आठवण.......

विवेकवि's picture
विवेकवि in जे न देखे रवी...
4 Mar 2008 - 7:56 pm

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवनीने दे

बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवनीने दे

बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे

उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवनीने दे

मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे
मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवनीने दे
आठवणीने दे.....

कविता आली आहे लेखक माहित नाहीत........

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

4 Mar 2008 - 9:46 pm | सुधीर कांदळकर

निष्काळजी टंकण्यामुळे बेरंग झाला. एक तर कविता न कळणा-यांना ती समजणे अगोदरच कठीण जाते. दहादा वाचावी लागते तेव्हा मडक्यात शिरते. वाचायलाच अडथळा आला तर ........

असो. नीटनेटकेपणा कोणत्याहि गोष्टीचे सौंदर्य वाढवतो हे खरेच. काही कवि तर अक्षरे तेखील रंगात टंकतात. ती सुबक अक्षरे पाहूनच मन तृप्त होते. म्हणून तर कोणतेहि प्रॉडक्ट सुंदर पॅकिंगमध्येच विकतात. हाच नीटनेटकेपणा, चोखंदळपणा, नंतर शब्दयोजनेतहि उतरेल. आणि कविता जास्त सुंदर आकर्षक होईल.

अनाहूत कडू सल्ल्याबद्दल क्षमस्व.

पुढील कवितेसाठी. शुभेच्छा.

विसोबा खेचर's picture

5 Mar 2008 - 11:36 am | विसोबा खेचर

बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे

वा, सुंदर!