माझा भ्रमणध्वनी क्रमांक आता बदलणार नाही :)

देवदत्त's picture
देवदत्त in काथ्याकूट
25 Sep 2009 - 1:06 am
गाभा: 

वर्ष २००८. पुण्यात एअरटेलचे प्रिपेड कार्ड घेउन बहिणीला मुंबईत दिले होते. पण काही कारणाने त्यावरून काही संपर्क करीता येत नव्हता. कार्डमध्ये बाकी असलेले पैसे ही पाहता येत नव्हते. कसातरी ग्राहक सेवेचा क्रमांक शोधून काढला. पण कार्ड पुण्याचे, मी ठाणे/मुंबईत. ह्या वरून त्यांनी मला भरपूर फोनाफोनी करावयास लावली. त्यातच एकाने मला ९८२००९८२०० हा नंबर दिला म्हणाला "ह्या क्रमांकावर एअरटेलला संपर्क करा." मला खात्री होती की तो क्रमांक हच/वोडाफोनचा आहे. पण त्यास माहीत नव्हते बहुधा.

माझा वरील शहाणपणा(?) व खालील सामान्य माहिती.

९८२०xxx -(मुंबई) ऑरेंज/हच/ आता वोडाफोन
९८२१xxx-(मुंबई) बीपीएल
९८१xxx (दिल्ली )
९३xxx रिलायंस
९२xxx आयडीया
९४xxx इतर काही... वगैरे वगैरे...

वरील दोन गोष्टींवरून हे सांगायचे होते की मोबाईलच्या पहिल्या ३/४ आकड्यांवरून तो कुठला व कोणत्या कंपनीचा मोबाईल क्रमांक आहे हे लगेच कळत होते.

पण आता ३१ डिसेंबर पासून ह्या माहितीचा उपयोग बहुधा होणार नाही. कारण ह्या बातमीनुसार केंद्र सरकारने मान्य केलेल्या ग्राहकांच्या मागणीनुसार आता मोबाईल क्रमांक तोच ठेवून ग्राहकाला मोबाईल कंपनी बदलता येणार आहे. अर्थात आतापर्यंत माहित असलेली वरील माहिती आता चुकीची होणार असली तरी त्यात आपला फायदाच आहे :) माझाही सध्याचा मोबाईल क्रमांक माझ्याकडे २००२ पासून आहे. त्यामुळे मध्ये थोडाफार त्रास सहन करून मी त्याच कंपनीची सेवा वापरत होतो. आता त्यात थोडी सुधारणा झाली आहे ही जमेची बाजू.

तरीही मला पडलेले काही प्रश्न:
गेले दीड दोन वर्षे मोबाईल कंपन्या असे करण्यास होकार देत नव्हते. अजूनही ते लगेच मान्य करतील का?
जरी कंपन्यांनी ते सुरू केले तरी कितपत चांगली सुविधा मिळू शकेल?
ते लावणार असणारे चार्ज कितपत असू शकतात हे ही नंतरच कळेल. पण असे नको की तो चार्ज एवढा की त्यापेक्षा नवीन क्रमांक घेणे स्वस्त पडेल :)

अर्थात TRAI ह्यात लक्ष घालेलच.

त्यामुळे आता मी माझा मोबाईल क्रमांक तोच ठेवून आता चांगली सेवा मिळण्याची आशा बाळगतो.
तुमचे ह्या Number Portability बद्दल काय मत आहे?

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

25 Sep 2009 - 2:32 am | मदनबाण

जर अशी सुविधा मिळाली तर ग्राहकाला हव्या त्या कंपनीची सेवा,तसेच हवा तो प्लान घेता येईल शिवाय नंबर तोच राहिल्याने...दुनियेला माझा लंबर चेंज झाला म्हणुन कळवण्याची भानगड करावी लागणार नाही.तसेच या सेवा देणार्‍या कंपन्यांमधे स्पर्धा निर्माण होऊन त्याचा फायदा ग्राहकालाच मिळेल...

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
आनंदाची बातमी !!!After sugar, Pawar warns of rise in rice price
http://ibnlive.in.com/news/after-sugar-pawar-warns-of-rise-in-rice-price...

दशानन's picture

25 Sep 2009 - 8:38 am | दशानन

हि सुविधा लागू करण्यासाठी TRAI खुप प्रयत्न केले आहे व पुर्णपणे कंपन्यांचे नाक दाबून चांगले.. वेळोवेळी दोनचार कानावर वाजवून .. त्यांचा माज उतरवून मग त्यांना राजी केले आहे ही सुविधा देण्यासाठी...

ह्या कंपन्या ही सुविधा देण्यास का तयार नव्हते माहीत आहे का ?

अहो, ह्यांनी खोटे नाटे बोलून जो नंबर ग्राहकांच्या गळी मारलेला आहे तो ग्राहक आता तोच नंबर घेउन दुस-या चांगल्या सर्विस प्रोव्हाडर मध्ये जाऊ शकतो ना ;)

*
खरं पाहता ही सुविधा गरजेचीच आहे, आता सारखं सारखं नंबर बदलण्याची गरज नाही... !

*
आता सध्या म्हणजे डिसेंबर पासून मेट्रो सिटी मध्ये सुविधा चालू होईल.

*
बाकी भारतात जून २०१० नंतर.

*
हि सुविधा खर्चीक आहे हे नक्की, मागे मटावर वाचले होते.. ६०००.०० रु. खर्च येईल एका नंबर साठी कंपण्यांना पण TRAI ने त्यांना ही सुविधा नाममात्र दराने देण्यासाठी बंधन घातले आहे.. मला वाटतं कमीत कमी ९९९ रु. व जास्तीत जास्त ते ३००० रुं पर्यंत घेतील.

***
राज दरबार.....

अवलिया's picture

25 Sep 2009 - 9:35 am | अवलिया

आम्ही सावकारांपासुन तोंड लपवण्यासाठी दर दोन महिन्यांनी नंबर बदलतो सबब याचा आम्हाला उपयोग नाही.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

नितिन थत्ते's picture

26 Sep 2009 - 6:24 pm | नितिन थत्ते

हो न राव.
नाना, आता कसं व्हायचं?
:''(

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

देवदत्त's picture

3 Oct 2009 - 12:14 am | देवदत्त

अहो नितीन/नाना,
ह्याने काय फरक पडणार? सक्ती थोडीच केली आहे तोच नंबर ठेवण्याची ;)

थोर्लेबजिराव's picture

25 Sep 2009 - 10:31 am | थोर्लेबजिराव

या विश्यावर अधिक महिति तथि एथे टिचकि मारा
http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/PressReleases/701/pr23s...

देवदत्त's picture

3 Oct 2009 - 12:14 am | देवदत्त

माहितीबद्दल धन्यवाद.

जोशी पुण्यात दन्गा's picture

3 Oct 2009 - 11:15 am | जोशी पुण्यात दन्गा

सगळ्या कम्पन्या चोर आहेत.
आम्ही २००५ मध्ये !DEA नामक भामट्यान्ना १००० रु दिले "Lifetime Recharge" च्या नावाखाली... म्हण्टल पुढ्ल्या वेळी भारतात येताना सगळ्यान्ना दवन्डी द्यायला नको...

(अनुस्वार कसा द्यावा हे कोणीतरी सान्गेल का :) नाहीतर हे असच लेखन वाचत बसा :D )

पुढ्ल्या वेळी रीचार्ज करायला जावे तर तेव्हा सान्गीतले की दर ६ महिन्यात म्हणे minium पैसे भरावे लागतात.
च्यायला हा कसला "Lifetime Recharge" !!!!

देवदत्त's picture

3 Oct 2009 - 6:37 pm | देवदत्त

दर ६ महिन्यात म्हणे minium पैसे भरावे लागतात.

हे त्यांच्या Fine Print मध्ये लिहिले होते.
पण त्याहूनही मोठी गोष्ट ही की त्यावेळी TRAI ने सर्व मोबाईल कंपन्यांना प्रश्न विचारला होता ,"आम्ही तुम्हाला १५ वर्षांचा परवाना दिला असताना तुम्ही ग्राहकाला आजीवन सेवा कसे काय देऊ शकता?"

ज्ञानेश...'s picture

4 Oct 2009 - 10:20 am | ज्ञानेश...

लाईफटाईम हा प्रकारच बोगस आहे. त्याच्या फंदात न पडणे चांगले.

बाकी आयडिया ची प्रीपेड सर्विस उत्तम आहे. मी गेली पाच वर्षे वापरतोय.

"Great Power Comes With Great Responsibilities"

टारझन's picture

4 Oct 2009 - 12:40 pm | टारझन

छाण चर्चा चालू आहे ... वाचतोय. अजुन तरी गेली ६ वर्षे एयरटेल वापरतोय .. आणि कंप्लिटली सॅटिस्फाईड :)