खळबळजनक बातमी... हे असे आणखी किती दिवस चालणार?

मड्डम's picture
मड्डम in काथ्याकूट
22 Sep 2009 - 1:18 pm
गाभा: 

खालची बातमी वाचा हे असे आणखी किती दिवस चालणार?

गँगरेपनंतर महिलेला जीवंत जाळले

मुंबई

मुंबईच्‍या एन्टॉप हिलमध्‍ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार करून त्यानंतर तिला आगीत टाकून दिल्‍याची खळबळजनक घटना घडली असून आगीत मोठ्या प्रमाणावर भाजलेल्‍या या तरुणीचे येथील सायन हॉस्पिटलमध्‍ये उपचारा दरम्‍यान निधन झाले आहे.

या 24 वर्षीय महिलेला दोन मुले असून पोलिसांनी या क्रुर घटनेतील चार आरोपींना अटक केली आहे. या चार आरोपींपैकी एकाचे या महिलेवर एकतर्फी प्रेम होते त्‍यातून त्याने हे कृत्य केले आहे.

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

22 Sep 2009 - 1:22 pm | पर्नल नेने मराठे

शी ...आय हेट ..... X( >:) ~X(
खरच ..हे असे आणखी किती दिवस चालणार?

चुचु

टारझन's picture

22 Sep 2009 - 8:42 pm | टारझन

शी ...आय हेट .....
खरच ..हे असे आणखी किती दिवस चालणार?

हे कोणासाठी ? बातमीतल्यांसाठी की बातमी इथे देणार्‍यांसाठी ?

-(बातमी प्रेमी) टारोबा न्युजर

गणपा's picture

22 Sep 2009 - 1:45 pm | गणपा

सौदीतल्या या गुन्ह्यांच्या शीक्षा आपल्या कडेही आसाव्यात अस पहील्यापासुन वाटत.
जो पर्यंत ह्या गुन्हेगारांना अश्या कडक शीक्षा होत नाही तो पर्यंत दुर्दैवाने अश्या घटना घडत राहतील. X(

सुधीर काळे's picture

22 Sep 2009 - 5:56 pm | सुधीर काळे

न्यायालयात फटाफट निर्णय होऊन त्याची अमलबजावणीही फटाफट झाली तरच असले गुन्हे कमी होतील. पण आपल्या देशातील न्यायालयांत देर तो है ही, पर अंधेरभी?
Hope not!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

सुधीर काळे's picture

22 Sep 2009 - 5:57 pm | सुधीर काळे

न्यायालयात फटाफट निर्णय होऊन त्याची अमलबजावणीही फटाफट झाली तरच असले गुन्हे कमी होतील. पण आपल्या देशातील न्यायालयांत देर तो है ही, पर अंधेरभी?
Hope not!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

ऋषिकेश's picture

22 Sep 2009 - 11:34 pm | ऋषिकेश

या चौघांपैकी एक मनसेचा शाखा-उपाध्यक्ष असल्याचे IBN-लोकमत वर दाखवत आहे. असे असेल तर मनसे यातून धडा घूउन चाललेली खोगीरभरती थांबवेल अशी आशा करावीशी वाटते.

ऋषिकेश
------------------
मृत व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ व आरोपींच्या निषेधासाठी रेडीयो मौनात गेला आहे

प्राजु's picture

22 Sep 2009 - 11:47 pm | प्राजु

डिस्गस्टींग!!!
....................................................
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

हर्षद आनंदी's picture

23 Sep 2009 - 6:37 am | हर्षद आनंदी

इथे गोर्‍या माकडांचा ७ वर्षे सक्तमजुरी \ जन्मठेप हा न्याय होऊच शकत नाही. या गुन्ह्याला शिक्षा एकच : रांझे गावचा पाटील : १ -२ करा, बघा सगळे कसे थंड पडतात ते..

जिथे उघड्या डोळ्यांनी पडद्यावर नंगा नाच बघितला, साहिला जातो तिथे ही अपेक्षा जरा जास्तच!! पहिल्यांदा वाक-दृष्य पटावरील पुढारलेल्याच्या नावाखालचा बीभत्स प्रकार थांबवा, इथे कॉण्डमची जाहीरात निळ्या-चित्रफितीच्या जवळपास पोहोचते, मग काय सांगावे? प्रेम ही एक थिल्लर गोष्ट असुन, मला जे हवे (जी हवी) ते मिळालेच पाहिजे, मला नाही मग तुला ही नाही... घ्या!~

दिलीप वसंत सामंत's picture

23 Sep 2009 - 12:02 pm | दिलीप वसंत सामंत

लोकांना कायद्याची दहशत बसेपर्यंत.