न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार

अगोचर's picture
अगोचर in काथ्याकूट
29 Sep 2009 - 4:23 pm
गाभा: 

"न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" हे योगेश्वर कृष्णाचे वाक्य लहानपणापासुन ऐकतो आहे.
मिपावरील रसिकांना त्याची अजुन जास्त ओळख आहे का ? ते कोणाच्या कुठल्या रचनेमधे आले आहे ?

आंतरजालावरही ते शोधण्याचा प्रयत्न केला. पण सगळीकडे त्याचा सर्वश्रुत वचनासारखाच उपयोग केला आहे.
पुलंनी ते अभ्यासक्रमात असण्याचा उल्लेख केला आहे ("करी शस्त्र न धरी चार युक्तीच्या गोष्टी सांगेन" अश्या अन्वयासकट).
त्यामुळे कदाचित मागच्या पिढीतील लोकांना कदाचित जास्ती माहिती असेल.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

29 Sep 2009 - 5:27 pm | विजुभाऊ

हे वाक्य/श्लोक विनोबा भावेंच्या भगवत गीतेच्या गीताई या भाषांतरात आलेले आहे

अगोचर's picture

29 Sep 2009 - 5:44 pm | अगोचर

धन्यवाद विजुभाऊ,

पण आत्ताच परत उघडून बघितले. गीताई जालावर असल्याने तिच्यात असते तर गुगलच्या कृपेनी सापडले असते असे वाटले होते. गीतेच्या वृत्तांमधे ही ओळ बसणार नाही अशीही शंका आली होती.

नक्की गीताईमधे आहे ?

---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

अवलिया's picture

29 Sep 2009 - 7:13 pm | अवलिया

विजुभाउने बोला है ना... फिर बराबरहीच होयगा.
विजुभाउ को च्यालेंज नै करनेका... भोत अभ्यास हैउसकाऽ
एमए को हिंदु धर्म स्पेशल सब्जेक्ट था बाबा !

ग्रेट आदमी है विजुभाउ !
है ना विजुभाउ ????

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विकास's picture

2 Oct 2009 - 8:47 pm | विकास

नक्की गीताईमधे आहे ?

ह्या ओळी गीताईतील नाहीत आणि (असे वाटते की) मूळ महाभारतातीलही नाहीत. त्या खालील प्रतिसादात आल्याप्रमाणे कुठल्या न कुठल्या कवीने लिहीलेल्या कवीकल्पनेतील ओळी आहेत, अर्थात श्रीकृष्णाने महाभारत युद्धात शस्त्र हातात घेणार नाही अशी (आधी घेतलेली आणि नंतर एकाप्रसंगीच मोडलेली) प्रतिज्ञा होती त्या संदर्भातील आहेत.

स्वाती२'s picture

29 Sep 2009 - 9:26 pm | स्वाती२

बहूतेक वामन पंडित. नक्की आठवत नाही. पण हे पंतकाव्य वाटते. माझी आई म्हणायची ते श्लोक पूर्ण.
यातील कथा- कृष्णाने युद्धात हाती शस्त्र घेणार नाही फक्त मार्गदर्शन करीन अशी प्रतिज्ञा केलेली असते. तर युद्धात कृष्णाला हाती शस्त्र घ्यायला भाग पाडिन अशी भीष्माची प्रतिज्ञा असते.

आनंद घारे's picture

30 Sep 2009 - 10:49 am | आनंद घारे

बहूतेक वामन पंडित
मलाही असेच वाटते. आमच्या लहानपणी मला तो श्लोक माहीत होता. बहुधा पांडवप्रताप या काव्यात असावा. महाभारत युद्ध होणार असे ठरल्यानंतर दुर्योधन आणि युधिष्ठिर हे दोघेही कृष्णाची मदत घेण्यासाठी त्याच्याकडे गेले होते. दुर्योधन आधीच पोचला होता त्यामुळे कृष्णाने त्याच्या बाजूला असायला पाहिजे असा आग्रह त्याने धरला. त्यावर कृष्णाने असा प्रस्ताव मांडला की एका बाजूला नि:शस्त्र मी आणि दुसर्‍या बाजूला सर्व यादवसेना यातून त्यांनी निवड करावी. दुर्योधनाने सेना मागून घेतली आणि युधिष्ठिराने कृष्णाला घेऊन त्याला अर्जुनाच्या सारथ्याला बसवले. पुढचे महाभारत सर्वांना माहीतच आहे. आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

आनंद घारे's picture

2 Oct 2009 - 7:21 pm | आनंद घारे

हा श्लोक नसून आर्या असावी आणि ती मोरोपंत कवीने लिहिली असावी असे थोडा विचार केल्यावर वाटते
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

तिमा's picture

30 Sep 2009 - 1:30 am | तिमा

निरनिराळे 'सल्लागार' ही हेच वाक्य म्हणत असतात.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

अगदी आत्ताच इथे पॅरिसमधे या उक्तीप्रमाणे प्रत्यक्ष वागणाऱ्यांचा अनुभव आला आहे. जरा सवडीने नंतर लिहीतो.