चकोल्या

विशाखा बहुलेकर's picture
विशाखा बहुलेकर in पाककृती
21 Sep 2009 - 5:34 pm

चकोल्या
हा फार जुना पदार्थ आहे.
साहीत्य- कणीक,तेल,तूरडाळ,सुके खोबरे,मेथी दाणे,जिरे, लाल तिखट,मीठ,गूळ,हळद,हिंग,चींच,
क्रुती - कणीकेच्या चपात्या लाटून (भाजू नये) सुरीने १ इंच आकाराचे तुकडे कापावेत. तुरीची डाळ शिजवून घ्यावी.ती पळीने थोडी बारीक करून घ्यावी. कढईत तेल घालून त्यात मेथीदाणे,हिंग,ह्ळदीची फोड्णी करून्,त्यात डाळ,लाल तिखट
,मीठ,थोडा गूळ,चींच,भाजलेले जिरे खोबरे घालून उकळी आणावी.व कणकेचे तुकडॅ त्यात घालून शिजवावे. खाताना तूप घालावे.

प्रतिक्रिया

डॉ.प्रसाद दाढे's picture

21 Sep 2009 - 5:43 pm | डॉ.प्रसाद दाढे

ह्यालाच वरणफळं असेही नाव आहे. अप्रतिम पदार्थ आहे. थंडीच्या दिवसात रात्रौ गरम गरम खावा, सोबत एखादा भाजलेला पापडही असावा..

युयुत्सु's picture

21 Sep 2009 - 6:12 pm | युयुत्सु

चकोल्या हे नाव कोणत्या प्रदेशातले? मी याचे 'डाळफळ' असे नाव ऐकले आहे. आमच्या घराजवळील पोटोबा या उपाहारगृहात हा पदार्थ मिळतो.

-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------

विशाखा बहुलेकर's picture

26 Oct 2009 - 2:43 pm | विशाखा बहुलेकर

युयुत्सू यांचा अभिप्राय अप्रस्तूत आहे.ही पाकक्रुती किमान १०० वरषे जुनी आहे. मी शोधलेली नाही.

सहज's picture

21 Sep 2009 - 6:25 pm | सहज

विशाखातैं मिपावरच्या पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन.

वरणफळ, चकोल्या हा पदार्थ यापूर्वी दोन वेळा मिपावर लिहला गेला आले. दुवा १ , दुवा २

येउ द्या अजुन नवे पदार्थ. आणी हो, खवय्ये मिपाकर फोटो असलेल्या पाककृतींनाच भरभरुन प्रतिसाद देतात हा तर पुढच्या वेळेला फोटो जरुर टाका. :-)

रेवती's picture

21 Sep 2009 - 7:10 pm | रेवती

असंच म्हणते.

रेवती

क्रान्ति's picture

21 Sep 2009 - 7:49 pm | क्रान्ति

याला चकोल्या म्हणतात. पाणी फोडणीला घातल्यावर त्यात थोडी मुगाची दाळ घालून ती शिजवून घ्यायची, ती वरणफळं पण सुरेख लागतात.

क्रान्ति
आई उदे ग अंबाबाई

मस्त कलंदर's picture

21 Sep 2009 - 8:02 pm | मस्त कलंदर

मला ही वरणफळं कधीच्च आवडली नव्हती.. स्वयंपाकाची आवड असलेल्या माझ्या एका भावाने सुचवलेली अ‍ॅडिशन....
व्यवस्थित चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, नायलॉन शेव, तूप, नि फोडणीच्या कढईमध्ये तेलात परतलेलं थोडंसं तिखट नि लसूण.... हे सगळं हाताशी घेऊन बसायचं... नि हवं तसं वरण्फळामध्ये घालायचं.... अशी मस्त टेस्ट येते की माझ्यासारखी वरणफळाला नाकं मुरडणारे लोक पण आवडीने खातात...
ही आमची सजवलेली वरणफळे::

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

चकली's picture

21 Sep 2009 - 8:13 pm | चकली

चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, नायलॉन शेव, तूप, नि फोडणीच्या कढईमध्ये तेलात परतलेलं थोडंसं तिखट नि लसूण.....

आवडले..

चकली
http://chakali.blogspot.com

स्वाती२'s picture

21 Sep 2009 - 8:55 pm | स्वाती२

मस्त आयडिया! मलाही वरणफळ फारशी आवडत नाहीत. आता अशी सजावट केलेली बघेन खाऊन.

दिपाली पाटिल's picture

21 Sep 2009 - 9:18 pm | दिपाली पाटिल

खानदेशातही वरणफळांना चाकोल्या/चिखल्या म्हणतात...पण तिकडे अगदी साधा पदार्थ असतो हा...साधं वरण आणि त्यात कणकेचे विविध आकार बनवुन सोडायचे आणि वरुन साजुक तुप घेउन खायचे...याला सोबत करायला बर्‍याचदा मिरचीचा ठेचा, दाणे-लसुण चटणी किंवा पापडाचा खुळा (भाजलेला उडिद पापड+ दाणे-लसणाची चटणी + तेल) असतात... पण हे कांदा,टोमॅटो-शेव एक्दम भारी...करुन बघायला हरकत नाहीये... :)

दिपाली :)

केळ्या's picture

21 Sep 2009 - 9:15 pm | केळ्या

आम्हीही याला 'डाळफळं' म्हणतो,चापून खातो.सोबत पोह्याचा तळलेला पापडही झक्कास लागतो.खूपदा पक्वान्नं म्हणून केला जातो.

विशाल कुलकर्णी's picture

22 Sep 2009 - 10:30 am | विशाल कुलकर्णी

आमच्या घरी वरणफळे नेहेमीच असतात. आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात. पुलेशु.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पर्नल नेने मराठे's picture

22 Sep 2009 - 1:36 pm | पर्नल नेने मराठे

घरी दाल-फ्राय उरलेय बरेच कालचे :-?
आता हे वापरुन करुन पाहाते आज चाकोल्या ;)

चुचु

मसक्कली's picture

5 Oct 2009 - 2:24 pm | मसक्कली

यम्मि.... =P~

आमी रत्रि वरन शिल्लक रहिल कि सकाळी दाल डोकरी करतो...

वरनाला पुन्हा थोडस मोहरी,लसुन्,हिन्ग्,तुप घालुन फोड्णी द्यायची आन चपाति लतुन काप सोडायचे,,वरुन कोथिम्बिर 8>

वाउव्...मस्तच लगत्....तिखट डाळी पेक्शा वरनात खुप आवडत मला.... :D

मी तर आइ ला मुद्दाम शिल्लक टेवायला लवते वरण... >:)

पर्नल नेने मराठे's picture

5 Oct 2009 - 4:51 pm | पर्नल नेने मराठे

:T अग बै जरा शुध्द बोल कि
माझ्याकडे ये ट्युशनला ;)
मला बै कोणी अशुध्द बोलले कि गरगरायला होते असे >>> :O
:P
तुझ्या आईला त्यात चिन्च , गुळ न शेन्गदाणे घालायला सान्ग , सुरेख लागते.

चुचु

प्रभो's picture

5 Oct 2009 - 5:07 pm | प्रभो

चुचु... जबराच.. =))

--प्रभो

पर्नल नेने मराठे's picture

5 Oct 2009 - 5:09 pm | पर्नल नेने मराठे

;) :D
चुचु

सखाराम_गटणे™'s picture

6 Oct 2009 - 12:00 pm | सखाराम_गटणे™

ह्या दोन्गी प्रतिसादांना मिपाच्या मुक्प्रुष्तावर स्तान देण्यात येवे.