डॅनबरी

प्रभो's picture
प्रभो in काथ्याकूट
28 Oct 2009 - 4:08 pm
गाभा: 

चंगळवादी आणी आद्य विठोबा रहिवासी असलेल्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानी कनेक्टीकट भागातील डॅनबरी क्षेत्री अथवा जवळपास कोणी मिपाकर वारकरी राहतात का?? असल्यास कळवा.

अवांतरः येत्या ९ तारखेपासून ३-४ महिन्यासाठी माझी बदली तिकडे होतेय......

प्रतिक्रिया

लबाड लांडगा's picture

28 Oct 2009 - 4:16 pm | लबाड लांडगा

ई हे काय नाव! त्यापेक्षा न्यु यॉर्क,न्यु जर्सी,डेन्वर,लॉस एंजेलिस ही नावे बरी वाटतात.
लबाड

प्रभो's picture

28 Oct 2009 - 4:28 pm | प्रभो

आवं तिकडची लोक डॅनिश कॅडबर्‍या लै खायची असं आयकायला आलंय..म्हणून डॅन-बरी

हे न्यु-यॉर्क पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

पर्नल नेने मराठे's picture

28 Oct 2009 - 4:27 pm | पर्नल नेने मराठे

मला क्रॅनबेरी माहितेय ;)
चुचु

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Oct 2009 - 5:21 pm | ब्रिटिश टिंग्या

मला ब्लॅकबेरी माहितेय ;)
टुटु

सूहास's picture

28 Oct 2009 - 6:06 pm | सूहास (not verified)

मला काहीही माहित नाही :(

सू हा स...

प्रभो's picture

28 Oct 2009 - 6:12 pm | प्रभो

तूपाची बेरी मला माहीत आहे.. =))

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

सूहास's picture

28 Oct 2009 - 6:18 pm | सूहास (not verified)

तसे मग मला मदरमेरी माहीत आहे =))

सू हा स...

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Oct 2009 - 8:13 am | llपुण्याचे पेशवेll

मला तर मदर तेरी पण माहीत आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

बाकरवडी's picture

29 Oct 2009 - 11:56 am | बाकरवडी

तसं तर मला कादंबरी माहीत आहे.

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

अमोल केळकर's picture

29 Oct 2009 - 9:16 am | अमोल केळकर

मला फक्त कॅडबरी माहित आहे :)
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विशाल कुलकर्णी's picture

28 Oct 2009 - 5:08 pm | विशाल कुलकर्णी

अच्छा म्हणजे तु पण काही दिवसांसाठी आद्य विठोबाचा वारकरी होणार तर. चंगळवादी कुठला? ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

दशानन's picture

28 Oct 2009 - 5:10 pm | दशानन

तुझ्यात मला सावंतकाका दिसत आहेत राव ;)

परिकथेतील राजकुमार's picture

28 Oct 2009 - 5:54 pm | परिकथेतील राजकुमार

चला म्हणजे आता तुमच्याही डोळ्यावर हिरवा माज येणार आणी तुम्ही रेषेवरच्या अक्षरांना धन्य मानु लागणार !

असो..

जाताना 'ने मजसी ने' ची ध्वनीमुद्रीका न्यायला विसरु नये. तिकडे स्कॉचचे ४/५ पेग झाले की हि ध्वनीमुद्रीका लावुन अमेरीकेची टिमकी वाजवतात आणी उरलेले अनिवासी कोल्हापुरी चपला घालुन त्यावर ताल धरतात म्हणे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

लबाड लांडगा's picture

28 Oct 2009 - 6:14 pm | लबाड लांडगा

थंडी चालु झाली आहे तेव्हा डिंकाचे लाडु न्यायला विसरू नकोस्.अनारसे,चिरोटे,चिवडा तिकडे चांगले पचतात.हॅड बॅगेज मध्ये हल्दीरामची दोन्-तीन पाकिटे आठवणीने ठेव. तुरीची डाळ,थोडे तांदूळ खिचडी साठी उपयोगी पडतील.बर्गर जपून खा.कोक जास्त नको.
पंढरपूरला नक्की जावून ये.विठोबांना जगाच्या शांततेची काळजी असते त्यामुळे सदैव कामात असणार्‍या विठोबांचे दर्शन दुर्मिळ असते असे ऐकलयं. नाही जमले तर मनातल्या मनात नमस्कार करायचा.General eletric साठी योगदान देणारे भारतिय वारकरी कनेक्टीकट मध्ये खूप आहेत.ते मदत करतीलच.
तुझाच
लांडगा

प्रभो's picture

28 Oct 2009 - 6:20 pm | प्रभो

म्या पन General eletric साठीच चाल्लोय...पन आमच्या पत्नीचे (पटनीचे) नातेवाईक फार कमी आहेत तिकडे....

बाकी, तुमचा सल्ला पराताईच्या आजच्या सल्ल्यासोबत लक्षात ठेवला आहे.....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अक्षय पुर्णपात्रे's picture

29 Oct 2009 - 12:23 am | अक्षय पुर्णपात्रे

प्रतिक, थंडी असणार तेव्हा गरम कपडे आणायला विसरू नकोस. बाकी सूचना श्री लांडगा यांनी दिल्याच आहेत. आणि हो, तिकडे थोडे उत्तरेला गेलास तर मराठी संस्थळांवरचे विठोबा भेटतील. त्यांचे जरूर दर्शन घे. (श्री घाटपांडे यांच्याकडे भजनाच्या ध्वनीफिती मिळतील.) कनेट्टीकट मध्येच कवीमंडळीही आहेत, त्यांनाही जमल्यास भेट दे. जमल्यास श्री सुनीत यांनी लिहिलेल्या अमेरिकन मिपाकरांविषयी (तेच ते कोडगे मिपाकर) लेखमालेचा दुवा श्री सहज यांच्याकडून व्यनि करून मिळव.

संदीप चित्रे's picture

29 Oct 2009 - 12:37 am | संदीप चित्रे

>> अनारसे,चिरोटे,चिवडा तिकडे चांगले पचतात.हॅड बॅगेज मध्ये हल्दीरामची दोन्-तीन पाकिटे आठवणीने ठेव. तुरीची डाळ,थोडे तांदूळ खिचडी साठी उपयोगी पडतील.>>
ह्या सगळ्या गोष्टी आणण्यापेक्षा एक न्यू जर्सीला चक्कर मार ... सगळ्या वस्तू इथेच मिळतील :)

बाकी प्राजुने कळवले आहेच की ती जवळ राहते.
मी न्यू जर्सीला आहे.. डॅनबरीपासून साधारण अडीच तासांवर.
व्यनिने फोन # कळवतो.

शाहरुख's picture

29 Oct 2009 - 1:44 am | शाहरुख

श्री लांडगा यांची यादी वाचून क्षणभर वाटले की अळिवाचे लाडू आणि तुपात भिजवलेले (की भाजलेले ?) खजुर सांगायचे राहिले की काय ?

तुझे लक्ष इकडे तिकडे विचलित न होता कामावर केंद्रित राहून सोपवलेल्या कामगिरीत उत्तम यश संपादन करता येओ (की येवो ?) यासाठी शुभेच्छा !!

पक्या's picture

28 Oct 2009 - 11:33 pm | पक्या

प्रवासासाठी शुभेच्च्छा.
ऐन थंडीतच येत आहात. कनेक्टीकटात खूप थंडी असते. भारतातून आल्या आल्या तर जरा जास्तच वाजते.
आतल्या कपड्यांचे ६-७ जोड आणावेत. इथे रोजच्या रोज कपडे धुत नाहीत. साठवून ठेवून आठवड्याला (घरच्या / बाहेरच्या) लाँड्री मध्ये धुतात.

वाटाड्या...'s picture

28 Oct 2009 - 11:48 pm | वाटाड्या...

भाऊ...

येताना औषधं घेऊन ये रे. नाहीतर पांढर्‍या घरातला विठोबा सोडुन खरा विठोबा आपल्या पायाशी घेईल. ह्या पंढरीमधे आता स्वाईन फ्लु ढिंगाणा घालायला सुरुवात झालीय.

मला रासबेरी पण माहीतेय....;)
- वा

टारझन's picture

29 Oct 2009 - 12:02 am | टारझन

काय पाण्चटपणा चाल्लाय रे फोकलिच्यांनो .. त्यानं एवढं कौतुकानं धागा टाकलाय .. आणि तुम्ही त्याचं कौतूक करायचं सोडून कोदा (पक्षी: धाग्याची वाट) लावताय ?
आं ...
प्रभ्या ... हामेरिकेला चालल्याबद्दल तुला भरपुर शुभेच्छा @! येताना मला एक ८ जीबी चा आय-फोन घेउन ये... अनलॉक करून :)

पहिल्यांदा गेलास की विठोबाच्या पाया पड ... तिकडे एक सावतामाळी भजन म्हणत असेल .. त्यांनाही नमस्कार कर :)

असो .. बाकी सुज्ञ आहेस .. मजा करा .. पण गेलेत तसे या .. काही नविन(किंवा एग्झिस्टिंग) व्हायरस आणु नका तिकडून

प्राजु's picture

29 Oct 2009 - 12:15 am | प्राजु

मी मँचेस्टर मध्ये आहे कनेक्टीकट मध्ये.
डॅनबरी आमच्या इथून जवळ आहे.
व्य नि मध्ये माझा फोन नं कळवते आहे.
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/

निमीत्त मात्र's picture

29 Oct 2009 - 12:46 am | निमीत्त मात्र

फारीन टूरला शुभेच्छा!!

आमची एकच सूचना: कनेक्टिकटचा उच्चार 'कनेटीकट' असा करा. क्ट मधला 'क' उच्चारायचा नसतो. गंमत म्हणजे तिथे अनेक वर्ष वास्तव्यास असलेल्या माझ्या मित्राला आणि त्याच्या बायकोला हे माहितीच नव्हते. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Oct 2009 - 8:17 am | llपुण्याचे पेशवेll

तुझ्या फारीन टूरला आमच्या शुभेच्छा. इतर कुठल्या ठिकाणांची माहीती हवी असेल तर व्यनी कर उत्तर मिळेल. :)

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

प्रभो's picture

10 Nov 2009 - 3:48 am | प्रभो

पोचलो...काल संध्याकाळी सुखरूप पोचलो... :)

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

शेखर's picture

10 Nov 2009 - 6:03 am | शेखर

फोन नंबर व्यनी कर