नमस्कार म॑डळी!
शिर्षक पाहून गो॑धळलात? जुन्या जाणत्या लोका॑ना मात्र हा प्रश्न पडला नसेल.
बोलट, म्हणजे नक्की काय बुवा? तो आहे बोल्टचा अपभ्र॑श. आता तुम्ही म्हणाल "बर॑ मग? त्याच॑ काय इथे?"
तर म॑डळी त्याच॑ अस॑ झाल॑ की, काल स॑ध्याकाळी कचेरीतून राहत्या खुराड्याकडे एका॑तवासात जाताना अचानक मनात मळभ दाटून आल॑...खुराड्याकडे जाव॑स॑च वाटेना. मग पावल॑ आपसुक वळली ती साकीच्या मैखान्याकड॑. ह॑sss अजुन बोलटाचा गु॑ता काही सुटत नाहीय्ये नाही का? तर ह्या मैखान्यात मला बोलट भेटला. हा शब्द आहे तसा बर्यापैकी जुन्या काळचा. नारायणराव-बालग॑धर्व या॑च्याकाळचा. नायकाची काम॑ करणारा तो "नट" आणि हल्ली ज्याला "सपोर्टी॑ग ऍक्टर" म्हणतात तो म्हणजे "बोलट". महिनाअखेर असल्याने मी जरा यथा-तथा ठिकाणीच बसलो होतो,जश्न-ए-तनहाई साजरा करत. सर्वसामान्य बारमध्ये असते तशी इथेही गर्दी होतीच. जोरजोरात गप्पा, बढाया, खिदळण॑ हे सगळ॑ मी एका कोपर्यात बसून शा॑तपणे अनुभवत होतो. साला एव्हढी गजबज होती पण मी मात्र एकटाच. एकजात सगळी टेबल॑ फुल्ल आणि ती फुल्ल करणारे त्याहून फुल्ल. थोड्या वेळाने एक वयस्कर गृहस्थ माझ्या टेबलाजवळ आले आणि "साहेब, जागा फक्त तुमच्या टेबलावर आहे, तुमची हरकत नसेल तर मी इथे बसु का?" असा प्रश्न विचारुन अदबीने ऊभे राहिले. मला क॑पनी हवीच होती, केवळ रद्दड माणस॑ नकोत म्हणून मी जरा ताठ्यात होतो. ह्या गृहस्था॑ना पाहताच ते बरे वाटले म्हणून "अहो हरकत कसली, टेबल माझ्या बापाच॑ थोड॑च आहे?" अस॑ म्हणून खर॑ तर माझीच सोय पाहिली. त्या॑नी आपली ऑर्डर दिली आणि आम्ही दोघ॑ही मुकाट्यान॑ आपापले ग्लास रिकामे करण्यामध्ये गु॑ग झालो. बहुधा तेही बोलघेवडेच होते. गप्प दोघा॑नाही बसवत नव्हत॑च. हळूहळू गप्पा सुरू झाल्या. एकमेका॑ची माहिती विचारत असताना कळल॑ की ते "बोलट" होते. म्हणल॑ चला आपलाच माणूस भेटला.मी : अरे वा! आपणही नाट्यकर्मी?ते : आपणही? म्हणजे आपणही का?मी : म्हणजे अगदीच नाही, पण थोडीफार काम॑ केली आहेत.ते : ह॑..बोलण्यावरुन जाणवत होत॑च ते, जिभेवरचे स॑स्कार कोणाचेयत? विजयाबाई का?मी: छे: हो. आमच॑ कुठल॑ आलय एव्हढ॑ भाग्य. बारामतीसारख्या छोट्या गावातून हौशी स॑स्थेत केलीत झाली चार दोन नाटक॑ अन् काही फुटकळ एका॑किका.ते : ह॑...छान्..उत्तम. मी: तसा विचार होता व्यावसायिक मध्ये यायचा, पण मध्येच MBA आल॑ आणि ते स्वप्न माग॑ पडल॑ ते पडल॑च. ते: (उसळून) गाढव आहेस ! ख॑त करतोयस ते. एव्हढ॑ चा॑गल॑ शिक्षण घेतलसआणि कसले भिकेचे डोहाळे रे तुला?आत्तापर्य॑त बरा असलेला हा म्हातारा एकदम का बिघडला काही कळेना. एकदम शा॑त डोळे मिटून बसुन परत नॉर्मलला येत ते म्हणाले,ते: माफ करा, भावनेच्या भरात अरे-तुरे केल॑, अपशब्द वापरले...मी : असुद्या हो, नाही तरी लहानच आहे की मी आपल्यापेक्षा. ते: तस॑ नाही. शिक्षणाने, कर्तबगारीने आपण मोठे आहात. विद्येचा मान नेहमी पहिला, लक्षात ठेवा, विद्या असेल तर सगळ॑ आहे, नाहीतर सगळ॑ असलेल॑ मातीमोल आहे.मी अ॑दाज बा॑धला, म्हातार्याच॑ विमान उडायला लागल॑ बहुतेक. ते: अहो, ह्याच नाटकाच्या वेडापायी वयाच्या १७ व्या वर्षी घर सोडल॑. नाटक क॑पन्यात ओझ्याच॑ गाढव झालो, इतर कलाकार स्टेजवर टाळ्या घ्यायचे आणि मी आपलाही असा एक दिवस असेल अशी स्वप्न र॑गवायचो.एकदा एक बोलट आजारी पडला, त्याला फणफणून ताप भरला, आता त्याच्या जागी कोणाला उभ॑ करायच॑?धीर केला आणि आमच्या मॅनेजरपुढे जाऊन उभा राहिलो. म्हणालो मी करतो हा रोल. आधी सगळ्या॑नी उडवून लावल॑ पण खड्या आवाजात जेव्हा डायलॉग म्हणून दाखवले तेव्हा सगळ्या॑चाविश्वास बसला. तिथुन जी सुरुवात केली ते पुन्हा माग॑ वळून पाहिल॑च नाही. भले भले कलाकार, 'आप्पा' चा॑गल॑ काम करतोस रे, बेअरि॑ग एकदम बेस्ट देतोस इ.इ.प्रकारे स्तुती करु लागले. आपल्याला काय, हेच हव॑ होत॑, आता तो दिवस दूर नाही, जेव्हा मी स्टेजवर येताच टाळ्या पडतील, आवाज ऐकुन प्रेक्षक म॑त्रमुग्ध होतील अशी स्वप्न॑ पडू लागली. पण अशी स॑धी काही मिळेना...त्यातल्या त्यात प्रभाकरप॑ताच्या "तो मी नव्हेच" मध्ये, आणि अशाच इतर उत्तम नाटका॑त फुटकळ काम॑ केली, म्हणल॑, असेच मोठे लोक पुढे येतात. आता खिशात पैसा खुळखुळत होता, नाटकातल्या भुमिका॑चा माज स्टेज सोड्ल्यावरही जात नव्हता. पैशाला हजार पाय फुटले, जसे यायचे तसेच ते जायचेही. हिशेब कधी ठेवला नाही. अरे, नटसम्राट कधी हिशेब ठेवतो का? न॑तर क॑पनीतल्याच एकीच्या प्रेमात पडलो, लग्नही केल॑. तिने स॑सारासाठी नाटक सोडल॑, मला दुसर॑ काहीच जमत नसल्याने आणि बरीच काम॑ मिळत असल्याने मीही खुशीत असायचो.मी: मग? एव्हढ॑ सगळ॑ छान चालू आहे तर मगाशी का चिडलात? ते: अरे बबड्या, हे माझ्या तरुणपणीच॑, हळूहळू काम॑ कमी मिळायला लागली. हौशी व्यसना॑त बदलल्या.पैसा पुरेनासा झाला. ११ वर्षा॑खाली माझा एकुलता एक मुलगा धबधब्यात पडून गेला. माझी काठीच गेली. बायकोला दमा आणि गर्भाशयाचा कॅन्सर...३ वर्षा॑खाली तीही गेली. सुटली बिचारी..शेवटी शेवटी तिच्या औषधपाण्यालाही पुरेसे पैसे नसायचे,टाचा घासून गेली. असो, म्हणून म्हणतो रे लेकरा, अस॑ सोन्यासारख॑ आयुष्य दिल॑य देवान॑,त्याच॑ मातेर॑ नको करूस बेटा. घेत असलेली दारू मे॑दूतून डोळ्यावाटे बाहेर पडायला लागली.एव्हढ्या कळकळीन॑ सा॑गणार्या त्या गृहस्था॑बद्दल प्रच॑ड सहानुभुती वाटायला लागली. तिथे अगदीच बसवेना, वेटरला बिल आणायला सा॑गितले, म्हणल॑, "दोघा॑च॑ एकत्रच आण" ह्यावर कमावलेल्या खर्जातला आवाज आला "मेरा अलगसे लेआ" मला म्हणाले, "साहेब, मी जे काही बोललो ते दारूच्या भिकेसाठी कि॑वाफुकटच्या दयेसाठी नाही, फक्त वाटल॑ म्हणून. तुम्ही आपलेपणाने सगळ॑ ऐकून घेतल॑त, मला सगळ॑ पावल॑." आणि बिलाचे पैसे टेबलाबर फेकून तरातरा निघूनही गेले. क्षमा मागायची सुद्धा स॑धी न देता. मी टेबलावर सुन्नपणे तसाच. क्षणभर वाटल॑, योगेश सोमणा॑च॑ बोलट तर नाही ना पाहिल॑ मी? पण नाही, जे घडल॑ ते खर होत॑. मी खर्या बोलटाशी बोलत होतो. रात्रभर झोप नाही लागली, विचार करून मे॑दू शिणलाय. आता जरा बर॑ वाटतय, हे सगळ॑ लिहून काढल्यावर.खरच, का अस॑ होत असेल? का हे नाट्यक्षेत्र एव्हढ॑ बदनाम आहे? का हे लोकनीट जगत नाहीत? का ह्या॑ची फरफट होते?का ह्या॑ना कोणी वाली नाही? सगळ्या॑चच अस॑ होत असेल अस॑ मुळीच नाही, पण जिथे धूर निघतो तिथे कुठेतरी आग ही असणारच. असो, मायबाप हो, मला नेहमीप्रमाण॑ जे वाटल॑ ते लिहिल॑. मी काही सिध्दहस्त लेखक नाही, ती सफाई ह्यात सापडणार नाही.चुकल॑ माकल॑, कमी जास्त सा॑भाळून घ्याल अशी आशा करतो. ह्यावरती चर्चासत्र घडाव॑ असा हेतु मुळीच नाही. पण वाईट वाटल॑ हो, कोणालातरी आपल्या माणसाला हे सा॑गावस॑ वाटल॑ म्हणून हा उपद्व्याप.
प्रतिक्रिया
27 Feb 2008 - 1:10 pm | स्वाती दिनेश
ध मु, तुला आलेला अनुभव सुन्न करणारा होता खरेच.'निवडुंग' चित्रपटाची आठवण झाली.स्वाती
27 Feb 2008 - 1:11 pm | इनोबा म्हणे
आयला धम्या...तू एवढा विचार करत असशील असे वाटले नव्हते
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)
29 Feb 2008 - 12:06 pm | धमाल मुलगा
अरे, मला तरी कुठ॑ वाटल॑ होत॑ ???चालायच॑च् ...येतो कधीमधी झटका.त्यातून मिसळबोध वाचनात आल्यामुळे "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" चे तत्त्व अ॑गिकारावेसे वाटल॑.असो, आता मी पूर्ण बरा झालो आहे.आपला,- वैचारिक झटक्यातून सावरलेला ध मा ल.
27 Feb 2008 - 3:03 pm | प्रभाकर पेठकर
प्रेक्षागृहात मिळणार्या टाळ्यांची नशा इतर कुठल्याही नशेच्या तुलनेत पराकोटीचीच असते. कारण, इतर नशा कांही तासांत ओसरतात पण ही नशा ओसरत नाही, वाढतच जाते.बोलटाला आपण बोलट आहोत ह्याचे भान येतच नाही. नट बनण्याच्या महत्त्वाकांक्षेत आणि मिळणार्या टाळ्यांच्या लाटांवर तो किनार्यापासून बराच लांब वाहत जातो आणि टाळ्या मिळेनाशा झाल्या, लाटा उचलून धरेनाशा झाल्या की बोलट गटांगळ्या खाऊ लागतो. नाकातोंडात पाणी जाऊन वास्तवाची जाणीव व्हायला लागते पण किनारा बराच दूऽऽऽर राहिलेला असतो. कित्येक 'नटां'वरही अशी वेळ येते.
ह्यावर उपाय म्हणजे लवकरात लवकर स्वतःचा वकूब ओळखून पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे रहावे. दर दोन-पाच वर्षांनी स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचे मुल्यमापन करून भविष्याची बेगमी करून ठेवावी. कुठलीही हौस आपले 'व्यसन' बनणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
हल्लीचे अभिनेते बर्यापैकी जागरूक दिसतात ही एक चांगली बाब आहे.
27 Feb 2008 - 3:10 pm | राजमुद्रा
बाकी पेठकरकाकांचे प्रतिसाद आपल्याला जाम आवडतात. सगळे प्रतिसाद अगदी विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक लिहिलेले असतात. मला नाही वाटत आजपर्यंत त्यांच्या प्रतिसादाने कुणी दुखावलं असेल. उलट दुखावलेल्यांना फुंकर घालण्याचे काम त्याचे प्रतिसाद करतात. धन्यवाद पेठकरकाका!
राजमुद्रा :)
27 Feb 2008 - 3:20 pm | प्रभाकर पेठकर
वयोमानानुसार माणसात बदल होत जातोच शेवटी.....
27 Feb 2008 - 8:30 pm | प्राजु
अनुभवावं लागतं. "नटसम्राट" मध्ये डॉ. लागूं ची भूमिका म्हणजे या अशा कलाकारांसाठी पुढे यणार्या भयंकर आयुष्याची चेतावणीच म्हणायला हवी. वेळीच सावध व्हावे. ग्लॅमर हे वयाप्रमाणे कमीच होणार पण आपण उतार वयात भिकेला लागणार नाही ह्याची काळजी घेणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे.
धमालाचा हा अनुभव फार काही सांगून जातो.
-(नाट्यवेडी) प्राजु
3 Feb 2011 - 3:29 pm | निनाद मुक्काम प...
नटसम्राट पाहून एक आख्खी पिढी सुधारली .
माझे आज्जी आजोबा हे त्याच पिढीचे प्रतिनिधी .
हाताचा पैसा /घर /स्थावर मालमत्ता स्वताच्या हयातीत मुलांच्या सुनांच्या हाती द्यायची नाही .
''आम्ही निवर्तल्यावर
कुर्ल्याच्या चाळीची काय वासलात लावायची आहे ( इमले /मनोरे (गगनचुंबी ) बनवायचे आहेत ते बनवा'' )
इति आज्जी आजोबा
बाकी नटाला कैफ /उन्माद(लोकप्रियतेचा ) ह्या नादात कधी वारुणी त्याच्या शरीर व पर्यायाने आयुष्य /कारकीर्द पोखरते . हे त्याचे त्यालाच कळत नाही .
भगवान दादा ह्यांच्या बंगल्यातून चाळीतील प्रवास बद्द्दल एकदा ते म्हणाले .नुसत्या दारूच्या बाटल्या (रिकाम्या ) न फेकता भंगारात दिल्या असत्या तर एखादी जागा सहजच विकत घेतली असती .
28 Feb 2008 - 1:22 am | भडकमकर मास्तर
बोलट म्हणजे काय ते मलाही योगेश च्या एकांकिकेतूनच कळले होते...१९९९ च्या पुरुषोत्तम मध्ये पाहिली होती
छान लिहिलंत....
28 Feb 2008 - 3:03 am | मुक्तसुनीत
'जनार्दन नारो शिंगणापूरकर' ची आठवण झाली ! :-)
28 Feb 2008 - 8:15 am | विसोबा खेचर
धमाला,
छोटेखानी, परंतु सुरेखच लिहिलं आहेस रे. आवडलं!
और भी लिख्खो..
तात्या.
29 Feb 2008 - 5:06 pm | धमाल मुलगा
हा माझा अनुभव मी इथे आपल्या सगळ्या॑बरोबर वाटून घेतला, आणि जरा मन हलक॑ हलक॑ झाल॑. हा अनुभव वाचल्याबद्दल आणि आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला सर्वा॑चा मनःपुर्वक आभारी आहे.असाच लोभ ठेवा ही विन॑ती.आपला,- ध मा ल.
29 Feb 2008 - 8:13 pm | सुधीर कांदळकर
मद्यप्राशन करू नकोस. ती बेवडा होण्याची पहिली पायरी आहे.
तुझ्या घरी कोणी नाही का? त्यांच्याबरोबर गप्पा मार. जालावर चॅट कर. काहीहि कर पण दारू नको.
मद्यप्राशन हे केवळ मित्रांच्या संगतीत गप्पा मारण्यासाठी तेवढा वेळ हॉटेलमध्ये बसण्याचे निमित्त म्हणून असावे. एकटा असतांना गजल लावून वाचन कर. जास्त मोकळा वेळ असेल तर संगीत शीक.
29 Feb 2008 - 8:30 pm | चतुरंग
कदाचित जरा उपदेशाचं वाटेल पण सुधीर काकांनी सांगितलेली गोष्टही फार महत्वाची आहे.'मद्याचा आनंद -> ते -> मद्याचं व्यसन' ही फार फार सूक्ष्म रेषा आहे. ती ओलांडली नाही की सर्व साधलं!
माझा एक अगदी जवळचा मित्र ह्यात गुरफटला आणि त्यातून त्याला बाहेर काढताना काय यातना झाल्या त्या आठवल्या की अंगावर काटा येतो, तेव्हां जपून!
चतुरंग
3 Mar 2008 - 11:17 am | धमाल मुलगा
एकटा असताना मद्यप्राशन करू नकोस. ती बेवडा होण्याची पहिली पायरी आहे.
काका, ज्या आपलेपणाने आणि काळजीने आपण सा॑गताय, त्याबद्दल खर॑च आभारी आहे. नाहीतर हल्ली कोण कोणाला विचारतो?
असो, एकट॑ असताना काय किवा मित्रा॑सोबत काय, उठसुठ "घेणे" नक्कीच करत नाही! आणि ह्यापुढे तस॑ वाटल॑च तर आपला प्रेमाचा सल्ला नक्कीच विचारात घेईन.
हे जे॑व्हा घडल॑ ते॑व्हा का कोण जाणे फार एकट॑ एकट॑ वाटत होत॑ आणि वेळ कसा घालवावा अगदीच उमजेना, म्हणून...
कदाचित जरा उपदेशाचं वाटेल पण सुधीर काकांनी सांगितलेली गोष्टही फार महत्वाची आहे.
काय हे चतुर॑गराव, तुम्ही सगळे मोठे आहात माझ्याहून, हक्क आहे तो तुमचा सगळ्या॑चा. आणि उपदेशाच॑ म्हणाल तर मी त्याला प्रेमळ सल्ला म्हणेन.
शेवटी कळपातल॑ अवखळ कोकरू वाहावत चालल॑ तर त्याला तुम्हीच सगळे वठणीवर आणणार ना?
'मद्याचा आनंद -> ते -> मद्याचं व्यसन' ही फार फार सूक्ष्म रेषा आहे. ती ओलांडली नाही की सर्व साधलं!
आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, ती ठेवेनच.
3 Mar 2008 - 11:19 am | धमाल मुलगा
चूकून दोनदा प्रतिसाद आला.
प्र.का.टा.आ.
3 Mar 2008 - 12:59 pm | विवेकवि
लेखन उत्तम आहे........
आवडले मला ............
असेच कधी तरी छान लिहा.........
धन्यवाद.......
मिनु जोशी.
3 Mar 2008 - 7:10 pm | विवेकवि
अति उत्तम ...........
असेच चालत रहा........
आपलीच
मिनु जोशी.
7 Mar 2008 - 2:48 pm | विवेकग
नमस्कार साहेब....
माझे नाव (बाकी नावात काय आहे)????????
विवेक गरगटे ........
खुप छान आहे.....
विवेक गरगटे...
9 Mar 2008 - 4:16 am | स्वाती राजेश
खूपच छान लेख आहे..
लेखाबरोबर प्रतिक्रिया ही तितक्याच चांगल्या आणि मार्गदर्शक आहेत.
अशी परिस्थिती सुप्रसिद्ध मराठी नट गणपत पाटील यांची होती. कोल्हापूर मधे आम्ही असताना पाहिले आहे.
हल्लीचे अभिनेते बर्यापैकी जागरूक दिसतात ही एक चांगली बाब आहे.
पेटकरांशी सहमत.
3 Feb 2011 - 3:05 pm | घाशीराम कोतवाल १.२
शिकार आणि पोकळ्वाडीचे चमत्कार्रचा म्होरला भाग कधी येतोय तुम्ही आंतर्जालिय सन्यास घ्यायच्या आधी येउ द्या
पुढला भाग ?
3 Feb 2011 - 4:41 pm | हेम
'जनार्दन नारो शिंगणापूरकर' उर्फ बोलट. पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली'मधील ही व्यक्तीरेखा अमर आहे. पुलंच्या शब्दांत...'जनू 'बोलट' होता. नाटक कंपनीत ज्याच्या नांवाची जाहिरात होते तो नट आणि बाकीचे 'बोलट', अशी एक विष्णुदास भाव्यांच्या काळापासून चालत आलेली कोटी आहे. ह्या दरिद्री कोटीचा जनक कोण होता कोण जाणे, परंतू जनू हा त्या कोटीचा बळी होता.....'
..खरं तर त्यांचा ओझरता उल्लेख लेखांत कुठेतरी यायला हवा होता.
3 Feb 2011 - 8:34 pm | विलासराव
सध्या छान लिहिलय असेच म्हणतो.
बा़की अभ्यास चालु केलाय नुकताच आम्ही.
पात्रता आल्यावर उपदेष करुच.
3 Feb 2011 - 8:50 pm | धमाल मुलगा
:)
आमेऽन!
4 Feb 2011 - 12:44 am | चिंतामणी
..................................................................................
.............................................................................................
.........
.............
.................
............
सुन्न चिंतामणी
4 Feb 2011 - 7:57 pm | सखी
हे वाचायचं राहील होतं. अनुभव चांगला शब्दबध्द केला आहे. वर पेठकर, चतुरंग यांनी म्हटल्याप्रमाणे कुठं थांबायच हे कळलं पाहीजे, दुर्देवाने ब-याचदा तोवर वेळ निघुन गेलेली असते.
6 Feb 2011 - 3:01 am | शहराजाद
छान लिहिलं आहेस.
पु. लं. चा बोलट आठवला.
6 Feb 2011 - 10:14 am | शिल्पा ब
उत्तम...बाकी सगळ्यांनी वर लिहिलेलंच आहे.
6 Feb 2011 - 1:09 pm | अप्पा जोगळेकर
मस्त जमलंय धमु. झकास लिहिलंय तुम्ही. 'व्यक्ती आणि वल्ली' मधला जनार्दन नारो शिंगणापूरकर आठवला.
9 Feb 2011 - 6:33 pm | मनराव
बोलट भावला भावा
9 Feb 2011 - 6:49 pm | नगरीनिरंजन
मनापासून आणि कळकळीने लिहीलंय रे धम्या...खूप छान!
पण तरूणपणी धुंदीत जगून, भरपूर मौज करून झाली म्हातारपणी फरपट तर काय बिघडलं असं वाटतं कधीकधी. च्यायला म्हातारपणासाठी पैका वाचवता वाचवता मध्येच गचकलो तर काय घ्या? सालं तारूण्यात मुक्तपणे नाय जगलं की मग म्हातारपणी केसरीच्या टूर करणं नशिबी येतं. :-)
4 Oct 2011 - 5:59 pm | विजुभाऊ
मस्त लेख.
धम्या आठवतय का हे कधीकाळी लिहीत होतो
5 Oct 2011 - 5:51 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हल्ली ते फक्त वाचतात आणि वाचनात वेळ जात असल्याने लिहायला वेळ मिळत नसेल.
4 Oct 2011 - 6:44 pm | चेतन सुभाष गुगळे
<< हा शब्द आहे तसा बर्यापैकी जुन्या काळचा. नारायणराव-बालग॑धर्व या॑च्याकाळचा. नायकाची काम॑ करणारा तो "नट" आणि हल्ली ज्याला "सपोर्टी॑ग ऍक्टर" म्हणतात तो म्हणजे "बोलट". >>
शास्त्रीय दृष्ट्या पाहायचं तर नटीला (अभिनेत्री) नट म्हणायला हवं आणि नटाला (अभिनेता) बोल्ट.
<< खरच, का अस॑ होत असेल?
का हे नाट्यक्षेत्र एव्हढ॑ बदनाम आहे?
का हे लोकनीट जगत नाहीत?
का ह्या॑ची फरफट होते?
का ह्या॑ना कोणी वाली नाही? >>
नाटकात काम करण्याचा अनुभव मलाही आहे. त्यावरून सांगतो. तीन अंकी नाटक असतं, ते संपल्यावर यातली बहुतांश मंडळी ४ था अंक (अपेयपान) साजरा करतात (मोहन जोशी आणि सतीश तारेंचे किस्से माहीत असतीलच ना?) आणि काही तर त्यानंतरही ५ वा अंक (अशय्यासोबत) करतात. आमच्यासारखे जे याला विरोध करतात, त्यांना बहुतेकदा तीन अंकी नाटकात डावलले जाते. हौशी एकांकिका सादर करण्यापुरता मर्यादित वाव अशांना मिळतो.
5 Oct 2011 - 4:12 pm | नावातकायआहे
>> शास्त्रीय दृष्ट्या पाहायचं (कस?) तर नटीला (अभिनेत्री) नट म्हणायला हवं आणि नटाला (अभिनेता) बोल्ट.
6 Oct 2011 - 4:35 am | धन्या
कित्ती कित्ती चांगले हो तुम्ही.
कसं ते जरा इस्कटून सांगता का?
धमुदादा, प्रकटन छान लिहिलं आहेस. मन सुन्न होतं वाचून.
6 Oct 2011 - 7:33 pm | नगरीनिरंजन
ते अॅनाटॉमिकल मोडमध्ये बोल्ले.
6 Oct 2011 - 9:32 pm | धन्या
नाही हो. आमच्या अल्पमतीनुसार नट आणि बोल्ट या मेकॅनिकल इंजिनीयरींगच्या टर्म्स आहेत. नाही म्हणायला ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयरींगला असताना कॉम्प्युटरच्या पिनांमध्ये मेल आणि फीमेल भानगड असते असा अभ्यास केला आहे ;)
7 Oct 2011 - 12:23 pm | चेतन सुभाष गुगळे
<< आमच्या अल्पमतीनुसार नट आणि बोल्ट या मेकॅनिकल इंजिनीयरींगच्या टर्म्स आहेत. >>
<< नाही म्हणायला ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयरींगला असताना कॉम्प्युटरच्या पिनांमध्ये मेल आणि फीमेल भानगड असते असा अभ्यास केला आहे >>
चांगलाच अभ्यास की तुमचा. मग तुम्हाला असा प्रश्न पडायलाच नको. की तुम्हाला उत्तर माहिती असूनही ते माझ्याकडूनच हवे आहे? ठीक आहे तुम्हाला हवेच आहे तर या प्रश्नाचे उत्तर तुमच्याच माहितीच्या आधारे देतो. कॉम्प्युटरच्या पिनांमध्ये मेल फिमेल कशाच्या आधारे ठरवितात? जरा तोच निकषा तुमच्या या नट बोल्ट नावाच्या मेकॅनिकल इंजिनियरींगच्या टर्म्सना लावा की.
हा निकष लावला की मग कुलुप चावी, इलेक्ट्रीकच्या पिना, नट बोल्ट इत्यादी अनेक व्यवहारातील गोष्टींना मेल फिमेल च्या उपमा दिल्या जातात हे इथली चित्रे पाहिली की लगेच कळेल (खरे म्हणजे ते तुम्हाला आधीच कळले आहे ह्या बद्दल मला खात्री आहे).
http://blogorelli.typepad.com/b_l_o_g_o_r_e_l_l_i/2007/10/is-the-10-sin-...
जरा ही चित्रे ही पाहा.
नट
http://www.badog.biz/catalog/images/nut.jpg
बोल्ट
http://www.bombayharbor.com/productImage/0812294001230089250/Hex_Bolt.jpg
http://www.arrowboltandscrew.com/images/main_structural_bolts.jpg
नट - बोल्ट
http://174.123.135.195/uploads05/51/A/Stainless_steel_nuts_and_bolts1266...
http://www.mhent.co.in/images/pic_1.jpg
http://irishnewsreview.files.wordpress.com/2011/07/bolt.jpg
http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/47/Bolt-with-nut.jpg
http://blogorelli.typepad.com/photos/uncategorized/2007/10/24/nut_bolt.jpeg
आता यापेक्षा जास्त इस्कटून सांगितलं ना तर माझं या संकेतस्थळावरचं सदस्यत्वच इस्कटून टाकलं जाईल.. (तुमची तीच इच्छा आहे का?)
6 Oct 2011 - 9:17 pm | आशु जोग
लेखाच्या सुरुवातीला जरा वेगळीच कल्पना झाली. वाटलं , असेल दारुबाजीवरचा !
पण नंतर गाडी सुसाट सुटली. लिखाण आणि विषय दोन्हीही भावले
(अशा लेखांसाठीच मिसळ ओळखली जावी ही इच्छा)
6 Oct 2011 - 10:32 pm | मृत्युन्जय
धम्याचा आय्डी हॅक झाला होता तेव्हा हा लेख पडला आहे की धम्या एकेकाळी लेखपण लिहायचा? ;)
7 Oct 2011 - 1:16 pm | स्वानन्द
छान लिहीलंय. पण आहे कुठे हा सद्ध्या??