स्टिम्ड फिश - एक हेल्दी रेसीपी

सहज's picture
सहज in पाककृती
23 Oct 2009 - 10:51 am

हा गणपा सांगून देखील नुस्ता तळतळाट करत राहील्याने व क्रस्टेशनच्या डिश बनवत राहील्याने मासा पाकृ मलाच द्यावी लागतीय. अरे पोट आणी कुल्ले फ्व्वाक्कन बाहेर आली तरी नुस्ते तळकट पदार्थ हाणताय तुम्ही सगळे. लेको जरा बनवा मी सांगतो ते पदार्थ. मग आवडती स्त्रीला आवडेल असे काही आवडते काम करु शकाल. खालच्या डीश मधे तेल वापरले नाही म्हणून इथे नमनाला दोन चमचे ;-)

बरं तर उत्तम मासे निवडायला लागणारी "साधना" नसेल किंवा तुमची आवडती "कोळीण" नसल्यास, तुमच्या आवडत्या मॉल / बाजारात जाउन फ्रेश सी फूड विभागातून तुम्हाला आवडेल असे ताजे कापलेले माश्याचे काप विकत घ्या. मी गुरामी नावाच्या माश्याचे काप घेतले आहे. शिजल्यावर एकदम मस्त शुभ्र जसे कवड्या दह्याचा काप व्हावा असा एकदम मउ. अजिबात उग्र वास नाही म्हणुन आवडतो.

साहीत्य

मॅरीनेशनसाठी - लीम्बु रस, मीठ, तिखट, हळद, खिसलेले/पेस्ट आले (प्रमाण तुम्हीच ठरवा - मीठ व हळद चिमुटभर बाकीचे चवीनुसार)

शिजवताना - आले उभे बारीक चिरलेले काप. मिरच्या उभे बारीक चिरलेले काप, कोवळी कांद्याची पात चिरलेली.

एक स्टिमर आधुनि़क, जुना (मोदक पात्र) किंवा वापरण्याजोगा (cooking steamer images असा सर्च मारा) काहीनाही तर खाली एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळा व वरती एका चाळणीत छान केळ्याच्या पानात गुंडाळून मासा ठेवा वाफेवर शिजेल.

पाककृती

माश्याचे काप वर दिलेले साहीत्य लावून मॅरीनेड करा, किमान तासभर.

मग स्टीमरमधे ते काप ठेवुन त्यात तुम्हाला आवडतात तेवढे मिरच्याचे काप शक्यतो एक किंवा दोन पुरतील एका कापाला. आल्याचे काप (शक्यतो कोवळे आले असे की नुस्ते आले खायला देखील छान लागतील) थोडी कांद्याची पात कापलेली टाकून शिजवा. १० - १५ मिनिटात काप शिजतील.

मग तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत तुमचे आवडते सॅलाड, आवडती रक्त वारुणी/ ज्युस, आवडती फळे.. यकदम झकास बेत!!

प्रतिक्रिया

संजीव नाईक's picture

23 Oct 2009 - 10:57 am | संजीव नाईक

=D> 8} सहज
स्वा:द लाजबाब.........
जर मॅरीनेशनसाठी - बेडेकरचे रसलीम्बु वापरले तरी चालेल.
जिंभेचे चोचले
संजीव

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2009 - 11:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदम जहाल आणि मादक सोडून मासे वाफवायचं कारण काय, का सहजच?
असो, शाकाहारी असल्यामुळे परमेश्वराच्या प्रथमावताराला वाफवण्याबद्दल मतप्रदर्शन करता येणार नाही. पण कंपूबिंपूत अजून असल्यामुळे प्रतिसाद टाकत आहे. ;-)

साधना करण्यासाठी आणि जवळच्या बाजारात कोळणी येण्यासाठी सहजकाकांना शुभेच्छा!

अदिती

निखिल देशपांडे's picture

23 Oct 2009 - 11:07 am | निखिल देशपांडे

असो, शाकाहारी असल्यामुळे परमेश्वराच्या प्रथमावताराला वाफवण्याबद्दल मतप्रदर्शन करता येणार नाही. पण कंपूबिंपूत अजून असल्यामुळे प्रतिसाद टाकत आहे.
=)) =))
आम्हीबी...
जवळच्या बाजारात कोळणी येण्यासाठी आमच्याबी सहजकाकांना शुभेच्छा!

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2009 - 11:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाकृ भारी. :)

Nile's picture

23 Oct 2009 - 11:30 am | Nile

सहज काका या जरा इकडे! मासे खाउन जमाना झाला राव! आजच एका मैत्रीणीला बनवायला सांगीतलंय बघु विकांताला जमलं तर.

पाणी सुटलं राव!

सुनील's picture

23 Oct 2009 - 12:16 pm | सुनील

आधी कविता आणि मग पाकृ. असो, यानिमित्ताने का होईना पण सहजरावांना लिहिते झालेले पाहून आनंद झाला.

गुरामी (Gourami) हा गोड्या पाण्यातील मासा. तसा कुठलाही मासा तळला की उत्तमच लागतो पण वाफावलेला मासा करण्यासाठी तो आकाराने मोठा असेल तरच बरा लागतो. गुरामी हा त्यासाठी उतम पर्याय. तसे पापलेट, सुरमई इ. खार्‍या पाण्यातील पर्याय वाफवून खाल्ले आहेत. आता हा प्रकार पहायला हवा.

एक वेगळी पाकृ दिल्याबद्दल सहजरावांचे अभिनंदन!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अवलिया's picture

23 Oct 2009 - 12:24 pm | अवलिया

कसे का असो... सहजराव लिहिते झालेत.. बरे वाटले.

व्यनीतुन खराखुरा प्रतिसाद आणि धाग्यावर +१ सहमत ही खोड वय वाढलं तशी कमी होत चाललेली दिसतेय.

आनंद आहे.

दिवाळी अंकावर स्पष्ट प्रतिक्रिया लिहुन त्यांनी आपण विचार पण करु शकतो याची चुणुक दिलीच आहे, भविष्यात त्यांच्या कडुन फार अपेक्षा आहेत.

त्यांच्या क्षमतेचा विचार करता अनेक दिवाळी अंकातील पाटीटाकु लेखकांच्या पोटात गोळा आला असेलच या बद्दल आम्हाला तरी काही शंका नाही.

त्यांनी लिहिते रहावे येवढे सांगुन माझा प्रतिसाद आटोपता घेतो.

अरे हो, माशाची पाकृ छान हा उल्लेख करायचा राहिला, अन्यथा प्रतिसाद अवांतर ठरेल.

हल्ली संपादकांना डायरेक्ट खरडीतुन सुपा-या दिल्या चुकलो चुकलो विनंत्या केल्या जातात. :)

तसेही आता प्रगल्भ मिपाच्या वातावरणामुळे आमच्यासारख्यांना केवळ गेले ते दिन गेले असेच सुस्कारे टाकत बसावे लागते. असो.

सहजराव आगे बढो ! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विंजिनेर's picture

23 Oct 2009 - 12:35 pm | विंजिनेर

हा गुरामी पोलॉक सारखा का दिसतोय?
असो. वाफावलेला मासा हा आमचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे पाकृ बद्दल धन्यवाद...

गणपा's picture

23 Oct 2009 - 1:06 pm | गणपा

चला सहजरावांना उद्युक्त करण्यासाठी वापारलेली चाल यशश्वी झाली म्हणायची ;)
अहो इतकी उत्तम डिश बनवणारे तुम्ही माझ्या पाककृतीची कसली वाट पहात बसला होतात.

या बल्लवाचे एकसे एक अविष्कार लवकर लवकर पहायला मिळो ही तो आम्हा मिपाकरांची इच्छा :)

तेवढेच आमचे कुल्ले आणि ढेरी आत जायला मदत. ;)

सुबक ठेंगणी's picture

23 Oct 2009 - 2:31 pm | सुबक ठेंगणी

हाऊ 'मीन' ऑफ यू सहज! ;)

आता मराठीत...
मस्त आणि स्वस्थ रेसिपी!
:)

विजुभाऊ's picture

23 Oct 2009 - 3:08 pm | विजुभाऊ

हाऊ 'मीन' ऑफ यू सहज
हे तर अस्सल संस्कृतोद्भव वाक्य आहे
अहो मीनः या सहजः

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सुबक ठेंगणी's picture

23 Oct 2009 - 3:18 pm | सुबक ठेंगणी

हाहाहा...बाकी संस्कृतही चालेल...फक्त 'मीन' शब्द मात्र संस्कृत आणि इंग्रजीतच घ्यावा.

प्रभो's picture

23 Oct 2009 - 2:42 pm | प्रभो

छान...जबहरा!!

--प्रभो

नंदन's picture

23 Oct 2009 - 2:48 pm | नंदन

मस्त पाकृ, सहजकाका. स्वास्थ्याच्या दृष्टीने तर विशेषच. तळलेल्या आणि दबदबीत आमटीतल्या माशांना पर्याय नाही हे खरं, पण अधूनमधून वाफ दवडून शिजवलेला मासाही चांगला लागतो :).

एक शंका : वाफेवरच्या माशासोबत श्वेत वारुणी अधिक उत्तम ना? त्यातही शार्डने?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

23 Oct 2009 - 2:53 pm | सहज

बरोबर. तो देखील एक स्टीरीओटाईप आहे खरा. ;-)

सुनील's picture

23 Oct 2009 - 2:54 pm | सुनील

वाफेवरच्या माशासोबत श्वेत वारुणी अधिक उत्तम ना?
बरोबर. श्वेत मांसाला संगत श्वेत वारुणीचीच! उगाच वर्णसंकर कशाला?
शार्डनी हा पर्याय उत्तम वाटतो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मिसळभोक्ता's picture

23 Oct 2009 - 10:43 pm | मिसळभोक्ता

आमच्याकडे माशासोबत रिझलिंग पिण्याची अनादि अनंत कालापासून प्रथा आहे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विंजिनेर's picture

24 Oct 2009 - 1:01 pm | विंजिनेर

रिझलिंग

ह्ममम्म.. जर्मनीतली का इटालीतली?

विंजिनेर(ली)

सुनील's picture

24 Oct 2009 - 1:21 pm | सुनील

रिझलिंग ही जर्मन वाईन.

खरं म्हणजे वाईन घ्यावी तर दक्षिण युरोपातीलच आणि उत्तर युरोपातील बियर! (अति उत्तरेकडील वोड्कादेखिल!)

उगाच उडप्याचा हॉटेलात जाऊन तंदुरी चिकन मागवण्यात आणि एखाद्या सुलेमानकडे इडली-सांबार खाण्यात काय अर्थ आहे?

(कट्टर जातीयवादी) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विंजिनेर's picture

23 Oct 2009 - 3:14 pm | विंजिनेर

त्यातही शार्डने?

गावी दा गावी पण छान लागते हो..

विसोबा खेचर's picture

23 Oct 2009 - 3:25 pm | विसोबा खेचर

सुसाट!

तात्या.

टारझन's picture

24 Oct 2009 - 12:53 pm | टारझन

बूंगाट!

-- खेचरिया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

दशानन's picture

23 Oct 2009 - 4:11 pm | दशानन

:|

छे मासें पण काय खाण्याची वस्तू आहे... नाही आवडले !

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

मस्त हो सहजकाका!!

स्वाती२'s picture

23 Oct 2009 - 4:39 pm | स्वाती२

मस्त! हा गुरामी मिळायची शक्यता नाही पण हॅलिबट वापरुन करेन हळदीच्या पानात.

धनंजय's picture

24 Oct 2009 - 1:01 am | धनंजय

आणि दिसायलाही लोभस पाकृ.

मस्त!

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 1:16 am | अक्षय पुर्णपात्रे

धनंजय यांच्याशी सहमत.

चित्रा's picture

24 Oct 2009 - 8:49 am | चित्रा

१ माकड, ०.०१ सेकंद.

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 12:57 pm | मिसळभोक्ता

वैनी,

जबरा..

(आम्ही आत्ताच ठरवले, की आता प्रतिसाद द्यायचे ते (क्ष, य) ह्या स्वरूपात. क्ष म्हणजे माकडांची संख्या, आणी य म्हणजे लागणारी मिनिटे. आणि नेमके तेच तुम्ही केलेत. धन्य. (१०००, ६०) ला आमचा नमस्कार सांगा.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मराठमोळा's picture

24 Oct 2009 - 1:12 pm | मराठमोळा

एकदम सोपी सरळ आणी मस्त पाकृ. :)
आवडली...

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

काजुकतली's picture

8 Feb 2014 - 3:44 pm | काजुकतली

मस्तच एकदम.. मीही असाच करते पण सोबत आले, मिरची इ. साहित्य कधी वापरले नाही. अता करुन पाहिन.