लोकहो,
अंगारकी चतुर्थी (विनायकी) दिनांक ११ मार्च रोजी आहे. सर्व गणेशभक्तांसाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस.
ही चतुर्थी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंतच आहे.
त्यामुळे पूजा, अभिषेक आणि विशेषत्वाने आवर्तने त्यापूर्वी संपतील याची काळजी घ्यावी.
आपला,
(घनपाठी) धोंडोपंत
प्रतिक्रिया
1 Mar 2008 - 9:51 pm | प्राजु
धोंडोपंत ,
आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. पण एक शंका आहे ही चतुर्थी चंद्रोदयापर्यंत नाहिये का? म्हणजे एरवीची संकष्टी म्हणजे उपास जशी चंद्रोदयाला सोडतात तशी ही केव्हा सोडायची?-
(सर्वव्यापी)प्राजु
1 Mar 2008 - 10:00 pm | धोंडोपंत
प्राजुताई,
ही संकष्टी नसून विनायकी आहे.
विनायकीचा उपवास दुसर्या दिवशी सोडायचा असतो. दुसर्या दिवशी म्हणजे पंचमी लागल्यावर विनायकीचा उपवास सोडतात.
त्यामुळे हिचा चंद्रोदयाशी संबंध नाही.
आपला,
(दशग्रंथी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
2 Mar 2008 - 7:22 pm | केशवराव
अहो दशग्रंथी महोदय ,
मंगळवारी चतुर्थी आली तर ' अंगारक योग आहे ' असे म्हणतात. याचा नेमका अर्थ काय ?
अंगारक योगाचे नेमके महत्व काय ? कृपया माहिती द्यावी.
----------- केशवराव .