हराभरा कबाब

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in पाककृती
23 Oct 2009 - 12:12 pm

साहित्य :
कोबी ; गाजर ; फरसबी ; स्लाईस ब्रेड ; पनीर ; हि.मिरची (ठेचा) ; मीठ ; चाट मसाला ; चिली सास ;
बटर चुरा ; तेल .

कृती :
कोबी,गाजर,फरसबी,पनीर सर्व किसून घ्यावे . स्लाईस ब्रेड कोरडाच मिक्सरमधून चुरा करून घ्यावा.
भाज्यांचे पाणी काढून टाकावे.
नंतर सर्व भाज्या ,पनीर , ब्रेड कच्चेच एकत्र करावे. त्यात चवीप्रमाणे मीठ , चाट मसाला , चिली सास , ठेचा हे सर्व घालून नीट मळून घावे.

नंतर त्याचे कबाब च्या आकाराचे छोटे गोळे करून बटरच्या ( ही बटर म्हणजे बेकरीत जी कडक बटर मिळतात ती ) चु-यात घोळवून घावे.

तेल तापवून त्यात मंद आचेवर खरपूस तळून घ्यावे व चिंच खजुराच्या गोड चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करावे.

प्रतिक्रिया

माधुरी दिक्षित's picture

23 Oct 2009 - 12:19 pm | माधुरी दिक्षित

रेसिपी मस्त आहे पण फोटो जरा मोठे करा.

प्रभो's picture

23 Oct 2009 - 12:57 pm | प्रभो

रेसिपी मस्त आहे पण फोटो जरा मोठे करा.

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

सहज's picture

23 Oct 2009 - 3:24 pm | सहज

रेसिपी मस्त आहे पण फोटो जरा मोठे करा.

दशानन's picture

23 Oct 2009 - 4:16 pm | दशानन

रेसिपी मस्त आहे पण फोटो जरा मोठे करा. X(

चार लोक सांगत आहे तर .... करावे माणसानं असा हट्ट करु नये.. करा बघू फोटो मोठे.... :D

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

टारझन's picture

26 Oct 2009 - 4:22 pm | टारझन

काय मोठे करा मोठे करा चालवलंय रे चोच्यांनो ? आहे त्यात समाधान माना ना !!

संतोष साहेब .. पाकृ जबरा .. हराभरा कबाब क्रिस्पी असले की लै भारी लागतात

- (हिरवे आणि भरलेले कबाब प्रेमी ) टारझन

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Oct 2009 - 2:44 pm | llपुण्याचे पेशवेll

हेच म्हणतो. मी हल्ली ते भोक्ते पण फुकटात र्‍हस्वाचे दीर्ध करत नाहीत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

राधा१'s picture

23 Oct 2009 - 12:44 pm | राधा१

सही आहे...पण फोटो जरा मोठे लावा ना :-)

नंतर त्याचे कबाब च्या आकाराचे छोटे गोळे करून बटरच्या ( ही बटर म्हणजे बेकरीत जी कडक बटर मिळतात ती ) चु-यात घोळवून घावे.
ह्याच्या ऐवजी ब्रेडक्रंप्स वापरले तर चालतील का?

गणपा's picture

23 Oct 2009 - 1:31 pm | गणपा

मस्त रेसीपी. फोटो मोठे करा राव थोडे.

मसक्कली's picture

23 Oct 2009 - 3:23 pm | मसक्कली

तोन्डाला पाणी सुटल... =P~

पण फोटो मोठे लावा .... आजुन छान वाटेल...!! :D

मग <:P <:P <:P <:P

अश्विनीका's picture

23 Oct 2009 - 11:02 pm | अश्विनीका

ही वेगळीच रेसिपी आहे . मी खाल्लेल्या हराभरा कबाब मध्ये पालक , मटार आणी बटाटा ह्या भाज्या वापरलेल्या होत्या.
- अश्विनी

प्राजक्ता पवार's picture

26 Oct 2009 - 3:31 pm | प्राजक्ता पवार

प्राजक्तापवार

बरोबर ! हरभरा कबाबमध्ये पालक , मटार , बटाटा ह्या भाज्या असतात. :)

नेहमी आनंदी's picture

26 Oct 2009 - 3:41 pm | नेहमी आनंदी

कुठे आहेत फोटो?
पण रेसिपी मस्त +१

नेहमी आनंदी's picture

26 Oct 2009 - 3:42 pm | नेहमी आनंदी

दिसलेत हो उशिरा दिसले

चुकभूल द्यावी घ्यावी.

पर्नल नेने मराठे's picture

26 Oct 2009 - 3:44 pm | पर्नल नेने मराठे


चुचु

राधा१'s picture

26 Oct 2009 - 4:51 pm | राधा१

चुचु ताई हे तर हिरवे दिसत नाही आहेत...दुसर काय नाव द्यायच बर?

टारझन's picture

26 Oct 2009 - 5:03 pm | टारझन

लाल पिला कबाब !!

पर्नल नेने मराठे's picture

26 Oct 2009 - 5:36 pm | पर्नल नेने मराठे

:D
चुचु

मसक्कली's picture

27 Oct 2009 - 12:31 pm | मसक्कली

लाल ,पिला,हरा, कबाब !! ;)
:D >:)

विसोबा खेचर's picture

27 Oct 2009 - 12:53 pm | विसोबा खेचर

व्वा! व्वा! :)

आशिष सुर्वे's picture

27 Oct 2009 - 5:35 pm | आशिष सुर्वे

दूरून डोंगर साजरे (हरेभरे) होते!!
जवळ आल्यावर्र लालभरे झाले..

असो.. छान आहे!
आपल्याला भारी आवडला आपला पदार्थ!
-
कोकणी फणस

पक्या's picture

27 Oct 2009 - 10:25 pm | पक्या

ही हराभरा कबाब ची रेसिपी नव्हे. व्हेज - पनीर कबाब असे काहितरी नाव द्या ब्वॉ.
हराभरा कबाब मध्ये मटार, पालक (पालक तर हवाच हवा) आणि बटाटा असतो.
गुगलून बघितल्यावर ही जेवढ्या काही साईट्स मिळाल्या त्यात प्रामुख्याने ह्याच भाज्या वापरलेल्या आहेत.

http://www.indobase.com/recipes/details/hara-bhara-kebab.php

http://www.indiaexpress.com/cooking/hara_bhara_kabab.html

दिपाली पाटिल's picture

28 Oct 2009 - 11:05 pm | दिपाली पाटिल

चिली सास ??
तिखट सासू घ्यायची कां काय??? :D

पण हराभरा कबाब मध्ये पालक असतोच खरा...हे ही छान च दिसतायत, खाणारे कुठे एव्ह्ढा विचार करतात...कबाब काय लगेच फस्त होतात..

दिपाली :D

श्रीयुत संतोष जोशी's picture

30 Oct 2009 - 7:22 am | श्रीयुत संतोष जोशी

सर्वांना अनेक धन्यवाद.
काहीतरी लोचा आहे. फोटो मला मोठे करता येत नाही आहेत.
भरपूर प्रयत्न केला.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.