काळा

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
27 Feb 2008 - 7:42 am

तुम्ही काहीही म्हणा, कोणत्याहि काळातील उदाहरण घ्या दोन रंगांनी मानवी समाजजीवनात एक विषेश स्थान पटकावले आहे. मानवी भावविश्व, अर्थविश्व, राजकारण, समाजकारण, काव्य, प्रतिभा अश्या नानाविध ठिकाणी या रंगानी आपला ठसा मानवाच्या आयुष्यात उमटवला आहे. तुम्ही ओळखलंच असेल हे रंग म्हणजे काळा आणि पांढरा
अश्मयुगातही प्रमुखाच्या गुहेला सफेद चुन्याची चित्रे काढल्याचे दिसुन येते......देवाला सगळ्या रंगांची फुले वाहता येतात पण काळी फुले तुम्ही देवाला वाहाल का? ........"स्वच्छता" म्हटली की डोळ्यांसमोर येते ती "शुभ्रता", आणि "काळा" रंग हा घाण/कचरा दाखवायलाच वापरतात.
माणसाचा चेहेरा आनंदाने "उजळतो", तर तो दु:खाने "काळवंडतो"... एखाद्याला हाकलतानाही "तोंड काळं कर" म्हणलं जातं....."काळा हिरा"ही म्हणायपुरताचसफेद, पांढरा हा नेहेमीच स्वातंत्र्य, पावित्र्य, बंधुता दाखवत आला आहे तर काळा रंग दानवी कृत्य, वाईटपणा, तुच्छता झेलत आला आहे
थोडक्यात माणसाने अनादी काळापासूनच पांढर्‍या रंगाला काळ्यापेक्षा श्रेष्ठ वागणूक दिली
पुढे माणसाने हा रंग वर्णात-त्वचेत शोधायला सुरवात केली. गोर्‍या त्वचेच्या माणसांनी पृथ्वी व्यापली आणि जेत्या गोर्‍या त्वचेला भाव आला, नैतिकता आली आणि काळा हा काळाच राहिला.
२०व्या शतकात काहि माणसांची मानसिकता बदलली. आता उघड उघड तरी वर्णभेद दाखवला जात नाहि. बर्‍याच नेत्यांनी जगाला गोर्‍यांच्या काळ्या मानसिकतेतुन सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न केला. ("इथे ही "काळा" रंग मात्र कमी दर्जाचे मन याच अर्थी वापरला गेला). त्वचेचा रंग काळा असला तरी मनाने गोरे आहोत असे म्हणून काळ्या रंगाला अजूनच तुच्छ लेखले गेले
अजुनही ही मानसिकता दिसते. भारतीय लावणी नर्तकीला केवळ एका व्हिजासाठी नृत्य करायला लावले जाते.... "काळ्या-तपकीरी" कातडीच्या खेळाडूंवर शेरेबाजी होते... अजुनहि युरोपातहि वांशिक चकमकी होतात.. तशी हि यादि न संपणारी आहे.. पण हल्लीचं उदा. द्यायचच "ब्लॅक" नाव असलेल्या चित्रपटाला साधं ऑस्कर नॉमिनेशनसाठी नाकारलं जातं हे काय कमी आहे? ;)
श्रेयअव्हेर (डिस्क्लेमर):वरील लिखाण हे केवळ एक "उबळ" या स्वरुपाचे असे स्वैर लिखाण असून ते लिहिताना कोणत्याहि सत्यासत्यतेची पडताळणी केलेली नाहि तरी अश्या लिखाणास फार सिरियसली(मराठी?) न घेता ह घ्या हेवेसांनल
उबळीची प्रेरणा: ही चर्चा

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

27 Feb 2008 - 9:13 am | बेसनलाडू

फार सिरियसली(मराठी?) न घेता ह घ्या हेवेसांनलसिरिअसली = गांभिर्याने?
स्वैर लेखन आवडले.
(वाचक)बेसनलाडू

धनंजय's picture

27 Feb 2008 - 9:22 am | धनंजय

स्फुट लेखन आवडले.आणि थोडेसे गांभीर्याने घेतल्यासही हरकत नाही.

सृष्टीलावण्या's picture

27 Feb 2008 - 9:23 am | सृष्टीलावण्या

वर्णभेद करण्यात भारतीय माणसे कमी नाहीत... कुलाबा किंवा काळा घोड्याला येऊन पहा.. रस्त्यातून चालणार्‍या युरोपी किंवा अमेरिकी दिसणार्‍या पर्यटकांसमोर नाचणारी आणि भिकारी वृत्तीचे प्रदर्शन करणारी आपली भारतीय मंडळी आफ्रिकी, पूर्व आशियायी लोकांकडे दुर्लक्ष करतात.. 

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Feb 2015 - 6:15 am | निनाद मुक्काम प...

गोरे हे श्रीमंत व काळे हे अविकसित असा प्रवाद जनसामान्य आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ग्राहक म्हणून त्यांच्याकडे भ्कार्यी ते दुकानदार पाठी लागतात पण अरबी पेहेराव असलेल्या माणसाच्या पाठी सुद्धा लोक लागतात.
परदेशात महागड्या ब्रंड च्या दुकानात शेखांचे स्वागत होते ,
ये सब इमेज का चक्कर आहे

मुक्तसुनीत's picture

27 Feb 2008 - 9:42 am | मुक्तसुनीत

>>> पण हल्लीचं उदा. द्यायचच "ब्लॅक" नाव असलेल्या चित्रपटाला >>साधं ऑस्कर नॉमिनेशनसाठी नाकारलं जातं हे काय कमी आहे? ;)
 
"ब्लॅक" हा एक अगदी टेरिबल् चित्रपट होता. फारच संवेदनाविरहित , आणि व्यंगाचे अत्यंत बटबटीत चित्रण करणारा. मार्मिकता, सूचकता या सर्वांच्या नावाने अंघोळ करून काढलेला.

विजुभाऊ's picture

27 Feb 2008 - 2:29 pm | विजुभाऊ

हे म्हणजे उगाच पांढर्यावर काळे करण्याचा द्राविडी प्राणायाम आहे.
बर्याच बाबतीत   काळे गोरे असा भेद अजिबात नसतो
उदा: काही हिरवट माणसे काळे गोरे असा भेद अजिबात करत नाहित
ती रागाने लालेलाल होतात्...लाजुन गुलाबी होतात्......
 पण मजा तेंवा येते जेंव्हा काळी माणसे  तोंडाला पावडर फासतात्......ती चक्क खारे दाण्या सारखी दिसतात
      :
 

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Feb 2008 - 4:12 pm | ब्रिटिश टिंग्या

"काळा" रंग हा घाण/कचरा दाखवायलाच वापरतात.एखाद्याला हाकलतानाही "तोंड काळं कर" म्हणलं जातंकाळा रंग दानवी कृत्य, वाईटपणा, तुच्छता झेलत आला आहेकाळा हा काळाच राहिला.<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" />
ह्म्म्म्म करा.....आमची थट्टा करा......
आपला,धनंजय काळा :((
 

प्राजु's picture

27 Feb 2008 - 11:49 pm | प्राजु

धनंजय तुझे आडनावच काळे आहे.. त्याला तू तरी काय करणार? आणि कवितेत.. मी सहजच म्हणाले रे "धनंजय काळा".. राग आला असेल तर सॉरी...
- (सर्वव्यापी)प्राजु

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Feb 2008 - 3:21 pm | ब्रिटिश टिंग्या

अहो मी लिहीलेलं इतक सिरियली घेउ नका......आम्हाला राग वगैरे येत नसतो :))
-धनंजय काळा :)

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Feb 2008 - 10:22 pm | llपुण्याचे पेशवेll

धनंजय नावाच्या लोकाना खरेच कशाचाच राग येत नाही. :) मला पण कशाचाच राग येत नाही मनापासून........ :)कायम मी निर्लज्जासारखा हसत असतो... :)
पुण्याचे पेशवे

सुनील's picture

27 Feb 2008 - 4:35 pm | सुनील

आपल्या संस्कृतीतही पांढरा रंग हा मांगल्याचे प्रतिक तर काळा रंग हा  दुर्गुणाचे प्रतिक मानले जाते.
उजेडात होते पुण्य, अंधारात पाप !!
कुठल्याही भानगडीत काळेबेरे हे असायचेच.
बाकी मराठी आणि इंग्रजी मंडळीत एक साम्य आहे - आमच्याकडे "काळे" आणि "गोरे" अशी आडनावे असतात तशी त्यांच्यात Black आणि White ! आता श्रीयुत काळे हे गोरेपान आणि श्रीमती गोरे ह्या सावळ्या असू शकतात, हे वेगळे!
 
आलटून पालटून सुनील (काळे) / सुनील (गोरे)
 
 
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

28 Feb 2008 - 12:28 am | विकास

स्वैर लेखन आवडले. म्हणण्यात तथ्य असले तरी,


  1. पांढरा रंग हा काळ्यापुढे फिकाच असतो
  2. माणसाचे तरूण पण हे  डोक्यावरचे केसकाळे असताना धरले जाते पांढरे झाल्यावर नाही. अर्थात काहीजणांचे डोक्यावरील केस "तोंड काळे करतात"हा भाग वेगळा :-)
  3. जो पर्यंत आपण लिहीत नाही तो पर्यंत कागद कितीही पांढराशुभ्र असला तरी "कोरा"च राहतो.
  4. संगणकावर टंकताना पण प्रामुख्याने आपण काळा रंगच वापरतो. जसा काळजीने चेहरा काळवंडतो तसाच भीतीने अथवा पित़ळ उघडे पडलेला चेहरापण गोरामोरा होतो.
  5. आणि हो, ज्या एका व्यक्तिस तमाम (हिंदू) भारतीय हे "संपूर्ण पुरूष" म्हणतात त्याचे नावच "श्रीकृष्ण" आहे.

 
प्रभाकर पेठकर's picture

28 Feb 2008 - 11:52 am | प्रभाकर पेठकर

पांढरा रंग हा काळ्यापुढे फिकाच असतोपांढरा हा रंग नाही. ते आहे सर्व रंगांचे मिश्रण. म्हणजेच पांढर्‍या रंगात सर्व रंगांचे अस्तित्व आहे.
माणसाचे तरूण पण हे  डोक्यावरचे केसकाळे असताना धरले जाते पांढरे झाल्यावर नाही.पण अनुभव मात्र केसांच्या पांढर्‍या छटेवर मोजण्याची प्रथा आहे. 'केस उगाचच उन्हात नाही पांढरे केलेले.' असे म्हणण्याचा प्रघात आहे. आणि त्यात तथ्यांश आहे....तसाच भीतीने अथवा पित़ळ उघडे पडलेला चेहरापण गोरामोरा होतो.चेहरा लाजून गोरामोरा होतो. पितळ उघडे पडल्याने अथवा भीतीने पांढराफटक पडतो. ..तमाम (हिंदू) भारतीय हे "संपूर्ण पुरूष" म्हणतात त्याचे नावच "श्रीकृष्ण" आहे.पण म्हणून गोर्‍या पुरुषांना 'अपूर्ण पुरूष'  म्हणतात असे कुठल्याही तर्कशास्त्रात म्हंटलेले नाही. तेही संपूर्ण पुरुष असू शकतात. (उदा. रेमन्ड सुटींग वापरणारे... A complete Man.)
जस्ट् अ टाईमपास. फार गांभिर्याने घेऊ नये, ही नम्र विनंती.
 

विकास's picture

28 Feb 2008 - 7:25 pm | विकास

..तमाम (हिंदू) भारतीय हे "संपूर्ण पुरूष" म्हणतात त्याचे नावच "श्रीकृष्ण" आहे.पण म्हणून गोर्‍या पुरुषांना 'अपूर्ण पुरूष'  म्हणतात असे कुठल्याही तर्कशास्त्रात म्हंटलेले नाही. तेही संपूर्ण पुरुष असू शकतात. (उदा. रेमन्ड सुटींग वापरणारे... A complete Man.)
गांभिर्याने घेत नाही पण मला काय म्हणायचे होते त्याचा खुलासा नक्कीच करतोय :-)
राम आणि कृष्ण हे हिंदूच्या श्रद्धास्थान असलेले मानवी अवतार आहेत.  त्यातील राम खरे म्हणाल तर आदर्श बाय ऑल मिन्स. पण तरीही त्याला "मर्यादा पुरूषोत्तम" असे विशेषण पडले. याच्या उलट श्रीकृष्ण - हा आयुष्यात, स्वतःसाठी नाही पण गरज पडली तसे, खोटे बोलला, जनतेला वाचवायची वेळ आली तेंव्हा पळून गेला, प्रतिज्ञा केल्या आणि मोडल्याही, स्वतःसाठी नाही पण कूट निती "इक्वल अँड अपोझिट" वापरली, इत्यादी.  एकीकडे देवाचा अवतार असलेल्या ह्या माण्साला शेवटी शापीत मरण आले तेही त्याने तसेच स्विकारले.  तरीही त्याला जास्त मान देत "संपूर्ण पुरूष" म्हणले गेले. असे मला म्हणायचे होते...
त्यात कुणाचे मी पौरूषत्व काढत नव्हतो आणि त्याला अपूर्णही म्हणत नव्हतो! गैरसमज नसावा.
 
 

ऋषिकेश's picture

28 Feb 2008 - 7:47 am | ऋषिकेश

हा स्वैर लेख गोड मानून प्रतिक्रिया देणार्‍याचे अनेक आभार :)

विसोबा खेचर's picture

28 Feb 2008 - 8:02 am | विसोबा खेचर

ऋषिकेशा,
तुझे स्वैर लेखन आवडले रे.. चांगले लिहिले आहेस.
आपला,(काळाकुट्ट) तात्या.

प्राजु's picture

28 Feb 2008 - 9:38 am | प्राजु

दाल मे जरूर कुछ काला है...या फिर पूरी दाल ही काली है.. असे हे नेहमीचेच संवाद...
बाकी हे लेखन मात्र आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2008 - 3:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वैर लेखन आवडले
 

सुधीर कांदळकर's picture

28 Feb 2008 - 10:17 pm | सुधीर कांदळकर

प्रच्छन्न न्यूनगंड जाणवला.  हिणवाल तर काळ्या पाण्याची शिक्षा देईन.
 
कालू कलंदर

स्वाती राजेश's picture

5 Mar 2008 - 1:48 am | स्वाती राजेश

आमच्या कॉलेज मध्ये सर होते ते दिसायला काळे होते. अगदी काळे कुळकुळीत.
वर्गातील मुले त्यांना ऐकु जाईल असे हमखास चिडवायची. पण ते हसून म्हणायचे,"आम्ही काळे आहोत म्हणून तुम्हाला लोक गोरे म्हणतात. आम्ही नसलो तर लोक तुमची कोणाशी तुलना करणार?,म्हणून आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात ठेवा."

यावरून आठवलं आमच्या बरोबर एक मुलगा होता, त्याचा किस्सा. तो भारतात असताना त्याला सगळे वर्गातले "इंग्रज" म्हणून चिडवायचे कारण गावातल्या शाळेत तो एकटाच वर्गात (आणि शाळेत पण बहुतेक) गोरा नि घार्‍या डोळ्याचा होता. तो वैतागायचा मग त्याचं तेच टोपण नाव झालं. पुढे तो इंग्रजांच्या देशात गेल्यावर त्याला कळालं की ते त्याच्यापेक्षा खूपच गोरे आहेत आणि त्याला ब्राऊन समजतात.. एकदा तर एक रेशिष्ट इंग्रज त्याला म्हणाला "where did u drop your skin, you paki ?", तो चिडायच्या ऐवजी हसायलाच लागला.
थोडक्यात रंग सापेक्ष असतात.

सृष्टीलावण्या's picture

5 Mar 2008 - 7:47 am | सृष्टीलावण्या

When I born, I black .
When I grow up, I black .
When go in sun, I black .
When I scared, I black .
When I sick, I black .
& when I die, I still black.

And u white fella,
when you born you pink .
when you grow up u white .
when u go in sun you red.
when u cold u blue.
when u scared u yellow .
when u sick u green .
& when u die u gray .
And u calling me coloured ? ?

by an African child.
Nominated for a prize for the best poem of 2005 .

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

arunjoshi123's picture

21 Feb 2015 - 4:10 pm | arunjoshi123

chhan lekh aNi pratikriya.

जयन्त बा शिम्पि's picture

22 Feb 2015 - 5:03 am | जयन्त बा शिम्पि

मलाही हे समजत नव्हते कि ' काळा ' पैसा तर नेहमीसारखाच दिसतो , मग तो " काळा " असुन लोक त्याला का लपवितात ?
आणि अशा ' काळ्या ' पैशाला उजेडात आणण्यासाठी सरकार का धड्पडते?

इतर रंगही वाइट वृत्तीँसाठी आहेत जसे black money ,magic .yellow journalism ,white elephant ,business in the red ,shades of grey ,green eye ,jaded actress ,pink lady