गेल्या काही दिवसांपासून मिसळपाव वर काही सदस्यांना संकेतस्थळ उघडण्यात अडचण येत असल्याचे जाणवले.या बाबत अधीक शोध घेतला असता असे निदर्शनास आले की ही अडचण इन्टरनेट एक्प्लोरर ६ व ७ मधेच केवळ आहे. या प्रकरणी प्रथम दर्शनी युट्युब चे मिसळपाव वर जोडल्या गेलेले व्हिडीयोज मुळे ही अडचण येते आहे असं दिसतंय. त्यामुळे संकेतस्थळावर असलेले सगळे युट्युब व्हिडीओज पुन्हा संपादित करावे लागतील. सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांना माहिती असलेल्या सर्व युट्युब व्हिडीओज च्या चर्चा अथवा साहित्याचे नाव येथे प्रतिक्रियेत द्यावे. म्हणजे तेथे जाऊन संपादन करने सोपे होईल. यापुढे मिसळपाव वर युट्युब व्हिडीओ जोडताना. जो कोड युट्युब देतं त्यातथोडा बदल करावा. येथे एका नवीन साहित्यामधे ( हजारों ख्वाहिशें...) मधे एका सदस्यांने जोडलेल्या व्हिडीओचे उदाहरण घेऊया. येथे हा व्हिडीओ जोडण्यासाठी युट्युब ने देऊ केलेला कोड आहे. <code> <object width="425" height="355"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/oZv_jM4zw6A&rel=1"></param><param name="wmode" value="transparent"></param><embed src="http://www.youtube.com/v/oZv_jM4zw6A&rel=1" type="application/x-shockwave-flash" wmode="transparent" width="425" height="355"></embed></object> </code>तर या कोड मधे थोडा बदल करावा लागेल. Object हे पद गाळून कोड <embed> या पदापासून सुरू झालेला तसेच </embed> या पदापर्यंतचाच कोड येथे द्यावा. त्या आधी व नंतरचा <Object> चा कोड देऊ नये. जसे वरच्या उदाहरणात. <code><embed src="http://www.youtube.com/v/oZv_jM4zw6A&rel=1" type="application/x-shockwave-flash" wmode="transparent" width="425" height="355"></embed></code> शक्यता आहे की या उपायाने ही अडचण दूर होईल. तरीही अडचण कायमअसल्यास निरोपा द्वारे नक्की कळवा. टीपः उद्या ह्या व्हिडीयो संपादनाच्या काळात काही काळ संकेतस्थळ विश्रांतीअवस्थेत न्यावे लागण्याची शक्यता आहे. कमाल वेळ एक तास.
प्रतिक्रिया
27 Feb 2008 - 10:48 pm | झकासराव
साइट ओपन होतेय पण काही काही नोडस ओपन होत नाहियेत.
प्रतिक्रिया देताना बर्याच वेळेला ऑपरेशन अबॉर्टेड म्हणुन पेज दिसत नाही.
हे अस का असाव??
मी एक्स पी वापरतो.
इन्टरनेटच वर्जन कितव ते कस शोधाव??
28 Feb 2008 - 1:31 am | व्यंकट
क्लिक ऑन हेल्प एन्ड देन ऑन अबाउट इंटर्नेट एक्स्प्लोरर
28 Feb 2008 - 10:31 am | सरपंच
ही चर्चा ह्या अडचणी माहिती करून घेण्यासाठीच तर आहे. येथे सुध्दा 'काही नोड' असं बोलून कसं चालेल. सांगा कुठे अडचण येते आहे ती. इन्टरनेट एक्प्लोरर किंवा विन्डोजच्या कुठल्याही सॉफ्टवेअरची आवृत्ती (version) माहिती करून घेण्यासाठी वरच्या मेन्यु मधे उअजवी कडे 'हेल्प' मधेजाऊन सर्वात खाली. 'about Internet explorer ' असे लिहीलेले असेल. त्यावर टिचकी मारा म्हणजे माहिती समोर येईल.
28 Feb 2008 - 4:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज पाने उघडत आहेत, प्रतिसादाचे पुर्वपरीक्षणासहीत प्रतिसाद ( सध्या तरी ) देता येत आहे, धन्यवाद !!!!!
लै वैतागलो होतो आम्ही.
अवांतर :) सरपंच, आज आम्ही लै खूष झालोय.....पण, आज वार आडवा आलाय !!!
28 Feb 2008 - 4:56 pm | सर्वसाक्षी
पार वात आलाय. कचेरीतून किमान अडखळत, मार्च- ऑक्टोबर करत करत का होइना पण लिहिता येत आहे. घरुन बोंब. 'पेज अबॉर्टेड' हेच अधिक दिसते. घरुन कुठल्याही लेखनात प्रतिमा टाकाचा प्रयत्न केला की युआरेल चिकटवून काम संपवून मूळ लेखावर टिचकी मारली की पान सरळ बंदच होते!
28 Feb 2008 - 5:08 pm | प्रमोद देव
ज्यांच्या कडे वरील दोन न्याहाळक असतील त्यांनी त्याचा वापर केल्यास मिपाची सगळीच पाने व्यवस्थित उघडताहेत असा अनुभव येईल. मी त्याचाच वापर करतोय सद्या. आयई शी मात्र सद्या मिपाची खास दुष्मनी दिसतेय.
28 Feb 2008 - 10:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कॅफेतून वरील आनंदाचा प्रतिसाद लिहिला. आम्हाला वाटलं सर्व स्थिरास्थावर झालंय, पण घरी आल्यावर 'पेज अबॉर्टेड' या संदेशापासुन आमचीही काही सुटका होईना.........:(
हा प्रतिसाद लिहितांना ढॅ ढॅ असे एरर चुकवीत, चुकवीत जीद्दीला लागल्यावर टंकलेला आहे !!!
28 Feb 2008 - 8:51 pm | चतुरंग
कधीतरी क्वचित, लिहिता लिहिता उंदराने स्क्रोल केले तर फाँट आपोआप बदलतो तेवढे सोडले तर मला काही प्रश्न नाहिये.
चतुरंग
28 Feb 2008 - 10:23 pm | सुधीर कांदळकर
आश्चर्याचा धक्का. आज ठीक आहे. दोन दिवस वैतागून आज दहा वाजता मिपा वर गेलो. आणि ठीक आहे.
28 Feb 2008 - 10:43 pm | सरपंच
सगळे युट्युब चे व्हिडीओज संपादित करणे गरजेचे आहे.
हे व्हिडीओज कुठे आहेत याची माहिती देता आली तर सोईचं होईल.
कुठल्या साहित्यात , प्रतिक्रियेत, खरडवहीत आदी कुठेही असेल तरी कळवा.
प्रयत्न चाललेत. लवकरच सर्व सुरळीत होईल.