दिल्लीदरबारची मटनबिर्याणी!!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in काथ्याकूट
2 Mar 2008 - 7:02 pm
गाभा: 

ओ तात्या,

नुसता फोटो दाखवून जळवण्यात कसलं आलंय रे "सौजन्य"? :) आजची पाककृतीमध्ये बिर्याणीचा फोटू देतोस, पण बाकी काही माहिती (जमल्यास रेसिपी) वगैरे दे ना बाबा! कमीतकमी हाटेलाची तरी माहिती दे. आपल्याकडे मुंबईकरेतर बरेच आहेत, कधी मुंबईत आले तर त्यांना उपयोगी पडेल!!

हे दिल्लीदरबार म्हणजे रीगलच्या जवळचं का रे? एकदम झक्कास हाटेल आहे. थोडं महागडं, पण पदार्थ आणि एकूणच सेट्-अप मस्त आहे!! आम्ही हेक्स्ट्-हाऊसमध्ये असतांना आमचे खायचे (अर्थात कंपनीच्या खर्चाने!) ते आवडते ठिकाण होते. अजून ते आहे हे ऐकून जुना दोस्त भेटल्याचा आनंद झाला.

मि. पा. करांनो, जर हे मी म्हणतो तेच ठिकाण असेल तर एकदातरी (पैसे साठवून) अवश्य भेट द्या....

त्या परिसरातली आमची ऐश करायची आवडती ठिकाणं दोन, एक हे आणि दुसरं "कॉपर चिमनी", बोरीबंदर स्टेशनच्या पाठीमागे असलेलं!
सुभानल्ला! क्या याद दिलायी है!!

नॉस्टाल्जिक,

पिवळा डांबिस

प्रतिक्रिया

केशवराव's picture

2 Mar 2008 - 7:28 pm | केशवराव

एक ' दिल्लीदरबार ' ग्रॅण्टरोडवर होते. चिकन तंदुरी काय झकास मिळायची ! आठवणही नकोशी वाटते.
----------------- केशवराव.

बेसनलाडू's picture

3 Mar 2008 - 6:51 am | बेसनलाडू

नॉवेल्टी सिनेमावरून कामाठीपुर्‍याच्या दिशेने सरळ काही अंतर चालून गेले की की उजव्या हातास 'दिल्ली दरबार' लागते. मस्तच जेवण मिळते. त्यांचीच एक शाखा पिडांकाका म्हणतात त्याप्रमाणे रीगलजवळ आहे.
(स्मरणशील)बेसनलाडू

प्रभाकर पेठकर's picture

2 Mar 2008 - 8:58 pm | प्रभाकर पेठकर

श्री. तात्या,
'आजची पाककृती' हे शीर्षक दिशाभूल करणारे आहे. कारण त्याखाली दाखविलेल्या बिर्याणीची पाककृती मिपावर दिसत नाही. एकतर पाककृती द्यावी अथवा 'आजचा खाद्यपदार्थ' असे शीर्षक द्यावे.

सर्किट's picture

3 Mar 2008 - 7:05 am | सर्किट (not verified)

हे म्हणजे प्यारिसला नववारी संस्कृती शोधण्यासारखे झाले.

हैदराबादच्या ओल्ड टावून मध्ये बादशाहची बिर्याणी खावी. उगाच मुंबईत बिर्याणी शोधू नये.

- सर्किट

बेसनलाडू's picture

3 Mar 2008 - 8:20 am | बेसनलाडू

दिल्ली दरबारची चाखली नसेल तर चाखून पहावी. आणि दुसरी बडे मियाँकडची.
अवांतर - वरिजिनल हैद्राबादी माणसाने मुंबईत येऊन वरिनजल हैद्राबादी बिर्याणी बनवली, तर हैद्राबादला जावे की मुंबईत खावे?
(आस्वादक)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

3 Mar 2008 - 8:41 am | विसोबा खेचर

उगाच मुंबईत बिर्याणी शोधू नये.

असहमत आहे. दिल्ली दरबारला खास लखनवी थाटाची उत्तम बिर्याणी मिळते.

हैदराबादच्या ओल्ड टावून मध्ये बादशाहची बिर्याणी खावी.

मी हैदराबादेतही बिर्याणी खाल्ली आहे आणि बिर्याणीचं माहेरघर असलेल्या लखनऊमध्येही उत्तम बिर्याणी खाल्ली आहे...

तात्या.

विसोबा खेचर's picture

3 Mar 2008 - 8:46 am | विसोबा खेचर

कमीतकमी हाटेलाची तरी माहिती दे. आपल्याकडे मुंबईकरेतर बरेच आहेत, कधी मुंबईत आले तर त्यांना उपयोगी पडेल!!

फॉकलन्डरोडच्या नाक्याला, गोलदेवळाजवळ हे हाटेल आहे...माझ्या माहितीप्रमाणे मेट्रो, माहिम येथेही शाखा आहेत.

त्या परिसरातली आमची ऐश करायची आवडती ठिकाणं दोन, एक हे आणि दुसरं "कॉपर चिमनी", बोरीबंदर स्टेशनच्या पाठीमागे असलेलं!

माझ्या माहितीप्रमाणे वरळीला नेहरू सेंटरच्या जवळ कॉपर चिमनी हे हॉटेल आहे. बोरीबंदरचं कॉपरचिमनी मला माहिती नाही...

असो...

तात्या.

पिवळा डांबिस's picture

6 Mar 2008 - 12:19 am | पिवळा डांबिस

माझ्या माहितीप्रमाणे वरळीला नेहरू सेंटरच्या जवळ कॉपर चिमनी हे हॉटेल आहे. बोरीबंदरचं कॉपरचिमनी मला माहिती नाही...

बरोबर! मी सांगत असलेलं कॉपर चिमनी हे त्यांचीच शाखा आहे. मला बोरीबंदरच्या ठिकाणाच्या रस्त्याचे नक्की नांव आता आठवत नाही पण त्याचे प्रवेशद्वार तस्सेच तांब्याच्या पत्र्याने मढविलेले आहे. बोरीबंदरवरच्या फेरीवाल्यांना जर "लाल दरवाजेका होटल" म्हणून विचारले तर ते सांगतात...
-डांबिस

कोलबेर's picture

6 Mar 2008 - 1:56 am | कोलबेर

त्या संजीव कपुरचे हॉटेल म्हणजे हे कॉपर चिमनीच का हो?

विजुभाऊ's picture

3 Mar 2008 - 1:10 pm | विजुभाऊ

तात्या नुसत्या फोटो वरुन पदार्थ कसे करयचे याचा क्लास काढायाचा ठरवतोय मी आणि पिवळा डांबिस काका......
तुम्च्या अशा फोटो पाक क्रुती अजुन येवुद्यात्....आमचा क्लास जोरात चालेल्...(हो ....तुमचे जे काय असेल ते ठरवुया.....)

पान्डू हवालदार's picture

4 Mar 2008 - 12:01 am | पान्डू हवालदार

नागपुर ला देखिल चान बडे मियाँकडची बिर्याणी मिलते

सुधीर कांदळकर's picture

4 Mar 2008 - 1:18 pm | सुधीर कांदळकर

आहे. त्यांचीच शाखा रीगलसमोर आहे. नामांकित ५ तारांकित हॉटेलातील चोखंदळ प्रवासी येथीलच बिर्यानी खातात. मुख्य म्हणजे नोव्हेल्टीच्या समोरील हॉटेलात गावठी कोंबडी देखील मिळते.

दिल्ली दरबारची रुमाली रोटी पण छान असते. खिमा पण छानअसतो. आणि गाजर हलवा वेगळा पण सुरेख. असा गाजर हलवा फक्त आमच्या घरी होतो. माहीमला फक्त 'पार्सल' मिळते. खाण्यासाठी जागा नाही.

वरळी नाक्याला एक इराणी आहे. त्याच्याकडील खिमापाव व पानी कम चहा उत्कृष्ट. अख्ख्या मुंबईत असा चहा कोठे मिळत नाही. पण थोडा असतो. म्हणून ३ - ४ कप प्यावा लागतो.

गिरगाव चौपाटीला क्रीम सेंटर मध्ये ट्रिपल संडे आईसक्रीम छान मिळते. वरळीला (नायलॉक हाऊस) 'क्वालिटी' नावाचे रेस्टॉरंट आहे. तेथील ट्रिपल संडे पण अप्रतिम. येथे देखील एक कॉपर चिमनी आहे.

फुले (क्रॉफर्ड) मार्केटसमोर बादशाही कोल्ड्रिंक हाऊस आहे. येथील फालूदा उत्तम.

पेडररोडजवईल चायना टाऊन मध्ये तसेच वरळीच्या फ्लोरामध्ये आणी शिवाजी पार्क च्या जिप्सी मध्ये चायनीज पदार्थ सुरेख.

दादरला सेना भवनाजवळ प्रकाश आणि आस्वाद अशी दोन रेस्टॉरंट्स आहेत. मराठमोळे पदार्थ येथे छान मिळतात. प्रकाशम्ध्ये वांगीभात आणि मिसळ आणि आस्वादमध्ये रस्सा. प्रकाशमधे आणखी एक गंमत आहे. महाशिवरात्र, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दिवशी येथे फक्त उपासाचे पदार्थ मिळतात. उपास न करणारांचीच गर्दी जास्त असते.

मासे इ. समुद्री पदार्थ खाण्यासाठी बरीच हॉटेले आहेत. जंत्री देता येत नाही. फार लांबलचक होईल. जीपीओ जवळ 'भारत', दादरला सिंधुदुर्ग, सचीन, परेलला बरीच आहेत. माहीमला गोवा पोर्तुगीझा, इ. इ.

अट्टल मुंबईकर

संजय अभ्यंकर's picture

5 Mar 2008 - 10:37 pm | संजय अभ्यंकर

पुना कॉफी हाऊसच्यामागे (बोळात) छान बिर्याणी मिळते (केशरी बिर्याणी).
उ. गृहाचे नांव तृष्णाज बिर्याणी हाउस.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/