टोस्ट...Tea Rusk...

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
25 Sep 2009 - 3:33 am


साहीत्यः

४ कप मैदा (मैदा+गव्हाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ, मी गव्हाचे पीठ घेतलेय...)
२ टीस्पून यीस्ट
१/२ कप + २ टेस्पून साखर
१.५ कप कोमट दुध
१ टेस्पून मीठ
१/४ कप बटर किंवा तुप (याचं प्रमाण जेव्हढं जास्त तेव्हढा खुसखुशीतपणा वाढेल...)
कुटलेली दालचीनी, जायफळ
आले बारिक तुकडे करुन

कृती:
१) एका वाडग्यात २ टेस्पून साखर + २ टीस्पून यीस्ट मिसळुन घ्यावे.
२) साखर्+यीस्ट मध्ये १/२ कप कोमट दुध घालावे आणि ५-७ मिनीटे बाजुला ठेवुन द्यावे.
३) १ कप दुध + १/४ कप बटर +१/२ कप साखर एकत्र करुन गॅसवर अगदी कोमट तापवावे...अगदी बटर वितळेपर्यंतच, जास्त गरम करु नये.
४) आता मैदा + यीस्टचे मिश्रण + वरिल दुध+तुप्+साखरेचे मिश्रण + आले+ दालचीनी-जायफळ एकत्र करुन ५-१० मिनीटे मळुन घेणे.
५) १ १/२ तास उबदार ठिकाणी पीठ फुगायला ठेवा...जवळजवळ दुप्पट फुगुन येइल.
६) हाताने ४-५ पंच मारुन पीठ परत अर्धा-एक मिनीट मळा.
७) २ बेकिंग ट्रे ला ग्रीस करुन ठेवा
८) आता त्याचे ४ भाग करुन त्या गोळ्यांना जाड लाटुन घ्या आणि लांब-लांब गुंडाळी करुन वरुन पाण्याचा हात फिरवून बेकिंग शीट किंवा कुकी शीटवर ठेवा.
९) आता अजुन ४५ मिनीटे उबदार जागी ठेवुन द्या.
१०) ३५० फॅ.वर २५-३० मिनीटे बेक करा...
११) आता या ब्रेड्सना ४-५ तास थंड होऊ द्या आणि नंतर अंदाजे १/२ इंच जाड चकत्या कापुन घ्या...
१२) आता या चकत्यांना कुकी शीटवर ठेवून २८० फॅ. वर ३० मि. बेक करा...अधनं-मधनं बघत रहावं लागतं...
१३) हलक्या तपकीरी रंगावर कडक झाले की हे टोस्ट झाले समजावे...

टीपा:
बाहेरच्या इतकं छान लागणार नाही बहुधा...गव्हाच्या पीठापेक्षा मैद्याचे जास्त छान लागतात.
बटर,साखर-मीठाचे प्रमाण जरुरीप्रमाणे बदलावे....
आवडीनुसार तीळ, खसखस, मनुका ही घालु शकता..

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

25 Sep 2009 - 3:35 am | मदनबाण

आहाहा... शेवटचा फोटु तर यकदम मस्त... :)

(मस्का खारी आणि बटर प्रेमी)
मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

गणपा's picture

25 Sep 2009 - 3:28 pm | गणपा

दिपाली तै निजधामास पोहोचलो..

लवंगी's picture

25 Sep 2009 - 3:35 am | लवंगी

पाय कुठे आहेत तुझे??

शेखर's picture

25 Sep 2009 - 3:58 am | शेखर

असेच म्हणतो..

अवांतरः
चहाचा पण फोटु टाकला असता तर अजुन मजा आली असती....

शाहरुख's picture

25 Sep 2009 - 4:28 am | शाहरुख

चहाचा पण फोटु टाकला असता तर अजुन मजा आली असती....

आणि पाककृती पण :-D

फोटो झक्कासच दिसतायत..कृतीही असणारच !!

(चहातून पार्ले-जी बिस्किटं बुडाबुडाके खाणारा) शाहरुख

दिपाली पाटिल's picture

25 Sep 2009 - 4:48 am | दिपाली पाटिल

फोटो झक्कासच दिसतायत..कृतीही असणारच !! म्हणजे??

दिपाली :)

शाहरुख's picture

25 Sep 2009 - 9:29 am | शाहरुख

म्हणजे??

हा प्रश्न विचारलाय की आत्मविश्वास दाखवलाय ? :-)

जर आत्मविश्वास दाखवत असाल तर, वेल..यु डिझर्व इट :-)
जर प्रश्न असेल तर, मी (हा पदार्थ स्वतः करणार नसल्याने) कृती न वाचता फक्त फोटो बघून प्रतिक्रिया दिली होती.

दशानन's picture

25 Sep 2009 - 8:28 am | दशानन

पाय काय विचारत आहात.... हात कुठे आहेत विचारा... बांधून ठेऊ म्हणत आहे =))

हे देवी !
का का आमच्या जीवावर उठली आहेस तु :D

*

आज पासून .. आता पासून दिपाली तै.. ब्लॅक लिस्टेड X(

***
राज दरबार.....

स्वाती२'s picture

25 Sep 2009 - 3:48 am | स्वाती२

दिपाली, धन्य आहे तुझी.

चकली's picture

25 Sep 2009 - 6:10 am | चकली

मस्त छान. फोटो बघूनच छान वाटले. आता रेसिपी वाचते.
चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

25 Sep 2009 - 8:11 am | प्राजु

तुला दंडवत गं बाई!!!! तुझा चरणकमळांचा फोटो काढून लाव इथे.. रोज दर्शन घेऊन तरी स्वयंपाक नीट येतो का करायला ते बघते.
:)
तुझ्यात पेशन्स सॉल्लिड आहेत बाई!! मस्त पाकृ...! नक्की करेन असं म्हणत नाही.. कारण ब्रेड झाल्यावर ४-५ तास थांबून ते पुन्हा बेक करणं माझ्याकडून नाही होणार.. त्यापेक्षा तू भेटे पर्यंत विकत आणूनच खाईन. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दिपाली पाटिल's picture

25 Sep 2009 - 9:02 am | दिपाली पाटिल

प्राजु...खरंतर ४-५ तास ठेवायचा असतो पण २०-२५ मिनीटेपण पुरे होतात..फक्त चटका लागू नये एव्हढे थंड होऊ द्यावे... :)

दिपाली :)

विसोबा खेचर's picture

25 Sep 2009 - 8:13 am | विसोबा खेचर

क्लास..!

चित्रा's picture

25 Sep 2009 - 8:16 am | चित्रा

असेच म्हणते. मस्तच दिसतायत.

तुम्हाला नक्की काय करता येत नाही? म्हणजे अशाच फक्त पाककृती द्याव्यात म्हणते. नाहीतर काय शामत आहे?

सहज's picture

25 Sep 2009 - 8:16 am | सहज

स्वयंपाकाची अतोनात आवड बॉ तुम्हाला दिपालीतै!!

:-)

आता चियाबाटा, फोकेशिया असे वेगवेगळे ब्रेड येउ द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Sep 2009 - 1:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जेवणाच्या वेळेसही टोस्ट खावेसे वाटले ... शेवटचा फोटो खूप मस्त आला आहे.

वेगवेगळ्या ब्रेड्सच्या रेसिपीजपण येऊ द्यात ना ...

अदिती

टारझन's picture

25 Sep 2009 - 8:44 am | टारझन

वा वा वा !! टोमॅटो सुप कुठाय ? च्या पेक्षा टोमॅटो सुप मधे ब्रेड भारी लागतो ;)

-(ब्रेडप्रेमी) टारोबा बटर

दिपाली पाटिल's picture

25 Sep 2009 - 9:00 am | दिपाली पाटिल

अरे टारझना हा तो ब्रेड नाहीये... हा चहात बुडवुन खायचा टोस्ट आहे...

दिपाली :)

टारझन's picture

25 Sep 2009 - 9:05 am | टारझन

अगं तेच असतं ते ... ब्रेड तापवला की झाला टोस्ट आणि सुप मधे टाकायचा असल्यावर त्याला ब्रेड स्क्रम्स का काय तरी म्हणतात ह्हुच्चब्रु लोक ..
बाकी भावणा समजा हो दिपाली तै :)

-( चहाप्रेमी) टारोबा गिरनार

दिपाली पाटिल's picture

25 Sep 2009 - 9:10 am | दिपाली पाटिल

तु म्हणजे अशक्य आहेस...
सुपात टाकतात ते ब्रेड्क्रम्स नसतात रे..क्रुटॉन्स म्हणतात त्यांना ...गरिब लोकंही तेच म्हणतात. :D

दिपाली :)

प्रभो's picture

25 Sep 2009 - 12:08 pm | प्रभो

आम्ही कुटॉन्सचे कपडे वापरतो बुआ

--प्रभो

चतुरंग's picture

25 Sep 2009 - 9:15 am | चतुरंग

हा धागा उघडल्याचा खरा पश्चात्ताप मला उद्या सकाळी चहा घेताना होणार आहे. :''( :''(

(टोस्टेड)चतुरंग

टारझन's picture

25 Sep 2009 - 9:42 am | टारझन

ओ प्रांजी कोई गल नही ऑय ... पार्ले-जी असतीलंच ना ?

-(नको आता कसला प्रेमी नको .. देवदास करेल तात्या) भित्तर

चतुरंग's picture

25 Sep 2009 - 9:46 am | चतुरंग

कुठे हे टी रस्क आणि कुठे ती पारले जी? (कुठे इंद्राचा ऐरावत चालीवर..) ;)

(चहात पडलेला पार्लेजीचा लगदा चमच्याने खाणारा)चतुरंग

अवलिया's picture

25 Sep 2009 - 9:20 am | अवलिया

[(

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दिपक's picture

25 Sep 2009 - 9:53 am | दिपक

चहा तयार आहे.. टोस्ट द्या बघु लवकर. :)

टारझन's picture

25 Sep 2009 - 10:17 am | टारझन

टोस्ट ऑलरेडी तयार आहे रे ... :) घे की हात वर करून :)

-नेत्रदिपक

दिपक's picture

25 Sep 2009 - 10:29 am | दिपक

धन्यवाद रे टाऱ्या. :)

दिपाली पाटिल's picture

25 Sep 2009 - 10:39 am | दिपाली पाटिल

ह तर ब्रेड-टोस्ट आणि मार्मालेड आहे... :)

दिपाली :)

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2009 - 11:13 am | प्रभाकर पेठकर

सुंदर, सोपी, उपयुक्त पाककृती आणि जीभखेचक छायाचित्र.

गव्हाच्या पीठाचे, कमी साखर आणि बटरचे टोस्ट कधीतरी करावे म्हणतो.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

प्रभो's picture

25 Sep 2009 - 12:10 pm | प्रभो

झकास....जास्त शब्दच नाहीत..

--प्रभो

sneharani's picture

25 Sep 2009 - 12:25 pm | sneharani

मस्तच...
छायाचित्र देखिल मस्तच दिसतायत.

श्रावण मोडक's picture

25 Sep 2009 - 12:30 pm | श्रावण मोडक

#o परत चूक केलीच.

टारझन's picture

25 Sep 2009 - 12:56 pm | टारझन

आहो घाबरू नका .. अनवाँटेड सेवेंटी टू च्या जाहिरातींचा भडीमार चालू असतो टिव्ही वर हल्ली !!

- श्रावणातला मोदक

श्रावण मोडक's picture

25 Sep 2009 - 1:09 pm | श्रावण मोडक

श्रावणातला मोदक
तुझ्या सह्यांचं एक संकलन करून टाक पटकन. ;)

किट्टु's picture

25 Sep 2009 - 3:52 pm | किट्टु

करुन बघायला हरकत नाही...शेवटचा फोटो तर एकदम मस्त!!!!

पण खुप patience ठेवावा लागेल रेसिपी करताना.... :(

सुबक ठेंगणी's picture

25 Sep 2009 - 4:01 pm | सुबक ठेंगणी

आताच मस्त चहाचा कप घेऊन बसली आहे...आणि टोस्टच्या रेसिपी आणि फोटोवर समाधान मानावे लागत आहे :(

स्वाती दिनेश's picture

25 Sep 2009 - 4:51 pm | स्वाती दिनेश

झकास दिसत आहेत टोस्ट..
स्वाती

सूहास's picture

25 Sep 2009 - 5:17 pm | सूहास (not verified)

काय बोलु ??..

बस ,मार डाला

सू हा स...

मीनल's picture

25 Sep 2009 - 6:03 pm | मीनल

काय? टोस्ट घरी करता येतात?

धागे काढून टाकण्यपेक्षा ह्या दिपाली ची मिपावरची मेबरशिप काढून घ्या बर.
रोजच्या रोज असा वात आणलाय!
नुसती पाकृ द्यावी आणि गप्प बसावे.
ते नाही हिच . ती त्यात फोटो टाकते.
स्वतः काम करतेच किचन मधे आणि सर्वांना कामाला लावते. :))

मीनल.

वेताळ's picture

25 Sep 2009 - 6:07 pm | वेताळ

खर तर आश्चर्य आहे. मला तरी वाटत होते हे पदार्थ फक्त बेकरीतच मिळतात.बाकी दिपाली तै चैन आहे तुमच्या फॅमिलीची .भारतात आला तर बोलवा एकदा जेवायला.सहसा पुर्ण दिवस जेवणाचा कार्यक्रम ठेवा. म्हणजे बर्‍यापैकी पदार्थ चाखता येतील.
वेताळ

रेवती's picture

25 Sep 2009 - 6:34 pm | रेवती

आजकाल दिपालीमॅडमनं सगळ्यांना जळवण्याचा विडा उचललेला दिसतो.;)
टोस्टचे फोटू व कॄती आवडली. छान, मस्त असे शब्द संपले आहेत.

रेवती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2009 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तोस आवडले. :)

दिपाली पाटिल's picture

25 Sep 2009 - 11:13 pm | दिपाली पाटिल

हो याला टोस म्हणतात नां....

दिपाली :)

चित्रादेव's picture

26 Sep 2009 - 8:22 am | चित्रादेव

दिपाली, खरेच खूप टेम्पटींग आहेत टोस्ट. करायला आळस आहे पण कोणी दिले करून तर तयारी आहे खायची. :)

दिपाली पाटिल's picture

26 Sep 2009 - 12:10 pm | दिपाली पाटिल

वाचनकर्ते आणि प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद...दिपाली :)