पारपत्र

आनंद घारे's picture
आनंद घारे in काथ्याकूट
1 Mar 2008 - 3:38 pm
गाभा: 

माझा एक मित्र मुंबईतून नवी मुंबईमध्ये रहायला गेला. पासपोर्टवरील पत्ता बदलून घेण्यासाठी तो प्रभादेवी येथील पासपोर्ट ऑफीसात गेला. यापूर्वी त्याच ऑफीसात जाऊन त्याचे पत्ता बदलण्याचे काम झाले होते. या वेळेस फॉर्म भरून रांगेतून खिडकीवर पोचल्यावर त्याला ठाणे येथील ऑफीसात जायला सांगितले गेले. दुसरे दिवशी तो तेथे गेला. त्याला यासाठी नवा पासपोर्ट बनवावा लागेल असे तेथे समजले आहे.
कोणाला या बाबतीत अद्ययावत माहिती किंवा ताजा अनुभव आहे का?

प्रतिक्रिया

लबाड मुलगा's picture

1 Mar 2008 - 3:45 pm | लबाड मुलगा

पासपोर्ट म्हणजे काय व कशाला लागतं हे झंगाट?
रेशन्कार्ड वरीजीनल व डिप्लीकेट १ दिवसात देवु शकतो
भागल का त्याने काम... सांगा व्यनि करा .. तोड्पाणी सांग्तो डिटेल्मदी

प्क्या

http://passport.nic.in/

ह्या कार्यालयात थेट संपर्क साधून काम करणे जास्त योग्य ठरते. एजंट वगैरे गाठू नयेत एकतर ते ठरलेल्या कार्यपध्दतीबाहेर फार काही करु शकत नसतात (संगणकीकरणाचा फायदा!) आणि दुसरे भ्रष्टाचाराला आणखी एक कुरण! माझे पारपत्र मी स्वतः मुंबईच्या कार्यालयात जाऊन, सनदशीर मार्गाने अर्ज देऊन बरोबर ४५ दिवसात घरपोच मिळवले एका पैची ही लाच न देता!!

माझी अशा प्रकारच्या कामातली भारतातली पध्द्त अशी - आधी सनदशीर मार्गाने जाऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, जर विनाकारण अडवाअडवी, टाळाटाळ झाली तर खालच्या माणसांशी काहीही वाद न घालता थेट त्या कार्यालयातल्या सर्वात वरिष्ठ अधिकार्‍याला भेटणे (थोडं राजकारणी पध्दतीने जावं लागतं, पण सरावाने जमतं ;)- १० पैकी ९ वेळा काम होतेच होते!

चतुरंग

विजुभाऊ's picture

3 Mar 2008 - 12:57 pm | विजुभाऊ

चतुरन्ग काका तुमचे १००टक्के खरे आहे

आनंद घारे's picture

4 Mar 2008 - 7:55 am | आनंद घारे

तुमचे सांगणे अगदी योग्य आहे, पण मी मांडलेल मुद्दा वेगळा आहे. मुंबईहून नवी मुंबई किंवा ठाण्याला रहायला गेलात तर त्यासाठी नवीन पासपोर्ट काढावा लागतो हे मला आणि माझ्या मित्राला माहीत नव्हते म्हणून मी त्याबद्दल विचारणा केली होती. आपण दिलेल्या लिंक वर ही माहिती दिसली नाही.

पटत नाही हो.
मी दिलेल्या दुव्यामधल्या पहिल्याच पानावरचा "FAQ" सेक्शन बघितलात तर पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात तुमचं उत्तर आहे.

फॉर्म नं.२ भरुन तुम्हाला चेंज ऑफ ऍड्रेस करता येतो.

चतुरंग

आनंद घारे's picture

5 Mar 2008 - 8:16 am | आनंद घारे

१.वरील उत्तरात दिल्लीहून बंगलोरला गेल्यावर काय करायचे हे सांगितलेले आहे.
नवी मुंबई हे एक वेगळे शहर आहे आणि ते ठाणे जिल्ह्यात येते. त्यामुळे तेथेच जावे लागते. हे सहसा कोणाच्या लक्षात येणार नाही.
२. पत्ता बदलण्यासाठी नवा पासपोर्ट दिला जातो अशी सध्याची पद्धत स्पष्टपणे त्या उत्तरात दिलेली नाही.