नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची शक्यता वर्तविली जात असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मोदी बुधवारीच रशियाच्या दौ-यावरून परत आले असून तेव्हापासून त्यांना सर्दी, तापाची लक्षणे आहेत.
नरेंद्र मोदी चार दिवसांचा रशिया दौरा करून बुधवारी रात्री परतले आहेत. तेव्हापासूनच त्यांना त्रास जाणवू लागला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ते आपल्या कार्यालयात होते. मात्र त्यानंतर ते घरी निघुन गेल्यानंतर त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. सध्या मोदी यांचे तीन दिवसांपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रविवारी मोदी सूरतमधील 8 कार्यक्रमांना हजेरी लावणार होते.
बिचारा डूक-या ताप कदाचित त्याला माहीत नसावे की तो कुणाशी खेळण्याचा प्रयत्न करतोय. अरे बाबा हे मोदी महाराज आहे. त्यांचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही.
प्रतिक्रिया
30 Oct 2009 - 3:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता या बातमीवर काय काथ्याकूट करायचा तेही सांगा अंमळ!
तो (स्वाईन फ्लू) आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं
कुठून कोण जाणे
नंतर प्रसारमाध्यमांना अक्कल आली
गणेशोत्सवानंतर
बातम्या कमी झाल्या,
घबराट कमी झाली.
पण अजूनही दिवसागणिक तेवढीच माणसं मरताहेत.
रोज मरे त्याला कोण रडे झालं का काय?
आधी हे वाक्य गद्य म्हणूनच लिहीलं होतं, पण किडे ना अंगात, म्हणून मग उगाच टी.जी.आय.एफ. चा एक प्रकार झाल्याचं दाखवत आहे. तेवढाच अवांतराला स्कोप!
अदिती
30 Oct 2009 - 11:59 pm | शाहरुख
२०१४ च्या निवडणूकीत मोदी भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याने भाजपचा 'प्लॅन बी' काय असावा या दिशेने काथ्याकूथ अपेक्षित असावा..
श्री. मोदींना दीर्घायुष्य चिंतून आपली रजा घेतो.
30 Oct 2009 - 3:07 pm | अमोल केळकर
काय खरंनाही त्या विषाणूच आता ! :| ( कोण असेल बरंया घटने मागं ?:? )
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
30 Oct 2009 - 3:09 pm | लबाड लांडगा
फ्ल्युमधून जरा ते सावरले की मी त्यांच्यासाठी मोसंबी,मिठाई घेवून जाणार आहे गुजरातला.कोणाला याय्चे आहे तर बोला.
लबाड
30 Oct 2009 - 3:34 pm | सूहास (not verified)
नाचा आता !!!
सू हा स...
30 Oct 2009 - 5:19 pm | बाकरवडी
हो त्यांना डुक्कर ताप झालाय हे स्पष्ट झालयं टीव्ही वर बघितले न्युजमधे.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
30 Oct 2009 - 6:17 pm | आशिष सुर्वे
ह्यात काँग्रेसच्या डुकराचा हात (की 'पंजा'?) असण्याची शक्यता नाकारता येत नाही..
असो, मानवतेच्या दॄष्टिकोनातून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही सदिच्छा!
-
कोकणी फणस
30 Oct 2009 - 6:29 pm | विजुभाऊ
:SS कपाळावर ठापक्कन हात मारल्याची स्मायली अजून सापडली नाही.
त्याना डुक्कर ताप झाला यात बातमी व्हावी असे सेन्सेशनल काय आहे .
उद्या त्यानी सकाळी दात घासले ही सुद्धा बातमी द्याल.
हम्म चालू द्या........"आजतक" आणि "सबसे तेज" टाईप भय्या पत्रकारी
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
30 Oct 2009 - 6:40 pm | सखाराम_गटणे™
स्वाइन फ्लूच्या संसर्गाने पुण्यातील तीन मुलांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या ९६ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. शहरात आणखी चार जणांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला असून सहाजण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. अशोक मेहता यांनी सांगितले.
आंबेगाव येथील साडेपाच महिन्याच्या प्रणीती सुनील लोहोकरे या मुलीला स्वाइन फ्लू झाला होता. उपचारासाठी गुरुवारी तिला वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ती मरण पावली.
काळेवाडीतील महेश उद्धव काळे (वय चार) याला स्वाइन फ्लू झाल्याने बुधवारी वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र , त्याच दिवशी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
हिंगोलीतील अमर विजय इंगळे या एक महिन्याच्या मुलास स्वाइन फ्लू झाला होता. उपचारासाठी त्याला पिंपरीच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये बुधवारी दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्याने शुक्रवारी सकाळी सात वाजता त्याचे निधन झाले.
पुण्यातील गुरुकुल शाळेत तिसऱ्या आणि पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना स्वाइन फ्लू झाला असून त्यांना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. शाळेतल्या अन्य विद्यार्थ्यांची तपासणी आरोग्य विभागाने सुरू केली असल्याचे डॉ. मेहता म्हणाले.
पुण्यात गुरुवारी पाच हजार ७४१ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४६८ जणांना टॅमिफ्लू देण्यात आले आहे. आयसीयूमध्ये २० पेशंट असून त्यापैकी सहाजण व्हेंटिलेटवर आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5180402.cms
---
30 Oct 2009 - 8:26 pm | पाषाणभेद
आता त्यांनी श्वास घेतला, जेवण केले, डावीकडे बघीतले अशा बातम्या पण येवू द्या व मिपा चा ईंडीया टिवी, महाराष्ट्र टाईम्स, संध्यानंद किमानपक्षी सकाळ होवू द्या.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें |)
30 Oct 2009 - 9:42 pm | संतोषएकांडे
भारतात स्वाईन फ्लु वर आज पर्यंत असरकारक लस उपलब्ध नाही.
मंगळवार पर्यंत देशात स्वाईन फ्लु च्या रुग्णांची संख्या १३,५४५ वर
पोहोचली. त्या पैकी ४५१ व्यक्ति देवशरण पावले.
ह्या रोगामूळे होणार्या मृत्युदरात ब्राझील आणी अमेरीका नंतर भारत
तीसरा देश आहे.
असो, कालच बडोदे शहरात एक ७५ वर्षीय वृध्ध मृत्यु पावले. एक
अडिच वर्षाच बाळ, तीन तरुण आणी दोन तरुण्या स्वाईन फ्लु मूळे
सीरीयस आहेत. शहरा बाहेर कोणीही त्याची नोंद घेतलेली दिसत नाहीये.
स्वाईन फ्लु कोणाचे काय वाकडे करु शकतो, माहीत नाही. येथे
तर बर्याच जागे वर महा मृत्युंजय मंत्र जप चालु झालेत.
करणार्यांच्या कंबरा नक्कीच वाकणार.... कदांचीत.
31 Oct 2009 - 1:50 am | प्राजु
व्हेरी फनी! :|
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/