शेंगदाण्याची आमटी

प्रभो's picture
प्रभो in पाककृती
8 Oct 2009 - 1:29 am

मागच्या आठवड्यात दसर्‍यानिमीत्त घरी गेलो होतो. अष्टमीच्या दिवशी आमच्या मातोश्री आजारी पडल्या.वडिलांचं ऑफिस आणी बहिणाबाईचे कॉलेज यामुळे उपवासाच्या अर्ध्या स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर पडली. बहिण कॉलेजला जायच्या आधी खिचडी आणी भगरीच्या भाकरी करून गेली.

मग जेवणाआधी माझ्यासाठी आणी आईसाठी मी शेंगदाण्याची आमटी व बटाट्याची भाजी करायचे ठरवले. त्याच्या या पाकृ.

टीप : गणपाने तुम्हा सगळ्यांना लाडावून ठेवलंय. या पाकृच्या शेवटी सजवून ठेवलेला आमटीचा फोटो नाहिये.

१. शेंगदाण्याची आमटी

कच्चा माल :
जिरं, आमसूल, तिखट

मिक्सरमधे बारीक फिरवलेलं शेंगा कूट, याव्यतिरिक्त कोथिंबीर, मीठ (चवीप्रमाणे)

एका कढईत जिर्‍याची फोडणी करावी.
त्यात आमसूल टाकावे. १०-२० सेकंदाने त्यात गरजेनुसार पाणी घालावे.

थोडी उकळी आल्यावर त्यात तिखट आणी कोथिंबीर टाकावी आणी अजून थोडा वेळ उकळावे.

नंतर त्यात शेंगाकूट आणी मीठ टाकून १०-१५ मिनिटे (आमटीला घट्टपणा कसा हवाय त्यानुसार) उकळावे. तयार झाली ही आमटी. ही साधी भगर,उपवसाचं थालीपीठ, भगरीच्या भाकरीसोबत छान लागते.

२. उपवासाची बटाटा भाजी

कच्चा मालः
उकडलेले बटाटे, मीठ, तिखट, कोथिंबीर, जिरं

एका कढईत जिर्‍याची फोडणी करा.

त्यात उकडलेले बटाटे चिरून घाला.

त्यावर तिखट, मीठ , कोथिंबीर टाका. थोडा वेळ परता.

असं तयार झालं आमचं फराळाचं ताट.
शेंगदाण्याची आमटी, बटाटा भाजी, उपवासाचे लोणचे, शाबुदाण्याची खिचडी आणी वरून तूप सोडलेली भगरीची भाकरी...

काही अवांतर फोटो..(आईने गौरी गणपतीला केलेलं सोवळ्यातलं जेवण)
थोडं उशिरा टाकतोय कारण घरून फोटो उशिरा मिळाले...आणी टाकल्याशिवाय रहावलं नाही.

१. सर्व प्रकारच्या कोशिंबिरी

२. वेगवेगळ्या भाज्या

३. मझा सर्वात आवडणारा पदार्थ : पंचामृत

४. प्रसादाचे ताट

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

8 Oct 2009 - 1:46 am | श्रावण मोडक

अट्टल दारूडा कसा 'जास्ती झाली' की स्वतःलाच बजावतो, 'उद्या नाही' आणि तरीही दुसऱ्या दिवशी जातोच, तसं झालंय आता. खितीही ठरवलं हे धागे उघडायचे नाहीत, तरी उघडले जातातच. मग डोक्यात चढतात. मग ठरवायचं पुन्हा नाही उघडायचे, पुन्हा तेच... भोगायचं एकेक केवळ!!!
बायदवे, हा या वयात रात्री जागून पाकृ टाकतोय... लग्न झालेलं नाही हे नक्की. पोरगी बघा रे याच्यासाठी पटकन. सुखी राहील ती.

बेसनलाडू's picture

8 Oct 2009 - 4:23 am | बेसनलाडू

पूर्ण प्रतिसादाशी (इन्क्लुडिंग वधू संशोधन) सहमत!
(सहमत)बेसनलाडू
मी/आमच्या घरी ही आमटी करताना शेंगदाण्याच्या कुटाबरोबर ओले खोबरेही एकत्र वाटून घेतो/घेतात मिक्सरमध्ये.
(बल्लवाचार्य)बेसनलाडू
उपवासाच्या दिवशीच्या स्वयंपाकात लाल तिखट न वापरता हिरव्या मिरच्या वापरतात, असे ऐकून आहे. म्हणजे मी तरी/आमच्या घरी हिरव्या मिरच्या वापरतो/वापरतात खिचडी, दाण्याची आमटी इ. करताना. तसेच भोपळा, सुरण, काकडी इ. चे पदार्थही खाण्याची मुभा असल्याचे दिसते; पण आमच्या घरी उपवासाच्या दिवशी हे वर्ज्य असतात. आजच सकाळी सकाळी उठून साबुदाणा खिचडी केली आणि आता आमटीच्या निमित्ताने आठवण झाली.
(अवांतर)बेसनलाडू

प्रभो's picture

8 Oct 2009 - 6:32 pm | प्रभो

>>उपवासाच्या दिवशीच्या स्वयंपाकात लाल तिखट न वापरता हिरव्या मिरच्या वापरतात, असे ऐकून आहे.

त्याचं कारण हे की, बर्‍याच वेळा उपवासाचे तिखट आणी नेहमीच्या वापरातले तिखट यात गल्लत होते...आम्ही मिरच्या कुटून आणल्यावर त्यातून गौरी, गणपती , उपास सोवळ्याचे जेवण यासाठी तिखट बाजूला काढून ठेवतो...त्यामुळे प्रॉब्लेम येत नाही

--प्रभो

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Oct 2009 - 7:24 pm | llपुण्याचे पेशवेll

त्याचं कारण हे की, बर्‍याच वेळा उपवासाचे तिखट आणी नेहमीच्या वापरातले तिखट यात गल्लत होते...आम्ही मिरच्या कुटून आणल्यावर त्यातून गौरी, गणपती , उपास सोवळ्याचे जेवण यासाठी तिखट बाजूला काढून ठेवतो...त्यामुळे प्रॉब्लेम येत नाही
बरोबर आहे. आमच्याकडे पण असेच करतात.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

विशाल कुलकर्णी's picture

8 Oct 2009 - 9:47 am | विशाल कुलकर्णी

अगदी अगदी ! प्रभ्या, लेका तो पंचामृताचा फोटो कशाला टाकलास?
माझा डेस्क ओला झाला ना! (माझा सुनील शेट्टी झाला ना यार! ;-) ) मला पण खुप आवडतं पंचामृत. माझी आई आणि बायको दोघीपण एक्स्पर्ट आहेत त्यात.
धंकु रे !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Oct 2009 - 11:11 am | llपुण्याचे पेशवेll

>> माझा डेस्क ओला झाला ना! <<
आरारारा.. मालक काय केलेत डेस्कावर.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

विशाल कुलकर्णी's picture

8 Oct 2009 - 1:25 pm | विशाल कुलकर्णी

श्रीमंत...

हे पण वाचा ना राव... (माझा सुनील शेट्टी झाला ना यार! )
त्याला प्रत्येक चित्रपटात एकदातरी लिटरभर लाळ गाळल्याशिवाय अभिनय केल्यासारखेच वाटत नाही.

अवांतर : सुनील शेट्टी आणि अभिनय? कै च्या कै... विशल्या खरंच तुझा शेट्टी झाला रे ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

टारझन's picture

8 Oct 2009 - 10:25 pm | टारझन

हॅहॅहॅ ..
लेख उघडायच्या आधी वाटलं .. "मण्याच्या खिषातल्याच शेंगदाण्याची" आमटी आहे की काय ? =))
अंमळ चांगली पाकृ आहे :)

-(शेंगदाणे प्रेमी) टारोबा पिनट

प्रभो's picture

8 Oct 2009 - 11:35 pm | प्रभो

त्याची आमटी नाही ठेचा केलायस आधीच तू......
=))

(आपला आमटीप्रेमी)प्रभो

प्रभो's picture

8 Oct 2009 - 2:52 pm | प्रभो

सर,

जी आवडलीय ती हो म्हणत नाहीये ना गेला ६ महिने झालं (तिला हे सगळे प्रताप माहित असून)...ती माझ्या कवितेतली हो...

तरी जरी कुठली मुलगी बघितली तरी फोटो कुरुवाळत बसू नका...लगेच मला व्यनी करा... :)
(व्यनींची वाट बघणारा)प्रभो

श्रावण मोडक's picture

8 Oct 2009 - 2:56 pm | श्रावण मोडक

प्रश्न गंभीर आहे. चर्चा करावी लागेल!!! :)

चित्रा's picture

8 Oct 2009 - 2:16 am | चित्रा

आईसाठी केले म्हणजे तिथेच सगळे श्रेय मिळाले की. शेवटच्या पूर्ण भरलेल्या पानाचा फोटोही आवडला.

प्राजु's picture

8 Oct 2009 - 3:45 am | प्राजु

आईसाठी केलंस... यातच सगळं आलं..
फोटो आवडले..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती२'s picture

8 Oct 2009 - 6:40 am | स्वाती२

+१
तुम्ही एवढे निगुतीने आई साठी केले यातच अष्टमी संपन्न झाली. छान आलेत फोटो.

विंजिनेर's picture

8 Oct 2009 - 7:31 am | विंजिनेर

असेच म्हणतो.

सुबक ठेंगणी's picture

8 Oct 2009 - 4:03 am | सुबक ठेंगणी

ही भावना खरंच महत्त्वाची आहे.
आणि सजवलेलं ताट खरंच खूप छान दिसतंय. वदनीकवळ घेता म्हणून सरळ जेवायला बसावं असं वाटतं आहे.
आता अष्टमीच्या दिवशी तुझ्या हातची दाण्याची आमटी आणि ते कोशिंबीर पंचामृताचं जेवायला येईन म्हणते :)

प्रभो's picture

8 Oct 2009 - 2:54 pm | प्रभो

ये..वाट बघतो

--प्रभो

लवंगी's picture

8 Oct 2009 - 4:53 am | लवंगी

तुझ्या बायोडेटामध्ये हे टाकायला विसरू नको रे..पोरींची रांग लागेल .... :)

अनुप कोहळे's picture

8 Oct 2009 - 11:08 am | अनुप कोहळे

पण मग लग्नानंतर तुम्ही स्वयंपाक घरात. ;)
क्रुती फारच छान जमली. आई साठी केली ह्यातच सगळे आले......
सोवळ्यातले पदार्थ पण भावलेत.

सहज's picture

8 Oct 2009 - 6:59 am | सहज

प्रभो लै भारी!

पॅराडिगम शिफ्ट! अनेक मुले (पुरुष) आता नियमीत व उत्तम स्वयंपाक करु लागली आहेत. आयांनी त्यांच्या मुला-मुलींना समानतेने वाढवले म्हणायचे? का मुलांना हे कळले आहे की चांगले खायचे असेल / वधू मिळवायची असेल तर स्वःताच बनवण्याशिवाय गत्यंतर नाही? ;-)

शाहरुख's picture

8 Oct 2009 - 7:11 am | शाहरुख

का मुलांना हे कळले आहे की चांगले खायचे असेल / वधू मिळवायची असेल तर स्वःताच बनवण्याशिवाय गत्यंतर नाही?

'आलीया भोगासी असावे सादर' असे कुणीतरी म्हटले आहेच की..

छोटा डॉन's picture

8 Oct 2009 - 7:27 am | छोटा डॉन

का मुलांना हे कळले आहे की चांगले खायचे असेल / वधू मिळवायची असेल तर स्वःताच बनवण्याशिवाय गत्यंतर नाही?

माझा वैयक्तीक मत (अनुभव नव्हे, उगाच डोक्याला शॉट नका देऊ ) :
मुलींचे २ प्रकार असतात जनरली, हे असे असतीलच असे नाही पण इन जनरल तसे असते. म्हणजे सर्वसाधारण गटवारी करायची तर ती अशी करता येईल ...

१. सुंदर मुली ( म्हणजे दिसायला, वागायला लै भारी ) पण स्वयंपाकाच्या नावाने बोंब. कशीबशी भात आणि आमटी बनवु शकणार्‍या. सगळा जोर हॉटेलिंग आणि पिझ्झा होम डिलीव्हरीवर. लग्नानंतर उत्तम जेवायचे असेल तर तुम्हीच स्वयंपाक शिका अथवा रोज हॉटेलातुन ऑर्डर करु शकु एवढा पगार कमवण्याची ऐपत ठेवा. तिच्या नटण्या-मुरडण्यातुन तिला स्वयंपाक शिकण्यासाठी वेळ मिळण्याची शक्यता कमीच असते.
उदा ( जनरलाईज्ड बरं का ) : जॉब करणार्‍या हाय्-फाय मुली , त्यात अजुन "लव्ह मॅरेज" करणार्‍या वगैरे ...

२. बर्‍यापैकी दिसायला अ‍ॅव्हरेज अथवा बिलोव्ह अ‍ॅव्हरेज असणार्‍या मुली : स्वयंपाक वगैरेचा छंद असतो, करुन खाऊ घालण्याची हौसही असते त्यामुळे लग्नानंतर खाण्याबाबत बोंबाबोंब होणार नसते.
अशावेळी बहुतेक "अरेंज मॅरेज" असते. ;)

आता निर्णय तुमचा आहे.
चॉईस इज युवर्स, क्काय ????

बाकी शेवटी तो प्रसादाच्या ताटाचा फोटो पहुन वारलो, लै म्हणजे लै झकास झाला आहे बेत ...
प्रभो, मज्जा आहे भौ तुझी ;)
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

शाहरुख's picture

8 Oct 2009 - 7:52 am | शाहरुख

आम्हाला जशी होते तशी आपल्याला सुंदर मुलींकडून हाडहाड होतेय का ? ;-)

अवंतर होत असलेने उत्तर खरडवहीत द्यावे :-D

(मत बरेचदा अनुभवातून बनते अशा मताचा) शाहरुख

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Oct 2009 - 8:40 am | llपुण्याचे पेशवेll

>> आम्हाला जशी होते तशी आपल्याला सुंदर मुलींकडून हाडहाड होतेय का ? <<
नाही तसे असणे आवश्यक नाही. निरीक्षणातून शिकता येते. आता आमच्या हापिसातल्या मैत्रिणींकडे आम्ही जेवायला जातो. त्यात डानरावाने म्हटल्याप्रमाणे दिसायला साधारण(ज्यात काळ्याबिंद्र्या, स्थूल मुलींचा समावेश होतो). त्यांच्याकडे जेवण चविष्ट होते.
पण ज्या दिसायला त्यातल्यात्यात बर्‍या त्यांच्याकडे मात्र जेवणाच्या नावाने बोंब्.(कसे काय त्यांचे नवरे असले जेवण जेवतात) असाही विचार मनात येऊन गेला. एकूणच क्रॉकरी, डिनरसेट उत्तम होते पण त्यातले कंटेट म्हणजे जेवण मात्र सुमार.
माझे तर स्पष्ट असे मत आहे की या सुंदर मुलीनाही जेवण चांगले बनवता येत असते तर त्या पण शेप मधे न राहता अंमळ स्थूल झाल्या असत्या.

अवांतरः प्रभोदेवा आमटी मस्तच रे. जेवणाचा फोटोही छानच. एकदा बोलव तुझ्या घरी जेवायला आम्हाला. :)

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

श्रीमंत, डान्राव आणी शारूक,

आपण समस्त जगाच्या भावना चव्हाट्यावर स्वारी कट्ट्यावर आणल्याबद्दल धन्यवाद.....
श्रीमंतांच्या निरिक्षणास दाद द्यावी वाटते...आमचे पण हेच निरिक्षण आहे..

--प्रभो

अवांतरः कधीही घरी या. यायच्या आधी कळवा म्हणजे तयारी करून ठेवता यील.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2009 - 3:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपण समस्त जगाच्या भावना चव्हाट्यावर स्वारी कट्ट्यावर आणल्याबद्दल धन्यवाद.....

=)) =))
मित्रांनो, ऑल द बेस्ट हा ...

प्रभो, पाकृ भारी. बर्‍याच दिवसात दाण्याची आमटी खाल्ली नव्हती; लवकरच केली पाहिजे.

अदिती

क्रान्ति's picture

8 Oct 2009 - 8:24 am | क्रान्ति

सोय झाली.
मी आमसुलाऐवजी दही घालून आमटी करते. बेलानं सांगितल्याप्रमाणे ओलं खोबरंही मस्त लागतं.
गौरीच्या नैवेद्याचं पंचामृत म्हणजे केवळ स्वर्गसुख!
प्रसादाच्या ताटाचा फोटो सुरेख आलाय.:)

क्रान्ति
अग्निसखा

प्रभो's picture

8 Oct 2009 - 3:05 pm | प्रभो

दही व ओलं खोबरं घालून आईला आधी एकदा करून बघायला सांगतो... :)
छानच लागत असणार म्हणा
--प्रभो

दशानन's picture

8 Oct 2009 - 8:58 am | दशानन

मस्त रे प्रभो !!!

च्यामायला.... मलाच काही येत नाही करायला :(

अवलिया's picture

8 Oct 2009 - 9:09 am | अवलिया

काय बोलु? शब्दच संपले.. :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दिपक's picture

8 Oct 2009 - 9:54 am | दिपक

गणपाने रचिला पाया,
प्रभो केलास कळस..!

हर्षद आनंदी's picture

8 Oct 2009 - 9:56 am | हर्षद आनंदी

कधी तिखट कधी मिरची वापरतात,

तसा मी कधीच उपास करीत नाही, पण उपवासाच्या दिवशी असे पदार्थ खायला मात्र आवडतात,

गौरीच्या प्रसादाचे ताट खुपच सुंदर..

प्रभो's picture

8 Oct 2009 - 3:02 pm | प्रभो

मिरची आम्ही तुकडे करून फोडणीत न टाकता मिक्सरमधून बारीक काढून तिखटाप्रमाणे वापरतो..... तुम्हीपण असेच करता का??
--प्रभो

गणपा's picture

8 Oct 2009 - 1:19 pm | गणपा

जियो मेरे लाल. (तुझी आई पण असच म्हणाली असेल) :)
मस्तच रे.
लेका जरा त्या भाकरीची कृती टाक रे. गेल्या आठवड्यात करायला गेलो नी मोठ्ठा पोपट झाला. आणि हा जोअडीला त्या पंचामृताची पण.

प्रभो's picture

8 Oct 2009 - 2:57 pm | प्रभो

पंचामृताची टाकू शकतो लवकर कारण ते मला येते..

भाकरीच्या पाकृमधे जरा गोंधळ आहे मझ्या मनात..आईला कंसल्ट करून टाकेन... :)
--प्रभो

भाग्यश्री कुलकर्णी's picture

8 Oct 2009 - 1:30 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सुरेख मांडलेलं ताट पाहुन खायची इच्छा झाली.

हे प्रभो,
ही पाकृ लिहून जेमतेम चहा करू शकणार्‍या (मायक्रोवेव्हमध्ये), एक वाटी तांदूळ+दोन वाट्या पाणी या कोष्टकाप्रमाणे तांदूळ कुकरमध्ये घालू शकणार्‍या व (मायक्रोवेव्हमध्येच) मॅगी उकळू शकणार्‍या अशा मला जाम म्हणजे जामच न्यूनगंड दिलास!
खरंच मी पोलाद बनवतो तेवढाच मला स्वयंपाक येतो. (तो खरं तर लै भारी स्वयंपाकच आहे!) पण नेहमीचा स्वयंपाक करणे ही कांहीं "खायची गोष्ट" नाही हे मला केंव्हाच कळलंय व मला स्वयंपाक "कशाशी खातात" हेही माहीत नाही.
हे प्रभो, जय हो! मला लै कौतुक वाटते अशा स्वयंपाक करू शकणार्‍या पुरुषोत्तमांचे!
प्रेझेंटेशन चांगले आहे पण कृती बरोबर आहे कीं नाहीं माहीत नाहीं. "श्यामच्या आई"त लिहिल्याप्रमाणे "धुरात बसून केलेल्या स्वयंपाक गोड म्हणून खावा, त्याला नावे ठेऊ नयेत" या न्यायाने सर्वांनी (विशेषतः तुझ्या आईने) तुझी आमटी झकास-झकास म्हणत (मुकाट्याने) खाल्ली कीं खरंच चांगली झाली होती?
जस्ट तंगडी ओढली (leg-pulling)! टेन्शन नही लेनेका, क्याsssss?
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सुबक ठेंगणी's picture

8 Oct 2009 - 3:24 pm | सुबक ठेंगणी

तुम्ही पोलादाचे चणे खाता :P (ह. घ्यालच!)

प्रभो's picture

8 Oct 2009 - 3:38 pm | प्रभो

वेडे, त्यांनी खातो असे कुठे लिहिलयं...बनवता येतं असं लिहिलयं...

आणी तुला माहिती आहेच ना...चणे आहेत पण दात नाहीत आणी दात आहेत पण चणे नाहीत...(काका ह. घ्या बरंका)
--प्रभो

सुबकताई (आणि बल्लवाचार्य प्रभो),
व्वा! आदाब अर्ज है!! क्या पतेकी बात कही है आपने!!!
(कांहीं गोष्टी उर्दूतच छान वाटतात!)
"चणे खावे लोखंडाचे" ही म्हण माहीत असूनही हे माझ्या लक्षात आलं नव्हतं हं! शिवाय पोलादचे चणे खायचे व "ह. घ्यायचे" म्हणजे जरा tall orderच नाही का!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

पर्नल नेने मराठे's picture

8 Oct 2009 - 3:45 pm | पर्नल नेने मराठे

:D सुरेख प्रभो
चुचु

स्वाती राजेश's picture

8 Oct 2009 - 4:14 pm | स्वाती राजेश

वेळ कमी असेल तर...भाजी आणि आमटी एकत्र करते....
फोडणीत बटाट्याच्या काचर्‍या करून टाकयच्या....बाकी सेम कृती...

सर्वात आवडणारा पदार्थ : पंचामृत
काय मस्त आला आहे फोटो...:)
काय भाऊ, त्याची जरा रेसिपी लिहीली असती तर बरे झाले असते...
आईला विचारून लिहा, वाट पाहात आहे.....

मॅन्ड्रेक's picture

8 Oct 2009 - 8:14 pm | मॅन्ड्रेक

at and post : janadu.

चतुरंग's picture

8 Oct 2009 - 8:16 pm | चतुरंग

लेकराला क्षमा कर तो हे असले पदार्थ करुन समस्त मिपाकरांना एकाच वेळी त्रास देत आहे! ;)

अरे वा, ताट बा़की एकदम क ड क सजवलं आहेस! B)
ताट तू स्वतः लावलं आहेस की तुझ्या आईची मदत घेतलीस? तू स्वतः लावलं असशील तर तुझं प्रचंड कौतुक कारण प्रत्येक पदार्थ योग्य जागी दिसतोय!

(लग्नासाठीचा तुझा बायोडेटा म्हणजे तुझं नाव, वय आणि तू केलेल्या पदार्थांनी भरलेल्या ताटाचा फोटू एवढेच ठेव. मुलींची रांग लागेल! ;) )

(सेमी-बल्लव)चतुरंग

प्रभो's picture

8 Oct 2009 - 8:22 pm | प्रभो

रंगाशेठ,

आत्ता पर्यंत २४ वर्षात मी गौरी-गणपती ला घरीच असतो....कुठेही रहायला असलो तरी...गेली ७ वर्षे घराबाहेर आहे तसा..

८व्या वर्षी मुंज झाल्यापासून सोवळ्यात आई-आजीने केलेल्या स्वयंपाकाचे प्रसदाचे ताट सोवळ्यात लावण्याचे काम मीच करतो. अधीक त्या दिवशीची पूजा पण (गौरी + गणपती + घरचे देव) . आणी जेवायला आलेल्या सगळ्यांना वाढतो पण.. :)

(वाढीव)प्रभो

प्राजु's picture

8 Oct 2009 - 8:36 pm | प्राजु

याला लवकर कुणीतरी मुलगी बघा रे!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

8 Oct 2009 - 10:44 pm | विसोबा खेचर

शब्द संपले...

तात्या.

मीनल's picture

9 Oct 2009 - 5:34 am | मीनल

प्रसादाचे ताट क्लासच.
मी उपासाच्या बटाटा भाजीत शेंगदाणा कूट घालते.
भगरीच्या भाकरी? कधीच नाही खाल्ली.

नल.

सुधीर काळे's picture

9 Oct 2009 - 12:10 pm | सुधीर काळे

खरं आहे. मीही नाहीं खाल्ल्या! (भगरीच्या भाकरी? कधीच नाही खाल्ली.)
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सोनम's picture

9 Oct 2009 - 6:07 pm | सोनम

मी ही नाही खाल्ली भगरीच्या भाकरी? :( :(
खुपच छान शेंगदाण्याची आमटी आणी उपवासाची बटाट्याची भाजी. :) :)
प्रसादाच्या ताटाचा फोटो ही खुपच छान आणी पदार्थ ही. =D> =D>

प्रसन्न केसकर's picture

9 Oct 2009 - 6:09 pm | प्रसन्न केसकर

उपासाच्या मिसळीत पण छान लागते.

स्वाती दिनेश's picture

9 Oct 2009 - 7:26 pm | स्वाती दिनेश

फोटो, पाकृ सगळंच मस्त..
स्वाती