डायलॉग

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
27 Feb 2008 - 11:12 am

माझे एक काका आहेत त्यांना कोणी विचारले की काय, ठीक चालले आहे ना... की ते म्हणतात, अहो कसले काय... दात पांढरे झालेत, केस हलायला लागलेत... 
कधी म्हणतात... आम्ही जिलबीसारखी सरळ माणसे.. चाल्लयं कसेतरी.. 
असे त्यांचे संवाद झक्कास असतात. ते प्रत्येक वाक्याला हुकुमी टाळी घेऊ शकतात.
तसेच आम्ही सगळी भावंड एकत्र आलो की अनोळखी, अनवट किंवा ठेवणीतले मराठी शब्द बोलतो आणि सर्वच मराठी माध्यमातून आले असल्याने हे भारी भारी शब्द समजून घेऊ शकतात आणि त्यावर कोट्या करू शकतात. बरेचदा आम्ही मराठी नाटकातील संवाद सुद्धा प्रसंगानुरुप चपखलपणे फेकतो.
म्हणजे हेराफेरी (परेश रावलचा), शोले अश्या चित्रपटातील खुमासदार हिंदी संवादसुद्धा वापरतो पण क्वचित्. (कारण मराठीचा जाज्वल्ल्य अभिमान नसानसांत मुरलाय ना...) हे मराठी संवाद फेकण्यासाठी "असा मी असामी" ही आमचे सर्वात आमची सर्वांत आवडती संहिता आहे... कुठलाही प्रसंग असो फेका असामीतला एक डायलॉग.
पण परवाच माझा भाऊ म्हणालाय, आगरी रामायणात असेच धमाल संवाद आहेत, मी लवकरच त्याचा पण रट्टा मारणार आणि मग करणार चालू त्यातील पण संवाद फेकणे ...

प्रतिक्रिया

सृष्टीलावण्या's picture

27 Feb 2008 - 11:28 am | सृष्टीलावण्या

इथे ऐकू शकता...

विसोबा खेचर's picture

27 Feb 2008 - 11:50 am | विसोबा खेचर

माझे एक काका आहेत त्यांना कोणी विचारले की काय, ठीक चालले आहे ना... की ते म्हणतात, अहो कसले काय... दात पांढरे झालेत, केस हलायला लागलेत... 
कधी म्हणतात... आम्ही जिलबीसारखी सरळ माणसे.. चाल्लयं कसेतरी.. असे त्यांचे संवाद झक्कास असतात. ते प्रत्येक वाक्याला हुकुमी टाळी घेऊ शकतात.
तसेच आम्ही सगळी भावंड एकत्र आलो की अनोळखी, अनवट किंवा ठेवणीतले मराठी शब्द बोलतो आणि सर्वच मराठी माध्यमातून आले असल्याने हे भारी भारी शब्द समजून घेऊ शकतात आणि त्यावर कोट्या करू शकतात. बरेचदा आम्ही मराठी नाटकातील संवाद सुद्धा प्रसंगानुरुप चपखलपणे फेकतो.
म्हणजे हेराफेरी (परेश रावलचा), शोले अश्या चित्रपटातील खुमासदार हिंदी संवादसुद्धा वापरतो पण क्वचित्. (कारण मराठीचा जाज्वल्ल्य अभिमान नसानसांत मुरलाय ना...) हे मराठी संवाद फेकण्यासाठी "असा मी असामी" ही आमचे सर्वात आमची सर्वांत आवडती संहिता आहे... कुठलाही प्रसंग असो फेका असामीतला एक डायलॉग.
पण परवाच माझा भाऊ म्हणालाय, आगरी रामायणात असेच धमाल संवाद आहेत, मी लवकरच त्याचा पण रट्टा मारणार आणि मग करणार चालू त्यातील पण संवाद फेकणे ...
वरील लेखनाचा आणि भाईकाकांच्या पुस्तकातील उतार्‍याचा नक्की काय संदर्भ आहे हे कळले नाही व तो उतराच्या उतारा येथे देण्याचे प्रयोजनही कळले नाही!
संदर्भ म्हणून वानगीदाखल इतरत्र प्रकाशित साहित्याच्या दोन चार ओळी मिपावर देणे ठीक आहे, परंतु मिपावर शक्यतोवर सभासदांनी स्वत:चेच लेखन अधिकधिक करावे असे वाटते, किंबहुना तसे मिपाचे धोरण आहे. हे यापूर्वीही अनेकदा मराठीतून सांगितले गेले आहे. कृपया सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती...
सर्व प्रसिद्ध दिग्गज लेखक/कवी/कवयत्रींबद्दल मिपाला पूर्ण आदर आहे परंतु त्यांचे साहित्य जसेच्या तसे, विनाकारण, विनासंदर्भ इथे येऊ नये. आंतरजालावर इतरत्र, पुस्तकस्वरुपात, हे साहित्य मुबलक स्वरुपात उपलब्ध आहे तिथेच ते वाचले जावे असे वाटते.
मिपावर अधिक करून सभासदांचे स्वत:चेच लेखन एन्करेज केले जाईल! 
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी , सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठी प्रेमींचं मनापासून स्वागत आहे.
या मिपाच्या धोरणानुसार कुठलीही व्यक्ति इथे येऊ शकते व तिचे स्वत:चे विचार/साहित्य इथे मांडू शकते, इतरांच्या लेखनावर प्रतिसाद देऊ शकते/त्यावर आपले मतप्रदर्शन/विचार मांडू शकते! या सर्वाचे  मिपावर मनापासून स्वागतच होईल! तसे स्वागत मिपाने आजपर्यंत केलेही आहे!
कृपया सर्वांनी सहकार्य करावे अशी पुन्हा एकदा कळकळीची विनंती!
अन्यथा नाईलाजास्तोवर असे साहित्य मिपावरून कुठलीही नोटीस, कुठलेही कारण न देता अप्रकाशित केले जाईल याचीही कृपया नोंद घ्यावी...
तात्या.

सृष्टीलावण्या's picture

27 Feb 2008 - 12:39 pm | सृष्टीलावण्या

असा मी असामीची क्लिप काढलीत तरी चालेल... कृपया राग नसावा...

विसोबा खेचर's picture

28 Feb 2008 - 8:22 am | विसोबा खेचर

धन्यवाद..

तात्या विन्चू's picture

27 Feb 2008 - 11:56 am | तात्या विन्चू

'अशी ही बनवा बनवी' मधले काही असेच लक्शात राहीलेले सन्वाद -
"जाऊबाई, नका जाऊ बाई"
"तीला विड्या फुकण्याचे डोहाळे लागलेयत!"
"आणी ह्या मिसेस बालगन्धर्व?"
"धनन्जय माने आहेत का घरात?"
 
आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू

" हो पण जनावरांना वाचता येत नाही, माणसांना येतं"
" तो माझा मित्र म्हणालो होतो ना इस्त्रायला जाणारा, तो वारला; आणि त्याबरोबर तुम्ही दिलेले पन्नास रुपये पण वारले.""माने, हा शुद्ध हलकटपणा आहे""अहो तो वारला, यात हलकटपणा कसला?"
हे विसरलात तात्या विन्चू
(बनवाबनवी फ्यान)बेसनलाडू

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Feb 2008 - 8:56 pm | llपुण्याचे पेशवेll

कोणी उपरोधाने म्हटले 'हुशार आहेस' तर त्याला उत्तर 'लहानपणापासून, म्हणजे असे आमचे काका म्हणायचे'.
पुण्याचे पेशवे

हेराफेरी मध्ये........अरे गाव कैसे जाउ ?मैने तो कुत्ते बिल्ली तक से उधर ले रख्खा है.
बाबा लगीन्......ढिंच्यांग ढिंच्यांग
निळू फुले......फुलाचा वास घ्यायचा म्हंटले कि फूल कुस्करावं लागतं..(चित्रपट : लक्श्मी ची पाउले....बहुतेक)

प्राजु's picture

27 Feb 2008 - 8:53 pm | प्राजु

असल्या कोट्या माझा नवरा अखंड करत  असतो.  एकदा कोणीतरी म्हणालं "आज ऑफिसमध्ये कटलेट ओर्डर केलं होतं .. पण कसलं ते कटलेट त्यात बटाटाच जास्त होता." तर माझा नवरा म्हणाला "म्हणजे बटलेट होतं म्हण की.."
मी एकदा कोल्हापूर्-सांगली वादात त्याच्या बाजूला बसून काहितरी जोरात बोलत होते.. मला म्हणाला " थांब आता मी तुझ्या त्या बाजूला बसतो म्हणजे माझा आता या कानाला आराम मिळून दुसर्‍या कान बंद पडूदे"
पुण्यात आमच्या इमारतीत पाटिल म्हणून होते. एकदा त्यांच्या लहानगा खूपच रडत होता तर हा म्हणतो, " आज पाटलीपुत्र फारच जोरात रडतो आहे."
सहज एकदा बोलताना कोणी तरी मला म्हणाले "अगं कोल्हापूरी चप्पल चांगली असते ना? " तर हा म्हणतो "माहिती नाही, मी तरी आजपर्यंत कधी हिच्या हातून खाल्ली नाहिये"
-(सर्वव्यापी)प्राजु

भडकमकर मास्तर's picture

28 Feb 2008 - 1:22 am | भडकमकर मास्तर

पाटलीपुत्र ची कोटी बेष्ट आहे

स्वाती दिनेश's picture

28 Feb 2008 - 12:46 pm | स्वाती दिनेश

पाटलीपुत्र ची कोटी बेष्ट आहे.
असेच म्हणते,स्वाती

सुधीर कांदळकर's picture

28 Feb 2008 - 10:47 pm | सुधीर कांदळकर

मिनिटे झालेली आहेत. एका मित्राची शाळकरी मुलगी.
तुमचे डोके कोठे? पाय ठेवायचेत. मी मुलगी असतो तर प्राजूच्या      नव-याच्या प्रेमात पडलो असतो. भाग्यवान आहे बेटी. असेच शब्द आयुष्य रंगीत करतात.
पाटलीपुत्र एकदम सही.
आमचे एक मित्ररत्न असेच आहे. एकदा हॉटेलात चेक इन करतांना भेटीचा उद्देश हा रकाना आला. काय लिहू? विचारले. लिही रंगढंग. मित्रवर्यांचे उत्तर.

एक's picture

29 Feb 2008 - 12:41 am | एक

एकदा आमच्याकडे फुकट "जांबा ज्युस" ची अनेक कुपन्स आली होती.
१-२ वेळेला फुकट ज्युस प्यायल्यावर परत त्याच दुकानात त्याच नावाने पुढचं फुकट कुपन वापरायला जिवावर आलं. म्हणून पुढ्च्या कुपन्स साठी मी माझं नाव "फुकट्या" असं सांगायला लागलो..
ज्युस तयार झाल्यावर ती ओरडायची.."Mr. Fuktya, your juice is ready!".. मजा यायची.. "फुकट्या" चा उच्चार करताना ती जी कोलमडायची. वा: वा:..
 

एक's picture

29 Feb 2008 - 12:57 am | एक

एकदा मी आणि माझा एक अमेरिकन कलीग ट्रेक वर गेलो होतो.
वाटेत एक बैल आमच्यावर फारच फिदा झाला आणि आमच्या रोखाने येवू लागला.  त्यावर माझा कलीग त्याच्यावर जोरात ओरडला.."Dude, don't u look at me like that, You will be on my dinner plate in couple of months!"
तसच एकदा मी माझ्या वयाने खुपच वडील असलेल्या कलीगला त्याच्या घरी सोडत होतो. वाटेत सिग्नलला थांबलो असताना मी इकडे तिकडे बघत होतो आणि तो सिग्नल हिरवा कधी झाला ते कळालच नाही.  बराच वेळ झाल्यावर त्याने हळूच खांद्यावर थोपटलं आणि म्हणाला, "Son, it's not going to get more greener than this, let's move on.."
 

चतुरंग's picture

29 Feb 2008 - 1:06 am | चतुरंग

मी इकडे तिकडे बघत होतो आणि तो सिग्नल हिरवा कधी झाला ते कळालच नाही. "Son, it's not going to get more greener than this, let's move on.."
तसंही सिग्नलला गाडी थांबल्यावर बर्‍याच बघण्यासारख्या 'गोष्टी' असतात तेव्हा सिग्नल कोण बघत बसणार! अर्थात ग्रीन चा 'रेड लाइट' व्हायच्या आत तिथून जाणंच बरं;)(ह.घ्या>:))
चतुरंग

टिउ's picture

29 Feb 2008 - 3:58 am | टिउ

अर्थात ग्रीन चा 'रेड लाइट' व्हायच्या आत तिथून जाणंच बरं;)
थांबलं तरी हरकत नाही! रेड लाईटमधे सिग्नल नेहमी ग्रीनच असतो! :-)