काल रात्री मॅसाच्युसेट्समधे पुन्हा हलकीशी हिमवृष्टी झाली. आज सकाळी गाडीवरचे बर्फ साफ करायला बाहेर पडलो, बरोबर चिरंजीवही होते (वय वर्षे ६ ), आणि बर्फात पायांचे ठसे दिसले, बॉबकॅटच्या! (हा प्राणी बॉबकॅटच असणार कारण मागच्याच आठवड्यात आमच्या निवासी संकुलाच्या आसपास तो दिसल्याबद्दलची भित्तिपत्रके लावली होती!). मी सावध होऊन मुलाला मागेच थांबवले!गाडीच्या खालून ठशांचा माग गेलेला दिसत होता त्यामुळे गाडीखाली आणि आजूबाजूला नीट निरखून घेतले आणि प्राणी नाही याची खात्री करुन घेतली. संकुलाच्या मागच्या बाजूस जंगल आहे तिकडे ठशांचा माग काढला (अवांतर - चिरंजीव फारच एक्साईट झाले होते "बाबा आपण जंगलात जाऊन त्याला पकडू या का?!" मी: " अरे काहीतरीच काय? तुला काय ते मांजर वाटलं का? तोच पकडेल आपल्याला". मुलगा: "मग मी टिरॉनोसॉरस रेक्स (डायनॉसोरची एक प्रजाती - हल्ली कारट्यांना हे असलं जनरल नालिज फार असतं:) चा आवाज काढून त्याला पळवून लावीन!!").आता संध्याकाळी येताजाताना सावध रहाणे आले :((!
मी झटपट कॅमेरा आणला आणि काही प्रकाशचित्रे चमकावली!
माझं निवासस्थान तळमजल्यावरच आहे त्याच्या खिडकीबाहेरचे ठसे -
जंगलाच्या दिशेने ठशांचा माग -
आणखी थोडं जवळून -
बॉबकॅट ह्या प्राण्याचा 'विकी'मधला दुवा http://en.wikipedia.org/wiki/Bobcat
चतुरंग
प्रतिक्रिया
29 Feb 2008 - 7:54 am | विसोबा खेचर
आता संध्याकाळी येताजाताना सावध रहाणे आले :((!
रंगराव, सांभाळा बरं स्वत:ला! काळजी घ्या..
तात्या.
29 Feb 2008 - 8:10 am | ऋषिकेश
ठशावरून तर बॉब्या एकदम थोराड वाटतो आहे. हे बॉबकॅट्स एकदम हल्ला करतीलच किंवा उघडपणे तुमच्यासमोर येतीलच असे नाहि. पण लहान चणीच्या मुलांना मात्र ते घाबरत नाहि :( तेव्हा मुलांना बाहेर जपून जायला सांगा.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
29 Feb 2008 - 7:27 pm | सुधीर कांदळकर
दिसला तर जास्त नशीबवान. आता कॅमेरा सरसावूनच तयार ठेवा. दिसला की काढा फोटू. संपूर्ण दिसण्यासाठी शुभेच्छा.
1 Mar 2008 - 11:01 am | पिवळा डांबिस
आम्हाला "बॉबकट" वाटलं...
तो ही येऊन गेला....:)))
बाकी चतुरंगराव, जरा सांभाळून! विशेषतः लहान मुलं असतील तर काळजी घ्या. मोठ्या माणसांना तसं घाबरण्याचं कारण नाही. आम्ही पुर्वी बॉस्टनमध्ये रहात असतांना स्नो मध्ये त्याचे ठ्से पाहिले होते. पण तो मोठ्या माणसांपासून दूरच रहातो असे ऐकले होते....
जनरली ते रात्री गारबेजमध्ये चिकन-मटणाचे अवशेष असतील तर ते खायला येतात. तेंव्हा रात्री जर गारबेज टाकायला जात असाल तर काळजी घ्या. अन्यथा काळजीचे कारण नाही.
-पिवळा डांबिस