उमेदवार

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
15 Oct 2009 - 11:58 am
गाभा: 

आधी सगळे सोप्पे होते हो.
पार्टीची वीण घट्ट होती.
उमेदवार कुठेही उभा राहायचा.
निवडुन यायचा.
आता तसे राहीले नाही.
आता उमेदवार राखीव मतदारसंघ असेल तरच लढ्णार म्हणतो.
उमेदवार लादता येत नाही.
मतदारसंघाच्या मनावर उमेदवाराचे यश अवलंबवुन असते.
मतदारसंघ अनुकुल आणि जागृत नसला तर मात्र उमेदवार उभा कधी राहीला हरला कधी न कळता डिपॉझीट जप्त.
त्यामुळे मतदारसंघाशी संपर्क साधुन अनुकुलता लक्षात घेउन मगच निवड्णुक लढवावी.
जाता जाता: सर्वांना दिपावलीच्या शुभेच्च्छा.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

15 Oct 2009 - 12:01 pm | अवलिया

राज्यसभा नाही तर विधानपरिषद बरी. थोड्यांनाच म्यानेज करावे लागते. :)

दिवाळीच्या शुभेच्छा !

मंग यंदाची दिवाळी कोन्त्या मतदारसंघात ? :?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

पिवळा डांबिस's picture

15 Oct 2009 - 12:08 pm | पिवळा डांबिस

आधी सगळे सोप्पे होते हो.
पार्टीची वीण घट्ट होती.
चिंतामणराव देशमुख पंजाबातून निवडून आले...
नरसिंह राव रामटेकमधून...
आणि मनमोहनसिंग आसामातून....
पार्टीची वीण घट्ट असेल तरच हे शक्य होतं!!!
नाहीतर जाज्वल्य मराठी म्हणवणार्‍या पार्टीचे उमेदवार मुंबईतही पडतात!!!
नाही, त्या ही पार्टीची वीण घट्टच होती....
एकेकाळी...
पण भय्यिणीना नादावण्याच्या लोभात सैलावली असावी...
तुम्हाला काय वाटतं?

टारझन's picture

15 Oct 2009 - 1:41 pm | टारझन

=)) =)) =))
काय डांबिसकाका ... ते प्रभुबाबा कोणत्या निवडणूका लढवायला सांगत आहेत ... आणि तुम्ही कोणते उमेद्वार उभे करत आहात .. =)) =))

- (अफ्रिकेत पहिली निवडणूक लढून प्रचंड बहुमताने निवडून आलेला अपक्ष उमेद्वार) टारात्मा गांधी
निषानी : वॉशिंग मशीन