इंग्रजी शब्दांच्या गमती

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in काथ्याकूट
24 Sep 2009 - 10:08 pm
गाभा: 

आमच्या परिचयातील एका बाईला मी सहज विचारलं. तुमचा मुलगा सध्या काय करतो त्यावर त्या म्हणाल्या एका कंपनीत टेंपरवारी (टेंपररी) लागलाय.गाडी चालवणारे अनेक बहाद्दर गाडीचा वेग कमी झाला कि मोसम( मोशन) तुटला असं म्हणतात ,मराठी प्रमाणे इंग्रजीचा विपर्यास्त करणारे महाभागही कमी नाहीत, मुलांना सायकल शिकवतांना पायंडल मार असं म्हणणारेही खूप आहेत.राँकेल भरण्यासठी पुनेल(फनेल) आण अशी घरातील जुनी माणस अजुनही म्हणतात.वाँशरला वायसर..इंजेक्शनला... इंजिक्शन .इन्सपेक्टरला....इनिसपेक्टर म्हणणारे आणि. कंडक्टरला.. कंडाँक्टर असं खूप जण म्हणतात..
आपल्या भोवतीही अशा गंमती होत असतीलच. तुम्हालाही असे शब्द आठवत असतील,चला तर ते शब्द आपल्या मित्रानां सांगू या.

प्रतिक्रिया

अन्वय's picture

24 Sep 2009 - 10:10 pm | अन्वय

मस्त

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2009 - 10:09 pm | बिपिन कार्यकर्ते

(घुसखोरीबद्दल क्षमस्व!!!)

मी काही वर्षांपूर्वी एक खूप जुनी कादंबरी वाचली होती. अगदी शे सव्वाशे वर्षांपूर्वीची कादंबरी आहे ती. जेव्हा भारतात इंग्रजी शिक्षण सुरू होऊन फार तर २०-२५ वर्षं झाली असतील तेव्हाचा काळ आहे कादंबरीतला. एक मुलगा खूप शिकून मोठा होतो. त्याला सरकार ऑनररी मॅजिस्ट्रेट करते. तेव्हा त्याची अडाणी आई दुसर्‍या एका बाईला सांगते की "आमच्या xxxला सरकारने अन्नावारी म्याजिष्ट्रेट केले आहे."

बिपिन कार्यकर्ते

अभिजा's picture

24 Sep 2009 - 11:04 pm | अभिजा

मराठी माध्यमाच्या शाळेतून एकदम कालेजच्या विंगज्री माध्यमात जाऊन 'पडलो'. तेव्हा इतर मोठ्या लोकांप्रमाणेच आम्ही पोरंही अरनॉल्ड श्वार्जनेगर ह्या बलदंड अभिनेत्याचे 'शॉल्लेट' फॅन होतो. पण करता काय! अरनॉल्ड श्वार्जनेगरच्या आडनावाचा उच्चार लै जड जायचा. म्हणून आम्ही त्याच्या नावाचे (आडनावाचे) सहज उच्चारण्याजोगे फोनेटिक सुलभीकरण केले होते - अरनॉल्ड शिवाजीनगर! :-)

अवलिया's picture

24 Sep 2009 - 11:08 pm | अवलिया

आम्ही अरण्या शिवाजीनगर केले होते. ढमी मोरे, समता कोल्हे या अजुन लाडक्या वस्तु... गेले ते दिन !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अभिजा's picture

24 Sep 2009 - 11:11 pm | अभिजा

अवलीया, जेम्स बाँड राजू मोरे हे नाव सांगायचे राहिले! :-)

अवलिया's picture

24 Sep 2009 - 11:12 pm | अवलिया

येस्स... वय झालं बघा.. विसरायला होतं.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुधीर काळे's picture

26 Sep 2009 - 12:25 pm | सुधीर काळे

रमेश मंत्र्यांनी त्याचे "जनू बांडे" असे नामकरण केंव्हाच केले होते!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

अभिजा's picture

24 Sep 2009 - 11:20 pm | अभिजा

बाईकचा शॉक अ‍ॅब्जॉर्बर = चॉकप्सर
ट्रकचा क्लीनर = किन्नर
कंप्यूटर = कँपूटर
झेरॉक्स = झोरॅक्स
सायकलची चेन = चैन
गाडी वेळेआधीच पोहोचणे = गाडी 'बिफ्फोर' आली.

छे! फारच मोठी लिस्ट होईल! :-)

sujay's picture

25 Sep 2009 - 12:02 am | sujay

मी चुकुन "बाईकचा" एवजी "बाईचा" वाचलं ;) ;)

सुजय

मला २ महिन्यानंतरही खव आणी खफ मध्ये लिहायची सोय उपलब्ध नाही. मी काय करावे?

चिरोटा's picture

24 Sep 2009 - 11:30 pm | चिरोटा

ट्रॅफिकचा उच्चार काही लोक ट्रॉफिक असा करतात. एकदा दोन बायकांचे ऐकलेले संवाद-
"कोणीतरी मुलगी प्रेगमेट(pregnant) होती ना"
"हो"
"तिची डिलिवरी निर्मल (normal) झाली का?"
लहानपणी शाळेत असताना ऐकलेले हे संवाद्.घरी येवून अर्थ विचारणार होतो. :)
गाडीच्या चाकाचे पंक्चर काढण्याऐवजी पंचरच काढले जाते.
दुकानाबाहेर एकदा 'कोल्ड्रींग मिळेल' अशी पाटी होती.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

मदनबाण's picture

24 Sep 2009 - 11:38 pm | मदनबाण

मी सुद्धा एका दुकानाबाहेर एकदा मिल्क शेख मिळेल अशी पाटी वाचली होती !!! ;)

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

कानडाऊ योगेशु's picture

25 Sep 2009 - 3:27 pm | कानडाऊ योगेशु

इकडे बेंगलोरमध्ये कोल्ड्रींक म्हणण्याऐवजी कूलड्रिंक (cool drink) असे म्हणतात.

शेखर's picture

24 Sep 2009 - 11:52 pm | शेखर

पेग = पॅक .

शेखर

Dhananjay Borgaonkar's picture

24 Sep 2009 - 11:55 pm | Dhananjay Borgaonkar

माझ आवडत ड्रिंक प्येप्सी.
आँडी गाडी लईईई भारी.
लेडीस बाया
एटीयम ब्यांकेत गेल्तो..

यादी खुप मोठी आहे.. पण टाईम पास धागा आहे. :)

sujay's picture

24 Sep 2009 - 11:58 pm | sujay

बरेच जण कस्टमर ला कस्टंबर, पंक्चर ला पंप्चर, लायसंन्स ला लायसन म्हणतात.
लपाछपी खेळताना सगळेच जण "ईस्टोप" म्हणतात.
माझा १ मित्र "बीलेटेड" ला "बेलीकेट" म्हणतो.
आमच्या शेजारी १ गावाकडचा मुलगा नवीनच रहायला आल होता, ११ वीत क्लास ला जाताना त्याने दुकानावर "ज्युस बार" अशी पाटी वाचली अणी मला म्हणे चल सुज्या ज्युस बार खाऊ (त्याला वाटल चोको बार सारखाच ज्युस बार पण असतो) =)) =))

सुजय

मला २ महिन्यानंतरही खव आणी खफ मध्ये लिहायची सोय उपलब्ध नाही. मी काय करावे?

यांच्यापैकी अनेक शब्द वापरायला मला आवडतात. मुळीच लाज वाटत नाही.

पंचर (पंक्चर)
टायर
वाल (वॅल्व)
पाना (स्पॅनर)
फलाट (प्लॅटफॉर्म)
पायडल (पेडल)
बिगुल (ब्यूगल)
रम्गरूट (रिक्रूट)
इंजिन (एंजिन)
वाघीण (वॅगन)
टोंबाटू (टोमॅटो)
फरसबी (फ्रेंचबीन)
फ्लावर (कॉलीफ्लावर)
...

या धाग्यातून काही छान शब्द मिळाले तर मी जरूर वापरायला घेईन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Sep 2009 - 4:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे शब्दतर आता मराठीतले शब्द म्हणून बहुतेकसे लोक वापरतातच.

मी फसले होते, एकदा ऑफिसमधला एक ड्रायव्हर मला सांगत होता, "ते तुमच्या पुण्या-मुंबैत (मी या दोन शहरांमधे, जवळ राहिल्याचा संदर्भ होता, प्रांतिक वाद उकरू नयेत) पिव्वर दूद मिळत नाय. त्यासाठी हितेच या तुम्ही, नारायणगावात."
बराच वेळानंतर पिव्वर म्हणजे शुद्ध, प्योर अशी माझी ट्यूब पेटली.

पुण्यातल्या हापिसातच एक चौकीदार सांगत होता, "म्याडम, तिकडनं जाऊ नका, हिकडनं जरा लांबून जा."
मी: "का हो? त्या बाजूला पावसामुळे निसरडं झालंय का?"
चौकीदारः "नाही हो म्याडम, आता पावसापाण्याचे दिवस. स्लिपरी होतं ना!"

अदिती

चतुरंग's picture

25 Sep 2009 - 7:26 pm | चतुरंग

घसरला बिचारा 'निसरड्या'वरुन! ;)

(धप्प)चतुरंग

श्रावण मोडक's picture

25 Sep 2009 - 7:38 pm | श्रावण मोडक

(धप्प)चतुरंग
=)) =)) =)) =))

अमृतांजन's picture

25 Sep 2009 - 8:57 pm | अमृतांजन

टोंबाटू (टोमॅटो) टंबाटं

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2009 - 10:04 pm | बिपिन कार्यकर्ते

टांबाटे... टांबाटी...

बिपिन कार्यकर्ते

काही इंग्रजी शब्द भारतीय भाषांतून निर्माण झाले. ते बनताना त्यांचेही अपभ्रंश झाले पण केवळ ते इंग्रजांनी केल्यामुळे आपण ते मोठ्या कौतुकाने स्वीकारतो. आपण मूळ शब्द इंग्रजीत वापरले तर लोक हसतील!
जगरनॉट = जगन्नाथ.
शाम्पू = चंपी
बंगलो = बंगला
कोप्रा = खोबरे
कुशी = खुशी
कॉट = खाट
टीपॉय = तिपाया

प्लॅटफॉर्मचे फलाट झाले की मराठीत सहज वापरता येणारा शब्द बनतो. सगळ्याच भाषा परके शब्द आपल्या भाषेत आणताना हा प्रकार करतात.

असो.

सुबक ठेंगणी's picture

25 Sep 2009 - 3:47 am | सुबक ठेंगणी

डिक्शनरीच आहे hobson jobson नावाची. मला वाटतं आशियायी (की हिंदी?) भाषेतून इंग्रजीत उसन्या घेतलेल्या शब्दांची.
ह्याचं hobson jobson हे नाव तो शब्द्कोष संपादन करणा-याला कसं सुचलं? तर आपल्याकडे मुहर्रम्च्या वेळी जी ताबूतांची मिरवणूक असते असतात त्यावेळी "या हसन या हुसेन" असं म्हणतात. ते त्याला "hobson jobson" असं ऐकू आलं म्हणे.
आपणही इंग्रजी आपल्या परीने वळवली तर त्यात काहीही वावगं नाहीच :)

नंदू's picture

25 Sep 2009 - 10:48 am | नंदू

"राँकेल भरण्यासाठी पुनेल(फनेल)"

राँकेल पण रॉक-ऑईल चा अपभ्रंश आहे. ;)

नंदू

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2009 - 11:01 am | प्रभाकर पेठकर

एके ठिकाणी गणपतीची फार सुंदर आरास केली होती. ती पाहून एक सरदार खुश झाला आणि म्हणाला, 'देखो रे शान' (गनपतीची शान तर पाहा!) तिथे बाजूलाच एक गोरा फोटो काढत उभा होता त्याला वाटले केलेल्या आरासलाच 'देखो रे शान' म्हणतात. त्यातून 'डेकोरेशन' शब्द जन्माला आला. (एक गंमत).

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

पाषाणभेद's picture

25 Sep 2009 - 11:18 am | पाषाणभेद

कंट्रक्शन हा पण शब्द चांगले शिकलेले व त्याच लाइनीतले लोक सुद्धा वापरतात.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

वि_जय's picture

25 Sep 2009 - 12:53 pm | वि_जय

लव्ह मॅरेज लग्न केल..
जस्ट आताच आलो..
चल एक गोल राऊंड मारून येऊ.
ऑन द स्पॉट.. जाग्यावरच खल्लास झाला..

अमृतांजन's picture

25 Sep 2009 - 8:48 pm | अमृतांजन

दौंडला "गोल राऊंड" नावाचा चौकच आहे. भली मोठी पाटी लावली आहे

कानडाऊ योगेशु's picture

25 Sep 2009 - 12:53 pm | कानडाऊ योगेशु

आलाराम
सुलोचन
पम्चर

मूळ शब्द ओळखा!

झकासराव's picture

25 Sep 2009 - 1:42 pm | झकासराव

आलाराम- अलार्म
सुलोचन - सोल्युशन (पंक्चर काढण्यासाठी वापरायचे)
पम्प्चर- पन्क्चर.

टारझन's picture

25 Sep 2009 - 1:01 pm | टारझन

हाहाहा ... अंमळ मजेशीर धागा ... काही काही ठिकाणी खुदकन हसलो .. :)
धनंजयचा टोंबाटू तर अक्षरश: फुटेश !! =))

-(आनंदित) टारझन

कानडाऊ योगेशु's picture

25 Sep 2009 - 2:08 pm | कानडाऊ योगेशु

आता ह्याचा मूळ शब्द सांगा.
बोवनी.

गावरान's picture

4 Oct 2009 - 9:11 pm | गावरान

गावरान
माझ्या समजुतिप्रमाणे 'बोहनी' हा मूळचा शब्द. कोठल्याहि दुकानात पहिल्या विक्रिला आजची 'बोहनी' झाली असे म्हणतात. काहि ठिकाणी 'भवानी' झाली असा वाक्प्रचार रूढ आहे.

किट्टु's picture

25 Sep 2009 - 3:59 pm | किट्टु

शाळेत असताना... एका विद्यार्थ्याने 'Judge' (जज) ला 'जुडगे' केलं होतं...
पुर्ण २ महीने त्याला सर्वांनी चिडवल होतं......

प्रदीप's picture

26 Sep 2009 - 4:40 pm | प्रदीप

गोष्टी सांगण्यात तरबेज असलेला आमचा एक मित्र एका पुढार्‍याचा त्याने स्वतः अनुभवलेला किस्सा सांगायचा. पुणे- कोल्हापूर रस्त्यावरून जातांना एका ठिकाणी Diversion होते तेव्हा Danger अशी त्या ठिकाणाच्या थोडे अगोदर पाटी लावलेली. त्याला हा पुढारी 'डांगेर' असे म्हणालेला (म्हणे)! त्याची आठवण झाली.

[अवांतरः शाळेत एका मुलाने 'रूखरूख' चे 'रूरवरूरव' असे वाचून आमची खूप करमणूक केलेली].

योगी९००'s picture

28 Sep 2009 - 5:54 pm | योगी९००

ख ला र व असे आम्ही बर्‍याच वेळा गंमतीत म्हणायचो..

रवडी सारवरेचा रवडा रवा. (खडीसाखरेचा खडा खा).

रवादाडमाऊ

प्रमोद देव's picture

25 Sep 2009 - 5:29 pm | प्रमोद देव

गुजराथी लोक 'अनाउन्स'ला अलाउंस म्हणतात.
हॉल ला होल.
प्रोग्रॅम ला पोग्राम

बरेच लोक ग्लॅक्सो ला ग्लॅस्को म्हणतात.
ट्रेन ला टिरेन म्हणतात.
नॉन युज ला नानुज
ह्या शब्दाची गंमत कळण्यासाठी ट्रॅफिक कंट्रोल ऑफिसमध्ये जावं लागेल...
सरकारी जुनी गाडी(मोटर) भंगारात काढल्याशिवाय...इंग्लिशमध्ये 'नॉन-युज' सर्टिफिकेट ट्रॅकं ऑफिसकडून मिळाल्याशिवाय नवी गाडी खरेदी करता येत नाही....तेव्हा तिथे सरसकट शिपायापासून ते वरच्या साहेबापर्यंत नॉन-युज ला
नानुज म्हणतात....अर्थात हे क़ळायला,डोक्यात शिरायला थोडा वेळ लागतो म्हणा. ;)

पोलिस खात्यातले काही शब्द...
सिक(आजारपण)....शिक,शिकात जाणे
आहारभत्ता......आरभत्ता,आरबत्ता
ड्रेस ....गणवेश,युनिफॉर्म
ड्रेस मध्ये नसणे(हाहाहा.अहो तसे नाही)...साध्या वेशात

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

चिरोटा's picture

25 Sep 2009 - 5:46 pm | चिरोटा

"विलायत" हा एक जुना शब्द. हा शब्द blighty (wound) ह्या वरुन आला आहे. सैनिक युद्धात गंभीर जखमी झाल्यावर त्याना तेथून दूर (कधी कधी इंग्लंडला)इस्पितळात नेण्यात येई.त्यावरुन बिलायती-->विलायती.
गायक विलायत खाँ मधील विलायत कसा आला हे मात्र कोडे आहे.
भेंडी.
क्ष्^न + य्^न = झ्^न

"विलायत" शब्द मूळचा आहे, अरबी उगम आहे. हिंदुस्तानी लोकांशी बोलताना इंग्लंडचा उल्लेख "विलायत" असा व्हायचा. त्याचा अर्थ "परदेश" आहे, हे इंग्रजांना ठाऊक नव्हते. त्यांना वाटले, की तो "इंग्लंड"साठी प्रतिशब्द आहे. त्याचा भ्रष्ट उच्चार इंग्रज लोक "ब्लायटी" असा करत.

"रोग" अर्थाचा इंग्रजी शब्द "ब्लाइट" आणि "आमचे इंग्लंड" या अर्थीचा शब्द "ब्लायटी" यांचा काहीएक संबंध नाही.

अमिगो's picture

28 Sep 2009 - 6:47 pm | अमिगो

काही दिवसां पुर्वी टिव्ही वर असे ऐकले होते की:

वास्को द गामा समुद्र मार्गे भारतात येण्या आधी जेंव्हा आशिया खंडातील लोक युरोपातील देशां मध्ये जमिनी च्या रस्त्याने जायचे (किंवा यायचे )तेंव्हा तुर्कस्थानातील विलायत नावचे गाव त्यांचा आशिया मधिल शेवटचा थांबा असायचा. आणि एकदा ते विलायते ला पोहचले की ते असे समजले जायचे कि ते युरोपात पोहचले...त्या वरुन विलायते ला गेला किंवा विलायते हुन आला रुढ झाले असावे.

प्रदीप's picture

26 Sep 2009 - 4:51 pm | प्रदीप

सांगूच नका. Engineering चे 'इजनरिंग' असे लिहीतात, 'डोसा' चे 'ठोंसा' ,'इडली'चे 'इटली' लिहीतात. (ही दोन्ही होतीही तशीच, मी अहमदाबादेत असतांना अख्य्ख्या शहरात चांगले उडुपी खाणे कुठेही मिळत नसे, त्यासाठी अहमदाबाद रेल्वे स्टेशनातील पहिल्या मजल्यावरील कँटीनात जावे लागे). आणि कहर म्हणजे 'कंपनी' चा शॉर्टफॉर्म 'कांऊ' (इथे तो लिहीताही येत नाही-- त्या 'कां'लाच उ'कार') असे काहीतरी लिहीतात. अजून त्यांची गम्मत म्हणजे tape ला 'टॅप' म्हणतात आणि tap ला टेप!! हे उच्चाराचे गौडबंगाल काही उमगले नाही.

तर्री's picture

25 Sep 2009 - 7:20 pm | तर्री

लॉर्ड फॉक्लंड = ऐयाशी करणारा / आळशी.
प्रप्-गंडा = प्रोपागंडा

विनायक प्रभू's picture

25 Sep 2009 - 7:27 pm | विनायक प्रभू

=हंपर
हॅहॅहॅ

mahalkshmi's picture

25 Sep 2009 - 7:58 pm | mahalkshmi

काका शीक होते, आता त्याना सौलीट विकनेसपणा आला आहे.दवा,इनजीशन चालु आहे.
असे बोलणारे अनेक आहेत.

विलास आंबेकर's picture

25 Sep 2009 - 8:29 pm | विलास आंबेकर

झक्कास!
अजुनही Glaxo ला Glasko म्हणणारे कंडक्टर भेटतात.
Certificate ला सर्टफिकेट म्हणणारे महाभाग भरपुर सापडतील की!

चिरोटा's picture

25 Sep 2009 - 8:45 pm | चिरोटा

मुझे नटवर किंग सिखाओ म्हणून एक ओळखीचा टॅक्सीवाला सरदारजी मागे लागला होता. नंतर ते networking आहे हे मला कळले.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

अमृतांजन's picture

25 Sep 2009 - 8:55 pm | अमृतांजन

फूट वॉल्व्हः फूट बॉल

बल्बः बल

शॉक अब्सॉर्बरः शॉकॉप, शॉकप्सर, शॉक आब्सरव्हर. एक जण माझी मो. सायकलचे शॉक अब्सॉर्बर पाहून " शॉकॉपकी नल्ली के झुल्ले हो गये है" असे म्हणाला.

सकाळमधे अनेक दिवस ब्यारीकेडस ला "ब्यारीगेट" म्हणायची प्रथा होती.

तसे आपण सगळे जण अनेक इंग्रजी उच्चार चुकीचे करतो- कंफर्टेबल हा चूकीचा उच्चार आहे. तो कंफर्तबल असा करतात म्हणे.

पर्नल नेने मराठे's picture

26 Sep 2009 - 12:40 pm | पर्नल नेने मराठे

माझ्या मैत्रिणीचा मुम्बईत 'रेन्ट अ कार' चा व्यवसाय आहे. तिच्या बर्याच गाड्या बॉलिवुडवाले वापरतात. तर एकदा राणी मु़खर्जी हिच्या गाडीत बसली. ड्राइव्हर परत आला तो सान्गु लागला कि राणीची तोचा फार छान आहे. आम्ही खुप हसलो त्याला त्वचा म्हणायचे होते. :D

तसेच काही लोक चर्चगेट ला चरचगेट म्हणतात. ~X(

चुचु

मराठमोळा's picture

26 Sep 2009 - 2:27 pm | मराठमोळा

डॉ़क्टर - डागदर
एरिआ - विरा
ऑप्ट्रा (कार) - ओपत्रा
स्कॉर्पिओ (कार) - कार्पिओ
ट्युसॉ (कार) - टकसन
सिंपल - शिंपल
गाडी चालु करणे - सेल मारणे
टेलीकम्युनिकेशन - टेलीकमीशन
स्पेशिअल टी - पेश्शल चहा
हॉटेल - हाटेल
ट्युब - टुप
सिक्स सिटर रिक्षा - डुक्कर रिक्षा/टमटम
ट्रक - टरक
सिनेमा - शिनिमा
क्रिकेट - किरकेट

एकदा आमचे प्रोफेसर "Toughened Glass" ला टोनेड ग्लास म्हणाले होते आणी आम्ही हसलो तर क्लासरुम मधुन बाहेर काढले होते :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सन्दीप's picture

26 Sep 2009 - 2:44 pm | सन्दीप

काशमिर ते कन्याकुमारी सगळे ड्रायवर रेडीयेटर ला रेडी वौटर बोलतात.

सन्दीप

विदेश's picture

26 Sep 2009 - 2:58 pm | विदेश

"मॉडर्न"- हा शब्द बरोबर उच्चारला जातो, पण हमखास "मॉर्डन" असाच लिहिलेला आढळतो !

प्रदीप's picture

26 Sep 2009 - 5:02 pm | प्रदीप

ह्या संबोधनाचा आपल्याकडील वापर वेगळाच आणि अर्थपूर्ण आहे. मूळ भाषेत तो अभिप्रेत नव्हता :)

विकास's picture

26 Sep 2009 - 5:12 pm | विकास

चिनी लोकांना "थ" चा उच्चार करता येत नाही त्यामुळे ते "स" म्हणतात. विद्यापिठात असताना सुरवातीस त्यामुळे "सिसिस" म्हणजे काय ते कळायचे नाही! :)

तेच थोडेफार इस्रायली ज्यूंचे पाहीले आहे.

मराठीतील आवडलेला एक प्रयोग म्हणजे "फोटो काढताना, जवळून क्लोजअप घे".

डागडर

अर्थात अमेरिकन्सपण आपल्या नावाचे असेच काही करून टाकतात.
विठ्ठलचे व्हायटल अथवा विटाली ;)

आणि भारतीयांनी पाश्चात्यांकडून चुकीचा वापरात घेतलेला स्वतःचा शब्द म्हणजे गंगेला गँजीस म्हणणे.

प्रमोद देव's picture

26 Sep 2009 - 5:54 pm | प्रमोद देव

आपण अजूनही सन्मानाने मिरवतोय.
शीव--सायन
वसई--बेसीन
वांद्रे-बॅन्ड्रा
मुंबई--बॉम्बे......वगैरे वगैरे

नावांची लावलेली वाट...
भट्टाचार्य---बॅनर्जी
चट्टोपाध्याय--चटर्जी..चॅटर्जी
ठाकूर-टागोर.....वगैरे वगैरे

अशी शेकडो उदाहरणे आपल्या आसपास आहेत आणि गंमत म्हणजे आपणही सवयीने तेच बोलत असतो.त्यामुळे... कुणी शुल्ड,वुल्ड,हुक्ड,कुक्ड,लोडगे,दोडगे वगैरे असे उच्चार केले तर तेव्हढंच मला इंग्रजीवर आणि खास करून इंग्रजांवर सूड उगवल्यासारखं वाटतं. ;)

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

सखाराम_गटणे™'s picture

28 Sep 2009 - 10:52 am | सखाराम_गटणे™

>>तेव्हढंच मला इंग्रजीवर आणि खास करून इंग्रजांवर सूड उगवल्यासारखं वाटतं.

+२

वि_जय's picture

5 Oct 2009 - 2:24 pm | वि_जय

कुणी शुल्ड,वुल्ड,हुक्ड,कुक्ड,

खर आहे.. असेच लूक आणी लव्हचा उच्चार ऐकतांना..
ढूमच्याक..ढण...ढण

अविनाशकुलकर्णी's picture

26 Sep 2009 - 10:16 pm | अविनाशकुलकर्णी

रबर---लब्बर
बल्ब---ब्लब
डोक्याला हेडेक नका देवु..
संट्रो.....संत्रो
पळशिकर....पळ शी कर
बशी..सासर

सुनिल पाटकर's picture

27 Sep 2009 - 2:16 pm | सुनिल पाटकर

काही जण बल्बला गुलोब असंही म्हणतात

नितिन थत्ते's picture

26 Sep 2009 - 10:24 pm | नितिन थत्ते

गाडी टो करून नेली याला टोचिंग करून नेली असे म्हणतात.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

शक्तिमान's picture

27 Sep 2009 - 2:40 am | शक्तिमान

आमच्या गावी आजोबा लोक ब्लेड ला बिलेट-पान म्हणतात.

अजुन शब्द्संग्रह वाढवायचा असेल तर हा धमाल लेख वाचा ... बर्मंगठिव्का!

गणपा's picture

28 Sep 2009 - 9:56 pm | गणपा

बर्मंगठिव्का!

=)) =)) =)) =)) =)) =)) =))

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
यावन रावनकी सभा शंभु बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।।
रबि छबि लखत खयोत बदरंग । राजन् तव तेज निहारके लखत त्यजो अवरंग ।।
-कवी कलश

संदीप चित्रे's picture

27 Sep 2009 - 4:43 am | संदीप चित्रे

ह्या शब्दाऐवजी बर्‍याच जणांना सर्रास 'अ‍ॅक्सिलेटर' म्हणताना ऐकलंय :)

तसंच सिंगल, डबल, ट्रिपल आणि नंतर 'चौबल' ही ऐकलंय :)

धागा मात्र मजेशीर आहे. आवडला.

सुबक ठेंगणी's picture

27 Sep 2009 - 8:06 am | सुबक ठेंगणी

उदाहरण बरोबर आहे की नाही माहित नाही पण बरीच जण पाच रुपयाच्या नाण्याला पाचचा डॉलर म्हणताना ऐकलं आहे :)

प्रमोद्_पुणे's picture

5 Oct 2009 - 12:02 pm | प्रमोद्_पुणे

पुण्यात तर सर्रास असेच म्हणतात....

अनिरुध्द's picture

27 Sep 2009 - 8:38 am | अनिरुध्द

मागे ३-४ वर्षांपूर्वी मित्राच्या गावाला गेलो होतो - कोकणात - तेव्हाची गोष्ट. तेव्हा तिथल्याच एका घरात वाढदिवसानिमित्त मोठ्या आवाजात गाणी लावली होती. मित्राकडे आलेल्या सुताराला त्याबद्दल विचारलं -

मित्रः काय रे! आज काय लग्नं वगैरे आहे काय गावात?
तो : नाय. आज आमच्या शेजारी पोग्राम है.
मित्र : कसला रे? काय हळद वगैरे.
तो : नाय. आड्डी-बड्डी
आम्ही दोघं गार एकदम.
मित्र : काय?
तो: त्ये नाय का ल्हान मुलाचा करतात १ वर्स झाल्यावर.

त्याच्याच बरोबर आलेल्या, पण जरा शिकलेल्या तरुण मुलाने सांगितलं की हॅप्पी बड्डे आहे. :))
हा धक्का पचवत नाही तर पुढे दुसरा धक्का.

तो : (चेह-यावर आपण काही चुकीचं बोलतोय हे काहीही भाव न आणता म्हणाला) : त्या तुकारामचा 'पिकर' चा धंदा हाय ना, म्हनून ह्यो पिकर.
आम्ही दोघं : पिकर ?
तो : ह्ये काय गानी लावल्यान् त्यो.

इथे सुद्धा मदतीला त्याच्या बरोबर आलेल्या मुलाने सांगितलं की त्याला
'स्पिकर' असं म्हणायचं होतं.

एवढं सगळं झाल्यावर आम्ही त्याच्याशी बोलणं सोडून आमच्या कामाला लागलो. पुढे काय बोलणार होतो आम्ही.

देवदत्त's picture

27 Sep 2009 - 2:31 pm | देवदत्त

माझे एक-दोन गुजराती मित्र एनेबल (Enable) चा उच्चार अनेबल असा करतात. ते म्हणजे Unable च्या उचारासारखे वाटते. त्यामुळे प्रोग्रॅमिंग करताना नीट विचारून घ्यावे लागायचे, "बाबा रे, ते बटन एनेबल करू की अनेबल?" :)
पण नंतर जरी तो अनेबल म्हणत असला तरी संदर्भ जोडून आम्ही बरोबर तो अर्थ घ्यायचो.

हैयो हैयैयो's picture

28 Sep 2009 - 7:24 pm | हैयो हैयैयो

माहिती.

  • माझे श्रीलंकेतील नातलग हे आंग्लभाषेमध्ये R असलेल्या शब्दांमध्ये R चा उच्चार ழ (ऴ) करतात. (उदा. रबर = ऴबऴ, रोल = ळो़ल इत्यादि.)
  • तेच लोक सिंहलभाषा अथवा तमिऴभाषा बोलताना र चा उच्चार मात्र र असाच करतात. (उदा. रत्नम, श्रीलंका, भारतम इत्यादि.)
  • स्वभाषेमधले शब्द आंग्लभाषेतून इतरांस सांगावयाचे झाले तर पुन्हा R चा उच्चार ழ (ऴ) असा करतात. (उदा. ऴत्नम, श्ळी़लंका इत्यादि.)
  • अवांतर. 'ழ' चा उच्चार मराठीभाषकांना लिहून (अथवा बोलून) समजावून सांगणे केवळ आणि केवळ अशक्यप्राय आहे. तो मराठी ळ च्या आसपास आहे असे सांगता येते. 'ழ' च्या जवळपास जाणारा एक उच्चार रशियनभाषेमध्ये आहे.
  • र च्या उच्चारावरून एक आठवते, पूर्वी माझा एक क्लाएण्ट कोरीअन (सिओळ चा राहणारा) होता. तो र, ल, न आणि ण ह्या सार्‍या अक्षरांचा उच्चार मराठी ळ च्या जवळपास जाणारा असा करी.

हैयो हैयैयो!

धमाल मुलगा's picture

28 Sep 2009 - 7:34 pm | धमाल मुलगा

अवांतर. 'ழ' चा उच्चार मराठीभाषकांना लिहून (अथवा बोलून) समजावून सांगणे केवळ आणि केवळ अशक्यप्राय आहे.

आणि तो शिकायचा असेल तर क्विकगन मुरुगन चित्रपटातला एक सीन पहावा.... त्यामध्ये मुरुगन समोरच्याला 'ळ' कसा म्हणायचा हे शिकवतो :D
(मलातरी तो ळ 'र्ळ'च्या जवळपासचा वाटला....जीभ प्रचंड गुंडाळुन सप्पकन सोडताना उच्चार करताना दिसला मुरुगन.)

शक्तिमान's picture

28 Sep 2009 - 8:29 pm | शक्तिमान

'ழ'
कोझिकोड मध्ये वरील अक्षर येते का?
कोझिकोड = कोळिकोड?

हैयो हैयैयो's picture

28 Sep 2009 - 9:10 pm | हैयो हैयैयो

കോഴിക്കോട് = कोळिक्कोडऽ (ड चा उच्चार पूर्ण. अवग्रहचिह्नासह)

तमिऴ 'ழ' = मलैयाळम 'ഴ'

हैयो हैयैयो!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2009 - 12:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोझिकोड = कोळिकोड?

या स्टेशनात देवनागरीमधे 'कोषिकोड्ड' (किंवा 'कोष्षीकोड' किंवा अशा उच्चाराच्या आसपासचा शब्द) लिहीला आहे.
तसंच अलेप्पीचं मूळ नाव आळपुळ्ळा किंवा आळपुष्षा म्हणे! स्पेलिंग आणखी तिसरंच. या अलेप्पी गावाच्या मूळ नावाची एवढी व्हर्जन्स ऐकली की मी शेवटी अलेप्पी हेच नाव डोक्यात फिक्स करून घेतलं.

इंग्रजी 'झेड' चा उच्चार केरळी लोकं ष किंवा ळ असा लिहीतात हा माझ्यासाठी सांस्कृतीक, भाषिक, सामाजिक धक्काच होता.

अदिती

सुनील's picture

5 Oct 2009 - 2:53 pm | सुनील

इंग्रजी 'झेड' चा उच्चार केरळी लोकं ष किंवा ळ असा लिहीतात हा माझ्यासाठी सांस्कृतीक, भाषिक, सामाजिक धक्काच होता.

हे उलटे असावे!

मल्याळममधिल हा विवक्षित उच्चार रोमन लिपीत दर्शविण्यासाठी "Z" चा उपयोग करतात, असे म्हणायचे आहे का?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कोळिक्कोडऽ (ड चा उच्चार पूर्ण. अवग्रहचिह्नासह)

समीपात मी कोळिक्कोडास गेलो होतो, तिथे काढलेले प्रकाशचित्र.

कोझिकोड = कोळिकोड?

या स्टेशनात देवनागरीमधे 'कोषिकोड्ड' (किंवा 'कोष्षीकोड' किंवा अशा उच्चाराच्या आसपासचा शब्द) लिहीला आहे.

ह्या स्टेशनात देवनागरीमध्ये कोषिक्कोड असे लिहिले आहे. देवनागरीमध्ये लिहिण्यासाठी पूर्वी उत्तरेकडून कामगार आणावे लागत. तमिऴ 'ழ' = मलैयाळम 'ഴ' असे जे लिहितात, तो उच्चार देवनागरी पाटी बनवून देण्यासाठी उत्तरेकडील कामगारांना कळावा म्हणून मलैयाळी कामगार तो आंग्लभाषेत zh असा लिहून देत. उत्तरेकडील कामगार ते zh ला 'ष' वाचत. त्यांनी एकदा तो पायंडा पाडला आहे, तो अजूनही चालू आहे.

आम्ही मात्र zh ला ऴ वाचतो. (ळ चे दोन प्रकार आहेत. एक ळ, दुसरा ऴ. मराठी ळ - गुजराती ળ हा ह्या दोन्ही प्रकारांपेक्षा वेगळा, तिसराच असा आहे.)

तसंच अलेप्पीचं मूळ नाव आळपुळ्ळा किंवा आळपुष्षा म्हणे! स्पेलिंग आणखी तिसरंच. या अलेप्पी गावाच्या मूळ नावाची एवढी व्हर्जन्स ऐकली की मी शेवटी अलेप्पी हेच नाव डोक्यात फिक्स करून घेतलं.

आलप्पुळा़ हे मूळ नांव आहे. ആലപ്പുഴ असे मलैयाळम लिपीत लिहितात, तर ஆலப்புழா असे तमिळ लिपीत लिहितात. आपण मात्र अलेप्पी असेच म्हणावे, कारण त्यातील ऴ हा आपल्याला ह्या जन्मात उच्चारता येणार नाही ह्याची १००००% खात्री आहे. 'ழ'/'ഴ' चा उच्चार मराठीभाषकांना लिहून (अथवा बोलून) समजावून सांगणे केवळ आणि केवळ अशक्यप्राय आहे. तो मराठी ळ च्या आसपास आहे असे काहीसे सांगता येते. त्यामुळे तेवढी सूट आपणांस मिळेल. ;-)

इंग्रजी 'झेड' चा उच्चार केरळी लोकं ष किंवा ळ असा लिहीतात हा माझ्यासाठी सांस्कृतीक, भाषिक, सामाजिक धक्काच होता.

  1. झेड चा नाही, झेडहेच चा. (zh)
  2. zh चा उच्चार ष असे स्वतः मलैयाळी लोक लिहित नाहीत.
  3. zh चा उच्चार ऴ असे मलैयाळी लोक लिहितात.

हैयो हैयैयो!

चिरोटा's picture

5 Oct 2009 - 12:25 pm | चिरोटा

इंग्रजीतल्या H चा उच्चार दक्षिणेत(विशेष करुन आंध्र्/कर्नाटक) 'हेच' असा का करतात हे कळत नाही.circuit चा उच्चार सर्क्युट असाही केला जातो.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

कानडाऊ योगेशु's picture

5 Oct 2009 - 7:17 pm | कानडाऊ योगेशु

H ने चालु होणार्या बहुतांश शब्दांचा उच्चार हा "ह" ने केला जातो.
उदा. हॅन्ड,हर्ट,हट इ.इ.
त्यामुळे बहुदा दाक्षिणात्य लोक H चा एच असा उच्चार न करता "हेच्च" असा करत असावेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Oct 2009 - 8:58 am | llपुण्याचे पेशवेll

आमच्या न्यूयॉर्कमधील हापिसात २ कर्नाटकी मुली होत्या. त्या बरेच वेळेला 'H' चा उच्चार 'A'सारख्या करायच्या. उदा.'Hairfall' चा उच्चार एयरफॉल. 'Horn' ला 'ऑर्नं'.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

विष्णुसूत's picture

10 Oct 2009 - 6:54 am | विष्णुसूत

मला इन्ग्रजी-मराठी तील शब्द वापरातील अनेक मजेशीर किस्से अनुभवास आले आहेत. त्यातील एक किस्सा असा :
एखादा मराठी नाव/आडनावा चा कोणी कधी भेटला /भेटली तर मी हमखास मराठित बोलतो. जगभर फिरताना कुठल्याहि देशात मराठि माणुस मी ओळखु शकतो , हि माझी खासियत आहे. बरेच मराठि लोकं एक "अ‍ॅक्सेन्ट" घेवुन बोलतात, मग ते किती हि वर्ष अमेरीकन इन्ग्रजी बोलण्याचा प्रयत्न करोत किंवा अन्य कोणती हि भाषा... असो.
एकदा टेनीस खेळताना ,शेजारील कोर्ट वरुन ,एक भारतीय मुलगी सारखी , नोकरी -नोकरी असे काहितरी म्हणत होती असे मला ऐकु आले. ( बहुतेक हि मुलगी पहिल्यांदाच टेनीस खेळत होती ) मला काहि समजले नाहि. काहि वेळा नंतर तिच्या पार्टनर मुलीला मी विचारले कि हि मुलगी नोकरी कर... मी नोकरी करते... वैगरे का म्हणते आहे ?
तेव्हा मला त्या मुलींच्या मराठि बोलण्यातले गुढ कळाले.
त्या मुली पहिल्यांदाच टेनीस खेळत होत्या व सर्विस करणे चा अनुवाद नोकरी करणे असा करत होत्या. ( बहुतेक ह्या दोघि अमेरीकेत नुकत्याच आल्या होत्या आणि अस्खलित मराठि शाळे मधे शिकलेल्या होत्या !). मला माझे हसु आवरत नव्हते .. पण त्या मुलींच्या मराठि भाषांतरा ची मजा वाटत होती. ह्या गोष्टिला आता बरीच-बरीच वर्ष झाली तरी हे "नोकरी करणे" भाषांतर नेहमी आठवते आणि हसु येते.
अजुन एक भाषांतर जे मला नेहमी ऐकु येते .. ते म्हणजे जवळ जवळ ८०% मराठि लोकं टेनिस ला "लॉन्ग टेनिस" म्हणतात !

कलंत्री's picture

14 Oct 2009 - 5:00 pm | कलंत्री

बिझी ला ( व्यस्त) असणे याचा उच्चार मी कार्यालयात बुझी असा करत असे. सर्व सहकारी करपल्लवी करत आहे असे मला जाणवले आणि प्रयत्नपुर्वक बिझी म्हणण्याचा प्रयत्न करी, तरी कधी बुझी असताना बुझी असे म्हणत असे. ( मनात म्हणे, हसा लेकानो)...