मध्यल्या वेळचे खाणे (ब्रेड रोल्स)

गणपा's picture
गणपा in पाककृती
30 Sep 2009 - 2:47 pm

काल सकाळी न्याहारीचा ज्याम कंटाळा आला होता. (अहो स्वतः बनवाव लागत. आयत गिळायला मिळत आसेल आमची ना कशाला?) दुपारी ऑफिस मध्येपण फळांवर वेळ मारुन नेली. संध्याकाळी खास जेवण बनवायचा मुड न्हवता, त्यामुळे प्रयोगशाळेला कुलुप. (कोण रे तो म्हणाला सुटलोSSSS ? :W बर इतक्या लवकर सोडीन >:) ).
रात्री ९ ला पोटात कावळे ओरडायला लागलेच. मग आता आयत्या वेळी काय कराव बर :? झटपट खिचडी करावी का? पण माझ्या जिभेचे चोचलेच फार त्यामुळे ती आयडिया रद्द [( .
फ्रिज उघडुन कच्च्या मालाचा अंदाज घेतला. ब्रेड दिसला. काही तरी असेच मध्यल्या ( ? ) वेळचे खाणे बनवावे ठरवले.
पटपट तयारीला लागलो.
एक लहान कांदा,टॅमेटो बारीक चिरुन घेतला. नारळ खवलेला होता तो काढला. १ चमचा बडीशेप घेतली/ला.
(बडीशेप च लिंग काय ब्वॉ? काही जण खाल्ली म्हणतात तर काही खल्ला. मरो त्याच्याशी काही देणे घेणे नाही.)

फ्रिजर मधली मसाला, हिरव वाटण (कोथींबीर + हिरवी मिरची + आल +लसुण) लावुन ठेवलेली कोलंबी काढली.
तिचे लहान (अंदाजे १ से.मी. लांबीचे) तु़कडे केले. त्यावर थोड लिंबु पिळल.

कढईत थोड तेल तापवुन त्यात कांदा गुलाबी होइस्तव परतला.

मग त्यात मसाला लावलेल्या कोलंबीचे तु़कडे टाकुन मस्त परतुन घेतेल.

लगेच त्यात टॅमेटो, नारळ, बडीशेप,मीठ टाकुन ५-७ मिनिटे खमंग परतुन सारण तयार केल.

ब्रेडच्या कडा कापुन घेतल्या. एका थाळीत थोड मिठाच पाणी घेतल.
एक ब्रेडची स्लाइस त्या पाण्याय बुडवुन लगेच तळ हातावर दाबुन त्यातल पाणी काढुन टाकल.
त्या स्लाइस वर तयार सारण टाकुन ब्रेडचा रोल वाळला.

ब्रेडच्या कडा दाबुन बंद केल्या.

तव्यावर थोड्याश्या तेलावर हे तयार रोल्स मध्यम आचेवर झटपट तळुन घेतले.

लवकर लवकर एका रोलचा समस्त मिपाकरांना नैवेद्य दाखवुन बाकीच्यांवर ताव मारला. :D

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

30 Sep 2009 - 2:55 pm | श्रावण मोडक

न वाचता आणि न पाहता थेट या बॉक्समध्ये आलोय, यावरूनच प्रतिसाद समजून घ्यावा.

सहज's picture

30 Sep 2009 - 2:58 pm | सहज

गणपाशेठला प्रतिसाद द्यायला वन हॅज टू थिंक आउट ऑफ द बॉक्स?

श्रावण मोडक's picture

30 Sep 2009 - 3:10 pm | श्रावण मोडक

गणपाशेठला प्रतिसाद द्यायला वन हॅज टू थिंक आउट ऑफ द बॉक्स?
हाहाहाहाहा... यू थिंक टू मच, सहजराव!!! हे बॉक्स वगैरे तर आमच्यालेखी लई लांबचं. आम्ही पदार्थ आणि चव याच्यापुरता मतलब ठेवतो. तो आज्जीकडून येवो किंवा आज्ज्याकडून किंवा मार्गारेट, एलिझाबेथ, जॉन, डॉन कोणीही... कसे :)

बेसनलाडू's picture

30 Sep 2009 - 11:50 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू
गणपाशेठचा स्वयंपाकातील उत्साह वाखाणण्याजोगा (नि स्फूर्तीदायक) आहे खरा!
(उत्साही)बेसनलाडू

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2009 - 3:02 pm | बिपिन कार्यकर्ते

नाव सांगणार तुझं!!!!! X(

बिपिन कार्यकर्ते

लहानपणी याच्यापाई खूप बोलणी खाल्लीत मी आईची., कारण मला किचनमध्ये जायचा कंटाळा, आणी हे साहेब एका पायावर तयार. :(

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2009 - 9:55 pm | बिपिन कार्यकर्ते

नाव तुला नाही सांगणारे... त्याच्या बॉसलाच सांगणारे... हा कंपनीत बसून असल्या पाकृ लिहित असतो म्हणून... मी ओळखतो त्याच्या बॉसला... :D

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

30 Sep 2009 - 10:00 pm | चतुरंग

गणपा तुझ्या बॉसला ओळखत नाही ना ह्याची खात्री करुन मग कळव! ;)

(कौंटर अ‍ॅटॅक)चतुरंग

छोटा डॉन's picture

30 Sep 2009 - 10:14 pm | छोटा डॉन

अहो रंगाशेठ, बॉसचे काय सांगता ?
अश्या एक से एक पाकॄ ( आणि त्याचे फोटो) पाहुन बॉसच गणपाला म्हणले "बॉस आहात" !

------
(सिसीलियन डिफेन्स) छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

चतुरंग's picture

30 Sep 2009 - 10:21 pm | चतुरंग

पॉइंट नोटेड! :B

(आँ पासाँ)चतुरंग

Nile's picture

1 Oct 2009 - 12:43 am | Nile

लै भारी, दोघेपण!

-गुमान एका जागी उभा राहुन समोरच्या राणीची मजा पाहणारा राजा. ;)

खालिद's picture

1 Oct 2009 - 12:41 am | खालिद

आता यापुढे काही बोलण्यासारखे शिल्लक नाही

(क्वीन्स गँबिट अ‍ॅक्सेप्टेड) खालिद

sneharani's picture

30 Sep 2009 - 3:05 pm | sneharani

=D> छानच...

धमाल मुलगा's picture

30 Sep 2009 - 3:05 pm | धमाल मुलगा

तुझा पत्ता दे रे लवकर...
वहिनी परत येईपर्यंत तुझ्याकडंच मुक्काम ठोकतो. रोज प्रयोग कर निरनिराळे...मी आहेच हादडायला :)

दिपक's picture

30 Sep 2009 - 3:11 pm | दिपक

नंदन's picture

30 Sep 2009 - 3:18 pm | नंदन
बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2009 - 3:30 pm | बिपिन कार्यकर्ते

श्री. गणपा यांची मिपावर फोटो चढवण्याची सुविधा काढून घेण्यात यावी असा प्रस्ताव मी मांडतो.

बिपिन कार्यकर्ते

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Sep 2009 - 3:40 pm | ब्रिटिश टिंग्या

संपादकांना पुर्णत: अनुमोदन!

- (सदस्य) टिंग्या

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2009 - 6:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बिका आणि टिंग्याला अनुमोदन

(कंपूबाज) अदिती

समंजस's picture

30 Sep 2009 - 3:39 pm | समंजस

गणपाभौ!! खल्लास @)
तुमची बायको दुर गेल्या पासुन आम्हा खाद्द प्रेमींची चांगलीच फावली आहे ;)
रोज नव्या पाककृती मिळताहेत आणखी काय! :)
खाद्दपदार्थांना ताटात सजवण्याच्या तुमच्या कल्पनाशक्तीला तर सलाम!

स्वाती२'s picture

30 Sep 2009 - 5:31 pm | स्वाती२

मस्त!

सोनम's picture

30 Sep 2009 - 6:40 pm | सोनम

खुपच छान पाककृती आहे. :) :)

संदीप चित्रे's picture

30 Sep 2009 - 7:33 pm | संदीप चित्रे

खल्लास !!!
बाकी सब खैरियत है ! ('खुदा गवाह'मधून उधार वाक्य)

मस्तानी's picture

30 Sep 2009 - 7:51 pm | मस्तानी

ब्रेड रोलचा " एम " छानच !
नवरात्र सम्पलच आहे, बडिशेप सोडुन बाकी सर्व सामान पण घरात आहे ... उद्या करुन बघावे म्हणते ... तुम्ही एकदम ग्रेट आहात ...

चतुरंग's picture

30 Sep 2009 - 8:07 pm | चतुरंग

आत्ता नक्की खात्रीच पटली की 'गणपा' हा मेल आय डी धारण केलेली ही सुगरण ताई किंवा काकू आहे! :D
(बर्‍या बोलाने तुमचे खरे नाव कळवा अन्यथा बंदीहुकूम काढावा लागेल ;) )

अहो वरण्-भात लावला की आमची छाती अभिमानाने वगैरे फुलून येते इथे तर मधल्या वेळचे वगैरे खाणे सुचते आहे आणि नुसतेच नाही तर अत्यंत यशस्वी होते आहे! छ्याऽऽएवढे फ्रस्ट्रेशन कधीच आले नव्हते! ~X(

(करपलेला)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2009 - 8:30 pm | बिपिन कार्यकर्ते

गणपा हा 'तो'च आहे 'ती' नाही. मला खात्री आहे. आणि मी लवकरच त्याचा बंदोबस्त करणार आहे. त्याची कंप्लेट करणार आहे.

बिपिन कार्यकर्ते

किट्टु's picture

30 Sep 2009 - 8:39 pm | किट्टु

बिका,

तुम्ही प्लीज 'गणपा' यांची कंप्लेट करु नका... आता कुठे त्यांनी बनवलेले पदार्थ मी करुन पाहायला सुरुवात केली आहे. अजुन मला खुप पदार्थ शिकायची इच्छा आहे.... :W

निमीत्त मात्र's picture

1 Oct 2009 - 1:22 am | निमीत्त मात्र

'गणपा' आहे का (पाटलांचा) 'गणपत' आहे ते काढा पाहू शोधुन एकदा! :)

पाककृती झक्कास!!!

गणपा's picture

1 Oct 2009 - 2:39 am | गणपा

आरारारारा चार रेशिप्या काय टाकल्या राव, लोक आमच लिंगच बदलायला निघाले.. :O

लोकांचा विश्वास बसावा म्हणुन करपलेल्या खिचडीची रेशीपी टाकावी काय :?

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

दिपाली पाटिल's picture

30 Sep 2009 - 8:52 pm | दिपाली पाटिल

>>आत्ता नक्की खात्रीच पटली की 'गणपा' हा मेल आय डी धारण केलेली ही सुगरण ताई किंवा काकू आहे!

'गणपा' नावाच्या कुणीतरी अंडरकव्हर काकू/ताई किंवा आजीबाई असणार...मला पहिल्या दिवसापासुन वाटतंय... :?
संपादकपदाचा उपयोग करुन तुम्ही जासुसी करु शकता चतरंग... :)
दिपाली :)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2009 - 9:06 pm | बिपिन कार्यकर्ते

गणपाला प्रश्न पडलाय बडीशेपेचं लिंग कोणतं आणि इथे पब्लिक.... जाऊ दे... ;)

बिपिन कार्यकर्ते

दिपाली पाटिल's picture

30 Sep 2009 - 9:13 pm | दिपाली पाटिल

गणपापण ना...एवढं सगळं बनवलं नी त्या बडिशेपेच्या मागे कसले लागताय.. :D

दिपाली :)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2009 - 9:16 pm | बिपिन कार्यकर्ते

छे छे!!! मी गणपाच्या मागे नाही लागणार हो.... मला आपली बडीशेपच बरी.

बिपिन कार्यकर्ते

गणपा's picture

30 Sep 2009 - 9:06 pm | गणपा

आता पुढच्या वेळी पाककृती सोबत माझा पण फटु टाकावा काय :?
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

चतुरंग's picture

30 Sep 2009 - 9:06 pm | चतुरंग

संपादक कुठले जासूसी करायला? आम्हाला तो अधिकार नसतो आम्ही आपले नामधारी! (खरं तर सफाई कामगारच ~X( )

(काटेरी मुकुटधारी)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2009 - 9:12 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत.

बिपिन कार्यकर्ते

Nile's picture

1 Oct 2009 - 12:28 am | Nile

यालाच 'उंदराला मांजर साक्ष' म्हणतात का हो प्राध्यापक साहेब? (आयला मग ते कोण? ) ;)

-अबकडेरिअन

चतुरंग's picture

30 Sep 2009 - 8:39 pm | चतुरंग

बडीशेप च लिंग काय ब्वॉ? काही जण खाल्ली म्हणतात तर काही खल्ला.

आम्ही बडीशेप खाल्लं म्हणतो! :D

(पुल्लिंगी)चतुरंग

सूहास's picture

30 Sep 2009 - 8:44 pm | सूहास (not verified)

बनव !! बनव !! आणी दाखव !! दाखव
आणी जळव !! जळव !!
सू हा स...

दशानन's picture

30 Sep 2009 - 8:45 pm | दशानन

आम्ही गणपाचे लेख न पाहण्याची शपथ घेत आहोत X(

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

दिपाली पाटिल's picture

30 Sep 2009 - 9:22 pm | दिपाली पाटिल

>>संध्याकाळी खास जेवण बनवायचा मुड न्हवता, त्यामुळे प्रयोगशाळेला कुलुप.

मुड नसताना एव्हढं भारी बनवता, मुड असताना किती भारी बनवाल...

एकदम झक्कास पाकॄ.लई भारी करुन. गणपा शेठ तुम्ही राव राहता कुठे?

वेताळ

चतुरंग's picture

30 Sep 2009 - 10:02 pm | चतुरंग

तिचा 'हात' कुठेही नाही असं भासवलं आहे! ;) फसलात ना!!

चतुरंग

टिउ's picture

30 Sep 2009 - 10:07 pm | टिउ

सध्या आम्ही मॅगी बनवण्याचा प्रयोग करतोय...कधी पाणी जास्त होतं तर कधी काय! एकदा मॅगी नीट जमली की मग तुमच्या पाकृ करायला घेउ, कसं?
हाय काय अन नाय काय! ;)

प्राजु's picture

1 Oct 2009 - 12:00 am | प्राजु

ओह!!!
नॉट अगेन!!!
(यांचं सदस्यत्व रद्द करण्याची तजवीज केली पाहिजे. ) :W
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

1 Oct 2009 - 12:26 am | विसोबा खेचर

दिपाली पाटिल's picture

1 Oct 2009 - 4:17 am | दिपाली पाटिल

ओह!!!
नॉट अगेन!!!
(यांचं सदस्यत्व रद्द करण्याची तजवीज केली पाहिजे. ):W

दिपाली :)

धमाल मुलगा's picture

1 Oct 2009 - 2:48 pm | धमाल मुलगा

ठ्या: करुन फुटलो!!!
फुर्रर्रर्रकन कॉफीनं कळाफलकाला आंघोळ घातली ना राव!!!

च्यायला, ही दिपाली आजकाल लैच दंगा करायला लागलीये :)

Nile's picture

1 Oct 2009 - 12:32 am | Nile

या गणपारावांच्या सासरची मंडळी मिपावर आहेत वाटतं. बायकोला तु गेलीस तर बघ कसली मजा करतोय असं दाखवताहेत, नाहीतर इतका उत्साह कुठला आलाय बाप्यात? ;)

-बाप्या.

चित्रादेव's picture

1 Oct 2009 - 6:07 am | चित्रादेव

कंटाळा आलाय असून सुद्धा ही अशी भन्नाट रेसीपी? कमाल आहे तुमची गणपा. इथे कंटाळा आल्यावर कोण ते किचनात उभे रहाणार वर ते इतके नीट फोटो घेत रेसीपी बनवणार.

कोण हे रोल्स खायला घालतील काय? मला पाहून भूक ही लागलीय. असे तळलेले वगैरे खूप आवडतात...

(मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरे म्हणून किचनात घुसलेली मी) चित्रा देव. :)

चित्रादेव's picture

1 Oct 2009 - 6:19 am | चित्रादेव

आणखी एक गणपाजी, तुमची बायको माहेरी गेलीय तरी तुमची भांडी, ताटं,गॅस वगैर चकचकीत. अजुन पांढरा रंग दिसतोय गॅसचा... :)

(बायकांची नजर ती मेली...तिकडेच जाणार)...

गणपा's picture

1 Oct 2009 - 12:23 pm | गणपा

चित्रातै, गेला १.५ महीना स्वतः भांडी घासायचो, पण तुम्हा सर्वांच्या आशिर्वादने गेल्या १० दिवसां पासुन घर कामासाठी कामवाली मिळाली आहे. :)
म्हणुन गेल्या एका रेसीपीतला डिसक्लेमर हल्ली टाकत नाही.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

मयुरा गुप्ते's picture

1 Oct 2009 - 7:54 am | मयुरा गुप्ते

आणखी एक गणपाजी, तुमची बायको माहेरी गेलीय तरी तुमची भांडी, ताटं,गॅस वगैर चकचकीत. अजुन पांढरा रंग दिसतोय गॅसचा

आहाहा...काय बरोबर बोललातं चित्राताई.रेशिपी आधी लक्ष गॅस एवढा पांढरा शुभ्र कसा दिसतोय ह्याकडे.
आम्ही आपले कंटाळा आला की कोणीतरी बनवून द्यावंच्या अपेक्षेत असतो.
मस्त आइडीया,कोलंबीचे ब्रेड रोल्स.

(हाफीसात अती काम असलं की ५ दिवसांचा स्वयंपाक एकत्र करुन ठेवणारे उत्साही)
-मयुरा

फ्रॅक्चर बंड्या's picture

1 Oct 2009 - 1:50 pm | फ्रॅक्चर बंड्या

घर कामासाठी कामवाली मिळाली आहे

म्हणजे अगोदर नव्हती .. बायको माहेरी गेली की लगेच बरे मिळाली... :?
चांगले आहे

स्वाती दिनेश's picture

2 Oct 2009 - 6:10 pm | स्वाती दिनेश

क्लास फोटो आणि रेसिपी.. मस्त..
स्वाती

मसक्कली's picture

5 Oct 2009 - 12:22 pm | मसक्कली

पण एक प्रश्न्न :?

कोळम्बी चे तुकडे न परतताच घातले का :O
आनि ते शिजाव आस तुमी त्याला डीप फ्राय देखिल केल नाय @)

मग ते कच्च वगैरे तर लागल नाही ना :/

आसो दिसत तर चान आहे..मी त्यात बटाटायाचि भाजि वपरली होति... :)