टाटा स्काय प्लस... माहिती हवी आहे...

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in काथ्याकूट
9 Oct 2009 - 4:20 pm
गाभा: 

हे टाटा स्काय प्लस प्रकरण जेव्हा गेल्या वर्षी आले होते तेव्हा चांगलेच इन्ट्रेष्टिंग वाटले होते पण किंमत महाग म्हणून आम्ही घेतले नाही..
डीटीएच मध्ये लाईव्ह टीव्ही पॊज, रेकॊर्ड आणि रिवाईन्ड ्करता येते.
४५ तासाचे रेकॊर्डिंग उपलब्ध असते.

ते लोक असे म्हणतात की आपली टीव्ही पहायची पद्धत बदलून टाकेल टाटा स्काय प्लस.
पुष्कळ निरर्थक पाहण्यात वेळ जातो, त्याऐवजी मोजकेच उपयोगी कार्यक्रम पाहिले जातील असे वाटते.

तेव्हा किंमत ९ हजार होती.

( आमीर आणि गुल पनगची जाहिरात छान असली म्हणून काय झालं?) परवडायला नको?
आता दिवाळीपर्यंत घेतल्यास ५ हजार झाली आहे. .. दिवाळीनंतर पुन्हा ९ हजार होणार आहे.....
विचार करायला फ़ारसा वेळ उरला नाहीये...

इथे कोणी टाटा स्काय ( विशेशत: प्लस) वापरते काय?
आपला अनुभव कसा आहे?
विशेषत: स्वच्छ चित्र (क्लॆरिटी), महिना बिल, तांत्रिक सपोर्ट कसा आहे?
( की कॊल सेन्टरशी दिवसेन्दिवस डोके लढवत बसावे लागते?.. टाटा ब्रॊडबॆंडचा अनुभव बरा नाही.)

प्रतिक्रिया

टारझन's picture

9 Oct 2009 - 4:32 pm | टारझन

नुसतीच माहिती मिळवण्यासाठी "एक लाईनचे पुचाट धागे" काढणारांनी शिकावे असा धागा !!
मास्तर योग्य प्रकारे मदत मागितली आहे. तुम्ही काय हो पर्वा करता ९ हजाराची .. २ दाढा कोरल्या की झाले :)
डिटीएच च्या कोणत्याही सर्व्हिसची क्लिअ‍ॅरिटी कळण्यासाठी आपल्या कडे अंमळ मोठा टिव्ही हवा ... आपल्या २१-२९ इंची टिव्ही वर काही फरक कळत नाही.
स्वस्त असेल ते घ्या !! रेकॉर्ड करून कार्यक्रम पहाण्याच्या फंदात कोणी पडतो असे वाटत नाही ... तरीही ब्रांड मुळे टाटा स्कायची सर्व्हीस चांगली आहे !

भडकमकर मास्तर's picture

9 Oct 2009 - 4:50 pm | भडकमकर मास्तर

असे ऐकले आहे की टाटा स्काय च्या सेट्टॊप बॊक्सला मागे ऎचडीटीव्हीसाठी यूएस्बीची सोय आहे.
पण हे एचडी टीव्ही काय अस्ते म्हणे?

रेकॉर्ड करून कार्यक्रम पहाण्याच्या फंदात कोणी पडतो असे वाटत नाही
मी पाहीन असे वाटते.

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

झकासराव's picture

9 Oct 2009 - 4:46 pm | झकासराव

एच डी टिव्ही.
हाय डेफिनेशन टि व्ही.
जास्त चांगल्या पिक्चर क्वालिटी असते म्हणे त्याची. बहुद्धा पिक्सेल प्रति स्केअर इन्च जास्त असतील.

.................................................

http://picasaweb.google.co.in/zakasrao

महेश हतोळकर's picture

9 Oct 2009 - 5:00 pm | महेश हतोळकर

http://electronics.howstuffworks.com/hdtv.htm येथे बरीच सविस्तर माहिती दिली आहे.

बाकी टाटा स्काय (+) बद्दल काहिच माहिती नाही.

ज्ञानेश...'s picture

9 Oct 2009 - 6:01 pm | ज्ञानेश...

माझ्याकडे टाटा स्काय (साधे) आहे.
डिश टीव्ही आणि बिग टीव्ही(रिलायन्स) पेक्षा निश्चितच चांगली सेवा आहे. (एयरटेलच्या डिजीटल टीव्हीबद्दल माहिती नाही.)

'प्लस' यापेक्षा नक्कीच चांगले असणार. पाच हजारात मिळतंय, तोवर घेऊन टाका.
कार्यक्रम/मॅच रिवाईंड किंवा रेकॉर्ड करून बघता येईल. दाल- चावल ऐवजी दम बिर्यानी मिळत जाईल, शिवाय केव्हाही उठून सुसूला जाता येईल.

मज्जा!

"Great Power Comes With Great Responsibilities"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Oct 2009 - 5:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जास्त माहिती नाही, पण डिश टी.व्हीपेक्षा टाटा स्कायची क्वालिटी चांगली आहे. रिलायन्सची त्यापेक्षा चांगली असण्याची दाट शक्यता आहे. ज्या प्रकारचं एन्कोडींग करतात त्यावर हे अवलंबून असतं. ही माहिती या क्षेत्रात काम करणार्‍यांकडून!

मी स्वतः डीश टी.व्ही. वापरायचे, ठीकठाक होती क्वालिटी.

अदिती

विनायक प्रभू's picture

9 Oct 2009 - 5:55 pm | विनायक प्रभू

झिंगालाला, झिंगालाला हुर्र हुर्र

१.५ शहाणा's picture

9 Oct 2009 - 7:26 pm | १.५ शहाणा

आमी माय बाप स र का र ची D T H सेवा वापरतो.

लइ बरि वाटते

संजय अभ्यंकर's picture

9 Oct 2009 - 9:42 pm | संजय अभ्यंकर

टारूभाउने सांगीतल्या प्रमाणे जंगी मोठा फ्लॅट्स्क्रीन टी.वी. घरात हवा.
चित्राचा दर्जा उत्तम. महीना रु. ५००/- रिचार्ज ला पडतात.

एअरटेल सुद्धा उत्तम. सध्या जमशेदपुरला आहे, हॉटेलवाला एअरटेल सुविधा देत आहे. एल्.सि.डी.- टी.वी. वर चित्राचा दर्जा व आवाज उत्तम .

तुम्ही काय हो पर्वा करता ९ हजाराची .. २ दाढा कोरल्या की झाले

घेऊन टाका! तिच्या आयला!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

छोटा डॉन's picture

9 Oct 2009 - 10:01 pm | छोटा डॉन

>>चित्राचा दर्जा उत्तम. महीना रु. ५००/- रिचार्ज ला पडतात.
क्काय ?
ते कसं काय शेठ ?

मी गेले अलमोस्ट २ वर्षे टाटास्काय वापरत आहे, क्वालिटी बेस्ट ह्यात वादच नाही, अगदी घातलेल्या पैशाचा पुर्ण आनंद मिळतो मला.
पण हे रेट्सचे आकडे माझे वेगळे आहेत ...

१. सुपर सेव्हर पॅक : २६० / महिना
२. लाईफ स्टाईल गोल्ड = ४० रुपये / महिना
३. ई एक पी एन/ स्टार स्पोर्ट्स = ४० रुपये / महिना
हे सध्या मी वापरतो ....

तुम्ही म्हणता ते ५०० चे पॅकेज कुठले शेठ ?

अवांतर : भडकमकर मास्तर्,माझा पर्सनल सल्ला असा आहे की ही सुविधा वापरणार असाल तर पहिल्यांदा कमीत कमी "३२ इंची प्लास्मा किंवा एल सी डी टीव्ही"घ्या, मगच ह्याचा आनंद एकदम खटाखट मिळेल ...

मुद्द्याचे :
५००० ची ऑफर लै भारी आहे, घेऊन टाका.
मी स्वतः घेत आहे, कितपत वापरेन ते माहित नाही पण घेत आहे. माझी बर्‍याच दिवसाची इच्छा होती जेव्हा हे लाँच झाले त्यापासुन, आता तेच ५००० ला मिळते आहे तर का सोडा ?
अर्थात मी सद्यस्थिती ग्राहक असल्याने मला अजुन स्वस्तात मिळेल.
पण तुम्ही घेऊन टाका बिनधास्त ....

------
(टाटा स्कायप्रेमी ) टाटोबा स्कायर
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

भडकमकर मास्तर's picture

10 Oct 2009 - 9:31 am | भडकमकर मास्तर

मस्त.. धन्यवाद...
टाटास्कायच्या वेबसाईटवरती माझे नाव घेण्यासाठी इच्छुक म्हणून टाकून ठेवले होते काल दुपारी ४ वाजता.
५ वाजता फोन आला... क्रेडिटकार्डावरती बुकिंग करून सुद्ध टाकले आहे.
( पहिला महिना फ्री सब्स्क्रिप्शन आणि बिनव्याजी आणि बिनप्रोसेसिंग फीचे सहा हप्ते ईएमाय कार्डावरती लावून दिले आहेत....४९९९ अधिक १००० रुपये इन्स्टॉलेशनचे असे ५९९९ रुपये होताहेत ते सहा महिन्यांच्या ९९९.८३रुपयांच्या हप्त्यात आहेत.... हे तर येकदम परवडणारे आहे... घेऊन टाकले...)

शिवाय पॅकेजेस विविध उपलब्ध आहेत... मला २७५ मध्ये मला हवी अस्लेली चॅनेल्स मिळत आहेत... बाकी स्टार क्रिकेट वगैरे लागतील तशी घ्यायची... चाल्तंय...

फक्त टाटाच्या टायमिंगच्या आश्वासनावर साशंक आहे,. :(
( टाटा ब्रॉडबँड पाच दिवसात इन्स्टॉलेशन होईल म्हणाले होते आणि पैसे भरून २५ दिवस झाले तरी कोणाचा फोन नाही, इन्जिनियराचा पत्ता नाही...मी तीन चार दिवस कस्टमर केअरशी अर्धा अर्धा तास फोन वरती एस्केलेशन करून करून भांडाभांड करत होतो, तेव्हा कुठे काम झाले.... )
.... ४८ तासांत इन्जिनियर ये ई ल म्हणत आहेत....
अगदी ४८ नाही निदान ९६ तासांची मनाची तयारी केली आहे...... त्यानंतर कस्टमर केअर आहेच...

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

सखाराम_गटणे™'s picture

10 Oct 2009 - 9:37 am | सखाराम_गटणे™

चांगलेच नेट लावुन नेट आणले तुम्ही.

दशानन's picture

10 Oct 2009 - 9:40 am | दशानन

मेट्रो सिटी मध्ये टाटाची सर्व्हिस चांगली आहे... मी ऑफिस मध्ये टाटा स्काय वापरत आहे... चांगली सर्विस आहे व ऑनलाईन जवळ जवळ सर्व कामे होतात त्यांच्या साईट द्वारे त्यामुळे आज पर्यंत तरी ग्राहकसेवा केंद्राशी संपर्क करण्याचा दिवस आलाच नाही ;)

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

भडकमकर मास्तर's picture

10 Oct 2009 - 9:43 am | भडकमकर मास्तर

४८ तासांत इन्जिनियर ये ई ल म्हणत आहेत....
अगदी ४८ नाही निदान ९६ तासांची मनाची तयारी केली आहे..

हे लिहिल्यानंतर दोन मिन्टातच इन्जिनियराचा फोन आला... दुपारी बसवून टाकत आहेत.... उत्तम झाले...

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

दशानन's picture

10 Oct 2009 - 9:44 am | दशानन

पेढे वाटा पेढे ;)

तुम्हाला तर टाटा पावला =))

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

भडकमकर मास्तर's picture

16 Oct 2009 - 10:02 am | भडकमकर मास्तर

सध्या लै भारी चालले आहे...
सर्व कार्यक्रम रेकॉर्डेड पाहतो...

एक दोन दिवस आधी सर्व चॅनल चेक करत रेकॉर्डिंग लावून ठेवायचे, घरी आले की प्लॅन करून भराभरा पाहायचे.. उत्तम आहे....
नेहमी न पाहिले जाणारे इंग्रजी सिनेमे पुष्कळ सापडले.
( काल एक मेसेज इन अ बॉटल नामक छान सिनेमा पाहिला)
...
सारेगमप मध्ये पल्लवीची बडबड आणि नॉन्सेन्स न पाहता गाणी ऐकायची बाकी सारे पुढे ढकलतो.. अर्ध्या तासात पाहून होतो कार्यक्रम.. ;)
असे काही सध्या टाटास्काय प्लसचे फायदे जाणवले आहेत...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

संजय अभ्यंकर's picture

10 Oct 2009 - 9:27 pm | संजय अभ्यंकर

मी रु. ५००/- प्र. म. भरतो.
तपशील पहावा लागेल, बहुदा किती चॅनल घेतलेत त्यावर असावे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

हरकाम्या's picture

10 Oct 2009 - 1:11 am | हरकाम्या

माझे " टाटा ईंडिकॉम " व "टाटा कार्ड " चे अनुभव न विसरण्यासारखे आहेत त्यामुळे मी "टाटा स्कायच्या " नादी लागलो नाही.

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

10 Oct 2009 - 10:08 am | अमित बेधुन्द मन...

टाटा स्कायची क्वालिटी चांगली आहे. आणि महिना बिल रीचार्ज पद्त आहे , तांत्रिक सपोर्ट उत्तम आहे कारण बेस्ट सर्विस आणि क्लॆरिटी यावरच कस्ट्मर टाटा स्काय कडे आकर्षित होतात मी स्वता टाटा स्काय मध्ये ३ १/२ वर्ष काम केले आहे

डॉ.प्रसाद दाढे's picture

11 Oct 2009 - 7:53 am | डॉ.प्रसाद दाढे

मीही दोन तीन वर्षे टाटा स्काय (साधे) वापरत आहे. तशी चांगली सेवा आहे, पण एकच प्रॉब्लेम आहे. मी जेंव्हा घेतले तेव्हा जुने चित्रपट व गाणी दाखविणारा झी क्लासिक नामक चॅनेल होता जो माझ्या वडिलांना आवडत असे तो दोन महिन्यातच बंद झाला. त्यामुळे पुष्कळदा असे होते की कुठल्याच चॅनेलवर पाहण्यासारखे काही नसते. त्यापेक्षा आमच्या केबलवाल्याच्या एका चॅनेलवर सतत जुनी किंवा रिसेंट चांगली गाणी वा पिक्चर्स सतत चालू असायचे जी एक बर्‍यापैकी एन्टरटेन्मेंट होती.
गुबगुबीत गुल पनागला सारखे पाहून घ्यावेसे वाटत होते पण किंमत अंमळ जास्त वाटली..

सहज's picture

11 Oct 2009 - 8:00 am | सहज

>गुबगुबीत गुल पनागला सारखे पाहून घ्यावेसे वाटत होते पण किंमत अंमळ जास्त वाटली..

हर हर हर (काळे काकांच्या सौजन्याने)

डॉक्टर तुम्हीसुद्धा? :O

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Oct 2009 - 3:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही आमची गुल पनाग. हीच्या अ‍ॅक्टींगवर आमचा भारी जीव! ;-)

अदिती

ऋष्या's picture

12 Oct 2009 - 3:02 pm | ऋष्या

माझ्याकडे साधे टाटा स्काय कनेक्शन आहे. एकूण अतिशय छान आहे. डाऊन टाईम एकदमच कमी. (आतापर्यन्त दोनदाच जोराचा पाऊस आला असताना १/२ तास बन्द होते. तसा मेसेज ही दिसतो आणि नन्तर आपोआपच सुरूदेखिल होते. )
मी १०००/१५००/- चे टॉप अप करतो आणि परिस्थिती प्रमाणे पॅकेज ठरवतो. (स्पोर्टस वगैरे). ईतर वेळी २७५/- चे पॅकेज चालू देतो. मी घरात जेव्हढा वेळ असतो त्यासाठी ते पुरते.
प्लस चा अनुभव नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Oct 2009 - 10:19 pm | प्रकाश घाटपांडे

आमच्या संकुलात टाटा स्काय आहे. एक वर्षे वॉरंटी नंतर जर दोष झाला तर त्याचे प्रत्येक वेळी चार्जेस ३५०/- आपण अ‍ॅग्रिमेंट सही करताना वाचले तर ते पुर्ण एकतर्फी आहे.एवढे मोठे अ‍ॅग्रीमेंट वाचायला वेळ नसतो. त्यापेक्षा सही पटकन केली की झाले. कराराने हार्डवेअर ही त्यांची मालमत्ता आहे. पण नीट ठेवण्याची जबाबदारी तुमची.तुम्ही टाटास्कायचे सेट टॉप बॉक्स एलएनबी (अँटेना) फक्त भाड्याने घेतल्यासारखे आहे. एकावर्षानंतर ए एमयु करण्यासाठी सांगतात.त्याचे चार्जेस २०००/- प्रतिवर्ष. नाही केले आन बिघडले कि सेवामुल्य भरपुर. म्हण्जे टाटाला आपल्या प्रॉडक्ट बद्दल वर्षाने खात्री नाही. परवा नो सिग्नल दोषासाठी टाटा स्कायवाला आला. काही तरी कनेक्षनचे केले हँग झाले सांगुन रिसेट केले. चालु झाले व तो गेल्यावर पाचच मिनिटात पुन्हा तोच दोष. मग जालावर तक्रार केली तोपर्यंत प्रिपेड मधुन ३५०/ कट व बॅलन्स ऋणभारित. आज येउन एम्डीयु ( बिल्डींगचे कॉमन अँटेना / मल्टी ड्वेलिंग युनिट) ते सेट टॉप बॉक्स मधील कनेक्टर पुन्हा बसवले व चालु झाला. आमचे संकुल साल टाटामय आहे.
सध्याच्या मार्केटिंग मध्ये छुप्या गोष्टी खुप असतात. विक्रीपश्चात सेवा ही वाजवी मुल्यात कधिच नसते. आपण वस्तु खरेदी करेपर्यंत अगदी गोड बोलतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अविनाश सहस्त्रबुध्दे's picture

15 Oct 2009 - 11:59 am | अविनाश सहस्त्रबुध्दे

टाटा स्काय वा डिश टिव्ही व सेट टॉप बॉक्स ह्यांच्या मध्ये नक्की काय फरक आहे?
मी मुंबईत राहतो व मी आमच्या केबलवाल्याकडून १२०० रुपयात सेट टॉप बॉक्स बसवून घेतला आहे.त्यावर मला जवळपास २७० चॅनेल्स दिसतात. व ती देखील २०० रु प्रतिमहिना ह्या दरात.
सर्वच चॅनेल्स चा दर्जा चांगलाच दिसत आहे. पुर्वी नुसती केबल असताना काहि चॅनेल्स फारच खराब दिसत होती. सेट टॉप बॉक्स बसवल्यापासून सर्वच चॅनेल्सचा चित्राचा दर्जा फारच चांगला झाला आहे.
हा एक स्वस्त पर्याय असताना टाटा स्काय वा डिश टिव्ही हे नक्की वेगळे काय देत असतात? कुणाला माहिती आहे काय?

अविनाश सहस्त्रबुध्दे

प्रशु's picture

15 Oct 2009 - 5:03 pm | प्रशु

या सगळ्या डी टी एच वर सगळ्या मराठी वाहिन्या एकत्र दिसतील असे एखादे पेकेज आहे का? आमच्या कडे झी २४ तास, झी ची चित्रपट वाहिनी दिसत नाही.

सुहास's picture

16 Oct 2009 - 1:59 am | सुहास

हे टाटा स्काय किंवा डीश चे सेट टॉप बॉक्स computer मध्ये TV tuner card टाकून जोडता येतात काय?

--सुहास

देवदत्त's picture

5 Nov 2009 - 10:58 pm | देवदत्त

माझ्या अनुभवाप्रमाणे ते TV Tuner Card ला जोडता येईल. मी आमच्याकडीत सेट टॉप बॉक्स (CAS अर्थात केबलचालकाने दिलेला)मध्ये तसे केले होते. फक्त आवाजाकरीता वेगळा मार्ग अवलंबिला होता.

भडकमकर मास्तर's picture

5 Nov 2009 - 3:26 pm | भडकमकर मास्तर

कळवण्यास आनंद होतो की
आमचेकडे टाटास्कायप्लस उत्तम चालू आहे.
सर्व सुविधा मजेदार आहेत.... रात्री-अपरात्री असलेले सिनेमे रेकॉर्ड करण्यासाठी ( आणि नंतर सवडीने पाहण्यासाठी भयानक उपयोगी)....
सारेगमप मधली पल्लवी जोशीची बडबड ( आता कसं वाटतंय? ऑल द बेस्ट.. खूप शुभेच्छा, .... जोरदार टाळ्या... याच्यात्याच्या स्मृतीमध्ये टाळ्या ) , शिवाय जाहिराती वगैरे पुढे ढकलून काही चांगली गाणी पहायचा आनंद मिळतो...... अशा प्रकारे कार्यक्रम अर्ध्या तासात पाहता येतो... वेळेची बचत हाच पैसा.. ;)
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

चतुरंग's picture

5 Nov 2009 - 11:12 pm | चतुरंग

फक्त एक राहिलं मास्तर
आमचेकडे श्री कृपेकरुन टाटास्कायप्लस उत्तम चालू आहे.
.....असं हवं होतं!!

(कृपाळू)चतुरंग

वेताळ's picture

6 Nov 2009 - 11:23 am | वेताळ

रात्री-अपरात्री असलेले सिनेमे रेकॉर्ड करण्यासाठी ( आणि नंतर सवडीने पाहण्यासाठी भयानक उपयोगी)....

कसले सिनेमे रात्री अपरात्री तुम्ही रेकॉर्ड करता? काही माहिती मिळेल का?

वेताळ

आंबोळी's picture

6 Nov 2009 - 11:48 am | आंबोळी

कसले सिनेमे रात्री अपरात्री तुम्ही रेकॉर्ड करता? काही माहिती मिळेल का?

हो हो... आम्हाला पण माहिती पाहिजे...

स्क्रीनशॉट / क्लिपा डकवल्यास उत्तम.

आंबोळी

भडकमकर मास्तर's picture

6 Nov 2009 - 5:19 pm | भडकमकर मास्तर

कसले सिनेमे रात्री अपरात्री तुम्ही रेकॉर्ड करता? काही माहिती मिळेल का?

अहो भारतीय दूरचित्रवाणीवरचे " गेले ते दिन गेले" ... इतकेच म्हणेन...

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी