आपल्या सभासदांत ज्योतिष्यावर संपूर्ण विश्वास असलेले व ज्योतिष्यशास्त्रात गती असणारे व त्यावर वारंवार लिखाण करणारे अनेक ज्योतिष्यभास्कर आहेत. कांहीं कुंडलीवर विसंबून आहेत, कांहीं कुंडलीवर विसंबून नाहींत तर कांहीं "तळ्यात-मळ्यात" आहेत (म्हणजे कधी-आहेत-कधी-नाहींत असे).
या सर्वांनी ओबामांच्या कुंडलीचा अभ्यास करावा व पहावे की त्यांचे ग्रहमान असे होते कां कीं पाचेक वर्षाच्या कालावधीत शिकागो येथील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात करणारा, कुणाला फारसा माहीत नसलेला हा कृष्णवर्णीय तरुण नुसता राष्ट्राध्यक्षच होतो असे नाही पण नोबेल पुरस्कारही जिंकतो. असे काय आहे त्याच्या कुंडलीत?
(उत्तर आधीच माहीत असले तरी अभ्यास इमानदारीत करावा!).
तसेच त्यांच्या हस्तरेखांचाही सूक्ष्मपणे अभ्यास व्हायला हवा.
ही व्यक्ती एक असमान्य व 'परंतु यासम हा' जातीतली आहे.
माझा स्वतःचा ज्योतिष्यशास्त्रावर अजीबात विश्वास नाहीं, पण माझे मतपरिवर्तन होण्याची इथे छान संधी आहे!
सुधीर काळे
ज्तोतिषी लोकांनी अभ्यास करण्यासारखी आहे ही 'केस"!
गाभा:
प्रतिक्रिया
12 Oct 2009 - 11:16 pm | मिसळभोक्ता
उत्तर आधीच माहीत असले तरी अभ्यास इमानदारीत करावा!
हीच तर खरी गोच आहे !
कुंडलीवाले कुडमुडे असोत, किंवा नाडीवाले नडमुडे, उत्तर माहिती असतेच, आणि तरी इमानदारी कशाशी खातात हे माहितीच नसते !
(ओबामाच्याच हास्पिटलात, त्याच वेळी जन्म झालेला एक इसम काही दिवसांपूर्वी चर्चेत होता. दोघांची कुंडली एकच.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
13 Oct 2009 - 7:49 am | सुधीर काळे
वा, वा, वा! अगदी माझेच विचार उमटले तुमच्या टंकनातून.....!
पण ज्योतिष्याच्या "खर्या" अभ्यासकांनी (कुडबुडे नव्हे) सखोल अभासण्यासारखी ही व्यक्ती आहे यात शंका नाहीं!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
12 Oct 2009 - 11:18 pm | चिरोटा
त्यांच्या कुंडल्या वेगळ्या असाव्यात. अमेरिकन ज्योतिषी संख्याशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम करतात असे म्हणतात.!!त्यांचे शागिर्द CNN/FOX News वर अधून मधून दिसतात.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
13 Oct 2009 - 11:30 am | Dhananjay Borgaonkar
काळे काका एक नंबर धागा आहे.
खरच जे लोक आम्ही ज्योतिषी करुन मिरवतात त्यांनी या प्रष्णाच उत्तर द्याव.
मला वाटत या योगाला राजयोग असे म्हणत असावेत.
13 Oct 2009 - 11:41 am | सुधीर काळे
राजयोग? You said it!
एकाद्या नागाने एकाद्या लहान मुलाच्या डोक्यावर तो झोपला असताना फणा काढून धरला तर तो माणूस पुढे छत्रपती व्हायचा अशी समजूत होती व अशी उदाहरणे माझ्या लहानपणी मी वाचली होती! (आता आठवत नाहींत)
ओबामांच्या डोक्यावरसुद्धा त्यांच्या लहानपणी कुण्या नागाने असाच फणा धरला होता कीं काय याचाही कसून तपास केला पाहिजे.
बिचार्या ओबामांची आई व आजी दोघीही वारल्या आहेत, त्यामुळे ही माहिती कोण सांगणार याची पंचाईत आहे खरी.
काहींही असो, पण आधुनिक "लाडोबा म्हापणकरां"ना हे एक आव्हानच आहे.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
13 Oct 2009 - 11:47 am | सखाराम_गटणे™
ओबामांची नाडी केंद्रात आले तर सगळ्या प्रश्नांची उकल होउ शकेल.
कोणी ओबामाला नाडी केंद्रात आणु शकते का?
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
13 Oct 2009 - 4:08 pm | वेताळ
त्याचा (बहुधा) उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा मिळतो का बघा.बाकी त्याची सगळी माहिती नाडीपट्टी वाचकाला आधीच माहित असेल. =))
वेताळ
13 Oct 2009 - 5:40 pm | विसोबा खेचर
युयुस्तू म्हाराज गप्प आहेत! ;)
तात्या.
13 Oct 2009 - 6:05 pm | अवलिया
यु यु स्तु नाही रे... युयुत्सु.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
13 Oct 2009 - 6:55 pm | विसोबा खेचर
तेच ते! :)
13 Oct 2009 - 11:00 pm | संजीव नाईक
सुधीर काळे यांस
कुंडलीचा अभ्यास करणे हा सुध्दा एक योग आहे. जसे वैद्यकिय सल्लागार कुठलीही वैद्यकिय परिक्षा केल्याशिवाय औषध देत नाही किंवा इलाज सागत नाही. त्या प्रमाणे योग्य कारणाशिवाय कुंडली बघितली सुध्दा जात नाही. नाहीतर त्यांच्या क्रेंद्र योग्यात मंगळ चा मुक्काम असायचा आणि राहु ( जनता ) त्यांच्या डोक्यावर छत्रछाया योगाचे कवच प्रधान करायची , नाहीतर मंगळा चा कुजस्तंभ योगात आजाराला तोंड देण्याची वेळ यावी.
अधिक माहीती साठी बघा.
http://vastuclass.blogspot.com
मंगळाचा कुजा
संजीव
14 Oct 2009 - 12:14 am | विसोबा खेचर
हो, परंतु आता तर ओबामाला नोबेल पुरस्कार मिळाल्याचे कारण सापडले आहे ना? मग पाहा बरं त्यांची कुंडली आणि प्रामाणिकपणे सांगा पाहू की त्यांच्या कुंडलीत इतक्या मानाच्या पुरस्काराचा योग होता किंवा नव्हता ते!
परंतु आता तुम्ही 'योग होता!' असच सांगणार! :)
तात्या.
14 Oct 2009 - 6:52 am | संजीव नाईक
तात्याश्री
नमस्कार, माझ्या जवळ त्यांची कुंडली नाही. आपण पाठवली तर बर होईल. बघु तरी त्यांच्या कर्मात काय आहे. त्यांची वास्तु कुंडली सुध्दा पाठवा,
संजीव
14 Oct 2009 - 7:20 am | Nile
एक प्रामाणिक प्रश्न. अमेरीकेचा प्रत्येक राष्ट्राध्यक्ष एकाच वास्तुत (व्हाईट हाउस) मध्ये राहतो मग त्यांचे त्या कालापुरते भविष्य सारखे, अगदी जसे च्यातसे नसले तरी, का नसते हो?
14 Oct 2009 - 3:10 pm | संजीव नाईक
श्रीमान
जगात प्रत्येक व्यक्ति हा नेहमी नविन जागेत राहण्यास गेल्यावर त्या जागेत बद्द्ल करतो. उदा. रंग, संडास, बाथरु, आपला बेडरुम इत्यादि वास्तुशास्त्रा प्रमाणे किंवा विज्ञान शास्त्रा प्रमाणे प्रत्येक गोष्टी मध्ये घन (+) / (-) ऋण ऊर्जा असते. त्यांच्या शरिरातील ऊर्जा स्त्रोत सुध्दा यास कारणी भुत ठरतात. तसेच कुंडली मधिल ग्रहाची ऊर्जा ही सुध्दा कारणीभुत ठरवु शकते. हा विषय फार मोठा आहे जमल्यास सविस्तर चर्चाकरण्याची तयारी आहे.
अभिप्राया बद्द्ल धन्यवाद
संजीव http://vastuclass.blogspot.com
15 Oct 2009 - 3:38 am | Nile
नक्की सविस्तर चर्चा करु. कुठे करायची तेवढं सांगा.
तुर्तास, वास्तुशास्त्रात धन-ऋण भारांचा अभ्यास सामाविष्ट आहे असे म्हणालात, कश्याप्रकारे हे जाणुन घ्यायला आवडेल. नविन धागा सुरु करावा हि विनंती. संपादकांना विनंती करुन त्याधाग्यावर फक्त विषयानुरुप चर्चा करता येईल.
उत्सुक,
शास्त्रीय.
14 Oct 2009 - 9:04 am | शाहरुख
http://www.neptunecafe.com/obama.html
इथे त्यांची कुंडली करण्यासाठी लागणारी माहिती कदाचित मिळू शकेल.
14 Oct 2009 - 3:17 pm | संजीव नाईक
शाहरुख यांस
अभिप्रया बद्द्ल धन्यवाद
पण मला त्यांची सध्यातरी गरज वाटत नाही, पण असो.! जर कोणाला ह्या संबधी जास्त विधिलिखीत हव असेल, त्यांनी माझी योग्य फी देऊन त्यांचा प्रश्न सोडवावा. राग नसावा.
आपला
संजीव
14 Oct 2009 - 3:26 pm | सखाराम_गटणे™
तुमची फी किती आहे?
मला ओबामाचे भविष्य बघायचे आहे.
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
14 Oct 2009 - 3:51 pm | संजीव नाईक
सखाराम_गटणे™ यांस
धन्यवाद ?
खरच! आपण फी देण्यास तयार आहात! आता बुवा आपली खैरनाही. आपले काम केलेच पाहीजे,
मला काही तज्ञ मिपा सभासदाची परवागी घेतली पाहीजे थोडा परवागी घेण्यास वेळ देता का?
संजीव
14 Oct 2009 - 5:50 pm | सखाराम_गटणे™
हो, नक्कीच, नक्कीच फि देउ.
तुम्हाला किती वेळ लागेल हे सांगता का?
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
14 Oct 2009 - 5:55 pm | सूहास (not verified)
अवांतर गप्पासाठी मालकांने डॉलर खर्चुन खरडवही दिली आहे ह्याची नोंद घ्यावी ..
आणी ऐ विक्या , काय रे त्या ओबामाचा कुंडलीच्या मागे लागलायस?
च्या मारी वय काय ? करतोयस काय ?
साड्यांचा अभ्यास करण्याएवजी माडीवर जा, बोळाच रहाणार नाही.
सू हा स...
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
15 Oct 2009 - 8:26 am | संजीव नाईक
सखाराम_गटणे™ यांस
मिपा वरिल सर्व सभासदाना हितचिंतकांना, मित्रमंडळींना, वाचकांना ही दीपावली आत्यंतिक सुखसमाधानाची ठरो आणि त्यांच्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य ही दीपावली निर्माण करो, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना....
प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की मिपा ही एक सार्वजनिक बाब आहे. ह्यात कोणाच्या खाजगि गोष्टी संबधी चर्चा किंवा लेख लिहण्या पूर्वी मिपा च्या पदाधिकार्यां बरोबर चर्चा करा, नाही तर त्त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.
संजीव
http://vastuclass.blogspot.com
14 Oct 2009 - 10:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
एक वाक्य विश्वरचनाशास्त्राबद्दल चर्चा संपवताना बर्याचदा कानावर पडतं "सर्व विश्व इगोसेंट्रीक (मराठी शब्द, स्वयंकेंद्रीत?) आहे". अलिकडे फारच पटायला लागलं आहे.
अदिती
14 Oct 2009 - 3:27 pm | संजीव नाईक
३_१४ विक्षिप्त अदिती
प्रश्न खुपच सुरेख आहे. बरे वाटले. अजुन ह्या जगातिल वैज्ञानिकांना प्राण नेमका कुठे आहे हे सापडलेले नाही. त्यां ........... विश्वनिर्मात्यांची कल्पना सुध्दा किती छान असेल. नाहीतर गाताना ७ सुरा पैकी एक सुरु जर बद्द्ला गेला तर झाला गायनातील एक नविन राग. किंवा जिर्याच्या फोडनि ऐवजी लसणाची फोंडणी दिली तर झाला जेवनातील नविन प्रकार असे असेल तर?
वेडा संजीव
14 Oct 2009 - 5:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझं व्यक्तीगत मत: विश्वनिर्मात वगैरे काही नाही, या सगळ्या कवीकल्पना आहेत.
असो. हे वाक्य मनुष्यस्वभावाबद्दल बोलतात, कारण शेवटी कोणत्यातरी स्थिरांकाची(?) किंमत १.०१ का ०.०९ यावरून हे लोकं कचाकचा भांडतात. दमून जेवायला जातात आणि तिकडे मैत्रीपूर्ण गप्पा मारताना उपरोल्लेखित वाक्य बोलून चर्चा संपवतात.
अदिती