समस्यापूर्ती : चारोळी ..........

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
27 Feb 2008 - 1:27 pm

माझ्या कॉलेजच्या जीवनात आमच्या 'सांस्कॄतीक संघाची' एक 'पंच लाईन' होती. एकदम झक्कस .......मला ती माझ्या ब्लोग वर टाकायची आहे पण मला त्या ४ ओळींपैकी फक्त ३ ओळीच आठवत आहेत, तर मला त्याची चौथी ओळ पूर्ण करण्यास मदत करा .........मी हा 'मिपा' च्या 'चारोळीत्तम लोकांना ' दिलेला 'खो' समजावयास हरकत नाही ....
"जिज्ञासा आमची जननी आहे ,-------------------------जिंकण्यासाठीच जन्म घेतो, यश आमच्या रक्तात आहे ...... "
 
 

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

27 Feb 2008 - 1:40 pm | धमाल मुलगा

चला, म्हणजे आम्ही आपल्या मदतीस येणे ह्या जन्मी तरी शक्य नाही...प्राजुताई, चतुर॑गराव, केशवशेठ, इनोबा  आणि सगळे रथी-महारथी, आता मदार तुमच्यावर  आहे.होऊन जाऊद्या !!!

विसोबा खेचर's picture

28 Feb 2008 - 9:19 am | विसोबा खेचर

म्हणतो..
छोट्या डॉनने बर्‍या सगळ्या कोंबड्या झुंजवल्या आहेत! :))
तात्या.

गीतांजली's picture

27 Feb 2008 - 1:42 pm | गीतांजली

 
"जिज्ञासा आमची जननी आहे ,संस्कार आमची शिदोरीजिंकण्यासाठीच जन्म घेतो, यश आमच्या रक्तात आहे ...... "
 

तात्या विन्चू's picture

27 Feb 2008 - 2:10 pm | तात्या विन्चू

मला वाटत कि दुसर्या ओळीच्या शेवटच अक्शर '...हे' असायला हव! चारोळीच्या चाकोरीत बसवायला सोपा जाईल.
आपला,
ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

राजमुद्रा's picture

27 Feb 2008 - 2:24 pm | राजमुद्रा

"जिज्ञासा आमची जननी आहे ,जोर आमच्या मनगटात आहेजिंकण्यासाठीच जन्म घेतो, यश आमच्या रक्तात आहे ...... "
 
राजमुद्रा :)

छोटा डॉन's picture

27 Feb 2008 - 2:36 pm | छोटा डॉन

"राजमुद्रा , गितांजली " उत्तम प्रयत्न केला आहे पण अजून सुध्धा योग्य ओळ सापडत नाही. हे 'ब्रिदवाक्य' कॉलेजच्या 'टी शर्ट ' वर होते त्यामुळे त्यात परंपरा , शिस्त वगैरे गोष्टी गॄहीत धरून रचा .........महत्त्वाचे म्हणजे "दुसरी ओळ ही यमक जुळणारी नाही, त्यामुळे त्याच्या शेवटी आहे , घेतो, नेतो असे काही येणार नाही "
मला किंचीत आठवत आहे ते असे"जिज्ञासा आमची जननी आहे ,-------- आमुची /आमचा ---------जिंकण्यासाठीच जन्म घेतो, यश आमच्या रक्तात आहे ...... "
छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

पुष्कर's picture

27 Feb 2008 - 9:01 pm | पुष्कर

नक्की ओळ काय आहे ते आठवत नाही, पण "जिज्ञासा आमुची जननी आहे" ही दुसरी ओळ आहे बहुतेक.
पहिल्या ओळीत "आम्ही" हा शब्द आहे (बहुतेक ओळीच्या शेवटी)
-पुष्कर

बरोबर संरचना अशी ....
"ज्ञानाचे पिसासू आम्ही,जिज्ञासा आमची जननी आहे,जिंकण्यासाठीच जन्म घेतो,यश आमच्या रक्तात आहे ..........."
अवांतर : का हो पुष्कर , "सी ओ ई पी" चे का ?                कुठली बॅच ?
छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

पुष्कर's picture

7 Mar 2008 - 8:13 pm | पुष्कर

हो. मी सी.ओ.इ.पी. २००७ ला पास-आऊट झालेली बॅच. तुझी कुठली बॅच?

-पुष्कर

चतुरंग's picture

27 Feb 2008 - 9:10 pm | चतुरंग

"प्रयत्न आमचा 'बाप', अन्जिज्ञासा आमची जननी आहे ,जिंकण्यासाठीच जन्म घेतो, यश आमच्या रक्तात आहे ...... "
चतुरंग

प्राजु's picture

27 Feb 2008 - 10:33 pm | प्राजु

"जिज्ञासा आमची जननी आहे ,प्रयत्न, चिकाटी  बाहूंत वाहेजिंकण्यासाठीच जन्म घेतो, यश आमच्या रक्तात आहे ...... "
- (सर्वव्यापी)प्राजु

जुना अभिजित's picture

28 Feb 2008 - 9:26 am | जुना अभिजित

"जिज्ञासा आमची जननी आहे ,जिद्द आमचा बाणा आहेजिंकण्यासाठीच जन्म घेतो, यश आमच्या रक्तात आहे ...... "