एन आर आय बँकिंग (NRI Banking)

JAGOMOHANPYARE's picture
JAGOMOHANPYARE in काथ्याकूट
1 Oct 2009 - 9:05 am
गाभा: 

एन आर आय बँकिंग बद्दल मला काही शंका आहेत..

१. NRE आणि NRO अकाउंटमध्ये काय फरक असतो ?

२. परदेशातून पैसे आपल्याच खात्यावर जमा करण्यासाठी NRE किंवा NRO अकाउंटमध्येच ट्रान्स्फर करणे आवश्यक असते का?

३. आपल्या पूर्वी ओपन केलेल्या सेविंग अकाउंटमध्ये ( जे NRE/ NRO नाही) आपण परदेशातून पैसे डायरेक्ट ट्रान्स्फर करु शकतो का?

४. मग जर नॉर्मल अकाउंटमध्ये पैसे डायरेक्ट ट्रान्स्फर करता येतात, तर NRE/ NRO अकाउंट असण्यात विशेष फायदा काय आहे?

मी विविध बॅन्कांच्या साइट्स पाहिल्या. पण त्यावर अकाउंट ओपन कसे करावे, मिनिमम बॅलन्स, अशी माहिती आहे... मला या प्रश्नांबाबत कोणी मार्गदर्शन करू शकेल का?

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

1 Oct 2009 - 9:31 am | पाषाणभेद

माफ करा. मला यातली काही माहीती नाही, पण सामान्यत: आदर्श प्रश्न कसे विचारावे हेच यातून दिसते.

मिपावर असलेल्या अनेक परदेशी बांधवांकडून आपले शंकासमाधान होईलच.
-----------------------------------
-बँकेत तोडफोड केली म्हणून दगडफोडीची सजा मिळालेला पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

सुनील's picture

1 Oct 2009 - 10:57 am | सुनील

१. NRE आणि NRO अकाउंटमध्ये काय फरक असतो ?
भारतातील NRE अकाउंट मधील पैसा पुन्हा परदेशी पाठवित येतो. याउलट भारतातील NRO अकाउंटमध्ये आलेला पैसा पुन्हा परदेशी पाठवता येत नाही (चुभुद्याघ्या).

२. परदेशातून पैसे आपल्याच खात्यावर जमा करण्यासाठी NRE किंवा NRO अकाउंटमध्येच ट्रान्स्फर करणे आवश्यक असते का?
आवश्यक नाही. परंतु या खात्यांवर जमा झालेल्या रकमेवर टॅक्स भरावा लागत नसल्यामुळे, तसे पाठवणे बरे!

३. आपल्या पूर्वी ओपन केलेल्या सेविंग अकाउंटमध्ये ( जे NRE/ NRO नाही) आपण परदेशातून पैसे डायरेक्ट ट्रान्स्फर करु शकतो का?
नक्कीच.

४. मग जर नॉर्मल अकाउंटमध्ये पैसे डायरेक्ट ट्रान्स्फर करता येतात, तर NRE/ NRO अकाउंट असण्यात विशेष फायदा काय आहे?
उत्तर वर दिलेले आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मीनल's picture

1 Oct 2009 - 6:28 pm | मीनल

१] माझ्या अनुभवानुसार NRE अकाउंटमधील पैश्याना भारतात टॅक्स नाही. परंतु NRO अकाउंटमधील सेव्हींग्ज, फिक्स डिपॉझीट यांवर ३०% टॅक्स आहे.
तो कमी करण्यासाठी एक फॉर्म आहे. तो मला बँक ऑफ बरोडा मधे मिळाला आहे. कुणाला हवा असल्यास स्कॅन करून पाठवेन.
इतर कुठल्याही बँकेत या बद्दल सुतराम कल्पना नाही.त्यांना तो फॉर्म म्हणजे काय तेच माहिती नाही.
२]NRE अकाउंटमधे बाहेरच्या देशातूनच पैसे यावे लगतात. ते NRO अकाउंटमधे किंवा नॉर्मल सेव्हिंग अकाउंट मधे ट्रान्सफर करता येतात. पण NRO मधून NRE अकाउंटमधे करता येत नाही.
३]एन राय आय स्टेटस झाल्यावर नॉर्मल सेव्हिंग अकाउंट चालू ठेवू शकतो. परंतु त्या इतत्र केलेल्या डिपॉझिट/इंन्व्हेसमेंट/शेअर्सच्या उत्पन्न( व्याज किंवा डिबेंचर ) त्या अकाउंटमधे टाकू शकतो की नाही तसेच त्याची एफ डी करू शकतो की नाही या बद्दल आम्हाला मतभेद दिसले आहेत.
एका सी ए म्हणण आहे की - नाही. कारण ओरिजिनल डिपॉझिट/इंन्व्हेसमेंट/शेअर्सचे पैसे भरतात मिळवलेले नाही. ते तसे आतील तर काहीही हरकत नाही.
दुसरा सी ए म्हणतो की -हो तुम्ही करू शकता . पण ते डिक्लेअर करून टॅक्स भरला की झाल.
यावर उपाय असा वाटतो की NRE अकाउंटमधे बाहेरच्या देशातून पैसे पाठवावे.
भारतात फार थोड्या अश्या टॅक्स फ्री इंन्व्हेसमेंटस आहेत त्यात पैसे गुंतवावे. ( उदा: आय सी आय सी आय मधील इंन्श्युरंन्स पॉलिसीज, न्यु यॉर्क लाईफ इंन्श्युरंन्स पॉलिसीज)पण यात रिटर्नस मार्कॅट वर अवलंबून आहेत.
किंवा रिअल इस्टेट मधे ही गुंतवता येतात. किंवा सोने खरेदी करता येईल.

जाणकार अधिक माहीती देतील.

मीनल.

विजुभाऊ's picture

1 Oct 2009 - 11:20 am | विजुभाऊ

पैसे हवालानी पाठवले तर टेक्स लागत नाही.
पण हवाला निवडताना पैसे घरपोच मिळतील असाच हवाला एजन्ट निवडावा

पर्नल नेने मराठे's picture

1 Oct 2009 - 11:47 am | पर्नल नेने मराठे

शी विजुभाउ कहिहि कय सन्ग्ताय :O

चुचु

गणपा's picture

1 Oct 2009 - 12:12 pm | गणपा

पण विजुभाय हवाल्याने पैसे पाठवले तर स्वकष्टाने कमावलेला पैसा काळ्या पैशात कनव्ह्रर्ट होइल ना :/
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

अवलिया's picture

2 Oct 2009 - 9:11 am | अवलिया

गणपा शेटशी सहमत आहे.
विजुभाउ उत्तर द्या... उगाच काहितरी लिहुन जायचे म्हणुन लिहु नका.
हा ब्यांकेसंबंधी धागा आहे. हिंदु धर्माच्या चालीरीतींविषयी नाही, की कुणीही काहीही बोलुन जावे आणि हिंदुंनी दिलेल्या विचारस्वातंत्र्याचा गैरफायदा घेवुन गरळ ओकावे.

नीट उत्तर द्या नाहीतर प्रतिक्रिया मागे घ्या !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

2 Oct 2009 - 9:20 am | दशानन

असेच म्हणतो.

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

अभिषेक पटवर्धन's picture

1 Oct 2009 - 1:02 pm | अभिषेक पटवर्धन

१. आर. बी. आय च्या नियमानुसार अनिवासि भारतियाना भारतात नॉर्मल सेवींग अकाउंट ओपरेट करता येत नाही. याचा अर्थ चालु खाती बंद करावीत असा नाही.
२. पैसे दोन्ही अकौंट मधे पाठवता येतात, पण सुनील यानी सांगितल्याप्रमाणे ते फक्त एन. आर. ई. खात्यातुनच परत आणता येतात. नॉर्मल अकाउंट मधुन पैसे देशाबाहेर पाठवण्याची पद्ध्त थोडी कटकटीची आहे.
३. जर तुमी कोणत्याही वर्षाच्या २९ सप्टेंबर आधी देश सोडला असेल (नोकरी करीता) आणि पुढच्या ३१ मार्च पर्यंत परत आला नसाल तर कोणत्याच रकमेवर टॅक्स लागत नाही (तुमी ती रक्कम देशात परत पाठवा अगर पठवु नका)
४. जर या तारखे नंतर गेला असाल तर मात्र पुढच्या ३१ मार्च पर्यंतचे सारे उत्प्न्न भारतात करपात्र आहे (परत पाठवा अगर पाठवु नका). आता तुमच्या वॉर्ड चा आयकर अधिकारि कीती तत्पर आहे यावर तुम्हाला कर भरावा लागेल की नाही हे अवलंबुन आहे.

JAGOMOHANPYARE's picture

1 Oct 2009 - 1:37 pm | JAGOMOHANPYARE

क्र. १- नॉर्मल अकाउन्ट ऑपरेट करता येत नाही, म्हणजे नेमके काय करता येत नाही हे समजले नाही... मी जर परदेशातून या अकाउंटला स्विफ्ट ने पैसे भरले.. आणि पोस्टाने या अकाउंटवरील चेक माझ्या घरी पाठवला की अकाउंट ऑपरेट झालेच की... पैसे भरणे आणि चेक देणे या दोन्हीवर बंधने तर नाहीत (नसावीत, ही अपेक्षा)

क्र. ४ - २९ सप्टेबरचा फंडा समजला नाही..... जोपर्यन्त मी भारतात काम केले आहे, तोपर्यंतचे माझे इन्कम भारतात टॅक्ससाठी गृहीत धरावे लागेल... त्या दिवसानंतरचे सगळे नियमानुसार टॅक्स फ्री होणार.... यात तारखेचा काय संबंध हे समजले नाही.... ( तसेच मी देश जुलै मध्ये सोडला आहे, त्यामुळे याची चिंता नाही.. )

हे गाइडलाईन्स कुठे वाचायला मिळतील ?

JAGOMOHANPYARE's picture

1 Oct 2009 - 3:25 pm | JAGOMOHANPYARE

२९ सप्टेबरचा फंडा समजला.......... NRI Guidelines मध्ये खालील व्याख्या आहे.........

A person is said to be "Resident" in India in any previous year if he -
(a) is in India in that year for an aggregate period of 182 days or more; or
( b ) having within the four years preceding that year been in India for a period of 365 days or more, is
in India in that year for an aggregate period of 60 days or more.

पर्नल नेने मराठे's picture

1 Oct 2009 - 2:12 pm | पर्नल नेने मराठे

क्र. १- नॉर्मल अकाउन्ट ऑपरेट करता येत नाही, म्हणजे नेमके काय करता येत नाही हे समजले नाही... मी जर परदेशातून या अकाउंटला स्विफ्ट ने पैसे भरले.. आणि पोस्टाने या अकाउंटवरील चेक माझ्या घरी पाठवला की अकाउंट ऑपरेट झालेच की... पैसे भरणे आणि चेक देणे या दोन्हीवर बंधने तर नाहीत (नसावीत, ही अपेक्षा)

एव्धे कराय्ची गरझ नाहि. एकस्चेन्जल जा, नॉर्मल अकाउन्ट ला बॅन्क त्रान्स्फर करा. काहि बॅन्कना २४ तासात पैसे येतात.
मी काल axis, BKC br. ला दुपारी १ ला दुबै हुन एकस्चेन्जमधे जाउन बॅन्क त्रान्स्फर केले. सकाली येउन online पाहिले तर पैसे आलेले होते.

चुचु

JAGOMOHANPYARE's picture

1 Oct 2009 - 2:21 pm | JAGOMOHANPYARE

एक्स्चेंज म्हणजे काय ?

पर्नल नेने मराठे's picture

1 Oct 2009 - 3:28 pm | पर्नल नेने मराठे

#o एक दुकान असते. त्या दुकानात पैसे चे व्यवहार केले जातात .
पैसे पाठ्वणे, कन्वर्ट करणे अस्ली कामे त्या दुकानात होतात. तु ज्या गावात आहेस तिक्डे रस्त्यावर्च्रा एका माणसाला विचार कि मनी एक्स्चे़ज कुठेय तो सान्गेल तिकडे जा.
तिकड्चा आगावु विचारेल कि DD करु का तर नाहि म्हण ..सान्ग भारतात बॅन्क ट्रन्स्फर करर्य्चेय, काम होइल.

चुचु
(UAE एक्स्चे़ज, शेख झायेद ऱोड ब्रान्च)

JAGOMOHANPYARE's picture

1 Oct 2009 - 3:36 pm | JAGOMOHANPYARE

Thanks >>> converted to >>>> आभार !

पैसे बदलून द्यायचे दुकान इथेही आहे.... पण तिथुन पैसे पाठवता येतात , हे माहीत नव्हते........ सध्या मालदिव मध्ये डॉलरचा दुष्काळ पडला आहे... त्यामुळे माहीत नाही, ते बिचारे दुकान उघडतात की नाही... :)
:)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Oct 2009 - 3:37 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत.

बिपिन कार्यकर्ते
UAE एक्स्चेंज, इमिग्रेशन रोड ब्रँच

पर्नल नेने मराठे's picture

1 Oct 2009 - 3:40 pm | पर्नल नेने मराठे

:D तुझ तर किन्ग फैझल स्त्रीट हवे ;)
चुचु

अवलिया's picture

1 Oct 2009 - 3:42 pm | अवलिया

आपापसात गप्पा मारण्यासाठी खव, व्यनीचा वापर करावा

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अंतु बर्वा's picture

1 Oct 2009 - 7:56 pm | अंतु बर्वा

माझ्या मते एकदा तुमचं status एनआराआय झालं की तुम्ही भारतात savings Account चालू ठेवू शकत नाही. तुम्हाला ती बंद करावी लागतात. त्याचप्रमाणे, DMAT Account मधुन तुम्हाला कोणत्याही प्रकारची समभाग खरेदी/विक्री करता येत नाही. अपवाद फक्त IPO चा. तुम्ही फक्त IPO मध्ये गुंतवणूक करु शकता. त्यानंतर ते समभाग सेकंडरी मार्केट मध्ये तुम्ही विकू शकत नाही.

तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट मध्ये पैसे ठेवू शकता जे NRE/NRO Account मधून यावे लागतात. बाकी दोघांतला फरक वरती जाणकारांनी सांगीतला आहेच.

आता असे बरेच जण असतील ज्यांचे NRI असूनही savings accounts आणी DMAT accounts चालू असतील. याला कारण हे सर्व track करण्याची कोणतीच सुविधा सध्या आयकर विभागाकडे असल्याचे दिसत नाही... आणी मुख्य म्हणजे, प्रत्येक बँकेने कोणत्याही ग्राहकाला NRE/NRO account उघडुन देताना त्या बँकेत असलेली ईतर सर्व savings accounts बंद करायला लावणे बंधनकारक आहे (जे होताना दिसत नाही...)

JAGOMOHANPYARE's picture

4 Oct 2009 - 9:10 am | JAGOMOHANPYARE

पण सेविंग अकाउंट बंद करून कसे चालेल ? जुन्या कंपनीचे पी एफ मिळणे, पूर्वीचे आय टी रिफंड यासाठी जर हा बँक नंबर दिला गेलेला असेल, तर अचानक हा नंबर बंद करून कसे चालेल ?

अंतु बर्वा's picture

6 Oct 2009 - 12:38 am | अंतु बर्वा

> पण सेविंग अकाउंट बंद करून कसे चालेल ? जुन्या कंपनीचे पी एफ
> मिळणे, पूर्वीचे आय टी रिफंड यासाठी जर हा बँक नंबर दिला गेलेला > असेल, तर अचानक हा नंबर बंद करून कसे चालेल ?

माझ्या मते त्याच अकाउंटला NRE/NRO मधे बदलता येतं...

अनामिका's picture

2 Oct 2009 - 12:14 am | अनामिका

इतर बॅकांचे माहित नाही पण माझ्या बॅकेने माझे पुर्वीचे बचत खाते एनआरई खाते सुरु करण्यापुर्वी बंद करण्यास सांगितले होते अन्यथा पुर्वीचे बचत खाते एनआरओ मधे परिवर्तीत करण्यात येईल असे सांगितले .....
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।