गाभा:
मी पाहिलंय, शेअर मार्केट मधिल कंपन्याचे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वर्गीकरण केलेले असते, जसे
Group: A, B,T, S, TS, Z etc.
तर हे वर्गीकरण कोणत्या निकषांच्या आधारे केले जाते?
अजुन कोणते ग्रुप असतात??
या ग्रुपची काहि ठळक वैशिष्ट्ये???
क्रुपया जाणकारांनी मदत करावी............
आपला ,
उम्मि
प्रतिक्रिया
3 Oct 2009 - 6:45 pm | पर्नल नेने मराठे
राजे :<
चुचु
4 Oct 2009 - 7:00 pm | उम्मि
राजे, तात्या, सागर मदत करा........
4 Oct 2009 - 7:20 pm | दशानन
ए कॅटेगरी चे शेयर्स - ह्यामध्ये त्या कंपनीचे शेयर असतात ज्यांचे कॅपीटल जास्त असते व त्याच बरोबर शेयर्सची संख्यापण जास्त असते, ह्यांचा ट्रेडींग टर्नओव्हर देखील जास्त असतो, व ह्यांच्र वार्षिक उत्पन्न वाढ रेकॉर्ड देखील चांगले असते तसेच हे शेयर धारकांना उत्तम डिविडेंड देतात व ह्या शेयर्सना ईंन्ट्राडे ट्रेडिंगची परवानगी मिळालेली असते, तसेच ह्यां कंपन्या शेयर धारकांना कमीत कमी तोटा व्हावा ह्यासाठी कटीबध्द देखील असतात कारण त्यांना त्यांचा ग्रेड जपायचा असतो.
बी कॅटेगरी - मध्ये जे शेयर असतात ते काही खुप मोठ्या कंपन्यांचे नसतात पण त्यांचे उत्पन्न व रोजचा मार्केट टर्नओव्हर हा व्यवस्थीत असतो ह्या कंपन्यांमध्ये फक्त डे ट्रेडींग ची परवानगी असते मार्जिन ट्रेडिंग ची नाही. ह्या कॅटेगरी मधील शेयर तुम्हाला फायदा पण देऊ शकतात व तेवढाच तोटापण, थोडे काळजी घेउन मग बी कॅटेगरीच्या शेयर ट्रेडिंग मध्ये उतरावे.
सी कॅटेगरी - ह्या मध्ये छोट्या छोट्या कंपन्यांचे शेअर असतात व त्यामध्ये फक्त फिजिंकल शेयर माध्यमातूनच ट्रेडिंग केले जाऊ शकते म्हणजेच डिलेव्हरी ट्रेडिंग. व सी कॅटेगरी च्या शेयर खरेदी-विक्री साठी तुम्हाला डिमेटची गरज नसते.
कॅटेगरी टी - ह्या मध्ये सेबीची कमेटी लक्ष ठेऊन असते असे शेयर्स येतात व ह्यामध्ये फक्त डिलेव्हरी शेयर्स मध्येच कार्य होऊ शकते.
कॅटेगरी झेड - ह्या कॅटेगरी मध्ये ते शेयर येतात जे बीएसईच्या काही नियमांची पुर्तता करु शकत नाहीत ह्यांमध्ये पण डिलेव्हरी ट्रेडिगंच होऊ शकते.
कॅटेगरी एफ आणी बाकी - ह्यांमध्ये डिबेंचर्स (बॉन्डस) व सरकारी शेयर्स असतात.