणे संदीप's picture

19 Sep 2019 - 4:24 am | चांदणे संदीप

झक्कास! मूळ पाककृती इतकीच ही अंडे घालून केलेली पण टेसदार लागतेय. =))

Sandy

पाषाणभेद's picture

21 Sep 2019 - 12:29 pm | पाषाणभेद

एकदम खरे.
दोन्ही कविता वेगळ्याच आहेत.
यावर कुठलीही झाक नाही. नविन माल आहे एकदम.

नि३सोलपुरकर's picture

19 Sep 2019 - 12:42 pm | नि३सोलपुरकर