गाभा:
मी PCMC हद्दीमध्ये प्लॉट पाहिला आहे. तो मला कर्ज क्कगून घ्यायचा आहे. पण त्या प्लॉटचे NA झालेले नाही. मला माहिती हवी आहे की NA नसताना मला कर्ज मिळेल का? मिळत असेल तर कुठल्या Bank मधून मिळेल? जर मी स्वतः NA करून घेतले तर किती खर्च येईल?
कॄपया जाणकारांनी मदत करावी. यासंदर्भात कुणी जणकार असतील तर त्यांची मदत मिळाली तर बरे होईल.
मदतीच्या अपेक्षेने वाट पाहणारी
राजमुद्रा :)
प्रतिक्रिया
22 Oct 2009 - 1:26 pm | विनायक प्रभू
कशाकरता घेताय भौ ते सांगा की?
धृतं कृत्वा लोनं पिबेत ही म्हण माहीत आहे ना?
22 Oct 2009 - 1:48 pm | गणपा
मास्तर, तो तो न्हवेच तो ती आहे..
>> मदतीच्या अपेक्षेने वाट पाहणारी
बाकी आपल्याला याबद्द्ल काही कल्पना नाही, जाणकार मिपाकर मदतीचा हात देतीलच.
22 Oct 2009 - 2:14 pm | स्वाती राजेश
माझ्या माहितीप्रमाणे प्लॉट एन.ए. असल्याशिवाय बँक लोन देत नाही. तसेच इंडेक्स २ असेल तर चालेल पण त्या प्लॉटवर ६ महिन्याच्या आत बांधकाम करावे लागते. हे सर्व नियमातील.....बाकी काही प्रायव्हेट बँक नियम धाब्यावर बसवून देतात....
बाकीची माहिती जाणकार देतीलच.
22 Oct 2009 - 2:22 pm | झकासराव
मला माहिती हवी आहे की NA नसताना मला कर्ज मिळेल का??????>>>>>>>>
मिळेल की.
सध्या तरी आयडीबीआय बॅन्क अशा गुन्ठेवारी असलेल्या जमिनीना लोन देते.
पण जमिन घेवुन घर बान्धने ह्यासाठीची प्रोसिजर माहिती नाही.
आयडीबीआय किन्वा सारस्वत बॅन्क हे दोन पर्याय आहेत. (मला दोनच माहिती आहेत. अजुन काही सहकारे बॅन्का देत असव्यात)
बाय द वे, जमिन कोणत्या येरीयात, किती आणि काय दराने घेताय ही किन्चीत माहिती द्या की. आम्ही देखील शोधतोय.
एन ए करण्यासाठी किती खर्च येइल ते माहिती नाही पण जमिन कॉर्पोरेशन हद्दीत असेल तर त्यावर काही आरक्षण आहे का ते बघाव लागेल. ती रेसिडेन्शियल झोन मध्ये हवी.
बाय द वे,
जमिनीची कागदपत्रे काय बघवीत इत्यादी माहिती एक लेख लिहुन देणार काय??
22 Oct 2009 - 2:49 pm | वेदश्री
बॅंकांबद्दल झकासरावांनी माहिती दिली आहेच. व्याजाचा दर वाजवीपेक्षा जास्त असतो असे माझे मत आहे.
NA करून घेणे ही सोपी गोष्ट नाही. टेबलावरून आणि खालून, ऑफिसच्या आत आणि बाहेर बर्याच जणांना बरेच पैसे द्यावे लागतात. शिवाय अशी पैसे देण्याची तयारी असली तरी NA करून मिळेलच याचीही शाश्वती नाही. अर्थात NA करून मिळाले तर ५० हजाराची जमिन ५० लाखातही विकता येऊ शकते म्हणे!
ज्या जमिनीत पीक निघू शकते ती जमिन कागदोपत्री NA करून घेऊन बांधकामाला परवानगी मिळवणे हे अजिबात योग्य नाही, असे माझे व्यक्तीगत मत आहे.
22 Oct 2009 - 11:19 pm | सुहास
माझ्या माहीतीप्रमाणे जमिन NA करायला ३ ते ५ रु प्रति स्क्वेयर फूट त्यासाठी सरकारी फि चा दर आहे.. त्यासाठी काही परवानग्या/कागदपत्रे लागतीलच त्याचा खर्च वेगळा लागेल.. कागदपत्रात कोरा ७/१२ (कोरा म्हणजे त्याच्यावर बोजा नसावा - कर्ज नसावे), कोणतेही आरक्षण नसल्याचा कॉर्पोरेशन्/ग्रामपंचायतीचा दाखला, इत्यादी येते म्हणे..
--सुहास
23 Oct 2009 - 2:57 am | रामपुरी
५ रु/वर्ग फूट पर्यन्त खर्च येइल. प्रत्येक ठिकाणी टेबलाखालून द्यावे लागतील ते वेगळे.
23 Oct 2009 - 9:48 am | पिवळा डांबिस
प्रत्येक ठिकाणी टेबलाखालून द्यावे लागतील ते वेगळे.
अरेरे!!!!
:)