आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर कविता ताळमेळकाव्य हे जुळे कधी कधी उगाच शब्दभेळहा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ
सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरातही विडंबने तुझी कुणी अता न वाचतातऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥
काव्य पाहता तुझे मनात जागतो छचोरअन मनातल्या मनात हासतो मी अघोरलोक हासता खुलून, सोडतेस ताळमेळ ॥
काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपूनएकदा तुला खरेच काढणार झोडपूनये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!--केशवसुमार(माघ वद्य ७ शके १९२९,२८ फेब्रु. २००८)
प्रतिक्रिया
28 Feb 2008 - 12:33 pm | बेसनलाडू
आवडले.
हा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ
ऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥
ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!
मस्त!
(आस्वादक)बेसनलाडू
28 Feb 2008 - 12:39 pm | स्वाती दिनेश
शब्दभेळ आवडली,स्वाती
28 Feb 2008 - 3:39 pm | सर्वसाक्षी
एकदम कडक! हिंदुस्थानातील आगमन जोरदार दिसते.
28 Feb 2008 - 8:43 pm | llपुण्याचे पेशवेll
काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपूनएकदा तुला खरेच काढणार झोडपूनये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!
लई आवडले बॉ....
पुण्याचे पेशवे
28 Feb 2008 - 8:46 pm | प्राजु
केशव, खरंच मस्त जमलीये...
- (सर्वव्यापी)प्राजु
28 Feb 2008 - 8:47 pm | चतुरंग
पण मला नेहमीची 'किक' नाही आली. (केशवा, कदाचित थोडा जेटलॅग असावा का?:))
चतुरंग
29 Feb 2008 - 7:57 am | विसोबा खेचर
काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपूनएकदा तुला खरेच काढणार झोडपूनये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!
लय भारी रे केशवा, वरील लायनी सर्वात आवडल्या... :)
तात्या.
29 Feb 2008 - 12:08 pm | सर्किट (not verified)
भरतभूमीवर पोहोचता क्षणी दोन कवितांच्या चिंध्या करून मोकळा जाहला !!जबरा !!- सर्किट
1 Mar 2008 - 7:26 pm | सुधीर कांदळकर
आहे.धमाल आली. असेच चालूद्यात. शुभेच्छा.
3 Mar 2008 - 11:38 pm | वरदा
सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात
ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात
आम्ही वाचतो की...मस्तच असतात एकाहून एक छान..
काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून.....
सहिच....