सहजरावांची प्रेरणा उधार ;)
त्यांच्या म्हणन्या नुसार आम्ही आरश्यात पाहीले व सुटलेले पोट आणि फ्व्वाक्कन बाहेर आलेले कुल्ले पाहुन आम्हाला आमचीच लाज वाटली.
त्यांनी दिलेल्या कृतीत थोडी पारशी भर टाकली .
तर ही कृती खास आपल्या सहजरावांना समर्पीत....
साहीत्यः
१ मोठा मासा. (पापलेट असल्यास उत्तम.) नाहीच मिळाला तर मोठ्या माश्याच्या तुकड्या.
पापलेट आमच्या नशीबी कुठे :( त्या मुळे लोकल माश्यावर (क्रोकर ) प्रयोग केला.
हळद, मीठ, लिंबाचा रस
चटणी साठी.
लिंबाचा रस.
१ वाटी नारळ.
१/२ कांदा बारीक चिरुन.
१ चमचा आलं-लसुण पेस्ट.
कोथींबीर, पुदिना पाने.
१/२ चमचा बडीशेप.
२ हिरव्या मिरच्या.
मीठ, साखर चवीनुसार.
कृती:
१ ) कांदा बडिशेप थोड्या तेलावर परतुन मग वरील चटणीचे साहित्य एकत्र करुन चटणी वाटुन घ्या.
२) मासा स्वच्छ करुन पाठी कडुन एक मोठी चीर देउन चटणी भरण्या साठी जागा करुन घ्या.
माश्याला हळद मीठ, आणि लिंबाचा रस लावुन १/२ तास मुरत ठेवा.
तोव्हर ओव्हन पण १५० ते २०० डि.से. वर सेट करा.
३) तयार चटणी माश्यात भरुन. वरुन पण चटणी लावा.
४) शक्य असल्यास केळीच्या पानात अथवा अॅल्युमिनीयमच्या फॉईल मध्ये गुंडाळा आणि १५-२० मिनिटं ओव्हन मध्ये भाजुन घ्या.
(मी केळीच्या पानात बांधुन मग वरुन अॅल्युमिनीयमच्या फॉईल गुंडाळली)
प्रतिक्रिया
29 Oct 2009 - 8:39 pm | निमीत्त मात्र
वा! गणपाशेठ..
बाकी तो दोन नंबरचा फोटो म्हणजे शाकाहारी लोकांची कसोटी पाहाणारा आहे.
30 Oct 2009 - 10:00 am | विजुभाऊ
गणपाशेठ
एकदम मस्त पार॑शी रेसीपी दिलीत.
त्याचे नाव पात्रानी मच्छी असे आहे. ( पात्रा = अळुची /केळीची पाने )
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
30 Oct 2009 - 12:52 pm | गणपा
विजुभौ, सुनीलभौ योग्य नाव निर्देशनास आणुन दिल्या बद्दल धन्यवाद.
बदल केला आहे. :)
29 Oct 2009 - 8:42 pm | संदीप चित्रे
भरलं पापलेट म्हणजे तर जीव की प्राण रे गणपा :)
29 Oct 2009 - 8:44 pm | दिपाली पाटिल
मस्तच दिसतोय मासा...पण केळीचं पान इकडे मिळत नाही आणि अॅल्युमिनिअम फॉइलमधे मासा उकडणे सेफ आहे कां...त्याला काही पर्याय आहे कां?
दिपाली ;;) =P~
29 Oct 2009 - 8:46 pm | निमीत्त मात्र
'इकडे' म्हणजे कुठे ते समजल्यास माहिती देण्यास सोपे जाईल
29 Oct 2009 - 8:49 pm | दिपाली पाटिल
अमेरिकेत हो...
दिपाली :)
29 Oct 2009 - 8:53 pm | निमीत्त मात्र
मग मेक्सिकन दुकानात मिळतात की केळ्याची पाने
29 Oct 2009 - 8:56 pm | गणपा
दिपाली करदळीची पाने पण चालतील..
30 Oct 2009 - 4:25 am | लवंगी
इथे केळीची पान नाही मिळत तर कर्दळीची कुठुन आणणार!!
पण मासा दिसतोय फस्टक्लास.. :)
29 Oct 2009 - 10:21 pm | स्वाती२
फॉईल मधे होते छान! मी हळदीची पाने नसली तर फॉईलच वापरते
30 Oct 2009 - 5:24 am | प्रियाली
केळीची पाने मेक्सिकन दुकानात सहज मिळतात. इंडियन स्टोर्समध्येही मिळतात.
दोन्ही, शक्य नसेल तर केळीचं झाड लावा परसात. स्प्रिंग ते फॉलच्या दरम्यान केळीची पाने हमखास. माझ्या अमेरिकन शेजार्याच्या अंगणात दोन केळीची फोफावलेली झाडे आहेत.
29 Oct 2009 - 9:31 pm | jaypal
नेहमि प्रमाणे सुंदर रेसिपी.
येत्या रविवारि नक्की करुन पाहीन(खाइन)
ह्ळ्दीच्या पानात सुद्धा चंगली चव येइल असे वाटते , कसे?
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
29 Oct 2009 - 9:47 pm | प्रभो
वा वा वा छान......मस्त रे भावड्या
गणप्या, थोड्या सावकाश टाक ना भावा रेसेप्या...आठवड्याला एक या रेट ने.....
राजे.....................ती सुरी दे रे....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
29 Oct 2009 - 10:33 pm | स्वाती२
आज एकादशी तेव्हा नुसतेच =P~ =P~ =P~ =P~
29 Oct 2009 - 11:55 pm | विसोबा खेचर
-----!
तात्या.
30 Oct 2009 - 12:18 am | चतुरंग
चतुरंग
30 Oct 2009 - 12:38 am | श्रावण मोडक
वा वा, प्रतिसाद आवडला.
30 Oct 2009 - 12:54 am | शाहरुख
पण प्यादं ?? निदान घोडा तरी पाहिजे राव !!
30 Oct 2009 - 1:03 am | प्रभो
येस्स....घोडा हवा...मला पण रंगाशेट नी आधी कुठेतरी टंकलेली (घोडा)चतुरंग अशी सही आठवतेय...
30 Oct 2009 - 1:50 am | नंदन
सही पाकृ. ब्रिटानियाची आठवण आली. धनसाक, पात्रानी मच्छी, तळलेले बोंबील, बेरीनो पुलाव आणि कॅरॅमल कस्टर्ड! - जीव तुटका तुटका होतो :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
30 Oct 2009 - 1:09 pm | llपुण्याचे पेशवेll
हां.. मला वाटलंच होतं हे सगळं वाचून नंद्या अंमळ हळवा होईल म्हणून.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
30 Oct 2009 - 11:47 pm | वेदनयन
ब्रिटानियाशिवाय पात्रानी मच्छीला पर्याय नाही.
अर्थात गणपाने खाऊ घातल्यास मी विचार बदलण्यास तयार आहे...
30 Oct 2009 - 4:37 am | टुकुल
जबरा गणपा...
एकदम सोपी पाकृ वाटत आहे म्हणुन नो निषेध ... घरी करुन बघतो..
--टुकुल.
30 Oct 2009 - 6:10 am | सहज
हे आमचे गणपा शेठ! यांच्या पाककृतीवर आमचा भारी जीव हो!!
धन्यु रे!! :-)
30 Oct 2009 - 8:36 am | अवलिया
...............
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Oct 2009 - 10:24 am | आशिष सुर्वे
क्रोकर मुबलक आहे लागोसात.. पण खाण्याचा धीर नव्हता झाला.
छान दिसतोय हा हिरवागार मासा..
-
कोकणी फणस
30 Oct 2009 - 11:34 am | सुनील
पदार्थ पानात गुंडाळून शिजवण्याची पद्धत आगळीच. पानाचा स्वाद हलकेच त्या पदार्थात उतरतो! अॅल्युमिनियम फॉइलमध्ये ती मजा नाही!
पाकृ आणि फोटो मस्तच. फक्त शीर्षकात "पाथरानी" ऐवजी "पात्रा नी" असा बदल करावा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Oct 2009 - 1:05 pm | विनायक प्रभू
च्या पानात अगद्दी लय भारी.
30 Oct 2009 - 1:12 pm | गणपा
खरय सर, गावाकडे मिळतात हळदीची पान. त्यापानात चव अजुनच खुलते.
31 Oct 2009 - 2:22 am | धनंजय
भारतीय दुकानात ओली आंबेहळद मिळते. वाळूमिश्रित मातीत ("soil for citrus/cactus) मध्ये तिला कोंभ फुटून पाने येतात. (दहा-बारा ओल्या हळकुंडात एखादेच जिवंत असते.) कॅलिफोर्नियामध्ये ही वनस्पती वर्षभर जिवंत राहील, मुळांना दर वर्षी नवे कोंभ फुटतील. (ईशान्येकडे दरवर्षी नव्याने सुरुवात करावी लागते.)
आंबेहळदीची पाने स्वादाला हळदीच्या पानांसारखीच असतात.
क्वचित ओली हळदकुंडेही दुकानात दिसलेली आहेत - उगवायचा प्रयोग अजून केलेला नाही.
पुण्यातसुद्धा घरी कुंडीत हळदीचे रोप लावायला हरकत नाही.
3 Nov 2009 - 10:56 am | मसक्कली
=P~
गणूशेठ....लगे रहो.. ;)
8>